आम्ही डिसेंबर महिन्यात केरळ मध्ये मुन्नार व आलेपी येथे फिरायला जाण्याचे नियोजन केले आहे. खूप वर्षांपासून केरळ पाहण्याची इच्छा शेवटी पूर्ण होणार आहे. कुठल्या टूर कंपनी बरोबर नसून आम्ही आमचे प्रवास करणार आहोत. सोबत २ वर्षांचा मुलगा आहे.
मुन्नार येथे 4 दिवस आणि अलेपिला 2 दिवस मुक्काम आहे. कोणी जाऊन पाहिले असल्यास काय पाहावे हे सुचवा.
प्रतिक्रिया
19 Sep 2019 - 2:06 pm | शेखर
https://www.misalpav.com/node/38421
19 Sep 2019 - 8:35 pm | गोरगावलेकर
वरील दुव्यातील 'विखि' यांनी नाश्त्यासाठी सुचवलेले मुन्नार येथील 'सरवना भवन' मलाही माझ्या २०१४ च्या सहलीतआवडले होते.
येथील केळीच्या पानावर वाढण्यात येणार नाश्ता खूपच चांगला असतो.
डोश्यासोबत आलेल्या तीन प्रकारच्या चटण्या तर मस्तच होत्या. जागा अपुरी पडते इतकी गर्दी असते त्यामुळे रांग लावून नंबर येण्याची वाट पाहावी लागते.
येथील एक वेटर त्याच्या कॉफी देण्याच्या शैलीमुळे चांगलाच लक्षात राहिला.
19 Sep 2019 - 4:50 pm | सान्वी
धन्यवाद शेखर जी बरीच माहिती मिळाली.
रच्याकने आमचं पण बुकिंग क्लब महिंद्र मध्येच आहे.
19 Sep 2019 - 9:55 pm | चौकटराजा
कोची मुन्नार प्रवास फार मस्त . बायो डायव्हर्सिटी चे जगातील उत्तम उदाहरण ! कोची गावातून बंदारावर फिरायाला जा . तेथील फिश नेटस चे सूर्यास्ताला फोटो काढा ! मुन्नार मधील बागेत फिरा . रिक्षा करून हिरव्याकंच परिसरातून मनसोक्त भटका . चहाचे मळ्यातून फोटो काढा , मेटुपट्टी डॅम वर फिरायला जा . इथे फिल्म शुटींग स्पॉट आहे . हा परिसर स्वीस विदाउट बर्फ इतका सुंदर आहे .अलिप्पेला एक बोट भाड्याने घ्या .तीनेक तासात लैगुन मधून बोट न्या ! कुमारकोम ला बसने जा . वेम्बनाद या प्रचंड लेकमध्ये फिरा. केरळ कशमीर इतकेच सुंदर आहे हे नक्की ! दोन्ही पेक्षा स्वीस कितीतरी सुंदर आहे पण तूर्तास केरला मस्त !
20 Sep 2019 - 1:33 am | सान्वी
सुंदर प्रतिसाद चौकटराजाजी, तुम्ही खूप गोष्टींबद्दल छान सुचवलं आहे परंतु आमच्या 2 वर्षांच्या बाळाला घेऊन यातल्या जमतील तितक्या गोष्टी बघू.
20 Sep 2019 - 5:29 am | कंजूस
सगळे जातात म्हणून मी मुन्नार, कोलम - अळेप्पी ब्याकवॉटर्स येथे गेलो नाही.
चहाच्या मळ्यातलं सौंदर्य कळत नाही. मसाल्यांची झाडं माहिती आहेत.
ब्याकवॉटर्स बोट प्रवासाचं (बोटीत बसून किनाऱ्यावरची नारळाची झाडं पाहाणे, लोक घरकामं करताना पाहाणे इत्यादी) आकर्षण नाही.
मागच्या वर्षापासून या भागात पूर येतो.
मत्स्याहारही नाही मग करणार काय?
केळीच्या पानावर नाश्ता, कॉफी-कसरत फक्त केरळमध्ये इथेच असते असं नाही.
बाकी लहान बाळास यातलं काय आवडणार?
20 Sep 2019 - 9:09 am | परिंदा
तुम्ही दोघे आणि लहान बाळच जात आहे आणि आलेप्पीला बोटहाऊस मध्ये पुर्ण दिवस राहणार असाल, तर पुन्हा एकदा विचार करा. बोटहाऊस सुरवातीला तास-दोन तास भारी वाटते, पण मग कंटाळा येतो. एवढीशी बोट, त्यात एकच खोली, फिरायल, चालयला कही मिळत नाही. त्यामुळे खुप कंटाळा येतो.
20 Sep 2019 - 10:42 am | कंजूस
कुमारकोम येथले पक्षी ( बगळे,करकोचे ,पाणपक्षी) बघणे ही एक ट्रीप गळ्यात मारतात.
मार्केटिंग फार.
20 Sep 2019 - 10:57 am | परिंदा
कुमारकोम येथले पक्षी ( बगळे,करकोचे ,पाणपक्षी) बघणे ही एक ट्रीप गळ्यात मारतात.>>
>>>
अशी ट्रिप कोची ला पण असते.
20 Sep 2019 - 10:48 am | उपेक्षित
माझ्या दृष्टीने जगातील सर्वात सुंदर ठिकाण आणि प्रेमळ माणसे केरळ आहे Real देवभूमी.
केरळमध्ये भरपूर फिरलोय बर्याचदा.
काश्मीर आणि बाकी ठिकाणे सुद्धा भरपूर फिरलोय पण काश्मीर मध्ये आपलेपणा जाणवत नाही जास्ती.
आलात कि फोटो आवर्जून टाका.
20 Sep 2019 - 1:11 pm | यशोधरा
काश्मीर मध्ये आपलेपणा जाणवत नाही जास्ती. >> खोऱ्यात की सगळीकडे?
23 Sep 2019 - 1:32 pm | उपेक्षित
काश्मीर खोर्यातच ताई, निसर्गाशी तुलना करता काश्मीर असेल स्विसच्या तोडीचे पण लोकल माणसे कधीच आपली वाटत नाही.
व्यवसायामुळे काश्मीरला काही चकरा झाल्यात त्यातली एक बरोब्बर २६ जानेवारीला झाली होती श्रीनगरला उतरल्यावर गाडीतून हॉटेल वर जाताना कर्फ्यू लागल्या सारखे वातावरण होते.
काही दुकानांवर कोळश्याने भारताबद्दल बेक्कार लिहिले होते साला.
असो जास्ती अवांतर नाय करत नाय तर धाग्याचा काश्मिर व्हायचा :)
23 Sep 2019 - 1:36 pm | यशोधरा
हो, कल्पना आहे म्हणूनच विचारले.
खोऱ्यातच अधिक दिसते हे.
20 Sep 2019 - 1:07 pm | गड्डा झब्बू
मुन्नारला चार दिवस आहात तर एक दिवस वाईल्ड मुन्नार इको टुरिझम साठी राखून ठेवा. तिथे लवकर पोहोचा नाहीतर खूप वेळ रांगेत ताटकळत उभे राहावे लागेल. अथीरापल्ली फॉल, रोझ गार्डनला अवश्य भेट द्या. मेटुपट्टी डॅम परिसर खूप रमणीय आहे. अलापुझाचा (अलेप्पी) समुद्रकिनारा आणि हाउसबोट मधून 3-4 तासांचा फेरफटका वेगळा अनुभव देईल शक्यतो सुर्यास्ताची वेळ या दोन्ही ठिकाणी गाठण्याचा प्रयत्न करा. ही ठिकाणे सोडली तर बाकी केरळ टुरिझमच्या बाबतीत ओव्हररेटेड आहे असे माझे मत बनले आहे.
विशेष सूचना:- मुसळधार पावसाने आणि पुराने मुन्नार येथील परिस्थिती खूपच खराब झाल्याचे वाचले होते, तुम्ही डिसेंबर मधे जाईपर्यंत गोष्टी पूर्वपदावर आल्या असतील. तरी एकदा खात्री करून घ्यावी. बरोबर लहान बाळ असल्याने संपूर्ण प्रवासासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट ऐवजी गाडी भाड्याने घेणे.
20 Sep 2019 - 1:35 pm | जॉनविक्क
ज्जेबात!
पण पहिल्यांदाच जात असाल तर ठीक. तसेही 70 टुरिस्ट मराठी असतील त्यामुळे तुम्हाला चुकल्यासारखे होणार नाही
20 Sep 2019 - 1:52 pm | गड्डा झब्बू
आणि 20-25 गुजराती :-))
20 Sep 2019 - 2:58 pm | जॉनविक्क
होय , उरलेल्यात 20 तरी गुजराती आणी 10 हिकडचे तिकडचे =))
20 Sep 2019 - 2:37 pm | किल्लेदार
अलेप्पी ला गेलात तर सायरस ग्रुप चे एक छोटे आणि आटोपशीर हॉटेल आहे. अगदी वेम्बनाड लेक च्या काठावर आणि आवर्जून जाण्यासारखे. लेक व्यू रूमची एक अक्खी भिंत काचेची आहे. एसी मध्ये आरामात बसून वेम्बनाड लेक चा आनंद घेता येईल. गेल्याच महिन्यात वीकएंड टूर करून आलो.
20 Sep 2019 - 5:15 pm | टर्मीनेटर
वरील प्रतिसादांत अनेकांनी योग्य सल्ले दिले आहेत. त्यातील काही गोष्टींशी मी सहमत आहे तर काही गोष्टींशी असहमत.
शेवटी "Beauty lies in the eye of the beholder". कोणाला कशात सौदर्य दिसेल ते पाहणाऱ्याच्या दृष्टी म्हणण्यापेक्षा दृष्टिकोनावर अवलंबून असते म्हणणे सयुक्तिक वाटते.
तुम्ही मुक्कामासाठी निवडलेली दोन्ही ठिकाणे छान आहेत, त्याच्या आसपास अनेक चांगली प्रेक्षणीय स्थळे आहेत. पहिल्यांदाच जाताय तर कुठलाच चांगला वा वाईट पूर्वग्रह न ठेवता तो परिसर फिरून/बघून या, आणि मिपावर छान प्रवासवर्णन लिहा. तुमच्या प्रवासासाठी शुभेच्छा!
अवांतर: @किल्लेदार , तुम्ही दिलेल्या हॉटेलचे फोटो खूपच सुंदर आहेत. पर्यटनासाठी जरी पुन्हा केरळला जाण्याची इच्छा नसली तरी काही कामानिमित्त अलेप्पीला पुन्हा जाणे झाले तर ह्याच हॉटेलमध्ये मुक्काम ठोकण्यात येईल हे निश्चित!
24 Oct 2019 - 6:55 pm | किल्लेदार
नक्की जा..
काही फार करायचे नसल्यास आणि तलावाकाठी बसून शांतपणे बिअर प्यायची असल्यास ;)
रिसॉर्ट मध्ये सायकली पण ठेवल्यात. त्यावरून फिरताना कोकणात फिरल्याचा फील येतो.
20 Sep 2019 - 5:32 pm | सान्वी
खूप छान व उपयुक्त प्रतिसाद आहेत सगळ्यांचे, खूप माहिती मिळते आहे.
@किल्लेदार जी तुम्ही सांगितलेले जे हॉटेल आहे तिकडे ऑनलाइन बुकिंग कसे करता येईल? नक्की नाव काय आहे तसे शोधते जालावर. होऊसबोट मध्ये राहणार नाही आहोत अलेपिला फक्त बोटिंग चाच विचार आहे.
@उपेक्षित जी नक्की लेख लिहीन जाऊन आल्यावर आणि फोटो पण टाकेन.
24 Oct 2019 - 6:52 pm | किल्लेदार
आत्ता बघितला प्रतिसाद
Cyrus Resort By Tolins Hotels & Resorts
make my Trip किंवा अजून कुठल्याही ऍप वर सापडेल.
20 Sep 2019 - 10:27 pm | कंजूस
तुम्हाला घाबरवण्यासाठी सल्ला नव्हता. एका नातेवाईकांचा मुलांना घेऊन आलेला अनुभव यावरून सांगितलं.
बाकी मुंबईत असाल तर वल्ड ट्रेड सेंटर इमारतीत केरळ टुअरिझमचे आफिस आहे तिथे ढिगभर माहिती पत्रकं, नकाशे देतात. तुमच्या जाण्यायेण्याचे दिवस /आरक्षणं सांगितलीत तर त्यामध्ये उत्तम आराखडा लगेच मिळेल. बुकिंग, हॉटेल,रुम,ट्याक्सी तर करतातच.
जी ठिकाणं इतर ट्रावल कंपन्या दाखवत नाहीत ती पाहा. उदा तट्टेखाद पक्षी अभयारण्य, रानपक्षी आहेत. कोची -कोटमंगलम -मुन्नार रस्त्यावर कोटमंगलमपासून आतमध्ये वीस किमी.
25 Sep 2019 - 8:16 pm | कंजूस
हेसुद्धा विचार करा अथिरापल्लीचे अद्भुत
26 Sep 2019 - 1:09 am | सान्वी
धन्यवाद कंजूसजी . धागा छान आहे