आमची मलेशिया भ्रमंती - क्वालालंपूर (भाग - ३)

वैभव.पुणे's picture
वैभव.पुणे in भटकंती
10 Sep 2019 - 12:08 pm

झोप येईना, क्वालालंपूर येईना!!

दे दणादण टेक ऑफ झाल्यानंतर, आता टार्गेट होते, कधी एकदा क्वालालंपूर येते आणि आम्ही मलेशियात उतरतो.
दिवसभराची धावपळ, ते कुतूहल, ते मलेशिया, मन अगदी विचारांनी भारावलेले आणि सोबतच धास्तावलेले!

सलग ५ तासांचा मुंबईहून प्रवास, सकाळी ५.३० आणि शेवटी तो क्षण! वेलकम टू मलेशिया, एअरलाइं कडून ऑफिषियल अन्नौंस्मेंट! वुहू... आले रे आले आपले मलेशिया आले...

कधी येतय कधी येतय चे नादात झोप विसरून गेली, व आता विमानात काय काय सुरू आहे बघतच सकाळची वाट पाहत राहिलो..

पटपट उतरण्याची बिलकुल घाई केली नाही, म्हणलं, हे विमान आहे, बस किंवा ट्रेन नाही, आणि आपल्यालाही पुढची घाई नाही, म्हणून सगळ्यात शेवटी जाऊ म्हणलं.
याचाही एक फायद्याचा विचार केला होता, तो म्हणजे, उशिरा उत्रून आरामात जाऊन, मग इमिग्रशन करू, म्हणजे हे आधी निघालेले लटांबळ त्यांचे इमिग्रेश्र्न करून निघून जाईल व गर्दी कमी होईल!

मग काय, निघालो आरामात, हॉटेलात चेक इन टाईम होता दुपारी २ वाजता (आपल्याकडे भारतात नॉर्मली ११-१२ वाजता असतो). इमिग्रेश्ण ला म्हणलं २ तास जाईल, तरी अजून ४-५ तास बाकी होते, आणि ते एअरपोर्ट वरच घालवायचे होते.

आधी एअरपोर्ट चे वॉश रूम वापरले, मस्त ब्रश चेहरा धुवून फ्रेश झालो, अगदी राजेशाही थाटात! नो पब्लिक अँड वेरी क्लीन. एअरपोर्ट ला नॉर्मली सगळी दुकाने, रेसटॉरंट उघडीच असतात, त्यामुळे आता तिथेच भ्रमंती करण्याचा विचार घेतला.

ईमिग्रेश्र्न केले, इथेही काही किचकट विचारणा नाही, रिटर्न तिकीट, हॉटेल बुकिंग व वापस कधी जाणार एवढेच प्रश्न! पटकन इमिग्रेष्ण केले, व सिक्युरीटी चेक करून बाहेर पडलो!

वेलकम टू मलेशिया!! सेलामत दतांग!! (ऑफिशीयल वेलकम)

सर्वात आधी काम केले ते लोकल मोबाईल सिम कार्ड घ्यायचे.

७ दिवसांचे ट्रॅव्हल सिम घेऊन, तिकड मोबाईल वापरायचा श्री गणेशा केला!

भूक जबरदस्त लागली होती, काही मिळत का खायला एवढ्या सकाळी बघितलं, सबवे, चहा कॉफी, बरेच ऑप्शन्स दिस होते, शेवटी एक ऑरगॅनिक फूड म्हणून नावाचे रेसटॉरंट फायनल केले ऑप्शन बरे होते, आता इकडचेच खायचे म्हणून तिथली फेमस डिश नासी लेमक आणि सोबतीला सँडविच घेतले! जास्त गोड होते, बहुदा मलेशियन पबलिक गोड खात असावी, असो!

न्याहारी झाली, २-३ तास उगाचच इकडून तिकडून फिरून अख्खा एअरपोर्ट हिंडून काढला, आता जायचे होते, तिथल्या मेन एरियात.
टॅक्सी च्या ऐवजी, पलबिक ट्रांस्पो ट युज करू म्हणलं. (मेन एरिया, के एल सेंट्रल, जसा मुंबई चां दादर, पुण्याचा स्वारगेट/शिवाजीनगर).

एअरपोर्ट ते के एल सेंट्रल तिकीट घेतले, आणि मलेशियन जर्नी चां पहिला टप्पा सुरू केला!

बस अगदी टाप टीप, स्वच्छ. एअरपोर्ट ते के एल सेंट्रल १-१.३० तास प्रवास भन्नाट! हे मोठे हायवे, हाय स्पीड वाहने वेगात, निर निराळ्या कार, बस मॉडेल्स! वावा! अगदी दुसऱ्या दुनियेत आलेलो. आजू बाजूला बघून मज्जा येत होती.

स्वतः सगळे आयोजन करून अनुभव घेत होतो, त्यामुळे, मज्जा कितीतरी पटीने वर्णन करता न येणारी होत होती!

अबब, काय ते टॉवर्स आणि काय ती लखलखीत दुनिया!

सिटी जवळ आली की, सगळे भव्य, फॉरेन दिसू लागले. क्वालालंपूर ची भव्यता, ट्विन टॉवर, अगदी कितीतरी लांबून दिसत होते, हेच ते वैभव ज्यास बघण्यासाठी इतका लांब प्रवास केला!

शिस्त मय ट्रॅफिक, नो पोलीस, ओन्ली सिग्नल!

बघून आता एका क्षणी वाटले की, आत्ता इथेच स्थायिक व्हावे!

बस के एल सेंट्रल ला आली, आणि एअरपोर्ट ते के एल प्रवास संपन्न झाला!

आता टारगेट होते, हॉटेल चेक इन करायचे आणि रिलॅक्स व्हायचे!

आता तिथून बसणे जाणे सोयीचे नव्हते, म्हणून टॅक्सी ने जाणे ठरवले.
मलेशियात उबर, चालते, पण नेमके ज्या दिवशी उतरलो, त्या दिवशीपासून, UBER कंपनी ग्रेब (Grab) सोबत मर्ज झाली कळले.

पटकन अॅप डाऊनलोड केले व हॉटेल चां पत्ता टाकून आगे कुच केले!
दुसऱ्या देशातील कार मध्ये पहिल्यांदा बसण्याचा तो योग!
नाऊ, फिलिंग वाज वु हू. . . . .

हॉटेलात चेकिन झाले, हाय राईज टॉवर, मस्त आजूबाजूचा खिडकीतून दिसणारे नजारे पाहून, रिलॅक्स झालो, व थोडी विश्रांती केली...

टू बी कंतिण्यु इन भाग - ४....

प्रतिक्रिया

तमराज किल्विष's picture

10 Sep 2019 - 1:36 pm | तमराज किल्विष

छान! फोटो पाहिजेतच. त्याशिवाय आम्हाला खरी सफर कशी घडेल? धन्यवाद.

वैभव.पुणे's picture

10 Sep 2019 - 11:28 pm | वैभव.पुणे

भाग -४ पासून फोटो सहित सहल घडेल!

अनिंद्य's picture

10 Sep 2019 - 2:04 pm | अनिंद्य

सलामत दतांग !
भाग मोठे, लवकर आणि फोटोसकट टाका प्लीज

वैभव.पुणे's picture

10 Sep 2019 - 11:27 pm | वैभव.पुणे

भाग - ४ पासून फोटोसहित सविस्तर लिखाण येत आहे हो...

कंजूस's picture

10 Sep 2019 - 5:34 pm | कंजूस

फोटो फोटो फोटो।
थोडी माहिती काढली होती ना अगोदर त्यात काय अनपेक्षित बदल झाले का?

वैभव.पुणे's picture

10 Sep 2019 - 11:33 pm | वैभव.पुणे

फोटो येत आहेत.
अनपेक्षित असे काही घडले नाही, सर्व माहितीतून आलेले बऱ्यापैकी कामी आले, तिथे जाऊन काहीतरी वेगळे असे काही घडले नाही, वातावरण सूट झाले, जेवायची म्हणाल तर सोय झालीच. शक्य तितके पायी फिरून व बस पकडून कुआळलंपुर मनसोक्त अनुभवले! पुढचे अनुभव लवकरच येतील मीपा वर!

सोत्रि's picture

10 Sep 2019 - 6:42 pm | सोत्रि

एअरपोर्ट ते के एल सेंट्रल तिकीट घेतले, आणि मलेशियन जर्नी चां पहिला टप्पा सुरू केला!

हे मस्त केलंत. तो एक तासाचा ड्राइव्ह एकंदरीत शहराबद्दलचे आणि मलेशियाबद्दलचे मत अनुकूल करतो.

के एल सेंट्रल ते एयरपोर्ट ट्रेन पण झक्कास आहे, २० मिनीटाचा प्रवास पण बसचा प्रवास जास्त चांगला.

- (मलेशियानिवासी) सोकाजी

वैभव.पुणे's picture

10 Sep 2019 - 11:30 pm | वैभव.पुणे

:-) लोकल बनून शहर अनुभवायचे होते, त्यामुळे हा प्री प्लॅन असलेला निर्णय! आणि के एल एक्स्प्रेस चे तिकीट बघता, बसच योग्य वाटली! ;-)

सुधीर कांदळकर's picture

10 Sep 2019 - 7:26 pm | सुधीर कांदळकर

की फोटो न टाकल्यास दंड वसूल करावा. बाकी वर्णन छान. दतांग .....

धन्यवाद.

वैभव.पुणे's picture

10 Sep 2019 - 11:26 pm | वैभव.पुणे

भाग - ४ पासून फोटोसहित सविस्तर लिखाण येत आहे हो...

वैभव.पुणे's picture

10 Sep 2019 - 11:27 pm | वैभव.पुणे

सध्या धकवून घ्या, उगाच दंड नको, मिपा वर दंडनीय अॅक्ट चालू करावा लागेल मग..:-):,-):,-);-)

श्वेता२४'s picture

11 Sep 2019 - 10:59 am | श्वेता२४

पुढील भाग येऊदेत लवकर

चौकस२१२'s picture

16 Sep 2019 - 2:27 pm | चौकस२१२

काय वेगळं बघितलेत ते नक्की लिहा, काय वेगळं खाल्लेत? उदाहरणार्थ तेथे भरपूर तामिळ हिंदू आणि तामिळ मुस्लिम पद्धतीचे जेवण मिळते त्यातील तामिळ हिंदू आपलय परिचयाचे असेल , तामिळ मुस्लिम, या शिवाय मले मुस्लिम , मलेशिअन चिनी इत्यादी ते हि खाऊन बघा , करी पफ ( करंज्या टुना माशाच्या , कोंबडीच्या ) गोडात,बर्फ कचान्ग , सावर चेरी + लिंबू ,
कोठे कोठे जाणार आहेत, जेटिंग हायलँड हे नेहमीचच आहे जर वेळ मिळाला तर कुआला सेलंगूर येथील काजवे बघायला जाउ शकता १ दिवस + रात्र
वाटते मस्त फळ फळवाल रस्त्याकडेला खा

वैभव.पुणे's picture

16 Sep 2019 - 8:29 pm | वैभव.पुणे

नमस्कार, एप्रिल मध्ये जाऊन आलेलो आहोत..
काजवे बघायचा प्लॅन होता, पण चौकशी केली असता, आम्ही पौर्णिमेला गेलो कारणाने, बुकिंग वाल्यांनी नम्रपणे, नका जाऊ सांगितले, पौर्णिमेचा प्रकाश आणि काजवे फार कठीण मेळ!! त्यामुळे नाही गेलो.

शाकाहारी असल्याने, जलान अलोर ला भरपूर असूनही खाता आले नाही, पण जे जे वेज होते, वेगळे होते, ते भरपूर खाल्ले. स्ट्रीट फूड, आइस्क्रीम, मलेशियन व चायनीज खाऊन चंगळ केली!!

तिकडची किवी फार मस्त वाटली, रंग वेगळा व चव वेगळीच!!

Nitin Palkar's picture

16 Sep 2019 - 8:29 pm | Nitin Palkar

मी देखील मलेशिया, सिंगापूर सहल ठरवतोय. सहल आयोजकविना. एका परदेश सहलीचा अनुभव आहे पण त्या वेळेस मुलगा आणि सून बरोबर होते. आता आम्ही दोघेच जाण्याचे ठरवतोय. तुमच्या लेखमालेचा नक्की उपयोग होईल. पुढील भागाच्या प्रतीक्षेत, पुलेशु.

चौकस२१२'s picture

17 Sep 2019 - 5:03 am | चौकस२१२

तुम्हाला साधारण कोणत्या गोष्टी आवडतात म्हणजे ऐतिहासिक, वास्तू नवीन वास्तू, जेवण, कला, आधी काय पहिले आहे कुठे गेला आहेत, किती वेळ आहे ? हे kalawet तर माहिती देणार्याला तशी योग्य मदत करता येईल ,
पूर्वे कडे , ४-5 तासात जात येईल असे
जर संस्कृती / वेगळे स्थापत्य इत्यादी पाहायचे असेल तर बाली ( आणि ते सुद्धा शक्य असल्यास कुटा चा गजबजाट टाळून )
मनुष्य निर्मित चकाचक बघायचा असले तर सिंगापोर आणि त्याबरोबर मलेशिया चा काही bhag
जंगल तर अनवट मलेशिया ( बोर्निओ)
इतर म्हणजे कंबोडिया अंगकोर wat
थायलंड, संस्कृती देवळे + समुद्र

चौकस२१२'s picture

17 Sep 2019 - 5:06 am | चौकस२१२

अजून वेगळे , थायलंड ते सिंगापोर आगगाडीने
जावा बेटावर जकार्ता पासून आगगाडीने बोरोबादुर पर्यंत जाणे ( जकार्ता विशेष काही नाही)

अनिंद्य's picture

17 Sep 2019 - 10:37 am | अनिंद्य

.....थायलंड ते सिंगापोर आगगाडीने...
.....जावा बेटावर जकार्ता पासून आगगाडीने बोरोबादुर.....

हे मला करायचे आहे. कधी जमेल माहित नाही :-(

चामुंडराय's picture

16 Sep 2019 - 8:42 pm | चामुंडराय

पुढचा भाग लवकर टाका.
बाकी कुठलीही ट्रिप स्वतः प्लॅन करून स्वतःला हवी तशी अरेंज करण्याची गंम्मत न्यारीच ह्यात शंका नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2019 - 9:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचतोय. वर्णन छान.

-दिलीप बिरुटे

माझीही शॅम्पेन's picture

3 Dec 2019 - 2:11 pm | माझीही शॅम्पेन

अरेच्चा पुढच्या भागाची कधीपासून वाट बघतोय , लवकर टाका कि राव , नम्र विनंती