साहित्य - एक वाटी मक्याचे दाणे, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी बारीक केलेला गूळ, वेलचीपूड, केशर.
कृती - मक्याचे दाणे व दूध एकत्र मिक्सरमधून वाटून घ्यावे. त्यात गूळ विरघळवून घ्यावा. वेलचीपूड व केशर घालावे. एरवी खरवसासाठी चीक उकडून घेतो त्याप्रमाणे शिटी न लावता कुकरमध्ये उकडून घ्यावे. गार झाल्यावर वड्या कापाव्यात. सध्या जवळजवळ वर्षभर स्वीटकॉर्न उपलब्ध असल्याने झटपट करता येण्याजोगा हा पदार्थ आहे. लहान मुलांनाही आवडेल.
प्रतिक्रिया
11 Jun 2008 - 5:15 pm | ऋचा
मक्याचं पण असं करता येत हे माहीत नव्हतं
खरच सोपी आणि साधी पा.कृ. आहे
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
11 Jun 2008 - 5:37 pm | विजुभाऊ
याला कॉर्न पूडींग असेही म्हणतात
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
11 Jun 2008 - 5:58 pm | स्वाती राजेश
कॉर्न पुडिंगच हे...:)
मस्त आहे रेसिपी.
14 Jun 2008 - 1:28 am | विसोबा खेचर
सहमत आहे,
पाकृ आवडली, अजूनही येऊ द्या..
तात्या.
11 Jun 2008 - 7:00 pm | स्वाती दिनेश
कॉर्न पुडिंगचे धर्मांतरित नाव आवडले,पुडिंगही आवडते.:)
योगिता मिपावर स्वागत..
स्वाती
14 Jun 2008 - 8:07 am | यशोधरा
हे करुन बघेन आज.. सोप्पं आहे करायला! योगिताताई, धन्यवाद या पाककृतीबद्दल
26 Mar 2009 - 2:19 pm | hemuu
लय भारी
26 Mar 2009 - 4:04 pm | जागु
वा साधी, सोप्पी, छान रेसिपी.