जावे फेरोंच्या देशा - भाग २ : तयारी-तयारी

कोमल's picture
कोमल in भटकंती
16 Sep 2019 - 10:47 pm

भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भाग १२ भाग १३ भाग १४

.anch {
border: none !important;
display: inline-block !important;
padding: 8px 16px !important;
vertical-align: middle !important;
overflow: hidden !important;
text-decoration: none !important;
color: #fff !important;
background-color: #2196F3 !important;
text-align: center !important;
cursor: pointer !important;
white-space: nowrap !important;
margin: 5px;
}
.anch-crr {
border: none !important;
display: inline-block !important;
padding: 8px 16px !important;
vertical-align: middle !important;
overflow: hidden !important;
text-decoration: none !important;
color: #000 !important;
background-color: #ccc !important;
text-align: center !important;
cursor: pointer !important;
white-space: nowrap !important;
margin: 5px;
}

४ जून २०१८

कालच बुक केलेल्या EgyptAir च्या तिकिटांमुळे आज ऑफिस च्या दिशेने पडणाऱ्या पावलांमध्ये पण (कधी नव्हे तो) एक वेगळाच उत्साह होता. सोबतीला हा विचारही होताच कि मिपावर इजिप्त भटकंती बद्दलचा माझा पहिलाच धागा असेल. ऑफिस मध्ये पोहोचल्यावर लगेच सुट्टीसाठी अर्ज केला. थोडा वेळ इकडे तिकडे टाईमपास केल्यावर सहजच मिपावर चक्कर मारावी वाटली. मिपाची खिडकी उघडली आणि माझं इजिप्तवरच्या पहिल्यावहिल्या धाग्याचं स्वप्न खळ्ळकन तुटलं. "ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – १" भटकंतीच्या सदरात मोठ्या दिमाखात मिरवत होता. आश्चर्य मिश्रित आनंद मिश्रित दुखरे मन घेऊन मी तडक तो भाग वाचून काढला. संजय भावे(उर्फ ‘टर्मीनेटर’) यांना व्यनि टाकला. भावे साहेबांचा झटक्यात रिप्लाय आला आणि चालू झालं आमचं इजिप्तावलोकन त्यांच्या नजरेतून.

पुढे जाऊन वेळोवेळी संजयने सर्वतोपरी मदत केली, माहिती पुरवली त्याबद्दल त्याचे आभार मानावे तेवढे कमीच. आणि मुख्य म्हणजे टायपायचा कितीही कंटाळा असला तरी हा माणूस इजिप्तबद्दल लिहिता-बोलतांना थकतच नाही. या लेखमालेमध्ये त्याच्या लेखातील काही पात्रांची परत भेट आपल्याला घडेलचं. पण एका वाक्यात सांगायचं तर, संजयच्या मदतीमुळे या सफरीतील सुरवातीची धाकधूक बऱ्याच प्रमाणात कमी होऊन, निवांतपणे आम्ही ट्रिपला सुरुवात केली होती. 

नेहमी प्रमाणेच या ट्रिपसाठी सुद्धा एक गोष्ट मनाशी पक्की केली होती कि कोणत्याही टूर्स अँड ट्रॅव्हल एजन्ट्स च्या घशात पैसे घालायचे नाहीत. निदान जिथे शक्य आहे तिथे तरी. त्यामुळे विमानाची तिकिटे, हॉटेल्स, व्हिसा, अंतर्देशीय फिरायची सोय, खाणं, पिणं सगळं आपण मॅनेज करायचं.

इंटरनेट हे कायम तुमच्या दिमतीला असतंच. एकतर अशाने आपले पैसे खुप वाचतात, स्थानिक लोकांना जास्त जवळून ओळखता येत, तुम्ही अनुभव संपन्न होता ते वेगळेच. आणि विमानाची स्वस्त तिकिटे शोधण्यापासून, व्हिसासाठी पळापळ करणे, हॉटेल्स शोधणे - त्यांची किंमत अजून कमी व्हावी यासाठी कूपन्स शोधणे - हॉटेल बुक करणे - परत फेरविचार करून हे नको ते बुक करू म्हणत जुने बुकिंग रद्द करून नवीन बुक करणे, आपला प्लॅन आपण ठरवणे या संपूर्ण प्रोसेस मध्येच एक वेगळा आनंद असतो. 

आता आम्ही स्वतः जायचं ठरवलं त्यामुळे किती दिवस हा मुद्दा फार महत्त्वाचा राहिला नव्हता. १४-१५ दिवस निवांत फिरू असं ठरवून तिकिटे बुक केली होती १८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर पर्यंतची. तारखांना लक्षात घेऊन कोणत्या दिवशी काय पाहायचं आणि कसं पाहायचं याचा एक ढोबळ प्लॅन आखून घेतला. आणि दिवस-ठिकाण अशा जोडीने हॉटेल्स चा शोध चालू केला. बुकिंग डॉट कॉम वरून काही हॉटेल्स शोधली, गूगल मॅप्स च्या साहाय्याने त्याच्या आजूबाजूच्या खाण्याच्या / वाहतुकीच्या / खरेदीच्या सोई बघून घेतल्या. वेळोवेळी संजयचा सल्ला घेत होतेच. जशा जशा तारखा पुढे जात होत्या आमच्या चेकलिस्ट मधील एक एक गोष्टी Done होत होत्या. एक प्रत्येक दिवसाची माहिती देणारी आयटेनेरी बनवली. याचे दोन फायदे असतात, एक म्हणजे आपला प्लॅन आपल्याकडे तयार असतो, आणि दुसरं, घरच्यांना याची एक प्रत दिली कि त्यांना पण अंदाज राहातो की आपण कुठल्या दिवशी कुठे आहोत याचा. अशीच एक प्रत इथे डकवली आहे.

२ ऑगस्ट २०१८ 

मी: हॅलो, सगळ्या प्रिंट आऊट घेतल्या का रे? 
तो: हो ग. 
मी: तिकीट?
तो: हो. 
मी: सगळे हॉटेल बुकिंग्स?
तो: हो. 
मी: Day by Day Itinerary?
तो: हो ग बाई. 
मी: व्हिसा कव्हर लेटर?
तो: नाही ते राहिलंय (अरे यार हे विसरलोच होतो मी)
मी: बघ मी म्हणलेले ना काहीतरी विसरशीलच तू!!
तो: विसरलो नाहीये तू मध्येच फोन केलास. मी आत्ताच काढत होतो प्रिंट्स. 
मी: ह्या ह्या ह्या.. चल थापाड्या.... बरं सगळ्याच्या २-२ कॉपीज काढ, २ सेट लागतील व्हिसासाठी. 
तो: हो ग आहे माझ्या लक्षात (ओ तेरी! ये भी भूल गया यार) ४ कॉपीज काढतो चांगल्या. 

ऑफिस मधल्या प्रिंटरचा सदुपयोग करून व्हिजाची कागदपत्र गोळा केली गेली. 

१० ऑगस्ट २०१८ 
व्हिसा पासपोर्टला चिकटला आणि हुश्श झालं. 

१७ सप्टेंबर २०१८ 
सगळ्या गोष्टी बॅगेत भरल्या गेल्या आणि आम्ही मुंबई एअरपोर्ट साठी कूच केले.बॅग्ज चेक इन करून सिक्युरिटी चेक मधून बाहेर पडून इमिग्रेशन च्या रांगेत दाखल झालो. 

इमिग्रेशन ऑफिसर: कुठे जाताय?
मी: इजिप्तला. 
इ. ऑ: कशाला? 
मी: फिरायला. 
इ. ऑ: किती दिवस फिरणार? 
मी: १४ दिवस. 
इ.ऑ: परत कधी मग? (त्याला बहुतेक मजा येत होती चौकशी करायला) 
मी: २ ऑक्टोबर ला. (लिवलंय ना दादा सम्द त्या बुकात)
इ.ऑ: आँ? एवढे दिवस? काय काय बघणार मग इजिप्त मध्ये? पिरॅमिड्स?
मी: हो. अजूनही बरंच काय काय आहे. नाईल, वाळवंट. 
इ.ऑ: छान छान!! मज्जा करा. (ठ्ठाप ठ्ठाप २ शिक्के मारले गेले होते)
मुख्य म्हणजे वरचं सगळं संभाषण खरंच मराठी मध्ये झालं. त्यालाही कंटाळा आला असावा बहुतेक हिंदी/इंग्लिश बोलून. 

passport

EgyptAir ची हि डायरेक्ट फ्लाईट अंदाजे ५ ते ५:३० तास लावते. १८ तारखेला बरोबर पहाटे ३ वाजता उडालेल्या आमच्या विमानाने पहाटे ५:३० वाजता (स्थानिक वेळ) आम्हाला फेरोंच्या देशात आणून सोडलं. 

flight

ता.क. सर्वसाक्षी यांचा धागा कै सापडला नव्हता राव मला. लै शोधलेलं मिपा.
😣

क्रमशः

प्रतिक्रिया

ही नःम्र विनंती!

जालिम लोशन's picture

17 Sep 2019 - 1:23 pm | जालिम लोशन

धन्यवाद,

एक वर्षांनी धागा टाकलाय हे लक्षात आलं. १८ सप्टेंबर ते १ ओक्टोबर - मला आगोदर वाटलं रोज डायरी लिहिणार.

हो. गेल्यावर्षी लिहायला सुरुवात केली होती त्यामुळेच तारखा 2018 च्या आहेत, पण मालिका पूर्ण होऊ शकली नव्हती..
आता होत आलीये म्हणून सुरवात केली भाग टाकायला.

_/\_

जबरी जबरी.
मजा येणार वाचायला.

श्वेता२४'s picture

17 Sep 2019 - 11:17 am | श्वेता२४

पु.भा.प्र.

किल्लेदार's picture

17 Sep 2019 - 4:34 pm | किल्लेदार

व्हिसा ऑफिसरने इतके ऑ ? ऑ ? का केले असा प्रश्न पडला आधी
मग कळलं की ते इ.ऑ. आहे म्हणजे इमिग्रेशन ऑफिसर

:) :) :)

टर्मीनेटर's picture

17 Sep 2019 - 5:01 pm | टर्मीनेटर

मस्त चालू आहे मालिका ....
मी स्कीप केलेल्या व्हाईट & ब्लॅक डेझर्ट बद्दल वाचायची मला जास्ती उत्सुकता आहे, अर्थात बाकीच्या गोष्टी सुद्धा तुझ्या नजरेतून आणि कॅमेरातून पुन्हा पाहायला/वाचायला अवडतीलच.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

जॉनविक्क's picture

17 Sep 2019 - 8:56 pm | जॉनविक्क

फक्त 5.30 तास ? वा.

निनाद आचार्य's picture

18 Sep 2019 - 8:58 am | निनाद आचार्य

दोन्ही लेख आवडले. लिहिण्याची शैली आवडली. फक्त पटापट टाका सगळे भाग. या अशा लेखमालिका वाचायला खूप मजा येते. पू ले शु!

सर्वसाक्षी's picture

18 Sep 2019 - 4:20 pm | सर्वसाक्षी

मीही इजिप्तवर थोडं लिहायचा प्रयत्न केला होता.
इथे वाचाEgypt

कोमल's picture

19 Sep 2019 - 1:21 pm | कोमल

धन्यवाद सर्वसाक्षी.
मागील भागात वल्लीने दुवा दिला तुमच्या लेखमालेचा तेव्हाच वाचुन काढली होती.

फार छान मांडणी केली आहे तुम्ही. मजा आली वाचतांना.

कोमल's picture

19 Sep 2019 - 1:22 pm | कोमल

सर्वांचे अनेक आभार.
_/\_