कालसुसंगत धर्मशास्त्र

संन्यस्त खड्ग's picture
संन्यस्त खड्ग in काथ्याकूट
29 Nov 2019 - 11:10 am
गाभा: 

d

हिंदू धर्मातील जुनाट कर्मठ चालीरीती , परंपरा आणि कालबाह्य , तर्कविसंगत शास्त्रनियम व रूढी फेकून देवून नवीन कालसुसंगत धर्मशास्त्र निर्मितीच्या प्रयत्नांकरिता हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !!!

धर्मशास्त्रात काही "स्थिर तत्त्वे" व काही "चल तत्त्वे'" आहेत असे म्हटले जाते . "कर्म" आणि "क्रिया" या भिन्न आहेत जसे की स्वतःच्या शारीरिक क्रिया म्हणजे जेवणे , न जेवणे , आंघोळ , शौचक्रिया इत्यादी . ह्या क्रिया म्हणजे कर्म नव्हे . कर्म तेव्हाच बनते जेव्हा त्या क्रियेमागे विशिष्ट हेतु अस्सतो . व त्या हेतुनुरूप ते कर्म चांगले अथवा वाईट ठरते .

स्थिर तत्त्वे जसे की मूलभूत नीतिशास्त्र कधीच बदलत नाही उदां. चोरी करणे , खोटे बोलणे , दुसऱ्या व्यक्तीला त्रास होइल असे वागणे हे पाप आहे हे नियम कधीच बदलत नाहीत . एका अर्थाने त्यालाच #कर्मविपाक नियम म्हणतात . म्हणूनच "पुण्य परोपकार पाप ते परपीडा" अशी वचने रूढ झाली .

चल तत्त्वे ही मुख्यतः क्रियेसंबंधी असतात . उदाहरणार्थ काय खावे , प्यावे , कुठे कुणाकडे खावे , काय केल्यास आंघोळ करावी इत्यादी . या चल तत्त्वात कालानुरूप बदल संभवतात . आणि तेच धर्मनियम मंडळाने बदलले आहेत .

पंचागकर्ते अनंत (मोहन) दाते यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात 'कालसुसंगत-आचारधर्म' या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. 'सध्याच्या काळातील जीवनव्यवस्था, विभक्त कुटुंब पद्धतीचा विचार करून २१ विद्वान अभ्यासकांनी एकत्र येऊन हा ग्रंथ तयार केला आहे. लोकमान्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विवेकशास्त्री गोडबोले, पंचांगकर्ते विद्याधर करंदीकर, श्याम जोशी, प्रभाकर पाध्ये, पंचांगकर्ते ओंकार दाते, अरुण वझे, प्रकाश दंडगे गुरुजी, बाळासाहेब दीक्षित, किशोरशास्त्री पाटणकर, विद्यावाचस्पती माधव केळकर, व. दा. भट, श्रीराम भट, वसंतराव गाडगीळ, वीरेंद्र कुंटे, धुंडीराज वेदपाठक आदी उपस्थित होते.

गिरी म्हणाले, 'ज्याला धर्माचे ज्ञान प्राप्त करायचे असेल त्याने वेदांचा आधार घ्यायला हवा; तेव्हाच खरा धर्म कळतो. ज्या ठिकाणी लौकिक प्रयत्न संपतात, त्या ठिकाणी वेदांतून अलौकिक प्रयत्नांतून सकारात्मक वलय निर्माण करता येते. धर्मातील नियम सोपे करून सांगणारे कोणीतरी हवे. ते सांगताना मूळ उद्देशाला धक्का न लागता आजच्या काळात त्याची सुसंगती कशी बसवता येईल याचा देखील विचार केला पाहिजे. आज धर्माचे मूळ विचार टिकविण्याची आवश्यकता आहे. भारतीय हिंदू वैदिक संस्कृती तेजाने तळपत आहे. अशी प्रभावी परंपरा सुरु राहीली तर देशाचे मांगल्य टिकेल,' असेही त्यांनी सांगितले.

विवेकशास्त्री गोडबोले म्हणाले, 'पूर्वीच्या ग्रंथाचे संदर्भ आज जसेच्या तसे वापरण्याला मर्यादा येतात. म्हणून या ग्रंथांचा मूळ उद्देश न बदलता, कालसुसंगत-आचारधर्म या ग्रंथाची मांडणी करण्यात आली आहे.' मोहन दाते म्हणाले, 'चाळीस वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहे. लोकांच्या शंकांचे निरसन करीत असताना ज्या ग्रंथांचा संदर्भ दिला जातो, ते ग्रंथ दोनशे ते पाचशे वर्षे जुने आहेत. त्यामुळे या नवीन पिढीसाठी विभक्त कुटुंबपद्धतीसाठी २१ व्या शतकातील २१ विद्वान अभ्यासकांनी एकत्र येऊन दोन वर्षे काम करून कालसुसंगत-आचारधर्म या ग्रंथाची मांडणी केली. यामध्ये पूर्वीचे काही नियम काळाप्रमाणे बदलले आणि काहीचे विश्लेषण केले. जन्म ते मृत्यूपर्यंतचे सगळे संस्कार या ग्रंथात आहेत.'

यापुढे जुनाट कर्मठ आणि मध्ययुगीन आंधळे धर्मनियम हिंदू समाजावर थोपणारी तथाकथित " शास्त्र " ग्रन्थ रद्दीत काढून कालसुसंगत आचारधर्माचे पालन करणे नक्कीच सोपे पडेल .

" कालसुसंगत आचारधर्म "
मूल्य - रुपये - १५०/-
ग्रन्थ उपलब्धता - दाते पंचांग .
पुणे - ०२०-२४४४४६२३
सोलापूर - ०२१७-२६२५३०९

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

29 Nov 2019 - 11:52 am | जॉनविक्क

जेंव्हा जेंव्हा तथाकथित धर्मशास्त्र वगैरे वगैरे यच्चयावत मानवी मनाच्या फक्त वरवरच्या क्रियेमध्ये ढवळा ढवळ करण्यातच समाधान पावेल त्यातून पुन्हा पून्हा फक्त पाखंड जन्माला येईल... मग त्याचे लेबल कोणतेही असो.

मुक्त विहारि's picture

29 Nov 2019 - 2:43 pm | मुक्त विहारि

सुरवात तर केली. ...

रोम एका दिवसात बांधून पूर्ण झाले नाही. ..

तिथेही एक धर्मपरिषद चालू होती, कोणीतरी महान वयक्ती तिथे माईकवर उपदेश करत होती की जर एक विवाहित स्त्री स्वखुशीने दुसऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवत असेल तर त्यासाठी ती दोषी ठरवता येणार नाही कौतुक वाटले रोम उभारणीचे...

किमान कायद्याचा मान तर राखला जातोय धर्माकडून :)

कधीतरी कुंभातले चार थेंब उडवा इकडे.

महाकुंभ न्हवता त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या जरा विरस झाला पण शाही स्नानाचा पहिला मान ज्या आखाड्याला होता नेमकी तिथेच आमची सोय झालेली असल्याने अंघोळीनंतर ओलेत्या अंगाने आम्ही सद्गुरू(?) मुलाखत देत असताना त्यांचे सोबती म्हणून टिव्हीवरही झळकलो आहोत हे खरे.

उत्कृष्ट नियोजन दर अडीच तासांनी सर्व रस्त्यांची झाडलोट, दर 100 मीटरवर दुतर्फा पिण्याच्या पाण्याचे नळ, दर 500 मिटरवर स्वच्छ राखलेली स्वच्छतागृहे यामुळे कचरा दिसायला सोडा वासालाही सापडत न्हवता याबद्दल योगी आदित्यनाथ सरकारचे करू तितके कौतुक कमीच. अर्थात हा त्रिवेणी संगमचा परिसरच गावाबाहेरील विस्तीर्ण वाळवंटी असल्याने नाशिक, हृषीकेश, उजैन पेक्षा व्यवस्था राखणे तुलनेत सोपे होते पण तरीही आतापर्यंतचे सर्वोत्तम कुंभ नियोजन होते यात वाद नाही, लवकरच निवडणूका होत्या त्यामुळे आतूनच सर्वांना यावेळी कोणताही गडबड गोंधळ व तंटे नकोत असे निरोप गेल्याची अफवा सत्य वाटावी इतके कटकटी विरहित शाही स्नान झाले. बाकी शाही स्नानाचा मान ऑन पेपर कोणाचा पहिला हे सुद्न्य लोकं समजून जातील, सुद्न्य नाहीत त्यांनी तसेही ते समजून घ्यायची आवश्यकता नाही :) ऑन पेपर मसल पावर वापरता येत नसते हे लक्षात घ्यावे, व पहिला मानाचे बेनिफिट समजून घेतले की नक्की काय ते उमजुन येईल आमचे सद्गुरूंनी त्यात बाजी मारली हा आमच्यासाठी सुखद अपघात त्यामुळे कमांडोच्या बंदोबस्तात विणाकटकट स्नान होऊ शकले. त्या नंतर इतरांना संगमावर नदीत शिरायचा मार्ग मोकळा झाला.

आपल्या आर्थिक कुवती नुसार तंबू मिळत होते, संगमाच्या जितकं जवळ तेव्हडी बोली जास्त, काही नागासाधूंनी त्यांच्या तंबूत लाईट घेतली न्हवती तिथे रात्री चक्कर टाकणे फार थ्रिलिंग प्रकरण होते, सर्वत्र मिट्ट अंधार, त्यात काही अंतरावर यांच्या धुनी, भोवताली हे सर्व दिगमबर अवस्थेत त्यांच्याच तारेत बसलेले बघून आपण टाइम ट्रॅव्हल करून चाकाचाही शोध न लागलेल्या युगात तर आलो नाही ना असा भास व्हायचा :) अतिशय गूढ वातावरण. यावेळी प्रथमच किन्नर आखाडा समाविष्ट झाला होता, तसेच एक ठिकाणी गजेंद्र चोहान पासून सर्व कलाकार जमा करून त्यांचे कडून रंगमंचावर महाभारतातील विविध प्रसंग लाईव्ह सादर करण्यात येत होते तिथं मजा आली, बाकी फिरण्यात आख्खा दिवस कसा जाई समजून येत नसे साधारण मग संध्याकाळी जिथे असू तेथून रिक्षाने परत मुक्कामी येत असू. तरीही सर्व परिसर फिरून झाला नाही च.

मंदार कात्रे's picture

30 Nov 2019 - 6:59 pm | मंदार कात्रे

एक स्वतन्त्र धागा काढून त्यात विस्तॄत पणे लिहा सर्व अनुभव .

कंजूस's picture

30 Nov 2019 - 9:34 pm | कंजूस

धन्यवाद.

एका हाताची पाच बोटे सारखी नसतात.

कंजूस's picture

29 Nov 2019 - 3:53 pm | कंजूस

१) पण नक्की काय ठरवले?
२) आचार संहिता ठरवण्यासाठी शिखर समिती तयार झाली का? संपूर्ण भारतासाठी एक नेमायला हवी मग पुढे.
३) काय रद्द केले?
हे जरा सविस्तर सांगणार का? बातमी २०१७ सालातली आहे.

मंदार कात्रे's picture

29 Nov 2019 - 8:40 pm | मंदार कात्रे

नुकताच हा ग्रन्थ मागवला होता . काही दिवसापूर्वी थोडासा चाळलाय . सुतक व सुवेर यासंबंधित नियम बदलले आहेत . अन्य ही बऱ्याच गोष्टीबाबत सुधारक मतांचा स्वीकार केल्याचे जाणवते . उदा . मासिक पाळी वगैरे बाबतीत काळानुसार पाळणूक शक्य नसल्याचे मान्य केल आहे .

श्वेता२४'s picture

30 Nov 2019 - 11:02 am | श्वेता२४

दाते पंचांग यांच्या संकेतस्थळावर ऑनलाईन बुक्स या विभागात तरी हे पुस्तक दिसून येत नाही. ऑनलाईन मागविण्याकरीता इतर काही पर्याय आहेत का? मुंबईत हे पुस्तक कुठे मिळेल?

मंदार कात्रे's picture

30 Nov 2019 - 4:41 pm | मंदार कात्रे

Book Price 150/- plus courier charges

Date Panchang
Whatsapp : 9922111489

Payment Details:

Date and sons
A/c. No. 11158190000030
HDFC Bank
For next/Rtgs Ifsc : HDFC 0001115
karve nagar br. Pune

श्वेता२४'s picture

30 Nov 2019 - 5:17 pm | श्वेता२४

.

शा वि कु's picture

30 Nov 2019 - 9:54 pm | शा वि कु
शा वि कु's picture

30 Nov 2019 - 9:54 pm | शा वि कु
शा वि कु's picture

30 Nov 2019 - 9:55 pm | शा वि कु