लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
गुड्डे बिस्किट
दुध
रंगीत बॉल्स
क्रमवार पाककृती:
१. बिस्किटाचे छोटे तुकडे करुन घ्या
२. मिक्सरमध्ये बिस्किट बारीक करुन घ्या
३. आता बारीक केलेले बिस्किट एका भांड्यात घ्या
४. आत यामध्ये थोडे दुध घालून एकत्र करुन घ्या
५. आता त्यामध्ये रंगीत बॉल्स घालून एकत्र करुन घ्या
६. आता हे मिश्रण मोदक साचामध्ये घालून मोदक तयार करुन घ्या
गुड्डे बिस्किट मोदक तयार आहेत
अधिक टिपा:
आपल्या आवडीप्रमाणे आपण कोणतेही दुसरे बिस्कीट घेऊ शकता
रेसिपीचा पूर्ण व्हिडीओ : https://youtu.be/PVS_xcoNoPc
प्रतिक्रिया
27 Aug 2019 - 12:41 pm | खिलजि
पार्ले किंवा मारीचे मोदक कशे लागतील ?? विचार करतोय ,, मीपण करू शकतो असे वाटतंय ,, पण खाऊ शकतो कि नाही त्याची कल्पना नाही .. किंव आहेत का मिपाकर ,, जे मी बनवलेले ,, मारीचे मोदक खातील ?
27 Aug 2019 - 12:56 pm | ज्ञानोबाचे पैजार
खिलजी काका आहो तुम्ही मारीच काय न्युट्रीचॉइस बिस्कीटाचे किंवा उपासाच्या बिस्कीटांचे मोदक बनवलेत तरी खाईन मी .
फक्त त्या पेडीग्रीच्या बिस्कीटांचे मोदक नका बनवू बुवा, किंवा बनवलेत तरी बिस्कीटाचे नाव वेगळेच सांगा.
हाकानाका
रच्याकने :- रंगीत गोळ्या म्हणजे बडिशोपेच्या गोळ्या का? कारण रंगीत गोळ्या म्हटले की डोळ्यासमोर काहीतरी वेगळेच उभे रहाते. हा बाप्पाचा नेवैद्य असल्याने ते इकडे त्या गोळ्या वापरुन चालणार नाही.
पैजारबुवा,
27 Aug 2019 - 7:18 pm | खिलजि
१११
28 Aug 2019 - 12:44 am | Namokar
बडिशोपेच्या गोळ्या चलतील , ईथे मी केक / आईस्क्रीम वर टाकतात ते "रेनबो स्प्रिंकल बॉल्स" वापरले आहेत :)
28 Aug 2019 - 12:40 am | Namokar
आपल्या आवडीप्रमाणे आपण कोणतेही दुसरे बिस्कीट घेऊ शकता ...
27 Aug 2019 - 12:44 pm | जॉनविक्क
हे करता येईल मलाही :)
27 Aug 2019 - 5:01 pm | जव्हेरगंज
साधी शिंपल रेशीपी!!!
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2816484705031517&id=17471912...
28 Aug 2019 - 12:39 am | Namokar
धन्यवाद __/\__
27 Aug 2019 - 9:55 pm | जालिम लोशन
बिस्किटाचा रंग नाही आला!
28 Aug 2019 - 12:39 am | Namokar
चोको अल्मन्ड फ्लेवरचे गुड्डे बिस्कीट आहे :) त्यामुळे असा रंग आला
28 Aug 2019 - 10:39 am | यशोधरा
बाप्पाला बिस्किटे खाऊ घालायची म्हणता? :)
असेच खव्याचे मोदक करता येतील, त्यात गुलकंद वगैरे टाकता येईल. भारी, ह्या दोन तारखेला करते.
मूळ आयडियेच्या कल्पनेबद्दल धन्यवाद!
29 Aug 2019 - 9:22 pm | पिंगू
जरा हे ट्राय करून बघ..
29 Aug 2019 - 9:37 pm | यशोधरा
सही आहे हे! चिकू मिळतात का बघते आणि मोदक अथवा बरफी टाइप करून बघणार नक्की. वा खूण साठवली.
28 Aug 2019 - 12:27 pm | जॉनविक्क
अन माझेच डोळे पाणावले. :D
28 Aug 2019 - 1:41 pm | आजी
वेगळीच कल्पना. पदार्थ चांगला लागेल. करुन पाहायला हवा.
28 Aug 2019 - 2:01 pm | खिलजि
आम्हालाही बोलवा केल्यावर .. मुंबईत राहत असाल तर त्वरित येऊ .. बोलवाल ना .. सांगा ना ..
28 Aug 2019 - 2:11 pm | जॉनविक्क
असं म्हटल्यावर कोण बोलावणार,
खाऊ शकतो की नाही कन्फर्म बोला ;)
28 Aug 2019 - 2:32 pm | खिलजि
अरे दुसऱ्यानं केलेलं खायला काय रे .. पण मी स्वतः केलेलं खाऊ शकतो कि नाही हे मला माहित नाही , म्हणून असं टंकल होत वरती
28 Aug 2019 - 3:11 pm | जॉनविक्क
दुसऱ्यानं केलेलं खाउ शकता का ते कन्फर्म बोला नंतर तक्रार उत्तरदायीत्वांस नकार लागू.
28 Aug 2019 - 3:13 pm | खिलजि
हो नक्कीच ,, जर दुसऱ्यानं कुणी आयतं बनवून दिल तर खायला काय हरकत आहे .. नक्कीच खाईन ..फक्त भूक जर जास्तच आहे याची जाणकारांनी नोंद घ्यावी ..
29 Aug 2019 - 11:46 pm | टवाळ कार्टा
आता चिकन घातलेले मोदक बघितले कि झाले :)