हस्तर आडाखे विधानसभेचे

हस्तर's picture
हस्तर in काथ्याकूट
24 Oct 2019 - 4:28 pm
गाभा: 

१) समजा युती झाली नसती तर
भाजप तोंडावर आपटली असती ,पण आता शिव सेना जास्त हळहळ करणार bargaining पॉवर कमी झाली

२) आयारामानं प्रवेश दिला नसता तर
कदाचित ३ ४ जागा गेल्या असत्या पण भ्रस्टाचार विरोधी आणि शुद्ध पक्ष म्हणून भाजप ची छबी टिकून राहिली असती

पुढे काय
१) evm च्या नावाने गळे काढणे आणि अनाकलनीय शब्द परत एकदा
२) आदित्य ठाकरे उ मु यावर ५ वर्षे करमणूक
३) शरद पवार लाईम लाईट मध्ये आले खरंच ,काँग्रेस आघाडीचे अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी कडून पद त्यांच्याकडे येणारच
४) निदान आता तरी राज्यस्तरीय प्रश्न हाताळले जातील व लोकल निवडणुकीत देशभराचे प्रश्न येणार नाहीत ,मतदारांना गृहीत धरणार नाहीत

सरकार गडगडण्याचा थोडी शक्यता आहे ५ वर्षात

प्रतिक्रिया

क्र ३ - लोभ असावा. पण तिकडून सुटणार नाहीच.

प्रसाद_१९८२'s picture

24 Oct 2019 - 6:23 pm | प्रसाद_१९८२

१) समजा युती झाली नसती तर
भाजप तोंडावर आपटली असती ,पण आता शिव सेना जास्त हळहळ करणार bargaining पॉवर कमी झाली

--

हे कसे शक्य आहे ?
उलट भाजपाच्या जागा कमी झाल्याने शिवसेनेची bargaining पॉवर वाढली आहे. आताच झालेली उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पाहा !

मात्र असे असले, तरी भाजपा पुन्हा सेनेच्या तोंडाला पाने पुसण्याची शक्यताच जास्त आहे. कारण सेना-राष्ट्रवादी मिळून सत्तेत येऊ शकत नाहीत व कॉंग्रेसला इतर राज्यात तथाकथित धर्मनिरपेक्षतेचा बुरखा चढवून निवडणुका लढवायच्या असल्याने, शिवसेनेबरोबर ते जाणार नाहित. मग सेनेपुढे पर्याय काय राहिला? तर फाटलेले राजीनामे खिषात ठेऊन पुढील पाच वर्षे भाजपाच्या मागे फरफटत जाणे.

हस्तर's picture

24 Oct 2019 - 6:44 pm | हस्तर

मला वाटले युती असल्याने पाठिंबा अनिवार्य आहे
तरी पण बार्गेनिंग पॉवर कमी आहे
१) कमी उमेदवार असल्याने जागा कमी निवडून आले, वेगळे लढवले असते तर स्ट्राईक रेट वाढला असता आणि पाठिंबा मिळाला असतात
२) आता पत्रकार परिषद घेतलयने सरळ सरळ हेच दिसते कि सेना वेळ पाहून अडवणूक करत आहे ,आधीच डरकाळी फोडली असती तर गोष्ट वेगळी
३) राष्ट्रवादी ने शिव सेनेला पाठिंबा देणार नाही असे म्हटलेय ,गर्भित अर्थ भाजप ला पाठिंबा मिळणार

अपक्ष आणि फोड फोडी करून सत्ता सेने शिवाय मिळवता येईल

लोकल विकास अनिवार्य आहे, पायाभुत सुविधा, सर्व घटकांना समान न्याय. ह्या गोष्टीकडे जर भाजपाने लक्ष दिले नाही तर २०२४ ला पुन्हा राष्ट्रीय मुद्द्यांवर निवडनुक लढवायला गेल्यास ह्या वेळी पेक्षा जास्त नुकसान होयील २०२४ ला.
सो कामाला लागले पाहिजे बिजेपी ने.

बाकी शरद पवार हे कसलेले राजकारणी आहेत, ते कोणाला आवडु वा ना आवडु त्यांच्या सारखा राजकारणी आता तरी महाराष्ट्रात नाही.

बाकी भाजप म्हणजे स्वछ प्रतिमा, हे आधी ही नव्हतेच, पण कॉन्ग्रेस राष्ट्रवादी सारखा भ्रष्टाचार त्यांनी केला नसल्याने किंवा करता येत नसल्याने ते ह्यांच्या मानाने स्वच्छ असे मान्य.
अंबानी, अदानी, भांदवलशाही राजकारण हे भ्रष्टाचार दिसत नसला तरी त्या आडुन काय चालले आहे हे लोकांना कळत नाही असे बीजेपी ने समजु नयेच..

बाकी आता इतर अपक्ष २९-३० अस्तील, मग ते भ्रष्ट असु किंवा नसु ते बीजेपी ओढेलच हे मी जाहीर पणे सांगतो.. त्यामुळे साम दाम दंड भेद वापरणारे बिजेपी स्वच्छ नाहीच.

त्यामुळे विकास केला नाही आता तर अवघड असेल नंतर. कारण ५ वर्षे कमी म्हणता येइल पण १० वर्षे कमी म्हणता येणार नाही.

सुबोध खरे's picture

25 Oct 2019 - 9:23 am | सुबोध खरे

बाकी शरद पवार हे कसलेले राजकारणी आहेत, ते कोणाला आवडु वा ना आवडु त्यांच्या सारखा राजकारणी आता तरी महाराष्ट्रात नाही.

गेल्या १० वर्षात चौथ्या क्रमांकाहून पहिल्या क्रमांकावर पक्ष आणणारे, सलग दुसऱ्यांदा १०० हून अधिक आमदार निवडून आणणारे देवेंद्र फडणवीस हे अपयशी, कमनशिबी ईत्यादी ईत्यादी..

गेल्या ५० हून अधिक वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचे सर्वेसर्वा असणारे, ४ वेळेस मुख्यमंत्री असतानाही एकदाही कार्यकाळ पूर्ण करु न शकणारे, एकहाती सत्ताचं काय, ५०-६० आमदारचं जेमतेम निवडून आणू शकणारे शरद पवार हे मात्र तेल लावलेले पैलवान, ७९ वर्षी पक्षाला बळकटी, सर्वाधिक यशस्वी, चितपट करणारे आदी आदी..

पगारी भाट कोणाला कसे तोलतील, तेचं जाणो..!

हस्तर's picture

25 Oct 2019 - 12:35 pm | हस्तर

गेल्या १० वर्षात चौथ्या क्रमांकाहून पहिल्या क्रमांकावर पक्ष आणणारे, सलग दुसऱ्यांदा १०० हून अधिक आमदार निवडून आणणारे देवेंद्र फडणवीस हे अपयशी, कमनशिबी ईत्यादी ईत्यादी..

>> नेते नमो आहेत ,लाट नामोंची आहे ,सभा नमो च्या झाल्या ,श्रेय मात्र फडणवीसांना

गेल्या ५० हून अधिक वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचे सर्वेसर्वा असणारे, ४ वेळेस मुख्यमंत्री असतानाही एकदाही कार्यकाळ पूर्ण करु न शकणारे, एकहाती सत्ताचं काय, ५०-६० आमदारचं जेमतेम निवडून आणू शकणारे शरद पवार हे मात्र तेल लावलेले पैलवान, ७९ वर्षी पक्षाला बळकटी, सर्वाधिक यशस्वी, चितपट करणारे आदी आदी..

>> आता पूर आलयावर पण आपत्ती व्यवस्थापन साठी शरद पवारांची आठवण काढली जाते ,बाकी महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद ५ वर्षे काढणे किती अवघड आहे हे मनोहर जोशी ,अशोक चव्हाण ,सुशीलकुमार शिंदे यांना विचार

ह्यांपैकी कोणीही दोनदा मुख्यमंत्री बनलेला नाहीये ,शंकर राव चव्हाण फक्त झाले आणि वसंत राव नाईक ,बाकी श पा ४ वेळा हा पण विक्रम आहे

गणेशा's picture

25 Oct 2019 - 1:01 pm | गणेशा

सुबोध जी,

तुम्ही म्हणता त्यात खोट आहे असे मी म्हणत नाहीच.
त्यात पुर्ण ५ वर्षे भुषविलेले मुख्यमंत्रीपद, पुन्हा १०० + आमदार निवडुन आणल्याबद्दल आपले माननिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासुन अभिनंदन पुन्हा मी करतो.

पण तुम्ही शरद पवारांवरच्या लाईन्स वर बोलला
आणि ह्या खालील लाईन्स सर्वात महत्वाच्या होत्या आणि त्या व्यव्स्थीत हताळाल्या गेल्याच हव्यात.

लोकल विकास अनिवार्य आहे, पायाभुत सुविधा, सर्व घटकांना समान न्याय. ह्या गोष्टीकडे जर भाजपाने लक्ष दिले नाही तर २०२४ ला पुन्हा राष्ट्रीय मुद्द्यांवर निवडनुक लढवायला गेल्यास ह्या वेळी पेक्षा जास्त नुकसान होयील २०२४ ला.

पगारी भाट असे सरसकट सगळ्यांना एकाच तराजुत तोलणे खरे तर मला योग्य वाटत नाही.

तुमच्या या रिप्लायमुळे मी पुढील लिखान ह्या दुर्लक्षित केलेल्या मुद्द्यावर विस्तारीत बोलण्याचा प्रयत्न करतो..

बाकी शरद पवार कसलेले नाहीत हे तुम्ही म्हणु शकता..
पण त्यांनी दरवेळेस दिलेले नव नविन नेते, तसेच गेल्यावेळेस(२०१४) निवडुन आलेल्या आमदांनी सोडलेली साथ आणि पुन्हा राहिलेल्या १७ आमदारांमधुन परत ५५ आमदार आणणे आणि तेही मरगळ प्राप्त झालेल्या जोडीदारासोबत . कोणी दूसरे असते तर येव्हडी उभारी घेण्याची ताकद त्यांच्यात नक्कीच नसती.
मोदींचा देशातील करिश्मा, ३७० , पाकविरोधी कारवाया यामुळे भाजपा हा शक्तिशाली वाटत होताच , त्यात महराष्ट्रात मेगाभरती यामुळे समोर पैलवान नाहीच , अब की बार २२० पार, हा अहंकार त्यानी तितक्याच ताकदीने परतवला आहे. ह्या बाबत तरी दुमत नसावे.

बाकी पहिल्यांदा शरद पवार मुख्यमंत्री झाले(१९७८) त्याला जनता पक्षाने पाठिंबा दिला होता, तसेच २०१४ ला भाजपा ला बाहेरुन पाठिंबा देवु असे म्हणुन शिवसेनेला कोंडित टाकणारा राजकारणी, २०१४ ला बारामतीतुन पवार हद्दपार करा ह्या मोदींच्या विधानानंतर ही निवडनुकीनंतर बारामतीत जावुन चर्चा करणारे मोदी , वसंत दादा शुगर फॅक्टरी(लोणी काळभोर आणि थेऊर जवळ) मध्ये मोदींनी, शरद पवार हे माझे राजकिय गुरु आहेत असे केलेले विधान यावरुन , शरद पवार यांच्या सारखा राजकारणी आता महाराष्ट्रात नाही असे मी विधान केले होते.

जॉनविक्क's picture

25 Oct 2019 - 10:17 pm | जॉनविक्क

बाकी शरद पवार हे कसलेले राजकारणी आहेत, ते कोणाला आवडु वा ना आवडु त्यांच्या सारखा राजकारणी आता तरी महाराष्ट्रात नाही.

हे अपूर्ण विधान आहे, पण हो ते अर्धसत्य असले तरी त्याची राजकीय किंमत तितकीच लाखमोलाची आहे हे मात्र खरे च.

ईवीएम वर बोलायलाच नको , पण जर येव्हडा विरोध कायम होत असेल तर कर नाही तर डर कशाला ह्या वरुन पुन्हा बॅलेट पेपर आणले तर योग्य होयील हे माझे वयक्तीक मत. कदाचीत ते पटणार नसेल तर सोडुन द्यावे

सुबोध खरे's picture

25 Oct 2019 - 9:26 am | सुबोध खरे

विरोधकांना बऱ्यापैकी जागा मिळाल्यामुळे

इ व्ही एम रडारडी चा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे

संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

विरोधी पक्ष मजबूत झाला हे ह्या निवडणुकीचे सर्वात मोठे फलित आहे.
शिवसेना नेहमी रुसून बसेल आणि तिचं
Bjp ला ऐकावाचे लागेल .
बायको जशी माहेरी जाण्याची धमकी देते तशी धमकी सेना देत राहील.

बीजेपी शिवसेनेचे ऐकायचा हा बाळासाहेंबाचा काळ होता.
आता मोदींच्या काळात शिवसेनेला रखडत मागे जावे लागते, खिशात राजिनामे ठेवुन गपचुक सरकार मध्ये रहावे लागते..

सुबोध खरे's picture

24 Oct 2019 - 8:10 pm | सुबोध खरे

शिवसेनेने जर एकदा युतीतून बाहेर पडून काँग्रेस राष्ट्रवादीशी संग केला तर त्यांचा अर्धा जनादेश नाहीसा होईल आणि त्यातून परत उभे राहणे कठीण होऊन बसेल. कारण हिंदुत्व वाद आणि कॉ /राकॉ चे मुस्लिम लांगुलचालन हे विळ्याभोपळ्या सारखे आहे. एखाद्या शहरात चालूनही जाईल पण राज्यभरात चालणार नाही.

काही लोक खाजगीत बोलताना आढळतात कि शिवसेनेला आता या दोघांचा पाठिंबा घेऊन सरकार बनवू द्याच. ते वर्ष दोन वर्षात पडेलच आणि मग शिवसेनेला उठून उभे राहणे कठीण जाईल. कारण मूलभूत वैचारिक विरोध आहे. त्यातून कॉ/ रा कॉ च्या डागाळलेल्या नेत्यांच्या विरोधात चालू असलेले खटले एकदा पूर्णत्वाला गेले कि असे सरकार चालवणे कठीण होईल.

विजुभाऊ's picture

24 Oct 2019 - 8:30 pm | विजुभाऊ

शिवसेना ही पूर्ण अपाँर्च्युनिस्ट आहे. पूर्वीपासूनच
एके काळी तीला वसंत सेना म्हणायचे.
आताही फार काही वेगळे नाही
खिशात राजीनामै ही गुरगुर मोदी ओळखून आहेत
उद्धव ठाकरे भाजपला खिंडीत पकडू पहात आहेत
पण जर भाजपने तुमचा पाठिंबा नको असे म्हंटले तर तर त्यावर त्यांच्याकडे काहीच उत्तर नसेल.
एकुणातच काहीच धोरण नसणे हे शिवसेनेचे धोरण
त्याना अजूनही महाराष्ट्राच्या प्रष्नांची जाण नाहिये
मुंबई आणि ठाणे यांच्याबाहेर जग आहे हे शि
वसेनेला माहीतच नाही

शिवसेना आणि bjp ला एकत्र रहावाच लागेल .
सेने नी स्वार्थ पायी काँग्रेस आघाडीचा पाठिंबा घेतला तर सरकार बनेल पण पुढे शिवसेना कमजोर होईल
तीच स्थिती bjp ची आहे .
महाराष्ट्र ला पण ते आवडणार नाही.
जातीयवाद महारष्ट्र घपवून घेणार नाही हे वंचित आघाडीची अवस्था बघून म्हणता येईल.
एक गोष्ट कोणाच्या नजरेत आली नाही असं वाटतंय .
मुंबई मध्ये उत्तर भारतीय लोकांचा महाराष्ट्र च्या विधान सभेत प्रवेश सेना bjp युती रोखत आहे ते ह्या राज्याच्या हिताचेच आहे .
गुजराती,मारवाडी,मराठी मतांच्या जोरावर उत्तर भारतीय लोकांचे निकृष्ट राजकारण वर बऱ्या पैकी नियंत्रण आले आहे
काँग्रेस च्या वेळी सिंग,तिवारी,निरुपम जास्तच फडफडत होते

सुबोध खरे's picture

25 Oct 2019 - 9:48 am | सुबोध खरे

काँग्रेस काही केल्या शिवसेनेबरोबर जाणार नाही कारण सर्वात कमी जागा त्यांना असल्यामुळे त्यांना या युतीतून फारसा फायदा होणार नाही पण राष्ट्रीय पातळीवर मात्र सर्वत्र मुस्लिम डावे पुरोगामी सेक्युलर लोकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध सहन करावा लागेल त्यामुळे श्रीमती सोनिया गांधी अशा युतीला कदापि मान्यता देणार नाहीत.

राहून राहीले राष्ट्रवादी आणि इतर खोगीरभरती ज्यांचे मिळून काही आमदार १४४ च्या वर जात नाहीत.

त्यातून एम आय एम, मनसे,कम्युनिस्ट काही शिवसेनेबरोबर जाणार नाहीत.

फारच मरमर करून काँग्रेस चा बाहेरून पाठिंबा घेऊन राष्ट्रवादी बरोबर युती करून शिवसेनेने "आपला मुख्यमंत्री" आणला तर हे औट घटकेचे राज्य किती टिकेल हा प्रश्न आहे त्यातून आदित्य ठाकरे सारख्या अतिशयच तरुण आणि अननुभवी मुख्यमंत्र्याच्या हाताखाली काम करायला किती दिग्गज तयार होतील हा प्रश्न आहेच.

मग यापेक्षा आदित्य याना उपमुख्यमंत्रीपद देऊन पाच वर्षे भाजपवर वचक ठेवून राज्य करणे जास्त सोयीस्कर होईल.

तेंव्हा भाजपबरोबर जितकी रस्सीखेच करता येईल तितकी करणे त्यांना आवश्यक आहे. अन्यथा भाजपला आपले १०५ अधिक १३ अपक्ष आणि काही इतर लहान पक्ष मिळून सव्वाशे ते १३० आमदार मिळतील शिवाय या तीन पक्षातील "बाहेरून पाठिंबा" देणारे आमदार घेऊन त्यांना बहुमत सिद्ध करता येईल.

कोणत्याच लहान पक्षाला किंवा अपक्ष आमदारांना फेरनिवडणूक करणे अजिबात परवडणारे नाही आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी तिहेरी आघाडी (यदाकदाचित) झाली तरी त्यांना कोणी कुत्रं विचारणार नाही कारण तिघांचे मिळून १५४ आमदार होतात

म्हणजे शिवसेनेने कितीही आव आणला तरी त्यांना भाजप शिवाय पर्याय नाही हि वस्तूस्थिती आहे.

बाकी साहेब यंव करतील त्यंव करतील या गमजा मारु द्या. त्यांच्याच्याने अजून काही क्रांती होणार नाहीये.

शेवटच्या मॅच मध्ये ५४ रन काढल्या. आता त्यांनी सन्मानाने निवृत्त व्हावे हेच श्रेयस्कर आहे.

सरकार बिजेपी आणि शिवसेनेचेच येणार आहे.
शरद पवार यामध्ये यावेळेस येणारच नाही हे मी स्पष्ट पणे सांगतो. कारण विरोधी पक्षाची भक्कम कामगिरी करुन ते पुढच्या निवडनुकीला सामोरे जातील .
आणि शिवसेनेला आता पुन्हा सरकार मध्ये राहुन विरोधी पक्षासारखी भुमिका यावेळेस मात्र करता येणार नाही .

तेंव्हा भाजपबरोबर जितकी रस्सीखेच करता येईल तितकी करणे त्यांना आवश्यक आहे. अन्यथा भाजपला आपले १०५ अधिक १३ अपक्ष आणि काही इतर लहान पक्ष मिळून सव्वाशे ते १३० आमदार मिळतील शिवाय या तीन पक्षातील "बाहेरून पाठिंबा" देणारे आमदार घेऊन त्यांना बहुमत सिद्ध करता येईल.

बाकी भाजपा, मेगाभरती प्रमाणे अपक्षांचा पण पाठिंबा घेइन, पण इतर लहान पक्ष त्यांना पाठिंबा देणार नाहीत असे मला वाटते, कारण जे भाजपा चे लहान मित्र पक्ष होते ते कमळ या चिन्हावरुनच लढले आहेत, आणि शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी पक्ष, मनसे हे भाजपाला पाठिंबा देणार नाही.आणि कॉन्ग्रेस , राष्ट्रवादी चे आमदार ही बाहेर पाठिंबा देणार नाहीत.
त्यामुळे भाजपा आणि शिवसेना हेच सत्तेत येतील, बाकी ते कसे येतील .. काय होयील हे मात्र येणारा काळ ठरवेल.
आणि पहिल्यांदाच निवडुन आलेले ठाकरे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदाचे उमेदवार पण नसतील असे मला वयक्तीक वाटते.. त्यांना कर्तुत्व सिद्ध करण्यास शिवसेना वेळ देइन असे मला वयक्तीक वाटते

ओम शतानन्द's picture

25 Oct 2019 - 4:45 pm | ओम शतानन्द

भाजप ला १०० जागा मिळाल्या त्या केंद्रात मोदी सरकार आहे म्हणून
लोक भाजप ला मत देतात ते मुख्यत्वे हिंदुत्व आणि मोदी यामुळे ,
गेल्या पाच वर्षात भाजपने लोकांच्या दैनदिन आयुष्याशी निगडीत असलेल्या कुठल्याही समस्या सोडविल्या नाहीत - रस्ते खड्डेयुक्त पूर्वी होते आताही आहेतच, ,हमी भाव नाही , रोजगार कमी होतायत ,टोल पासून सुटका नाही उलट नवीन टोल लावायची तयारी आहे , वाहतूक समस्या गंभीर होत चाललीये त्यावर उपाय नाही ,शिक्षण क्षेत्रात सुधारणा दूरच नवीन गोंधळ करून ठेवले , सिंचन घोटाळा किंवा अन्य कुणाही भ्रष्टाचार्यावर कारवाई केली नाही , गेल्या कार्यकाळात सत्ता होती पण काहीही भरीव कामगिरी करता आलेली नाही , आता ज्या जागा मिळाल्या त्या केंद्रात असलेया सरकारच्या कामगिरीमुळे . यापुढील निवडणुकीत सत्ता मिळायची सुतराम शक्यता नाही . शेवटची संधी आहे कमाई करायची .

Bjp चा देशाच्या विकास शी काही ही संबंध नाही.
पाणी योजना,सिंचन योजना आणि हा असंख्य देशांनी बनलेला कृत्रिम भारत देश आता पर्यंत टिकवायचे काम काँग्रेस नी केले आहे हे नाकारता नाही येत नाही .
एक भाषा एक देश
आणि अश्या फालतू घोषणे मध्ये पाहिले राजकारणी अडकले नाहीत म्हणून हा एकसंघ देश दिसत आहे .
एक देश एक;;;!!!!!
ह्याचा कधीच विचार करू नका नाही तर ५६, देश तयार होतील

Bjp चा देशाच्या विकास शी काही ही संबंध नाही.
पाणी योजना,सिंचन योजना आणि हा असंख्य देशांनी बनलेला कृत्रिम भारत देश आता पर्यंत टिकवायचे काम काँग्रेस नी केले आहे हे नाकारता नाही येत नाही .
एक भाषा एक देश
आणि अश्या फालतू घोषणे मध्ये पाहिले राजकारणी अडकले नाहीत म्हणून हा एकसंघ देश दिसत आहे .
एक देश एक;;;!!!!!
ह्याचा कधीच विचार करू नका नाही तर ५६, देश तयार होतील

Bjp चा देशाच्या विकास शी काही ही संबंध नाही.
पाणी योजना,सिंचन योजना आणि हा असंख्य देशांनी बनलेला कृत्रिम भारत देश आता पर्यंत टिकवायचे काम काँग्रेस नी केले आहे हे नाकारता नाही येत नाही .
एक भाषा एक देश
आणि अश्या फालतू घोषणे मध्ये पाहिले राजकारणी अडकले नाहीत म्हणून हा एकसंघ देश दिसत आहे .
एक देश एक;;;!!!!!
ह्याचा कधीच विचार करू नका नाही तर ५६, देश तयार होतील

तुम्ही धाग्याच्या नावात तुमचे नाव का ठेवतात?
चांगले दिसत नाही ते.

विजुभाऊ's picture

27 Oct 2019 - 3:18 pm | विजुभाऊ

नाव ठेवायला जागा राहू नये म्हणून असेल ते.
असो

शिवसेचेचा वैचारीक वकूब कळून चुकला आहे.
त्याना केवळ तात्कालीक फायदा दिसतोय.
महाराष्ट्राचा भुगोलही माहीत नसणार्‍या अदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करणे हे आत्मघातक ठरेल.
सेने कडे स्वतःच्या बळावर शंभर आमदार निवडून आणणे इतके बळ कधीच नव्हते. त्यांची तेवढी वैचारीक बैठकही नाहिय्ये.
आत्ता देखील ५० + जागांचे जे यश मिळाले आहे ते भाजपच्या पाठिंब्यामुळे.
सेने बरोबर युती करून भाजपने मिळवल्या त्यापेक्षा अधीक त्याम्नी एकट्याने लढून मिळवल्या असत्या.
शिवसेना नेते हे उ प्र मधे ब स पा च्या मायावती प्रमाणे वर्तणूक करीत आहेत.
त्यातून त्यांच्याबद्दल मतदारांना रागच वाढीला लागणार आहे.
समजा कोणाचेच सरकार स्थापले गेले नाही आणि पुन्हा निवडणुका लागल्या तर तो संपूर्ण दोष सेनेचा असेल.
मराठी मनातून त्यावेळेस शिवसेना कायमची पुसून गेलेली असेल .
केंद्रातदेखील शिवसेना बाजूला फेकली जाईल. ते त्यांचे कायमचे नुकसान असेल

रमेश आठवले's picture

27 Oct 2019 - 9:08 pm | रमेश आठवले

सेनेनी असाच ताठरपणा चालू ठेवला तर फडणवीस आपणहुन सरकार स्थापन करण्याचा दावा करणार नाहीत. रिवाजा प्रमाणे राज्यपाल काही दिवसांनंतर , सगळ्य्यात मोठ्या पक्षाचे नेते असल्याने ,त्यांनाच सरकार बनवण्यासाठी पाचारण करतील आणि त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगतील. फडणीसांनी असा प्रस्ताव मांडला तर खालील पर्याय उपलब्ध असतील.
१. शिवसेना बाहेर राहुन समर्थन करेल.
२. शिवसेना विरोध करेल पण पवार पक्ष तटस्थ राहील आणि सरकार तरेल . काही शिवसेना आमदार बंड करतील.
३. शिवसेना , काँग्रेस व पवार पक्ष एकत्र येऊन सरकार पाडतील.
४. पुन्हा निवडणुका होतील आणि शिवसेना सध्याच्या पेक्षा कमी जागा जिंकेल.
या पर्यायांचा विचार केल्यावर शिवसेनेने, त्यांच्या पप्पुला उपमुख्यमंत्री बनवुन आमदारांच्या संख्येच्या प्रमाणात मंत्रीपदे स्वीकारण्या शिवाय गत्यन्तर नाही असे दिसते.

१. शिवसेना बाहेर राहुन समर्थन करेल.
कायम टांगती तलवार चालणार नाही
२. शिवसेना विरोध करेल पण पवार पक्ष तटस्थ राहील आणि सरकार तरेल . काही शिवसेना आमदार बंड करतील.
होऊ शकते
३. शिवसेना , काँग्रेस व पवार पक्ष एकत्र येऊन सरकार पाडतील.
नाही होऊ शकत ,पवार साहिबानी ह्याच निवडणुकीत शिव सैनिकांना कुत्रे म्हटले आहे
४. पुन्हा निवडणुका होतील आणि शिवसेना सध्याच्या पेक्षा कमी जागा जिंकेल.
खर्च खूप होतो निवडणुकीचा ,मतदान खूपच कमी होईल ,होऊ नये

कंजूस's picture

29 Oct 2019 - 8:42 pm | कंजूस

एक टिवी, दोन रिमोट.
एकूण ## राजनीतीचा नाच.

अनुप ढेरे's picture

31 Oct 2019 - 9:30 am | अनुप ढेरे

एक टिवी, दोन रिमोट.

=))

प्रसाद_१९८२'s picture

30 Oct 2019 - 9:05 pm | प्रसाद_१९८२

भाजपापेक्षा अर्ध्याहून कमी जागा निवडणुन येऊनही, सध्या माध्यमांमधे शिवसेनेचा जो काय तमाशा सुरु आहे तो पाहून, ह्या पक्षात डोके ताळ्यावर असणारा एकादा तरी नेता शिल्लक उरला आहे का हा प्रश्न पडतो.

१९९५ मधे भाजपापेक्षा, शिवनेनेच्या फक्त आठ जागा जास्त निवडणुन आल्या होत्या त्या जिवावर त्यांनी ५ वर्षे मुख्यमंत्रीपद स्वत:कडे ठेवले व आज भाजपाच्या ४९ जागा जास्त निवडणुन आल्या असताना शिवसेना भाजपाकडे मुख्यमंत्री पद मागत आहेत. अगदिच हास्यस्पद होत चाललाय उठा सध्या !

याला कारण गेल्या 5 वर्षातील दुय्यम वागणूक आहे असे वाटते आहे ..

जॉनविक्क's picture

31 Oct 2019 - 3:44 am | जॉनविक्क

सेना गेली 6 वर्षे ते करत आहे, बघूया काय होते ते