वरुण मोहिते यांना श्रद्धांजली

रानरेडा's picture
रानरेडा in काथ्याकूट
12 Jul 2019 - 11:02 pm
गाभा: 

मिपा च्या सुरुवातीपासून असलेले सदस्य वरुण मोहिते यांचे काल दुःखद निधन झाले .
वरुण मित्रा तुला श्रद्धांजली, जिकडे असशील तिकडे धमालच करशील, मजेत रहा !

प्रतिक्रिया

स्पार्टाकस's picture

12 Jul 2019 - 11:05 pm | स्पार्टाकस

वरुण मोहितेंचं तरुण वयात अकाली जाणं अतिशय दु:खद आणि धक्कादायक आहे.
श्रद्धांजली!

कुलदादा's picture

13 Jul 2019 - 1:22 pm | कुलदादा
कुलदादा's picture

13 Jul 2019 - 1:23 pm | कुलदादा

*वरुणराजा खरोखर रुसला*

मृग त्यानंतर आर्द्रा एकामागून एक कोरडा जातोय....आजच्या या दुःखद वारतेनंतर तर खात्रीच पटली की वरुणराजा खरेच रुसलाय....

एका उच्च शिक्षित , हरहुन्नरी, हजरजबाबी, व्यवहारी ,लोकप्रिय , वाचनवेडा आणि समंजस, उमद्या तरुणाचे असे अचानक एक्सिट घेणे चटका लावून गेलंय...
अशीच हळहळ गेल्या वर्षी बोकशेठ गेल्यावर वाटली होती.....
या आभासी जगात या दोघांनाही प्रत्यक्ष न भेटता आल्याची हुरहूर वाटत राहील...
त्यांच्या अगणित लोकसंग्रहाच्या अश्रूंच्या धारेत माझीही दोन टीपे.

स्वर्गीय वरूणभौच्या आत्म्यास चिरशांती मिळो हीच विठठलाच्या पायी मनःपूर्वक प्रार्थना !

हरी: ओम शांती !

वरुण यांच्या जाण्यावर विश्वास बसत नाही.
३०-३२ हे काय जाण्याचे वय होते का?
वाचन अफाट होते.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

मदनबाण's picture

12 Jul 2019 - 11:07 pm | मदनबाण

फार वाईट बातमी ! :(

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Jul 2019 - 11:09 pm | अमरेंद्र बाहुबली

वरून मोहितेंना श्रद्धांजली. फार भयानक धक्का बसला. बोका शेठ नंतर एक चांगलं व्यक्तिमत्त्व गेलं.

मुक्त विहारि's picture

12 Jul 2019 - 11:10 pm | मुक्त विहारि

भावपूर्ण आदरांजली. ..

मुक्त विहारि's picture

12 Jul 2019 - 11:11 pm | मुक्त विहारि

भावपूर्ण आदरांजली. ..

vcdatrange's picture

12 Jul 2019 - 11:12 pm | vcdatrange

श्रद्धांजली

दीपक११७७'s picture

12 Jul 2019 - 11:12 pm | दीपक११७७

धक्कादायक बातमी, भावपुर्ण श्रद्धांजली

जॉनविक्क's picture

12 Jul 2019 - 11:14 pm | जॉनविक्क

क्काय ?

अरे यार, नाही यार... हे मान्यच नाही :( :( :( :(

धर्मराजमुटके's picture

12 Jul 2019 - 11:14 pm | धर्मराजमुटके

मागे ठाणे येथील कट्ट्याला भेट झाली होती. खरं तर जाण्याचं वय अजिबातच नव्हते. बातमी खरी वाटत नाही. नक्की काय झालं ?
ईश्वर त्यांच्या कु़टुंबियांस दु:ख झेलण्याचे बळ देवो आणि आत्म्यास शांती देवो !

टर्मीनेटर's picture

12 Jul 2019 - 11:22 pm | टर्मीनेटर

वरुणला भावपूर्ण श्रद्धांजली.
कावीळ झाली होती. दोन-तीन दिवसांपूर्वीच व्हॉट्सॲप वर बोलणे झाले होते.

जालिम लोशन's picture

12 Jul 2019 - 11:18 pm | जालिम लोशन

:-(

अभ्या..'s picture

12 Jul 2019 - 11:22 pm | अभ्या..

भरोसा राहिला नाही राव जिंदगीवर.
कधीही, कुणीही, कसेही.... काय खरे नाही.
.
.
मोहिते, तुम्हाला शांती लाभो तरी कसे म्हणावे?

श्री's picture

12 Jul 2019 - 11:22 pm | श्री

भावपुर्ण श्रध्दांजली

श्री's picture

12 Jul 2019 - 11:22 pm | श्री

भावपुर्ण श्रध्दांजली

जव्हेरगंज's picture

12 Jul 2019 - 11:38 pm | जव्हेरगंज

फारच धक्कादायक.
विश्वास बसत नाहीये.

उपयोजक's picture

12 Jul 2019 - 11:39 pm | उपयोजक

भावपूर्ण श्रद्धांजली!! :-(
_/\_

फुटूवाला's picture

12 Jul 2019 - 11:44 pm | फुटूवाला

परवा सकाळी फोन आलेला त्यांचा पण मी कामात असल्याने लक्षच नाही गेले फोनवर.

टीपीके's picture

12 Jul 2019 - 11:47 pm | टीपीके

:( इतक्या अकाली वयात?

वरुण मोहितेंना श्रद्धांजली.

फुटूवाला's picture

12 Jul 2019 - 11:53 pm | फुटूवाला

बोलणे झाले नाही याची हुरहूर वाटत राहील..

Rajesh188's picture

13 Jul 2019 - 12:17 am | Rajesh188

भावपूर्ण श्रद्धांजली

अनन्त अवधुत's picture

13 Jul 2019 - 12:25 am | अनन्त अवधुत

वरुण मोहितेंना श्रद्धांजली.
असे कोणाचे अकाली जाण्याबद्दल ऐकले कि फार जास्त उदासवाणे वाटते.
ईश्वर त्यांच्या आप्त परिवारास धीराने उभे राहण्याची शक्ती देवो.

शंकासुर's picture

13 Jul 2019 - 12:32 am | शंकासुर

मी त्यांना कधी प्रत्यक्ष भेटलो नाही.
पण त्यांच्यासोबत झालेल्या चर्चा कायमच रंजक असायच्या
प्रत्येक वेळी त्यांचा एक नवीन पैलू दिसायचा.
एक जबरदस्त व्यक्तिमत्व गमावल्याची हुरहूर कायम राहील.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो

श्रिपाद पणशिकर's picture

13 Jul 2019 - 1:26 am | श्रिपाद पणशिकर

देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो

गामा पैलवान's picture

13 Jul 2019 - 2:40 am | गामा पैलवान

श्रद्धांजली! :-(

वमोपा म्हणजे वरुण मोहिते-पाटील असा आदरमिश्रित गंमतीने उल्लेख होत असे.

मध्यंतरी माझं मिपा खातं स्थगित झालं होतं. मालकांची माफी मागून प्रकरण मिटवायचं म्हणंत होतो. मी माफी मागायच्या बेतात आहे हे वमोपांना आजिबात सहन झालं नाही. खरंतर माझ्याच चुकीमुळे खातं गोठवलं गेलं होतं. पण त्यांनी शेवटपर्यंत मला माफी मागू दिली नाही. एव्हढी आस्था दाखवायला मी त्यांचा कोण लागून राहिलो होतो? कोणीच नाही. तो माणूस मुळातूनच दिलदार होता.

दिलदारीवरनं माझी मागल्या ऑगस्टातली (साल २०१८) भेट आठवली. तेव्हा तर माझी त्यांच्याशी ओळखही नव्हती. पण गा.पै. आलेत असं कळताच त्यांनी सरळ कट्टा जाहीर केला. त्यांच्या ओळखीच्या हॉटेलात. शुक्रवार होता तरीही बरेच लोकं आले. खाणं भरपूर झालं, आणि पिणंही. यथावकाश एकेक जण निघू लागला. तेव्हा लोकांना कळलं की बिलाची व्यवस्था वमोपा परस्पर पाहणार आहेत. पूर्णत: अनपेक्षित आदरातिथ्य करण्यासाठी दिलदारी हवीच.

सर्वांनी आपापल्या प्रकृतीस जपा, इतकंच तूर्तास सांगेन.

-गामा पैलवान

या कट्ट्याला झालेली वरुण ची भेट पहिली आणि आता दुर्दैवाने शेवटची... बाकी मिपा आणि कायप्पा मुळे ओळख. समविचारी असल्यानं अनेकदा गप्पा व्हायच्या... कायप्पा समूहावर मी कुणाशी भांडत असलो की फोन करून "जाऊ दे रे, सोड रे..." असं सांगायचा.

त्याचं वाचन अफाट होतं. आणि अनुभवविश्व भलतंच समृद्ध! ममव लोकांच्या कल्पनेत पण येणार नाहीत अशा कित्येक विषयांवरचे त्याचे अनुभव तो शेअर करत असायचा... आणि (माझ्याशी नसले तरी इतरांशी) मतभेद झाले, तरी त्याच्या वागण्या-बोलण्यात कधीही कटुता नसायची.

आठवड्यापूर्वी एका कामानिमित्त फोनवर बोललेलो. ठाण्यात माझ्या ऑफिस जवळ भेटायचं ठरवलेलं. त्यांनतर एक-दोन दिवसात, 9 जुलै ला त्याचा फोन आलेला. पण काही ऐकू येत नव्हतं. आणि कामात असल्यानं नन्तर फोन करायचं राहून गेलं...

आयुष्यभर चुटपुट राहणार आता! :(

अरे बापरे!
हे काय?
अवघडेय :(

कुमार१'s picture

13 Jul 2019 - 5:03 am | कुमार१

भावपूर्ण श्रद्धांजली

चाणक्य's picture

13 Jul 2019 - 5:43 am | चाणक्य

हे धक्कादायक आहे. कावीळ झाली आणि गेले ?? विश्वासच बसत नाहीये. बापरे.
श्रद्धांजली !

तुषार काळभोर's picture

13 Jul 2019 - 6:24 am | तुषार काळभोर

वरुण मोहिते यांचा परिचय नव्हता, पण त्यांचे लेख एका वेगळ्याच अनुभवविश्वातले असायचे.

मनापासून वाईट वाटतंय!

चंद्र.शेखर's picture

13 Jul 2019 - 6:42 am | चंद्र.शेखर

धक्कादायक बातमी.
भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रचेतस's picture

13 Jul 2019 - 6:48 am | प्रचेतस

भावपूर्ण आदरांजली

Nitin Palkar's picture

13 Jul 2019 - 7:02 am | Nitin Palkar

वरुण मोहिते यांच्याशी प्रत्यक्ष परिचय नव्हता पण त्यांच्या लिखाणातून, संदेशांमधून त्यांच्या जिंदादिल स्वभावाची ओळख होत असे. जिथे असतील तिथे धमाल करत असोत....

सुनील's picture

13 Jul 2019 - 7:08 am | सुनील

कधीच भेट झाली नाही ही रुखरुख राहीलच.

श्रद्धांजली.

दुर्गविहारी's picture

13 Jul 2019 - 7:16 am | दुर्गविहारी

खुपच त्रास देणारी बातमी. अजूनही धक्क्यातून सावरलो नाही.
श्रध्दांजली. ____/\____

उगा काहितरीच's picture

13 Jul 2019 - 7:17 am | उगा काहितरीच

धक्कादायक ! :'(

भावपूर्ण श्रद्धांजली !

सोत्रि's picture

13 Jul 2019 - 7:26 am | सोत्रि

भावपूर्ण श्रद्धांजली!

- (वाईट वाटलेला) सोकाजी :(

नाखु's picture

13 Jul 2019 - 7:33 am | नाखु

भावपूर्ण श्रद्धांजली

मनाने सुद्धा राजा असलेल्या जिंददील चतुरस्र मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली.

कितीही विरोधी राजकीय मत असले तरी वैयक्तिक कटुता निर्माण न होउ देता मत मांडण्याचे धाडस आणि कसब ज्या मोजक्या मिपाकरांना आहे त्यात वमोपा नक्कीच आहेत

अत्यंत दुःख झाले असलेला वाचकांची पत्रेवाला नाखु

भावपूर्ण श्रद्धांजली वमोपा..... धक्कादायक, विश्वासच बसत नाहीये अजून....!!

वामन देशमुख's picture

13 Jul 2019 - 7:57 am | वामन देशमुख

भावपूर्ण आदरांजली....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jul 2019 - 8:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशय धक्कादायक बातमी. मिपाच्या निमित्ताने वाट्सपग्रुप बोलत असायचो.

भावपूर्ण आदरांजली.

-दिलीप बिरुटे

सुधीर कांदळकर's picture

13 Jul 2019 - 8:20 am | सुधीर कांदळकर

श्रद्धांजली. माझा त्यांचा परिचय नव्हता वा कधी संपर्कही नव्हता. परंतु मिपाच्या सुरुवातीपासूनचे सदस्य या नात्याने त्यांना श्रद्धांजली.

लई भारी's picture

13 Jul 2019 - 8:27 am | लई भारी

प्रत्यक्ष भेटलो नाही पण त्यांच्या दिलखुलास व्यक्तिमत्वाची झलक आली होती. त्यांचं अकाली जाणं चटका लावणार आहे. :-(

अनिंद्य's picture

13 Jul 2019 - 8:29 am | अनिंद्य

दुःखद बातमी.

वरुण आणि मी त्यांच्या भगिनींना भेटणार होतो एका कामासाठी. त्यासाठी फोन नंबर एकमेकांना पाठवले इतक्यातच.

आयुष्याचा खरंच काही भरवसा नाही :-(

श्रीगुरुजी's picture

13 Jul 2019 - 8:45 am | श्रीगुरुजी

अत्यंत वाईट बातमी. अजूनही खरे वाटत नाही.

इतक्या अल्प वयात जाणे धक्कादायक आहे. आधी ओंकार पत्की, नंतर तात्या आणि आता वरूण मोहिते . . . तीन मिपा सदस्य एक वर्षाच्या आत गेले. तिघांचंही जायचं वय नव्हतं. मिपाला दृष्ट लागली कोणाची तरी.

वरूण मोहितेंचा उल्लेख मी गंमतीने मोहितेसाो असा करायचो. क्रिकेट, राजकारण, पुस्तके अशा विविध विषयांवर ते बोलायचे. काही महिन्यांपूर्वी ते पुण्यात आल्यानंतर भेट होणार होती, पण आयत्यावेळी काही कारणाने भेट झाली नाही.

मोहितेसाोंच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना!

सुबोध खरे's picture

13 Jul 2019 - 9:21 am | सुबोध खरे

वरुण मोहितेंना श्रद्धांजली. __/\__

उपयोजक's picture

13 Jul 2019 - 9:37 am | उपयोजक

varun

विनिता००२'s picture

13 Jul 2019 - 9:42 am | विनिता००२

धक्कादायक बातमी :(

हे काय वय आहे का जायचे? भावांजली :(

गोरगावलेकर's picture

13 Jul 2019 - 9:57 am | गोरगावलेकर

भावपूर्ण श्रद्धांजली

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Jul 2019 - 10:03 am | ज्ञानोबाचे पैजार

भावपूर्ण श्रद्धांजली

प्रमोद पानसे's picture

13 Jul 2019 - 10:15 am | प्रमोद पानसे

दोन स्टोरीज अर्धवट सोडल्या
मी pm वर बोललो होतो त्याला.एकावेळी एकच स्टोरी संपव ...
आता पुढे काय झालं कसं समजणार ?

उत्कंठा वाढवुन गेला वरुण.

छान माणूस होता. जवळचं कुणीतरी अचानक हुरहुर लावुन गेल्याची भावना.

चांगला मित्र गमावल्याचे खूपच दु:ख झाले आहे.
फोनवर नेहमीच बोलणे व्हायचे.

श्रद्धांजली.. :( :(

झेन's picture

13 Jul 2019 - 10:24 am | झेन

प्रत्यक्ष परीचय नाही पण मिपावर वाचून वाटतं रांगडा, बहुआयामी, प्रामाणिक, दिलदार माणूस चटका लावून गेला. परमेश्वर घरच्यांना हा धक्का सहन करण्याची ताकद देओ.

ठाणे कट्ट्याला मी आणि मुवि टेबल धरून बसलो होतो सहालाच. एकेक जण येत होता. मग जरा वेळाने वरुण'आला' असं कोणी म्हटलं. अगोदरच्या त्याच्या लेखनावरून कोणी चाळीस पन्नाशीचा माणूस असावा असा माझा अंदाज होता पण अहो मीच वरुण म्हटल्यावर विश्वास बसला नाही.
एका बाजूस मुवि, खरेसाहेब, गामा पैलवान आणि पाडगावकर पतिपत्नी यांच्या गप्पा रंगलेल्या. या बाजुला वरुण, मी, सुहास झेले असा ग्रुप जमलेला. वरुणास सर्व वयाच्या लोकांशी वार्तालाप,संवाद करण्याचं सहज साधतं हे लगेच लक्षात आलं. तेवढ्या अर्ध्या तासात त्याने माझ्याशी जमवून माझी फिरकीही घेतली होती.
निवडणूक निकालानंतर त्याने कर्जतजवळ फार्म हाऊसला कट्टाही ठरवला होता. तिथूनच रामबाग माथेरान ट्रेक सुरू होतो. त्याला माझ्याबरोबर ट्रेकला यायचे होते पण आणखी बरेच मिपाकर जण आले तर वरती येणार नाहीत मग आपण दोघेतरी जाऊ असं ठरलं. मी गुपचूप एकटाच जाऊन आलो हे कळल्यावर मग पावसाळ्यात जाऊ ठरलं.
पण पण पण ते आता केवळ आठवणच राहील हे मला काय माहीत??

मित्रहो's picture

13 Jul 2019 - 11:21 am | मित्रहो

भावपूर्ण श्रद्धांजली

सातएक वर्षं झाली असावीत - कोरम मॉलमधल्या पॉप टेट्सच्या कट्ट्यात वरुणची भेट झाली होती.
गवि, रामदास, विजुभाऊ, क्लिंटन, प्रभूगुर्जी, साक्षीशेठ असे मिपाचे दिग्गज त्या कट्ट्यात होतेच; पण त्यांच्यासोबतच, वयाच्या मानाने बरीच भटकंती केलेल्या वरूणही लक्षात राहिला होता.

त्याची अशी अकाली एक्झिट अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे.

प्रमोद देर्देकर's picture

13 Jul 2019 - 1:01 pm | प्रमोद देर्देकर

आधी मला वाटलं धागा काथ्याकूट मध्ये टाकलाय म्हणजे कोणी तरी मस्करी तर नाही ना करत आहे ?

! भावपूर्ण श्रध्दांजली !

श्वेता२४'s picture

13 Jul 2019 - 2:48 pm | श्वेता२४

मलाही वाटलं मस्करी असेल. पण हे फारच धक्कादायक आहे। विश्वास बसत नाही. वरुणजींना भावपूर्ण श्रद्धांजली

कुलदादा's picture

13 Jul 2019 - 1:21 pm | कुलदादा
कुलदादा's picture

13 Jul 2019 - 1:21 pm | कुलदादा
बबन ताम्बे's picture

13 Jul 2019 - 1:33 pm | बबन ताम्बे

अत्यन्त धक्कादायक बातमी. त्यांचं बरचसं लेखन मिपावर वाचले आहे. एका सिद्धहस्त आणि अनुभवसमृद्ध लेखकाला मिपाकर कायमचे मुकले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

गामा पैलवान's picture

13 Jul 2019 - 1:49 pm | गामा पैलवान

परिस्थिती ठीक असूनही खरे डॉक्टरांची भीती दुर्दैवाने खरी ठरली : https://www.misalpav.com/comment/885892#comment-885892

-गा.पै.

अनन्त्_यात्री's picture

13 Jul 2019 - 2:14 pm | अनन्त्_यात्री

__/\__

उपेक्षित's picture

13 Jul 2019 - 3:10 pm | उपेक्षित

अत्यंत धक्कादायक, शब्द सुचत नाहीये, खरच मिपावला दृष्ट लागलीये कुणाचीतरी.

उपेक्षित's picture

13 Jul 2019 - 3:14 pm | उपेक्षित

अत्यंत धक्कादायक, शब्द सुचत नाहीये, खरच मिपावला दृष्ट लागलीये कुणाचीतरी.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2019 - 3:43 pm | अत्रुप्त आत्मा

:( अर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर!!! :(

कुमार१'s picture

13 Jul 2019 - 3:52 pm | कुमार१

दोन आठवणी

१. मी २ वर्षांपूर्वी इथे लिहू लागलो आणि सुरवातीस माझे 'अंतर्नाद' मधले लेख पुन्हा प्रकाशित केले. तेव्हा वरुणने ते त्या मासिकात वाचल्याची पोच दिली. असा एखादा तरुण ते मासिक वाचतोय हे कळणे हा सुखद धक्का होता. मग आम्ही व्य नितून त्या मासिकावर बोलत असू.

२. १० जुलैला त्याचा माझ्या पित्तखड्यावरील लेखाला उत्साहवर्धक प्र आला. त्या लेखात काविळीचा उल्लेख आहे. ….आणि ११ ला त्याचे निधन…. छे, कसतरीच झाले.
कुठल्या अवस्थेत त्याने तो वाचला असेल या कल्पनेने मला जाम अस्वस्थ झालो.

असो, पुन्हा एकवार श्रद्धांजली.

दादा कोंडके's picture

13 Jul 2019 - 3:52 pm | दादा कोंडके

भावपूर्ण श्रद्धांजली! _/\_

अभिजीत अवलिया's picture

13 Jul 2019 - 4:53 pm | अभिजीत अवलिया

फार वाईट बातमी. दोन तीनदा फोनवर बोलणे झाले होते. एक दिवस मुंबईला येऊन भेटून जातो असेही सांगितले होते. पण त्याआधीच वरुण गेला. अतिशय निराशाजनक बातमी.

टवाळ कार्टा's picture

13 Jul 2019 - 5:53 pm | टवाळ कार्टा

एक अवलिया होता वरुण, गेल्यावर्षी एक धमाल छुपा कट्टा केलेला, फक्त आम्ही दोघेच होतो...अर्ध्या तासासाठी भेटायचे ठरवून 3-4 तास गप्पा हाणत बसलेलो (मासे, चिकन होतेच)
मध्येच थोडावेळ जरा उदास झालेला वाटला पण नंतर परत मूडमध्ये आला
अधेमध्ये कायप्पावर मेसेज व्हायचे
बोक्यानंतर आणखी एक चांगला मित्र चुटपुट लावून गेला :(

भीमराव's picture

13 Jul 2019 - 6:40 pm | भीमराव

भावपूर्ण श्रद्धांजली.

बाप्पू's picture

13 Jul 2019 - 7:30 pm | बाप्पू

भावपूर्ण श्रद्धांजली..

जेम्स वांड's picture

13 Jul 2019 - 8:43 pm | जेम्स वांड

अन ३३ कोटीं पैकी कुठल्या देवावर आळ घ्यावा हे लक्षात न आल्यामुळे उगाच आपली मात्र चिडचिड होत राहते. वरुण मोहितेंना भावपूर्ण श्रद्धांजली.

चांदणे संदीप's picture

13 Jul 2019 - 10:30 pm | चांदणे संदीप

वरूण मोहिते यांचे लिखाण वाचल्यावर त्यांच्या व्यक्तिमत्वाला इतके पैलू कसे पडले असतील याचा नेहमी विचार यायचा. प्रत्यक्ष भेटून विचारायचीही इच्छा होती. दुर्दैवाने ती आता पूर्ण होऊ शकत नाही.

भावपूर्ण श्रद्धांजली!

Sandy

Rajesh188's picture

14 Jul 2019 - 12:44 am | Rajesh188

माझा एक मित्र आजारी पडला डॉक्टर नी निष्कर्ष काढला कावीळ .
मरणाच्या दारात पोचल्यावर योग्य डॉक्टर
कडे पोचला निदान झाले
Thyroid .
औषध चालू केली दोन महिन्यात टणाटण

टिवटिव's picture

14 Jul 2019 - 3:17 am | टिवटिव

भावपूर्ण श्रद्धांजली..

रानरेडा's picture

14 Jul 2019 - 9:43 am | रानरेडा

काल वमो च्या घरी गेलो होतो. बरोबर भारत मुंबईकर होते .
वरुण याच्या घरी आई , आजोबा त्यांची मैत्रीण आणि इतर नातेवाईक होते .
आई किमान बोलण्या इतपत सावरलेल्या दिसल्या . खरो खर काय बोलावे हे आम्हाला कळत नव्हते
त्या दोघी कडून कळले त्या प्रमाणे परवा संध्याकाळच्या सुमारास प्रकृती खालावल्या सारखे वाटले , तेंव्हा त्यांना रिक्षात घालून इस्पितळात नेले , वरुण चालत रिक्षात बसला , व्यवस्थित बोलत होता . शुगर लो झाल्यासारखी वाटली म्हणून त्याने एक केक खाल्ला .
इस्पितळात रक्तदाब आणि शुगर प्रचंड कमी झालेली दिसली आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली .
असे वाटते कि वेदना झाल्या नसाव्या .
आई व मैत्रिणी कडून मिपा चा अनेकदा उल्लेख झाला . व मो चे मिपा वर खरेच प्रेम होते .
अजून काय लिहू, .
आई अजून एक बोलल्या कि व मो कोठलेच पथ्य पाळत नव्हते , यात बरेच सांगून गेल्या .
या दिलदार मित्रास आपल्या सर्वा तर्फे श्रद्धांजली , त्याने जे आनंदाचे क्षण दिले होते त्याची आठवण म्हणून शेवटचे जावू शकलो .
त्याच्या घरी मुलुंड ला अनेकदा जायचे होते , त्याच्या बरोबर ठरवले होते पण असे जावे लागेल असे वाटले नाही !

जॉनविक्क's picture

14 Jul 2019 - 9:12 pm | जॉनविक्क

इस्पितळात रक्तदाब आणि शुगर प्रचंड कमी झालेली दिसली आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली

मी या अनुभवातून गेलो आहे, मिनिटाला खडीसाखर कडंम - कडम करून खात होतो आणि भोवताली काय चालू आहे याचे भानही येत न्हवते इंजेक्शन आणि सलाईन मिळे पर्यंत जीवात जीव न्हवता. नंतरचे नेमकं काय घडले ते आठवत नाही. शारीरिक वेदना जरी कमी असल्या तरी मनाची भीती, अनियंत्रित श्वासोश्वास व मनाची शरीराशी बांधून राहण्याची अविरत तडफड पराकोटीची अस्वस्थता निर्माण करते इतर काही विचारासाठी उसंतही देत नाही असं नक्कीच म्हणेन.

रक्तदाब कमी झाल्याने जरी हृदयावर फार ताण येत नाही तरी पॅरालिसिसचा धोका असतोच खडीसाखर व पाणी हाच यावर घरगुती उपाय आहे असं अल्पमतीला वाटते बाकी वस्तुस्थिती तज्ञच जाणोत.

रानरेडा's picture

14 Jul 2019 - 9:44 am | रानरेडा
रानरेडा's picture

14 Jul 2019 - 9:45 am | रानरेडा

वमो यांनी मिपा साठी बरेच काही केले होते, त्यांचा बॅनर लागावा अशी अपेक्षा आहे.

आनन्दा's picture

14 Jul 2019 - 10:09 am | आनन्दा

अनुमोदन

चौथा कोनाडा's picture

16 Jul 2019 - 4:14 pm | चौथा कोनाडा

अनुमोदन

मास्टरमाईन्ड's picture

14 Jul 2019 - 10:14 am | मास्टरमाईन्ड

भावपूर्ण श्रद्धांजली..
प्रत्यक्ष परिचय नव्हता पण त्यांचं लेखन छान होतं.
लिखाण अर्धवट सोडून गेले... आठवण येत राहील.

मंदार कात्रे's picture

14 Jul 2019 - 6:32 pm | मंदार कात्रे

श्रद्धांजली

अनिरुद्ध.वैद्य's picture

14 Jul 2019 - 8:56 pm | अनिरुद्ध.वैद्य

भावपुर्ण श्रद्धांजली :-(

समीरसूर's picture

15 Jul 2019 - 11:36 am | समीरसूर

हे प्रचंड वाईट झालंय! कुणीतरी जवळचं, खास अकाली गेल्यावर जो धक्का बसतो अगदी तसं झालंय मला....कसं शक्य आहे हे? वरुण मोहितेंशी एका धाग्यावर नुकताच संवाद झाला होता माझा...उमदं व्यक्तिमत्व!!! अतिशय हुशार आणि बुद्धिमान लेखक आणि वाचक असंच वरुण मोहितेंचं वर्णन करावं लागेल. माझं कधी प्रत्यक्ष बोलणं-भेटणं नाही झालं त्यांच्याशी पण एक सुसंस्कृत आणि व्यासंगी तरूण म्हणून त्यांची माझ्या मनात प्रतिमा होती.

खूप हळहळ वाटतेय....त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!

खिलजि's picture

15 Jul 2019 - 12:22 pm | खिलजि

@ उपयोजक ,, धन्यवाद तुम्ही कैक मिपाकरांची सुप्त इच्छा नकळतपणे पूर्ण केलेली आहे .. मलापण वरुणला भेटण्याची इच्छा होती पण ती आता कायमची राहिली .. त्याचा फोटो पेस्ट करून तुम्ही त्याला श्रद्धांजली वाहण्यात मोठा हातभार लावलेला आहे ..

खिलजि's picture

15 Jul 2019 - 12:25 pm | खिलजि

_/\_ वरुण मोहिते आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली :-( _/\_

सोनल परब's picture

15 Jul 2019 - 2:40 pm | सोनल परब

भावपुर्ण श्रद्धांजली

मूकवाचक's picture

15 Jul 2019 - 5:18 pm | मूकवाचक

वरूण मोहिते यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!! _/\_

चिगो's picture

15 Jul 2019 - 5:29 pm | चिगो

अरेरे.. काय हे? एवढ्या लहान वयान अकस्मात, तेपण काविळीने निधन? बरंच काही अर्धवटच राहून गेलं, मित्रा..
अत्यंत दु:खदायक आणि धक्कादायक बातमी..
भावपुर्ण श्रद्धांजली..

एकामागोमाग एक धक्कादायक बातम्या कळत आहेत मिपावर. भयानक अनपेक्षित! एक अतिशय उमद्या मनाचा माणूस गेला... वरुण मोहित्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली! वाईट झालं!

ट्रेड मार्क's picture

16 Jul 2019 - 5:49 am | ट्रेड मार्क

मला अजूनही खरं वाटत नाहीये. इतके दिवस प्रतिसाद लिहायची पण इच्छा होत नव्हती.

प्रत्यक्ष भेट झाली नाही पण बाकी संपर्क होता. एवढ्या लहान वयात एवढे अनुभवसमृद्ध कसे याबद्दल मला कायम प्रश्न पडत आला आहे आणि हेवा सुद्धा वाटला आहे. वयापेक्षा जास्त मॅच्युरिटी होती हे तर नक्कीच आहे.

आपण जे ६०-७० वर्षे जगून अनुभवणार नाही ते वमोपा एवढ्या कमी वयात अनुभवून गेले. त्यांच्या जाण्याचं दुःख तर आहेच पण ते जिथे असतील तिथेही कट्टा जमवून इतरांचे आयुष्य समृद्ध करत असतील याबद्दल खात्री आहे.

चौथा कोनाडा's picture

16 Jul 2019 - 4:13 pm | चौथा कोनाडा

अत्यंत दु:खदायक आणि धक्कादायक बातमी..
भावपुर्ण श्रद्धांजली..

श्रीरंग_जोशी's picture

19 Jul 2019 - 6:25 pm | श्रीरंग_जोशी

वरुण मोहिते यांच्या अकाली निधनाने खूप धक्का बसला व वाईट वाटले.
अत्यंत अनुभवसंपन्न आयुष्य अन कसलीही भीडभाड न ठेवता स्वतःचे अनुभव थेट लिहिण्याची बेधडक वृत्ती कायम स्मरणात राहील.

वरुण यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

कधी बोलणे झाले नाही पण नाव सतत दिसायचे. वाईट झाले ,श्रद्धांजली. एक प्रश्न,लग्न झाले होते का त्यांचे?

सुबोध खरे's picture

25 Jul 2019 - 7:57 pm | सुबोध खरे

लग्न झाले होते का त्यांचे?
नाही

नावातकायआहे's picture

25 Jul 2019 - 2:02 pm | नावातकायआहे

! भावपूर्ण श्रध्दांजली !

एमी's picture

25 Jul 2019 - 3:05 pm | एमी

:-( आदरांजली.

निशाचर's picture

27 Jul 2019 - 2:39 pm | निशाचर

भावपूर्ण आदरांजली

गामा पैलवान's picture

13 Jul 2020 - 12:15 pm | गामा पैलवान

वरुण मोहिते पाटलांना परलोकवासी होऊन परवा ११ जुलैस एक साल झालं. असतील तिथे शांती लाभो.
-गा.पै.

ठाणे कट्ट्याला एकदाच भेटलो. नंतर त्याने कर्जतला बाबा **डेअरीजवळ कट्टा ठरवला होता. तो काही झाला नाहीच.

गामा पैलवान's picture

13 Jul 2021 - 9:33 pm | गामा पैलवान

वमोपांना जाऊन परवा दोन सालं झाली. यंदा पुण्यतिथी चुकवायची नाही म्हणून टपून बसणार होतो. तरीपण हुकली. लक्षांत राहिली नाही. वमोपांनी खाऊ घातलेली ऑगस्ट २०१८ ची पार्टी विसरलो. काय चरलेलो त्या दिवशी (खरंतर रात्री). दुष्काळातनं आल्यागत हाणत होतो. अक्षरश: फुकटात चरलो. तरीपण त्यांची तिथी विसरलो. खरंतर मी इतका काही कृतघ्न नाही. पण म्हणतात ना, ही दुनिया फक्त जिवंत माणसांचीच आहे.

वरुण मित्रा, जिथे असशील तिथे तुला योग्य मार्ग सापडत राहो.

-गा.पै.

पाषाणभेद's picture

1 Aug 2021 - 5:28 pm | पाषाणभेद

गापै,
आपल्या हातात काय आहे!
काही गोष्टी एखादी व्यक्ती गेल्यानंतरच आपल्याला त्या व्यक्तीप्रती कळतात. तुम्ही नका इतके विचार करू. जे झाले ते आपल्या हाती नव्हते. तुम्ही दोन क्षण त्यांचेसोबत जगलात हे स्मृतीच्या कप्यात जतन होईलच, पण तुम्ही स्वःतला कृतघ्न समजू नका. दोन वर्षानंतरही तुम्ही आठवण काढत आहात यातच सर्व काही आले.

गामा पैलवान's picture

1 Aug 2021 - 10:46 pm | गामा पैलवान

पाषाणभेद,

एका अर्थी तुमचं बरोबर आहे. चरतांना मला माहित नव्हतं की पार्टी फुकटांत आहे म्हणून.

मला फक्त वमोपांचा जाण्याचा दिवस लक्षांत ठेवून त्या दिवशी स्मरण करायचं आहे. आता पुढल्या वर्षी बघू.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

11 Jul 2022 - 2:14 am | गामा पैलवान

वरुण मित्रा,

आज ११ जुलै. तुला जाऊन तीन सालं झाली. जिथे असशील तिथे तुला योग्य गती लाभो. तू दिलेली ऑगस्ट २०१८ ची पार्टी आजही लक्षांत आहे.

तुझा मित्र,
-गामा पैलवान

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Jul 2022 - 7:47 am | अमरेंद्र बाहुबली

वमोपांना श्रध्दांजली.

विवेकपटाईत's picture

11 Jul 2022 - 7:24 pm | विवेकपटाईत

भावपूर्ण श्रद्धांजली. सोसायटीत वावरायचे असते म्हणून एखाद पेग पार्टीत घ्यावा लागतो विशेषकर आयटी क्षेत्रात गुरुग्राम, नोयडा, पुणे, बंगलोर हैदराबाद मुंबई. मुलीही घेतात. आता तर वाढदिवस, साखरपुडा आणि लग्नात दारू ही ठेवलीच जाते. मध्यम वर्गीय घरात फ्रीज मध्ये दारूची बाटली दिसणे सामान्य बाब आहे. न घेणारे आमच्यासारखे मागासलेले ठरतात. माझे दोन अत्यंत जवळचे शाळेकरी मित्र चाळीसीच्या आत गेले. दोन्ही दारू पिणारे होते. एकाला लू लागली आणि एक हार्ट अटॅक (पहिला) गेला. त्यानंतर मित्रांच्या मैफलीत जाणेच सोडून दिले. मी आज जीवंत आहे त्याचे मुख्य कारण कुठलेही व्यसन नसणे.
खरी श्रद्धांजली हीच की घरात तरी किमान दारूची बाटली ठेऊ नये.

नठ्यारा's picture

11 Jul 2024 - 12:39 pm | नठ्यारा

वरुण मित्रा, जिथे असशील तिथे तुला शांती व सद्गती मिळो. २०१८ ची पार्टी आजूनही आठवत्येय.
-नाठाळ नठ्या