उपवासाचा शिरा खास आषाढी एकादशीनिमित्त by Namrata's CookBook :९

Primary tabs

Namokar's picture
Namokar in पाककृती
11 Jul 2019 - 6:20 pm


साहित्य :
१ वाटी निवडलेली वरई/भगर
१ वाटी साखर
तूप
केळी
चारोळ्या ,काजू ,बदाम
वेलची पूड
मीठ
दूध(३००मि.)

कृती :
१. वरई/ भगर धुऊन चाळणीत पाणी निथळायला ठेवा
२. दूध गरम करायला ठेवा
३. कढईत ३ चमचे तूप घ्या ,तूप गरम होत आलेकी त्यामध्ये वरई/ भगर लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या.

४. तापवलेलया दूधातलं आर्ध दूध वरईवर/भगरीवर घाला.

५. आता यामध्ये चिमूटभर मीठ घालून एकत्र करुन घ्या.
६. हे मिश्रण दाटसर होऊ लागल्यावर उरलेले दूध घाला.

७. वरई/भगर थोडी शिजत आलीकी त्यामध्ये साखर, चारोळ्या , काजू , बदाम , वेलची पूड घलून परतून घ्या

८. केळीचे पातळ काप करुन त्यात घाला.लागेल तसे तूप पुन्हा घालून मिश्रण एकत्र करुन घ्या

९. एक वाफ आल्यावर मस्त गरमा गरम शिरा संपवा.

शिरा तयार आहे

अधिक टिपा:
*तूप, साखरेचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करु शकता
*ही भगर/वरई मिक्सर मध्ये बारीक करुनसुद्धा शिर करण्यासठी वापरु शकतो
पाककृतीचा पूर्ण व्हिडिओ :
https://youtu.be/zWoSjJp5XH8

प्रतिक्रिया

पैलवान's picture

12 Jul 2019 - 7:51 am | पैलवान

एकदम समयोचित!!

आमच्याकडे महाशिवरात्रीला रताळ्याचा शिरा असाच केला जातो.

यशोधरा's picture

12 Jul 2019 - 8:09 am | यशोधरा

आवडली रेसिपी. करून बघेन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jul 2019 - 10:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंबर एक. आवडलं. फोटो लैच जीवघेणे.
धन्यवाद.

वाटीभर पाठवा. पुण्य लाभेल.

- दिलीप बिरुटे

रमेश आठवले's picture

12 Jul 2019 - 10:54 am | रमेश आठवले

आमच्याकडे शिंगाड्याच्या पीठाचा शिरा करत असत.

प्रलयनाथ गेंडास्वामीं's picture

12 Jul 2019 - 12:47 pm | प्रलयनाथ गेंडास...

फ्लाईंग किस टू धिस रेसिपी !

धन्यवाद पैलवान ,यशोधरा , प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,रमेश आठवले,प्रलयनाथ गेंडास...

रेमिंग्टन's picture

21 Jul 2019 - 2:49 am | रेमिंग्टन

नक्कीच करून बघायला हवी अशी पाकृ..
उपवासाच्या दिवसाचा आमचा खाण्याचा अजेंडा ठरलेला असतो.
सकाळी उठल्यावर 2 कडक चहा घ्यावेत. थोडीफार भूक मरते.
मग गरमागरम साबुदाण्याची खिचडी, आवडीप्रमाणे त्यात कमी अधिक दाण्याचा कूट असावा. वरतून मुबलक दही घ्यावे. चालत असेल तर काकडी-खिचडी घ्यावी. नाश्त्याची सांगता मसाला दुधाने करावी.

हापिसात लंचला परत डब्यातली खिचडी, दाण्याचे लाडू, एखाद दुसरं केळ आणि शेवटी ताक ओरपावं

उपाशीपोटी घरी आल्यावर भगर आणि दाण्याची आमटी, मिळाल्यास उपवासाचं थालपीठ आणि शेवटी परत मसाला दुधाने सांगता करावी.
आणि मग स्वस्थ चित्ताने डोळे मिटावेत.