सोलापूरची आंध्र (मिरची) भजी by Namrata's CookBook :७

Namokar's picture
Namokar in पाककृती
5 Jul 2019 - 7:49 pm

-- सोलापूर मध्ये ही भजी आंध्र भजी या नावाने प्रसिध्द आहेत त्यामुळे हे नाव रेसिपीला दिले आहे

लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोठी मिरची
मिरचीसाठी मिश्रण :
धणे+जिरे पुड / जिरे पुड
शेंगदाण्याचे कूट
चिंचेचा कोळ
मीठ

भजीसाठी :
१ वाटी बेसन पीठ (५० ग्रॅ)
२ चमचे तांदळाचे पीठ (२५ग्रॅ)
१ छोटा चमचा हळद
१ छोटा चमचा ओवा
कोथिंबीर (optional)
चवीनुसार मीठ
१/४ चमचा सोडा
तेल
पाणी
चाट मसाला / काळे मीठ
बारीक चिरलेला कांदा

क्रमवार पाककृती:
१. मिरची धुवून,पुसून घ्या
२. आता ही मिरची अर्धी कापून घ्या आणि त्यातल्या बिया काढून घ्या ,त्यामूळे मिरचीचा तिखटपणा थोडा कमी होईल
Mirchi
मिरचीसाठी मिश्रण :
३.एका वाटीमध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट ,चवीनुसार मीठ , धणे+जिरे पुड , लागेल तसे चिंचेचा कोळ घालून मिश्रण करावे (मिश्रण जास्त पातळ करु नये )
४. आता हे मिश्रण मिरची मध्ये भरुन घ्या
Mirchi

भजीसाठी :
५. एका भांड्यात बेसन पीठ ,तांदळाचे पीठ , ओवा , मीठ ,हळद एकत्र करुन घ्या .
६. आता थोडे थोडे पाणी घालत मिश्रण एकत्र करुन घ्या (खुप जास्त पातळ नको)
७. आता त्यामध्ये सोडा घाला आणि सोड्यावर १ चमचा मोहन (गरम तेल)घाला ,एकत्र करुन घ्या
८. तळण्यासाठी तेल कढई मध्ये गरम करायला ठेवा
९ . एक एक मिरची मिश्रणात घालून तेलात सोडा आणि तळून घ्या
Mirchi
१०. मस्त आंध्र (मिरची)भजी तयार आहेत ,त्यावर चाट मसाला/काळे मीठ , बारीक चिरलेला कांदा , सॉस (optional) घालून सर्व्ह करा
मस्त गरम गरम संपवून टाका
Mirchi

वाढणी/प्रमाण:

अधिक टिपा:
* मोठ्या आणि जाड मिरच्या घ्या,मिश्रण छान भरता येईल
पुर्ण रेसिपीचा व्हिडिओ :

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

5 Jul 2019 - 7:56 pm | श्वेता२४

मस्त पाककृती. पोस्टीमेज मध्ये इमेज अपलोड केल्यावर त्याची डायरेक्ट लिंक मिळते ती इथे पेस्ट करा म्हणजे इथे थेट फोटो दिसेल आत्ता लिंक दिसत आहे

अभ्या..'s picture

5 Jul 2019 - 9:08 pm | अभ्या..

वॉव,
सोलापुरात ह्याला आंध्रा भजी, रायचूर भजी किंवा गुंटूर भज्जी म्हणतात. सोलापुरला भज्यांची इतकी व्हरायटी आहे की शेजारशेजारच्या भजेवाल्यापाशी वेगवेगळी टेस्ट असते आणि दर्दी लोक्स ते बरोब्बर ओळखून असतात.
जोडबसवण्णा चौक ते पाण्याची टाकी रोडवर चार पाच दुकाने आहेत. बाकी अजुन आहेत काही पूर्व भागात पण मला माहीती नाहीत जास्त. :( आपले नितीनअण्णा सोलापूरकर शुअर सांगू शकतील.
माझ्या माहितीनुसार ह्यात शेंगादाण्याचा कूट नाही घालत सारणात. चिंचेचा कोळ आणि अन्य मसाला जाणवतो. एक अ‍ॅडिशन म्हणजे मिरचीचा थोडापार्ट बेसन न लागलेला ठेवतात. तेवढीच मिरची डायरेक्ट तेलात तळली जाते अन स्वर्गीय टेस्ट देते. वरुन बारीक कांदा अन मसाला. जन्नत हो जन्नत.

नि३सोलपुरकर's picture

8 Jul 2019 - 6:48 pm | नि३सोलपुरकर

धन्यवाद अभ्या .. आठवण काढल्याबद्दल ,
बाकी भजी मिळण्याची खास दुकाने सुरु होतात गणेश पेठ ,साखर पेठ ,जोडबसवण्णा चौक ते पाण्याच्या टाकी पर्यन्त.
अलिकडे पद्मशाली चौक ते दत्तनगर हा एरिया हि हॉट फेव्हरेट होतोय खादाडी च्या बाबतीत .बरीच भजी ची दुकाने आहेत ,पाणीपुरी आहे .
पूर्वी रंगा चौक येथे अंडा भजी मिळायची ... एकदम मस्त टेस्ट होती त्याची .
डिस्को भजी हा हि एक भन्नाट प्रकार मिळतो पूर्व भागात .

उगा काहितरीच's picture

5 Jul 2019 - 10:14 pm | उगा काहितरीच

वॉव ! सुप्पर !! शेवटचा फोटो मस्त आहे एकदम.
रच्याकने थोड्याफार फरकाने यासारखी भजी हैद्राबादला खाण्यात आलेले आहे. परभणी, हिंगोली भागातही वेगवेगळ्या प्रकारचे मिरची भजे खाल्लेले आहेत.

आन्ध्रा म्हटले चिंच, शेंगदाणे, मिरचा, तीळ आलेच
आन्ध्रा भजीचे नाव तेलंगणा झाले का? या लांबड्या मिरचा तिखट नसतात . फोटो छान.

तुषार काळभोर's picture

6 Jul 2019 - 8:50 am | तुषार काळभोर

एकदम खतरनाक!!

आज पाऊस पडतोय. भजी खायची लै इच्छा होतेय.

जेम्स वांड's picture

6 Jul 2019 - 12:13 pm | जेम्स वांड

हा तर एकदम तोंडाला पाणी आणणारा मामला, सिझन पण पावसाळा, आता ही भजी ट्राय करणे मस्ट झाले आहे! नजीकच्या मुहूर्तावरच ट्राय करतो आता.

पद्मावति's picture

6 Jul 2019 - 12:48 pm | पद्मावति

आहा. मस्तंच.

चौथा कोनाडा's picture

6 Jul 2019 - 6:17 pm | चौथा कोनाडा

पावसाळ दिववसात अश्या चमचमीत पदार्थाच्या पाकृवर बन्दी घालण्यात यावी संम महाराज !

हापिसात ऐन प्रोजेक्ट कामाच्या वेळी जीभ हुळहुळली !

बाकी, पा कृ भारी !

धन्यवाद श्वेता२४ ,अभ्या.., उगा काहितरी,,कंजूस, पैलवान ,जेम्स वांड , पद्मावति ,चौथा कोनाडा

जुइ's picture

10 Jul 2019 - 8:02 am | जुइ

काही वर्षांपूर्वी चैन्नईत मरीना बीचवर खालेली मिर्ची भज्जी आठवली.

खादाड's picture

11 Jul 2019 - 1:50 pm | खादाड

मस्त !!

Namokar's picture

11 Jul 2019 - 10:22 pm | Namokar

धन्यवाद जुइ ,खादाड