व पु

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in काथ्याकूट
25 Mar 2009 - 10:00 am
गाभा: 

आज २५ मार्च २००९
प्रख्यात लेखक व. पु काळे यांचा जन्मदिवस .कथा,ललित लिखाण ,नाटक अशा सर्व लेखनप्रकारात उत्तम लिखाण करणारा हा लेखक
व पुंचे विशेष म्हणजे कथेला एकदम शेवटी कलाटणी देण्याची ताकद ...
आणि जाता जाता जिवन विषयक तत्वज्ञान थोडक्यात सांगुन जायची त्यांची हातोटी .
मराठी साहित्यविश्वात अनेक साहित्यिक आहेत ,प्रत्येकाची काही वैशिष्ट्ये आहेत .या सर्वांमध्ये वपुंचे स्थान कोठे येते ते मला ठावुक नाही
पण सर्वसामान्य जनमानसात प्रसिद्धी मिळवणार्‍या काही मोजक्या लेखकांमध्ये वपुंचा समावेश होतो हे नक्की
त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन त्यांचे काही लिखाण आपल्यासाठी


असे अनेकानेक उत्तम लिखाण करुन मराठी साहित्यावर आपला वेगळा ठसा उमटवणार्‍या व पु ना माझा सलाम आणि अभिवादन....

वपुंचा चाहता
विनायक पाचलग

प्रतिक्रिया

दिपक's picture

25 Mar 2009 - 10:12 am | दिपक

१) खिसेकापुच गर्दीत ओरडतो, "खिसापाकीट सम्हालो"
लोक अभावितपणे आपली पाकिंट बघतात आणि
खिसेकापूला लोंकाचा पाकिट ठेवण्याचा खिसा समजतो.

२) स्पर्श न करताही आधार देतो येतो हे ज्याला कळतं त्यालाच
'पालक' शब्द समजला.

३) बेदम पैसा मिळवणं याइअतकं मिडीअऑकर ध्येय दुसरं असूच
शकत नाही. माणसं जोडायला त्यापेक्षा जास्त बळ लागतं.

४) ऑपरेशन होण्यापुर्वी रोगी घाबरलेला असतो. त्यातुन बरा झाला
की शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.

५) 'आपल कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की
समजावं आपला उत्कर्ष होतोय.'

६) सर्वात जीवघेणा क्षण कोणता?
खुप सदभावनेने एखादी शुभ गोष्ट करायला जावं आणि
स्वत:चा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच
यावा. सदहेतूचीच शंका घेतली जावी हा!

७) माणूस निराळा वागतोय, बिघडला. असं आपण पटकन
एखाद्याबद्दल बोलतो. पण तसं नसतं. त्या सगळ्याचा अर्थ
तो आपल्याला हवा तसं वागत नाही एवढाच असतो.

८) गैसमज हा कॅन्सरसारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला
पोहचल्यावर तो आपलं स्वरुप प्रकट करतो.

९) अग्निदिव्य करुनही प्रभु रामचंद्राचे डोळे उघडले नाही
किंवा खात्री पटुनही सीतेच्या नशिबातला वनवास टळला नाही
आणि हे सगळं कुणासाठी? तर लोकांचे कपड्याने डाग
स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी काढणाऱ्या एका धोब्यासाठी.
कुणाच्या समाधानासाठी कुणाचा अंत पाहायचा हे माणसाने
ठरवले पाहिजे.

१०) जिथं उमटलेला ठसा जतन केला जाईल तिथंच शिक्का
उमटवावा. नाहीतर ते निवडणुकीचे शिक्के होतात.

-- व.पु. काळे

आमचेही या महान ले़खकास अभिवादन !

श्री's picture

25 Mar 2009 - 10:19 am | श्री

पार्टनर - आपण ईथून आता सात पावलं चालू. आशिर्वाद द्यायला ही आपली नवीन वास्तू आहे. पावालागणिक ती तथास्तु म्हणत राहील. तुझ्या दादांची साधना तुझ्या पाठीशी आहे. मरताना दिलेला बाबांचा आशिर्वाद मलाही सावरील. मी आस्तिक आहे की नास्तिक ह्याचा मी कधी शोध घेतलेला नाही.मी श्रध्दावंत मात्र जरूर आहे. सौंदर्य,संगीत,सुगंध,साहित्य या सर्वांसाठी मी बेभान होतो पण माझी जमीन कधी सुटत नाही. मी माणूस आहे ह्याचा मला अभिमान वाटतो मला परमेश्वर व्हायच नाही. नवर्‍याला देव वगैरे मानणार्‍यांपैकी तू आहेस की नाहीस हे मी परिचय होऊनही विचारलेले नाही. तशी नसशीलच तर उत्तम, पण असलीच तर ईतकच सांगेन की मला देव मानण्याचा प्रयत्‍न केलास तर तो माझ्यावर अन्याय होईल. मला माणूसच मान म्हणजे कळत-नकळत होणारे अपराध क्षम्य ठरतील. कुणाचही मन न दुखावणं हीच मी देवपूजा मानतो. जीवात-जीव आसेतो मी तुला सांभाळीन. सांभाळीन हा शब्द चुकीचा आहे. त्यात अहंकार डोकावतो. तेव्हा ईतकच सांगेन की आपल्या घरात,संसारात तु चिंतेत असताना मी मजेत आहे अस कधी घडणार नाही. आणि शेवटच सांगायाच म्हणजे मला पत्नी हवीच होती,मात्र पत्त्नि झाल्यावर तुझ्यातली प्रेयसी सांभाळ.
मला सखी हवी आहे ..........होशील !!!..........

व. पुं. ना माझे ही अभिवादन............
तमसो मा ज्योर्तिगमय

घाशीराम कोतवाल १.२'s picture

25 Mar 2009 - 10:27 am | घाशीराम कोतवाल १.२

नरक म्हणजे काय?
दोघांत असलेला तिसरा माणुस न जाणे म्हनजे नरक

पोरगी म्हणजे झुळुक
ईती व पु पार्टनर
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

विनायक पाचलग's picture

25 Mar 2009 - 11:20 am | विनायक पाचलग

तिघांचेही एवढ्या उत्क्रुष्ट लिखाण पुरवल्याबद्दल आभार

When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES

विनायक पाचलग

संदीप चित्रे's picture

25 Mar 2009 - 7:55 pm | संदीप चित्रे

पाहिजे तेव्हा हवा तो माणूस न येणं म्हणजेही नरकच
--------
पोरगी म्हणजे झुळूक .. अंगावरून जाते, अमाप सुख देते पण धरून ठेवता येत नाही !
---------
माझे शब्द थोडे चुकले असतील पण साधारण अशीच वाक्यं आहेत ती.

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

विशाल कुलकर्णी's picture

25 Mar 2009 - 11:52 am | विशाल कुलकर्णी

मराठी मुला, अरे तिथेही काही दिसलं नाही, इथेही दिसत नाही. असं का होतय? :S

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

मि माझी's picture

25 Mar 2009 - 12:16 pm | मि माझी

१.खर्च झाल्याचे दु:ख नसतं... हिशोब लागला नाही की त्रास होतो.
२. संवाद दोनच माणसांचा असतो.. त्याच्यात तिसरा माणूस आला की त्याच्या गप्पा होतात.
३.ज्यांच्या असण्याला अर्थ नसतो.. त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते..

--मी माझी..
पुणेकर होण्यासाठी तूम्हांला कोणत्यातरी गोष्टीचा जाज्वल्य अभिमान बाळगण आवश्यक आहे..!!

jenie's picture

25 Mar 2009 - 1:17 pm | jenie

कोणतीही व्यक्ति शम्भर टक्के चागलि नसते तशी वाईटही नसते..
गुण-दोष याचे मीश्रन म्हणजे माणुस.

व. पुं. ना माझे ही अभिवादन

अनामिका's picture

25 Mar 2009 - 2:57 pm | अनामिका

वपूर्झा
एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पण पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत.
----------------------------------------------------------------------------------------------
स्वप्न संपल की सत्य बोचु लागतं उदबत्या जळुन गेल्या तर मागे राखेचा सडा ऊरतो . राखेला सुंगंध नसतो. स्वप्नाला सुत्र नसत. तरी मी त्याला विचारलं "स्वप्नांवर माणुस जगतो का रे ?" तो म्हणाला "नाही ! स्वप्नांवरच माणुस झोपतो, रमतो. पण जाग येईपर्यंत ! जागेपणीही स्वप्नच ऊराशी बाळगली तर परत झोपण्याची वेळ येते माणसावर "

"मी बुवा स्वप्नांवरच जगतो. स्वप्नांचा आणि सुंगंधाचा फ़ार जवळचा संबंध असतो"
"बरोबर आहे, शेवटी दोन्हीची राख होते"

-----------------------------------------------------------------------------------------------
एकाकीपण वेगळं , एकांत वेगळा . परीसराचं मौन म्हणजे एकांत .
आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण . एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं.

अशृ म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्या वर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला असेल.
---------------------------------------------------------------------------------------

देशाची फाळणी,प्रथम माझ्या शरीराची फाळणी झाल्याशिवाय होणार नाही
अशी वचनं देणार्‍या माणसाला "राष्ट्रपिता"हि किताबत मिळाली ,
त्याने विश्वासघात केल्यावर लाखो संसार हे असेच उध्वस्त झाले.................
पित्याच पद न पेलणारा माणुस हा श्वापदच!
वपुर्झा
----------------------------------------------------------------------------------------------
रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो.
पण तुळस वृंदावनातच रहाते
तिच्यापुढे आपल्याला उभंच रहावं लागतं
-----------------------------------------------------------------------------------------
एका क्षणामधे पत्नीची आई होते.....
नवर्‍याने त्यानंतर पिता व्हाव ही पत्नीची अपेक्षा असते.पण तसं घडत नाही.
ह्याच कारण दिवस गेल्यापासून दिवस पुर्ण होईपर्यंत पत्नीने मातृत्वाचा एक छोटा कोर्स केलेला असतो...
एकच विद्यार्थी असलेला वर्ग तिने नऊ महिने सांभाळलेला असतो.
आई आणि मुल शाळेतच असतात आणि पुरुष शाळासोडुन अन्यत्र असतो .
म्हणुनच त्याला पिता व्हायला वेळ लागतो.
त्यात शाळेला कायमच कंटाळलेला नवरा वाट्याला आला तर संसारामधे तो बिनखात्याचा मंत्री असतो..............
-----------------------------------------------------------------------------------------------
मखमलीचा अंगरखा घातला की बघणार्‍याचे डोळे दिपतात.पण तो अंगरखा घालणार्‍याला आतलं अस्तरच स्पर्श करीत असतं...........तशा काही व्यथा.................
------------------------------------------------------------------------------------------------
सुखाचे क्षण पार्‍याप्रमाणे असतात...........
हातात आलेले वाटतात तेंव्हा निसटून गेलेले असतात..........
-----------------------------------------------------------------------------------------------कोणतंही समर्थन मुळ दु:खाची हकालपट्टि करु शकत नाही...................
वर पट्टि बांधायची ती जखम झाकण्यासाठी.........
आत जखम आहे ती ज्याची त्यालाच ठसठसत असते....................
----------------------------------------------------------------------------------------------
ह्या जगात पुरुषार्थ ह्या शब्दाचा अर्थ समजलेले पुरुष फार, म्हणजे फारच मोजके आहेत्.पुरुषार्थ म्हणजे रसिकता........जबरदस्ती नव्हे,शारीरीक ताकद नव्हे ,तर मानसिक ताकद.
ज्याला ही मानसिक रसिकता समजली त्यालाच पुरुषार्थ समजला.....
असा पुरुष, पुरुष असला तरीही कोमल असतो. तो कुणावरही जबरदस्ती करीत नाही..............
-----------------------------------------------------------------------------------------
स्पर्शसुख म्हणजे प्रेम नक्कीच नाही.तो प्रितीचा मुळरंग नाही.तो नुसता अभिलाषेचा तवंग! एक सवंग लालसा! जाता येता भेटत रहाते ,जाणवते..स्पर्शाची ही लालसा रोज ऑफिसला जाताना लोकल मधे सहन करावी लागते.रस्त्याने चालताना लादली जाते...बुकिंग क्लार्कने तिकीट देताना स्पर्श करावा,बस कंडक्टरने तेच, वाण्याने पुड्या देताना तेच,ऑफिसरने फाईल देताना तेच.हिच लालसा ऑफिसच्या लिफ्ट्मधेसुद्धा सुटाबुटात चिकटून रहाते.....वर पुन्हा "सॉरी"च गुलाबपाणी शिंपडायच आणि एक ओशट हास्य.....सगळीकडे हिच लालसा थैमान घालताना दिसते.......ऑफिसच्या कामासाठी फोन करावा तर पलिकडचा पुरुषी आवाज अकारण मवाळ होतो. नजरा तर दुसरं काही ओकतच नाहीत.स्त्रीदेहावर त्या अर्थपुर्ण नजरांची पुट चढलेली असतात पुटं!
भारतिय युद्ध समाप्तीनंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रथम रथामधुन उतरायला सांगितल.अर्जुनाला नवल वाटल तरी कृष्णाच ऐकुन तो उतरला.त्यानंतर श्रीकृष्ण उअतरताच अर्जुनाचा तो रथ जळून गेला.त्यावर श्रीकृष्णाने सांगितलं 'कौरव सैन्याने टाकलेल्या अस्त्रांचा परिणाम रथावर झालेला होता.अगोदर मी जर उतरलो असतो तर हा रथ तुझ्यासकट जळून गेला असता"..........
आयुष्यभर स्त्रीदेहाच रक्षण असाच कुणी अजात कृष्ण करीत असला पाहिजे.
नाहीतर पुरुषांच्या नजरांनी तो देह चितेवर चढण्यापुर्वीच जळून गेला असता..................
---------------------------------------------------------------------------------------------
सर्वात जीवघेणा क्षण कोणता?.....................
खुप सद्भभावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि
स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा ,
सदहेतूची शंका घेतली जावी ,हा!!!!!!!!!!!!!
व.पु.

---------------------------------------------------------------------------------------------
"अनामिका"

अमोल केळकर's picture

25 Mar 2009 - 1:27 pm | अमोल केळकर

१) आकाशात ऊन आणि पावसात जेंव्हा युध्द चालते तेंव्हाच इंद्रधनुष्य तयार होते.
आयुष्य सजवायचे असते ते अशा इंद्रधनुष्यांनी. तडजोडीमुळे नुकसान होत नाही, तर
संधी मिळते, इंद्रधनुष्य फुलवण्याची -

२)नियतीच्या तराजूशी वशिला नाही. पैसे दाबणं नाही.टेबलाखालचे व्यवहार नियतीला मंजूर नाहीत. जशी साधना, तसं माप!दैव नाही ! नशीब नाही!आजच्या समग्रतेतच उद्याचं फुलणं, बहरणं आहे !

३)आयुष्यातील फक्त चांगलेच क्षण टिपायला आणि तेवढेच क्षण जतन करायला नित्य कोजागिरी जागवणारं मन लाभावं लागतं

४) आपत्ती पण अशी यावी , की त्याचाही इतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचंच तर ठेच लागून पडू नये. चांगलं दोन हजार फुटावरुन पडावं.
माणूस किती उंचावर पोचला होता, हे तरी जगाला समजेल.' ---

५)अपेक्षाभंगाचा क्षण हाप्रकाशाचा किरण असतो.आपण अंधारातून चालतआहोत याची जाणीव हा किरण करुन देतो. प्रकाशाचा हा किरण धरुन ठेवता येणे ही इतर अनेक कलांपैकी श्रेष्ठ कला आहे

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

श्री's picture

25 Mar 2009 - 1:35 pm | श्री

आईच्या आणि बापाच्या ’मोठेपणाच्या’व्याखेत सुसंवाद नसेल तर मुलं गुदमरतात.
संधीचा कोणताही क्षण दवडू नकोस.कोणत्या पाऊलवाटेचा पुढे हमरस्ता होईल,हे प्रवासाच्या प्रारंभी सांगता येत नाही.तेव्हा मुलाला चालू द्यावं.आईबापांनी मुलांच्या मार्गात आडवं पडावं ते सावलीच्या रुपानं.
बाप मुलाला गादी देऊ शकतो.झोप देऊ शकत नाही.
आई जेवण देऊ शकते.भूक देऊ शकत नाही.
हे ज्या पालकांना समजलं त्यांना जगाचं रहस्य समजलं.
नजर शाबूत असलेला बाप मुलाला एकदाच जन्म देऊन थांबत नाही,आयुष्यभर तो जन्मच देत असतो.
मुलाला मोकळेपणी फिरु देणं,तो एक स्वयंभू जीव आहे हे जाणणं,त्याला त्याची स्वत:ची सुखदु:ख आहेत ह्याचं स्मरण ठेवणं.लोभ,मोह,माया ह्या मर्यादांनी तो स्वतंत्रपणे बांधला गेला आहे ह्याची ओळख ठेवणं,हे जो बाप करतो,तो प्रतिक्षणाला त्याला जन्म देतो.
"आम्ही आमच्या लहानपणी असे नव्हतो"ही बकबक जो बाप करतो त्याला लहानपणी जसं काय करायचं हे समजल नाही तसच बाप झाल्यावरही कुणाचं उदाहरण द्यायचं हे कळलेलं नाही.ह्या विधानापुढं दुसरं अप्रबुध्द विधान कोणतही असू शकणार नाही.
व.पु.

तमसो मा ज्योर्तिगमय

मॅन्ड्रेक's picture

25 Mar 2009 - 1:49 pm | मॅन्ड्रेक

आयुष्यात एक क्षण भाळण्याचा बाकि सारे सांभाळण्याचे.
व.पु.

श्रेया's picture

25 Mar 2009 - 2:13 pm | श्रेया

मि वपूर्झा पुस्तक वाचेले आहेत त्यांच्या ईतर पुस्तकांची नावे द्यावीत

श्री's picture

25 Mar 2009 - 2:28 pm | श्री

माझे आवडीचे - पार्टनर,
एक सखी
मायाबाजार
रंग मनाचे
आपण सारे अर्जुन
ही वाट एकटीची
गुलमोहोर
वर्पुवाई
ईंटीमेंट

तमसो मा ज्योर्तिगमय

मैत्र's picture

25 Mar 2009 - 2:35 pm | मैत्र

सर्वात आवडलेले - सखी. (सखी, गार्गी, बाप, अशा अनेक अप्रतिम कथा).
महोत्सव, प्लेझर बॉक्स, तप्तपदी, वपुर्वाई, आपण सारे अर्जुन,पार्टनर.

ढ's picture

25 Mar 2009 - 2:34 pm |

देशाची फाळणी प्रथम माझ्या देहाची फाळणी झाल्याशिवाय होणार नाही अशी वचनं देणार्‍या
माणसाला राष्ट्रपिता हा किताब मिळाला. त्याने विश्वासघात केल्यानंतर लाखो संसार उध्वस्त
झाले. पित्याचे पद न पेलणारा माणूस हा श्वापदच
- वपूर्झा.

श्रेया, विकीपिडिया वर वपुंच्या पुस्तकांची यादी आहे.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

26 Mar 2009 - 12:54 pm | घाशीराम कोतवाल १.२

हे घ्या श्रेया ताई हि यादि
वपुंची पुस्तके
कथा
इन्टिमेट
ऐक सखे
कर्मचारी
का रे भुललासी
काही खरं काही खोटं
गुलमोहर
गोष्ट हातातली होती!
घर हलवलेली माणसे
तप्तपदी
दोस्त
बाई, बायको आणि कॅलेंड‍र
भुलभुल्लैया
महोत्सव
मी माणुस शोधतोय
मोडेन पण वाकणार नाही
रंग मनाचे
लोंबकळणारी माणसं
वन फॉर द रोड
वलय
वपु ८५
वपुर्वाई
सखी
स्वर
संवादिनी
हुंकार
मायाबझार

वैचारिक
आपण सारे अर्जुन

कादंबरी
ठिकरी
तु भ्रमत आहासी वाया
पार्टनर
हि वाट एकटीची

ललित
कथा कथनाची कथा
दुनिया तुला विसरेल
निमित्त
प्लेझर बॉक्स
प्रेममयी
पाणपोई
फॅन्टसी - एक प्रेयसी
माझं माझ्यापाशी?
रंगपंचमी
वपुर्झा

व्यक्तिचित्र
चिअर्स
माणसं
सांगे वडिलांची किर्ती
सगळि नाव विकिपिडिया मधुन सांभार

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

हरकाम्या's picture

25 Mar 2009 - 6:08 pm | हरकाम्या

प्रतिक्रिया देणार्या सर्वांचे आभार, माझ्याकडे मात्र " वपुंचे " प्रतिक्रियांमध्ये देण्यासारखे काही नाही याचे वाईट वाट्ते.
त्यांच्या " पार्टनर " कादंबरीने लावलेले वेड अजुन डोक्यातुन गेलेले नाही .

नेहेमीच्या आयुष्यातल्या अनुभवांचे सूक्ष्म निरीक्षण, त्यावरची मार्मिक टिप्पणी, आणि साध्या सोप्या वाक्यात कथासूत्र पुढे नेण्याची धाटणी ही त्यांची शैली सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला चटकन आपलंसं करुन घेईल अशी आहे.
त्यांचं लिखाण आवडण्याचं एक वय असतं असं मला वाटतं त्या वयात मला ते आवडूनही गेलं. आता तितकंसं आवडेल असं वाटत नाही.
तरीही त्यांचे काही वेचक लिखाण, जसे काही उतारे वर दिलेत, हे नक्कीच वाचनीय आहे. त्यांचे कथाकथन मला अधिक भावते.
भदे, सबनीस इ. कथा मला आवडल्या.

चतुरंग