चंद्रयान आणि रिलेशनशिप

पुणेरी कार्ट's picture
पुणेरी कार्ट in जे न देखे रवी...
25 Jul 2019 - 4:03 pm

चंद्रयान आणि रिलेशनशिप,
पुढे जाण्यासाठी 'स्पेस' महत्वाची.

शब्दक्रीडा

प्रतिक्रिया

प्रसाद_१९८२'s picture

25 Jul 2019 - 4:10 pm | प्रसाद_१९८२

कवितेची उरलेली कडवी, चंद्रयान "सुर्यावर" उतरल्यावर लिहिणार आहात का ? :)

जॉनविक्क's picture

25 Jul 2019 - 5:23 pm | जॉनविक्क

धर्मराजमुटके's picture

25 Jul 2019 - 10:02 pm | धर्मराजमुटके

चंद्रयान आणि रिलेशनशिप,
पुढे जाण्यासाठी 'स्पेस' महत्वाची.

मात्र त्या अगोदर

चंद्रयान आणि रिलेशनशिप,
पुढे जाण्यासाठी जुळून येणारी 'डेट' महत्वाची.

झालच तर
चंद्रयान आणि रिलेशनशिप,
पुढे जाण्यासाठी 'बालाजी' ची हेल्प महत्वाची.

चंद्रयान आणि रिलेशनशिप

जमलं तर यशस्वी लक्ष्यभेद

नाही तर घट"स्फोट" नक्की

चंद्रयान आणि रिलेशनशिप

जमलं तर ओव्या

फसलं तर शिव्या !!!!

श्वेता२४'s picture

26 Jul 2019 - 10:57 am | श्वेता२४

दोन ओळी व त्यावरचे प्रतिसाद, सर्वच भारी

जालिम लोशन's picture

26 Jul 2019 - 2:21 pm | जालिम लोशन

सर्वांची प्रतिभा जागृत केली.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Jul 2019 - 2:35 pm | ज्ञानोबाचे पैजार

चंद्रयान आणि रिलेशनशिप
आवाज पहा येई कसा बीप बीप बीप
सुरवातीस होते भारी घाई घाई घाई
उडू लागता आवाज होई सुई सुई सुई

काउंट डाउन सुरु होता भर भर भर
आग कसे ओकू लागे घर घर घर
दुर जाता दिसू लागे छान छान छान
बघताना मोडून जाई मान मान मान

चांदोबाचा जेव्हा काढाल माग माग माग
मोठे होतील त्याच्या वरचे डाग डाग डाग
दुरुनच चंद्र भासे गोड गोड गोड
जवळ जाता दिसू लागे खोड खोड खोड

पैजारबुवा,

जॉनविक्क's picture

27 Jul 2019 - 2:56 pm | जॉनविक्क

असे कोणी म्हणू नये ही विन्नती आहे ;)