किशोर कुमारचे दुर्मिळ गाणे

देवदत्त's picture
देवदत्त in काथ्याकूट
21 Mar 2009 - 12:27 am
गाभा: 

दोन आठवड्यांपूर्वी रेडियो मिर्ची वर किशोर कुमारचे 'पडोसन' चित्रपटातील 'मेरे सामने वाली..' हे गाणे ऐकले. पण खास गोष्ट म्हणजे ते गाणे दुख:द छटेचे आहे. सिनेमात किंवा कॅसेटमध्येही ते गाणे कधी पहायला/ऐकायला मिळाले नाही. आंतरजालावर मिळालेल्या माहितीनुसार ते गाणे प्रदर्शित झाले नव्हते. पण ते गाणे ऐकण्यास जरूर मिळाले.

मेरे सामने वाली खिडकी में एक चांद का टुकडा रहता है|
अफसोस ये है के वोह हमसे कुछ उखडा उखडा रहता है|
पहले तो हवा उन जुल्फों से खुशबू भी चुराकर लाती थी|
भूले से कभी उडती उडती आवाज भी आ जाती थी|
आवाज से भी महरूम हुए, इस बात का दुखडा रहता है|
मेरे सामने वाली खिडकी में एक चांद का टुकडा रहता है|

मला मिळालेल्या गाण्याचा दुवा हा आहे.

हे गाणे जर सिनेमात असते तर कोणत्या प्रसंगात असते असा मी विचार करत होतो. घरातील चर्चेनुसार 'भोला' (सुनील दत्त) ला गुंडानी मारल्यावर नंतर असेल. पण मला असेही वाटले की 'बिंदू'(सायरा बानू) जेव्हा मास्टरजीसोबत (मेहमूद) लग्न करण्याचे ठरवते तेव्हा. पण गाण्याचे शब्द आणि प्रसंगांचा ताळमेळ जमला नाही.

म्हटले तुम्हाला विचारू.
तुमच्या मते हे गाणे सिनेमात कुठे असू शकले असते व ह्या गाण्याबद्दल इतर, म्हणजे ध्वनीमुद्रित झाले होते तर सिनेमात किंवा कॅसेटमध्येही का नाही आले वगैरे वगैरे, माहिती मिळू शकेल का?

प्रतिक्रिया

आंबोळी's picture

21 Mar 2009 - 12:30 am | आंबोळी

तात्याना विचारा... त्याना माहीत असेल ...ते किशोर कुमारच्या घरी नेहमी जात असतात.

प्रो.आंबोळी

देवदत्त's picture

21 Mar 2009 - 12:33 am | देवदत्त

अरे हो, ते राहिलेच.
तात्या, तुमचा माहितीचा बटवा उघडा की आमच्याकरीता :)

विसोबा खेचर's picture

21 Mar 2009 - 12:33 am | विसोबा खेचर

ते किशोर कुमारच्या घरी नेहमी जात असतात.

आता ते आमच्या भाग्यात नाही. आमचे गुरुजी १३ ऑक्टोबर १९८७ रोजी खुदाला प्यारे झाले!

असो..

आपला,
(किशोरकुमार गांगुली या माणसाचा पागल!) तात्या.

विसोबा खेचर's picture

21 Mar 2009 - 12:37 am | विसोबा खेचर

तूर्तास गडबडीत. सवडीने लक्ष घालतो..

तात्या.

केळ्या's picture

23 Mar 2009 - 4:02 pm | केळ्या

पडोसनच्या १९६८ साली प्रकाशित झालेल्या तबकडीवर (३३RPM) हे गाणे मेरे सामनेवाली(sad)या नावाने होते.मला वाटते,कहना है गाणे झाल्यावर हे गाणे नुसतेच मागे वाजले असते.मग पुढे भोला मरण्याचे नाटक करतो.