गाभा:
बासल् (स्विट्झर्लंड) येथे झालेल्या जागतिक बॅड्मिंटन विजेतेपद स्पर्धेच्या (World Badminton Championships 2019) अंतिम सामन्यात नोझोमी ओकुहारा हिचा २१-७, २१-७ असा मोठ्या फरकाने सरळ पराभव करत पी व्ही सिंधू जगज्जेती झाली आहे. हा ऐतिहासिक बहुमान मिळवणारी ती पहिली भारतिय आहे.
आतापर्यंत या स्पर्धेत ५ पदके मिळवून आणि तीनदा अंतिम स्पर्धेपर्यंत धडक मारल्यानंतर आज सिंधुने सुवर्णपदकावर हक्क प्रस्थापित केला आहे.
कोणत्याही जागतिक स्पर्धेत ब्राँझ, रौप्य आणि सुवर्ण पदके मिळविणारी सिंधु ही पहिली भारतिय खेळाडू आहे.
(सर्व चित्रे, जालावरून साभार)
प्रतिक्रिया
25 Aug 2019 - 6:53 pm | जॉनविक्क
I just simply like her.
25 Aug 2019 - 7:05 pm | राघव
मनःपूर्वक आनंद झालाय.. खूप खूप अभिनंदन! :-)
25 Aug 2019 - 9:51 pm | झेन
मजा आणली सिंधू नी
26 Aug 2019 - 9:47 am | नि३सोलपुरकर
मनःपूर्वक अभिनंदन सिंधू चे .
26 Aug 2019 - 10:14 am | नाखु
अभिनंदन आणि शुभेच्छा
बाकी क्रिकेटवर पान भर आणि चवितचर्वण करणारी माध्यमेही या बातमीवर हातचं राखून लिहीतात, दाखवतात
26 Aug 2019 - 10:38 am | यशोधरा
सिंधूचे खूप अभिनंदन!!
26 Aug 2019 - 12:31 pm | आनन्दा
अभिनंदन!!
26 Aug 2019 - 12:55 pm | उपेक्षित
जियो सिंधू, proud ऑफ यु.
26 Aug 2019 - 1:01 pm | अभ्या..
धागालेखात असलेला बाल वॉशिंग्टनी उत्साह भावला.
लगे रहो.
26 Aug 2019 - 6:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
नक्की काय म्हणायचे आहे ???!!!
एखाद्या भारतियाने केलेल्या जागतिक विक्रमी कामगिरीबद्दलचे साधे कौतूकही इतका मानसिक त्रास देत आहे ? कमाल आहे !
27 Aug 2019 - 6:50 pm | उपेक्षित
च्यायला अभ्या भावा गल्ली चुकलास जणू ?
26 Aug 2019 - 1:01 pm | कुमार१
मनःपूर्वक अभिनंदन सिंधू चे .
26 Aug 2019 - 2:05 pm | राजेंद्र मेहेंदळे
सिंधुचे मन: पूर्वक अभिनंदन.
26 Aug 2019 - 6:48 pm | यशोधरा
अजून काही विजेते-
कोमलिका बारी - जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा - सुवर्ण
मानसी जोशी आणि प्रमोद भगत - जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धा - प्रत्येकी सुवर्ण
26 Aug 2019 - 7:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !!!
27 Aug 2019 - 1:55 pm | बेकार तरुण
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
26 Aug 2019 - 7:07 pm | सुबोध खरे
सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन
26 Aug 2019 - 9:52 pm | पियुशा
वा वा वा !!!!!
26 Aug 2019 - 9:57 pm | Rajesh188
अभिनंदन .
पण खेळा मध्ये हा आपला हा परका असे काही नसते .
ह्याच्या अगोदरचे सर्वोच्य रेकॉर्ड काय आहेत
26 Aug 2019 - 10:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
नायतर काय ! लोक उगाचच, आपला देश/खेळाडू जिंकला की आनंद साजरा करतात आणि हारला की दु:ख साजरा करतात ! येडबंबू कुठचे !
;) =))
27 Aug 2019 - 2:13 pm | बेकार तरुण
लोल... नाहीतर काय... उगाच ऑलिंपिक मधे सिल्व्हर मिळालेलं तेव्हा सगळे हळहळलो आणि आता खूष होत आहोत....
ह्याच्या अगोदरचे सर्वोच्य रेकॉर्ड काय आहेत>>> जरी तुमचे समाधान होणार नाही, तरी माझ्या परीने उत्तर ..
हा खेळ म्हणजे धावण्याची शर्यत नाही की १० सेकंदाचे वर्ल्ड रेकॉर्ड आहे.... ह्या अगोदरील कोणतीही वर्ल्ड चँपियनशिप फायनल इतकी वन साईडेड झालेली नाही (हे झालं
वैयक्तीक मतं).. अजुन काही ......
... सिंधुने लागोपाठ ३ वर्ष फायनलमधे पोचुन दाखवले आहे...
वर्ल्ड चँपियनशिपमधे ५ मेडल जिंकुन सर्वाधिक मेडल जिंकणार्या विक्रमाची बरोबरी केलेली आहे....
सर्व प्रकारची मेडल जिंकणारी जगातील ४थीच खेळाडु आहे...
गेल्या २० वर्षात चीन सोडुन ह्या प्रकारात (विमेन्स सिंगल्स) मेडल जिंकणारा भारत हा फक्त ५ वाच देश आहे... (४० वर्षात ६वा)...
सिंधुचा तसेच सर्व खेळाडुंचा जे जागतिक पातळीवर भारतासाठी मेडल जिंकतात त्यांचा अभिमान आहेच....
27 Aug 2019 - 5:52 am | चामुंडराय
सिंधूच्या ह्या दैदिप्यमान यशामुळे आसिंधु हिमालय अ'बाल' वृद्धांमध्ये उत्साहाचे 'वॉशिंग्टनी' वातावरण !!
27 Aug 2019 - 9:07 am | जॉनविक्क
27 Aug 2019 - 1:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे
'वॉशिंग्टनी' वातावरण
म्हणजे नक्की काय असते ?प्रश्न खरा आणि गंभीर आहे.
27 Aug 2019 - 11:01 am | लई भारी
_/\_
अभिमान वाटावा अशीच गोष्ट आहे. लोकसत्ताच्या संपादकीयात काही चांगले मुद्दे मांडले आहेत या अनुषंगाने.
अशा खेळाडूंच्या कुटुंबाचा खूप सहभाग आहे आणि तो प्रशंसनीय आहे असं काहीस लिहिलंय.
28 Aug 2019 - 1:51 pm | आजी
सिंधूचे मनापासून अभिनंदन..
28 Aug 2019 - 9:10 pm | ऋतुराज चित्रे
https://www.google.co.in/amp/s/www.news18.com/amp/news/buzz/while-pv-sin...
29 Aug 2019 - 12:13 am | जव्हेरगंज
बढिया!!!
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2818993974780590&id=17471912...