मिपा दिवाळी अंक आवाहन

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in लेखमाला
12 Sep 2019 - 7:19 pm

.bgimg-1 {
background-image: url("https://i.postimg.cc/tgHfbch4/paper-b.png");
}
p {
margin-left:20px;
margin-right:20px;
text-align:justify;
font-size:19px;
}

मिपा दिवाळी अंक आवाहन

IMG-20190910-WA0007

मंडळी, गणपतीबाप्पांना निरोप देऊन झालेला आहे, श्रीगणेश लेखमालाही सुफळसंपूर्ण झाली आहे आणि आता सगळ्यांना वेध लागले असतील ते येणाऱ्या दिवाळीचे. दिवाळी म्हटली की दिव्यांच्या रोशणाईच्या, उटण्याच्या, अत्तरांच्या, रांगोळीच्या रंगांच्या आणि फराळाच्या खमंग सुवासाच्या आठवणी आपसूकच प्रत्येकाच्या मनामध्ये रुंजी घालायला लागलेल्या असतील. अशी काही काही समीकरणं आपल्या डोक्यात फिट बसलेली असतात. ह्याबरोबरच मराठी माणसासाठी या समीकरणाचा आणखी एक पैलू आहे, तो म्हणजे दिवाळी अंक. दिवाळी अंकांशिवाय आपली दिवाळी अपूर्णच.

सालाबादप्रमाणे या वर्षीसुद्धा आपल्या मिसळपावचा दिवाळी अंक वाजत गाजत येणार आणि नेहमीप्रमाणेच लेख, प्रवासवर्णनं, कथा, कविता, व्यंगचित्रं अशा चौफेर वाचनफराळाने हा अंक सर्वांगसुंदर नटणार! अर्थात, तुम्ही सगळ्यांनी हातभार लावल्याशिवाय हे शक्य नाही.

तर मिपाकरहो, आहात ना तयार? तुम्हां सर्वांना लिहायला सुरुवात करण्याची मनःपूर्वक विनंती आहे. आपल्याला जे आवडेल, रुचेल ते लिहा. फक्त दिवाळी हा आनंदाचा सण असल्याने, लिखाणाला उदासीची, हिंसेची वा बीभत्सतेची छटा शक्यतो नको.

तसंच, नेहमीच्या लिखाणाखेरीज आम्ही तुमच्यासाठी एक लेखनविषयसुद्धा घेऊन येतो आहोत. त्या विषयाला धरूनसुद्धा तुम्ही आपलं लेखन पाठवू शकाल.

विषय (थीम) आहे : रसग्रहण.

कशाला म्हणावं रसग्रहण? एखाद्या विषयाच्या अनुषंगाने सुचलेले विचार आणि त्या अनुषंगाने इतर संदर्भ देताना, सोप्या आणि सहज भाषेत केलेलं अभ्यासपूर्ण आणि/ किंवा माहितीपूर्ण लेखन वा विचारांची मांडणी. मात्र, मांडणीत विद्वत्तेपेक्षा रसिकतेची अनुभूती यावी. रसग्रहणाने विषयाच्या आशयाचा विविध पातळ्यांवर शोध घ्यावा. त्यातील सौंदर्यस्थळं उलगडावीत, वाचकांना रसग्रहण वाचताना विषयाचा कौतुकपूर्ण परिचय व्हायला हवा.

रसग्रहण म्हणजे समीक्षण नाही, इतकं लक्षात ठेवता पुरे.

तर, कशाचं रसग्रहण करायचं आहे?

आपण रसग्रहण हा विषय केवळ पुस्तक, चित्रपट, नाटक वा गाणं ह्यापुरता मर्यादित राखणार नाही आहोत. रसग्रहण ही संकल्पना पुढे नेत, खाद्यसंस्कृती, स्थळ, भाषा, साहित्यप्रकार, लेखकाची लेखनशैली, आवडते लेखक, कलाकार, स्थापत्यकला, एखाद्या काळाविषयी (period), चित्रकला, फोटोग्राफी, नृत्य, नाट्य, संगीत असे अनेक विषय ह्या संकल्पनेमध्ये समाविष्ट होऊ शकतील. तुमच्या आवडीचा विषय तुम्ही निवडू शकाल.

ह्या विषयाला धरून लेखन दिलंत, तर रसग्रहणाचा विषय आम्हाला कळवायला विसरू नका.

अर्थात, विषय दिला म्हणजे फक्त त्यासंबंधित साहित्य स्वीकारणार असं नाही. विषयाधिष्ठित किंवा आपल्याला सुचलेल्या विषयावर अशा दोन्ही प्रकारच्या लेखनाची आम्ही वाट बघत आहोत. लेखाबरोबर प्रकाशचित्रे दिल्यास शक्यतो स्टॅण्डर्ड आकारातील - उदाहरणार्थ, ६४० x ४८०, १०२४ x ७६८ वगैरे, कसल्याही प्रकारे कोडींग वा Formatting न करता पाठवावीत, ही विनंती.

लेखन देण्याची मुदत १० ऑक्टोबर, २०१९.

आपलं लेखन 'साहित्य संपादक' या आयडीवर व्यनिने पाठवा किंवा sahityasampadak.mipa@gmail.com या पत्त्यावर ईमेलने पाठवा. काही प्रश्न, अडचणी असतील तर आमच्याशी (साहित्य संपादक) संपर्क साधा. दिवाळी अंकात आपलं लिखाण पाठवताना ते आधी कुठेही (म्हणजे छापील स्वरूपात आणि डिजिटल स्वरूपात - अगदी स्वतःच्या फेसबुक भिंतीवरसुद्धा) प्रकाशित झालेलं नाही, याची काळजी घ्या.

तसा आपल्याकडे अजून वेळ आहे, तेव्हा होऊ जाऊ द्या लेखनाला सुरुवात! एक से बढकर एक लेख, कविता, कथा येऊ द्या मिपाकरहो, आम्ही तुमच्या लेखनाची वाट पाहत आहोत.

तेव्हा, लागा लिहायला!

टीप : आलेल्या साहित्यापैकी दिवाळी अंकासाठी निवडलेले लेख प्रकाशित करून झाल्यानंतर जे अप्रकाशित लेख आणि इतर साहित्य प्रशासनाकडे असेल, ते सदस्य स्वत: प्रकाशित करू शकतील. तसंच मिपा दिवाळी अंक प्रकाशित झाल्यानंतर आपलं अंकातलं समाविष्ट लिखाण लगेचच इतरत्र प्रकाशित करू नये, अशी विनंती.

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

12 Sep 2019 - 7:43 pm | तुषार काळभोर

लै भारी चित्र!! एक लंबर....
रोचक थीम. सुंदर रांगोळी!

थीम सोडून इतर लेखसुद्धा भारीच असणार.
आनंद, उत्साह, रोषणाई, फटाके, फराळ आणि दिवाळी अंक!

अब आयेगा मजा!!

पद्मावति's picture

12 Sep 2019 - 7:37 pm | पद्मावति

आहा...मस्तंच. ग ले मा झाली आता वेध दिवाळी अंकाचे.

यशोधरा's picture

12 Sep 2019 - 7:46 pm | यशोधरा

मिपाकर लेखक चमूने भरभरून लिहावे, ही विनंती.
आम्ही आहोतच वाचायला.

दिनेश५७'s picture

12 Sep 2019 - 8:18 pm | दिनेश५७

रसग्रहण ही दिवाळी अंकाची संकल्पना खूप आवडली. अंक रसाळ होणार यात शंका नाही.

जव्हेरगंज's picture

12 Sep 2019 - 8:33 pm | जव्हेरगंज
तुषार काळभोर's picture

12 Sep 2019 - 9:11 pm | तुषार काळभोर

भारीये!

पद्मावति's picture

12 Sep 2019 - 9:26 pm | पद्मावति

क्लास जमलाय वीडीओ :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Sep 2019 - 10:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

एक नंबर !

ज्योति अळवणी's picture

13 Sep 2019 - 12:43 am | ज्योति अळवणी

झक्कास जव्हेरगंजजी,

एकदम perfect विडिओ

स्वाती दिनेश's picture

12 Sep 2019 - 8:37 pm | स्वाती दिनेश

रस ग्रहण करण्यास सज्ज.. :)
संकल्पना आवडली.. दिवाळीअंकाची उत्सुकता आहेच..
अंकासाठी लेख देण्याचा विचार तर आहे,
स्वाती

ज्योति अळवणी's picture

13 Sep 2019 - 12:45 am | ज्योति अळवणी

वा वा

दिवाळी अंकाची announcement झाली तर!!! जमेल तो प्रयत्न नक्की करणार. बाकी वाचन चंगळ आहेच

उत्तमोत्तम लेखांची मेजवानी मिळणार.

जॉनविक्क's picture

13 Sep 2019 - 8:49 am | जॉनविक्क

अनिंद्य's picture

13 Sep 2019 - 10:35 am | अनिंद्य

रसग्रहणाची थीम उत्तम आहे.
दिवाळी तसाही खाणे-पिणे, अत्तर-उटणे, रोषणाई आणि हल्ली दिवाळी पाडवा पहाटेचे सूरस्नान असा 'सेन्सरी ओव्हरलोड' असलेला रसयुक्त सण आहे.

अंकासाठी काही लिहिण्याचा प्रयत्न असेल.

अनेक शुभेच्छा.

नंदन's picture

13 Sep 2019 - 1:27 pm | नंदन

रसग्रहणाची थीम सुरेख आहे. ह्या निमित्ताने, तुलनेने अप्रसिद्ध गोष्टींबद्दल अधिक वाचायला मिळेल याची उत्सुकता आहे.

सुधीर कांदळकर's picture

13 Sep 2019 - 2:22 pm | सुधीर कांदळकर

चित्र, रांगोळी आणि आवाहनाचे शब्दांकन देखील. अंकाच्या लेखकांकडून असलेल्या लेखनाच्या अपेक्षा नेमक्या शब्दबद्ध केल्या आहेत. एवढे सुंदर आवाहन लेखनप्रवर्तकच ठरो! अंकाला अनेक अनेक शुभेच्छा.

फार गहन विषय निवडला आहे मालक .. आम्ही तर अंक येण्याआधीच बाद झालो .. त्ये रसग्रहण कि काय म्हणतात ते निदान या मालिकेत लेख वाचून तरी शिकता येईल ..

पाषाणभेद's picture

13 Sep 2019 - 3:42 pm | पाषाणभेद

आता हाय का!
म्हंजे आपन तर वाचत न्हाईच मंग ल्यायचं कुठनं वं?
आन समजा नाय लिवलं, तर मंग वाचनार्‍यांचं लिवल्यालं वाचायंच!
चेष्टा हाय व्हय?

हाकानाका.

दुर्गविहारी's picture

13 Sep 2019 - 6:10 pm | दुर्गविहारी

दिवाळी अंकाची उत्सुकता वाढली आहे. धागा लिहीणारच आहे आणि मुख्य म्हणजे वेळेवर देणार आहे.

कुमार१'s picture

14 Sep 2019 - 5:10 am | कुमार१

लेख पाठवला आहे !

मित्रहो's picture

14 Sep 2019 - 11:25 pm | मित्रहो

काहीतरी लिहिण्नयाचा नक्की प्रयत्न करतो

सरनौबत's picture

16 Sep 2019 - 11:57 am | सरनौबत

रसग्रहणाची व्याख्या / अपेक्षा फार सुंदर रीतीने उलगडून सांगितली आहे. काहीतरी 'रसरशीत'लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करीन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Sep 2019 - 10:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गलेमाचा गणेशा एसटीत बसून बाय बाय करुन आत्ताच निघालाय.
आपण त्याला बाय केल्याचा हात अजून वरच आहे की दिवाळीची हाक आली. :)

दिवाळी अंकाचं बॅग्राउंड, आवाहन, आणि विषय आवडला.
शुभेच्छा आणि सहभागासाठी प्रयत्न असेलच.

बाय द वे, अशा आवाहनातच पुढचा विशेषांक काय असेल वगैरेची एक पुसटशी कल्पना दिली पाहिजे
असे वाटते, म्हणजे आमच्यासारखे हौशी लेखक कोणत्या तरी एखाद्या अंकात बसू शकतील.

-दिलीप बिरुटे
(वाचक मिपाकर)

चांदणे संदीप's picture

20 Sep 2019 - 1:49 pm | चांदणे संदीप

माझ्याकडून दोन कविता. एक हार्ड ल्याडिंग आणि एक सॉफ्ट ल्याडिंग साठी. ;)

सं - दी - प

जव्हेरगंज's picture

29 Sep 2019 - 5:51 pm | जव्हेरगंज
मायमराठी's picture

30 Sep 2019 - 7:35 pm | मायमराठी

नवनवीन साहित्य वाचायला अशी उत्कंठा वगैरे वाढणे किती सुखद असते नाही?

ज्योति अळवणी's picture

15 Oct 2019 - 8:25 am | ज्योति अळवणी

अप्रतिम विडिओ

ज्योति अळवणी's picture

15 Oct 2019 - 2:25 pm | ज्योति अळवणी

अप्रतिम विडिओ

कुमार१'s picture

30 Sep 2019 - 11:32 am | कुमार१

सुंदरच हो , धन्यवाद .

तुषार काळभोर's picture

30 Sep 2019 - 11:43 am | तुषार काळभोर

येणार !
वाजणार !!
गाजणार !!!

स्वधर्म's picture

1 Oct 2019 - 12:23 pm | स्वधर्म

आधीच स्वागत! अंकातील गोष्टींची अाणि लेखांची उत्सुकता अाहे.

गुल्लू दादा's picture

6 Oct 2019 - 6:39 pm | गुल्लू दादा

लेख पाठवला आहे.

अनिंद्य's picture

9 Oct 2019 - 4:33 pm | अनिंद्य

लेख पाठवला आहे हो !
आता प्रतीक्षा वाचन-मेजवानीची.

पाषाणभेद's picture

10 Oct 2019 - 3:23 am | पाषाणभेद

दिवाळी अंकासाठी लेख लिहीण्याचे कसलेही प्रयोजन नव्हते. आज रात्री वेळ असल्याने लेख लिहीला गेला. प्रकाशित करणार तेवढ्यात दिवाळी अंकासाठी लेख पाठवायची शेवटची तारीख तरी पाहून घेवू म्हणुन येथे आलो अन आजच शेवटची तारीख असल्याचे पाहीले.

मग लेख प्रकाशित न करता दिवाळी अंकासाठीच्या 'साहित्य संपादक' या ईमेल वर पाठवला आहे.

वाचूया मग इतरही लेखन!

यशोधरा's picture

10 Oct 2019 - 1:08 pm | यशोधरा

मस्तच की पाभेभाऊ! इथपासून इथवर झालेला बदल छानच आहे!

जेम्स वांड's picture

10 Oct 2019 - 1:05 pm | जेम्स वांड

एक इस्कलबाज लेख यथामती लिहून पाठवला आहे.

आता फक्त दिवाळी अंक वाचण्याची हुरहूर लागली आहे.

मुक्त विहारि's picture

10 Oct 2019 - 7:49 pm | मुक्त विहारि

उजवा हात अद्याप Plaster मध्ये आहे.

त्यामुळे खूप वेळ टाइप करायला लागतो.

यशोधरा's picture

10 Oct 2019 - 8:04 pm | यशोधरा

व्यनी बघा मुवि.

जव्हेरगंज's picture

18 Oct 2019 - 11:47 pm | जव्हेरगंज
ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Oct 2019 - 8:18 am | ज्ञानोबाचे पैजार

अफाट म्हणजे अफाटच लैच आवडल्या गेला आहे.
बर्‍याच दिवसांनी डुडळगावच्या गोलंदाजाची आठवण झाली आणि मन भरुन आले.
लगे रहो जव्हेरभाय...
पैजारबुवा,

हरिहर's picture

19 Oct 2019 - 8:55 am | हरिहर

अशक्य आहे!

सर्वसाक्षी's picture

19 Oct 2019 - 11:11 am | सर्वसाक्षी

मजा आली

चांदणे संदीप's picture

19 Oct 2019 - 5:15 pm | चांदणे संदीप

=)) =)) =))
मिपाचे एक वेगळेच जग आहे हे यानिमित्ताने अधोरेखित झाले.
आणि हिटलरने जो पैजारबुवांच्या विडंबनाचा अभ्यास करायला सांगितला ते ऐकून जी हालत खराब झाली भल्याभल्यांची ती पाहून लैच्च मज्जा आली राव! =)) =))

सं - दी - प

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Oct 2019 - 6:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लैच भारी. खरं तर दिवाळी अंकात स्वतंत्र पाहीजे हे. नंबर एक, आवडल्या गेलं आहे.

-दिलीप बिरुटे

प्राची अश्विनी's picture

20 Oct 2019 - 9:23 am | प्राची अश्विनी

खमंग खुसखुशीत आणि कडक.:)

मित्रहो's picture

21 Oct 2019 - 11:28 am | मित्रहो

लय म्हणजे लयच आवडले हे. तांब्याधिपती काय, पैंजारबुवांची विडंबण काय सारच आवडले. शेवट त्या अजरामर कवितेनी. मस्त. खतरनाक

धर्मराजमुटके's picture

21 Oct 2019 - 9:43 pm | धर्मराजमुटके

लै म्हणजे लैच आवल्डा व्हिडो. अस्ल्या व्हिडोंची पण एक काँपीटीशन होउन जाऊ द्या मिपावर एकदा.

बिपीन सुरेश सांगळे's picture

19 Oct 2019 - 1:48 pm | बिपीन सुरेश सांगळे

जव्हेरगंज
कैच्या काई राव .
भारी मजा आया .

साहित्य संपादक's picture

19 Oct 2019 - 2:55 pm | साहित्य संपादक

यावेळी दिवाळी अंकासाठी भरभरून साहित्य आलंय. उत्तम प्रतिसादासाठी अनेकानेक आभार मंडळी.
लेखननिवडीची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. ज्यांचे लिखाण दिवाळी अंकात समाविष्ट होऊ शकणार नाही त्यांना वैयत्तिक निरोप आज रात्रीपर्यंत जातील. ज्यांना व्यनी मिळाले नाही त्यांनी हीच घोषणा स्वीकृतीची पोचपावती समजावी.
दिवाळी अंकासाठी लेखन पाठविणाऱ्या सर्व लेखकांचे आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो
असाच लोभ असू द्यात
सस्नेह
टीम दिवाळी अंक