सगळ्या मिपाकरांना नमस्कार ....
मी पुण्यात राहते ... पुढील एक वर्षभरात माझ्या फॅमिली आणि relatives बरोबर परदेशी फिरायला जायचा विचार आहे ... आमचा ९-१० जणांचा ग्रुप असेल ...ह्या यादीमध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, Singapore , Thiland , मलेशिया, बाली ह्यापैकी एक देश निवडून प्रवास करायचा विचार आहे ...USA ला एकटीने प्रवास मी केला आहे पण टुरिस्ट म्हणून नाही ... मध्यंतरीच्या काळात वीणा वर्ल्ड आणि केसरी बद्दल चौकशी केली होती ... दोन्ही टूर कंपनी बद्दल चांगली आणि वाईट अशी दोन्ही मत आहेत ... अर्थात ती तशी असणार हे हि मान्य ... हि फॅमिली ट्रिप असल्यामुळे सगळ्या दृष्टीने योग्य होईल अशी टूर कंपनी निवडायची आहे ... पण इंटरनेट वरून मिळालेली माहिती पाहता गोंधळ उडालेला आहे ... तरी जास्तीत जास्त ठिकाणे बघता येतील, राहायची आणि commutation ची सोय चांगली पुरवत असतील, affordable असेल अश्या तत्वांवर बसू शकेल अशी एखादी ट्रॅव्हल कंपनी सुचवावी .... तसेच वीणा वर्ल्ड आणि केसरी ने कोणी प्रवास केला असेल तर त्या बाबतची आपली मते मांडावीत म्हणजे निर्णय घेणे सोपे होईल .... पैशाची अडचण नाही ... परंतु बाकीच्या गोष्टींचे टेन्शन ना घेता ट्रिप चा आनंद द्विगुणित व्हावा एवढी अपेक्षा आहे ...
सुहास म्हात्रे काका ... तुमचा guidance तर अगदीच हवा आहे ...मिपावरचे तुमचे सगळे ब्लॉग्स मी वाचलेत ... तुम्हाला travelling चा खूप experience आहे ... इथे तुमच्याकडून काही suggestion मिळाले तर मस्तच ....
धन्यवाद !!
प्रतिक्रिया
5 Jun 2019 - 1:26 pm | उपेक्षित
आपल्याला व्यनी केला आहे.
7 Jun 2019 - 12:22 pm | प्रिया१
तुम्हाला पण रिप्लाय केला आहे
7 Jun 2019 - 10:22 pm | पाषाणभेद
खुला प्रस्ताव आहे तर उघड प्रतिसाद द्या की इतरांनाही लाभ होईल.
8 Jun 2019 - 7:00 pm | उपेक्षित
@ पाषाणभेद,
खुला नाहीये म्हणून तर व्यनी केलाय दादा, उगाच जाहिरातबाजी नको.
5 Jun 2019 - 4:51 pm | चौकटराजा
यात्रा कंपनींना एअर फेअर ठोक खरेदी मुळे स्वस्त पडते की नाही याबद्द्ल अनेक वाद आहेत. पण निवास त्यांना स्वस्त पडत असावा असे वाटते. खर्चाचा सवाल नसेल तर स्वतः" ट्रीप " प्लान करा . एअर फेअर व निवास व स्थानिक सेवा ई साठी अनुभवी ट्रॅव्हल एजंट ला भेटा .खरा प्रवासी यात्रा कंपनीने कधी जात नाही कारण त्याचे स्वतः:चे स्थळ दर्शनाचे निकष ठरलेले असतात . लाईफ स्टायली साठी जाणार असाल तर मँगो हॉलिडे पुणे यांच्या ट्रीप वीणा व केसरी पेक्षाही उत्तम .
7 Jun 2019 - 12:29 pm | प्रिया१
"खरा प्रवासी यात्रा कंपनीने कधी जात नाही कारण त्याचे स्वतः:चे स्थळ दर्शनाचे निकष ठरलेले असतात " हे तुमचे म्हणणे बरोबर आहे पण आम्ही फॅमिली आणि relatives जात असल्याने शक्यतो ट्रॅव्हल कंपनी चा विचार करत आहे ... कारण माझी आई मावशी अशी मंडळी आहेत ... जी अगदी ज्येष्ठ नसली तरी तरुण पण नाहीत ... त्यामुळे त्यांच्या comfort च्या दृष्टीने पण विचार करत आहे ... मँगो हॉलिडेज ऐकलं आहे ... हा पर्याय पडताळून पाहायला हरकत नाही ...
5 Jun 2019 - 11:47 pm | संग्राम
एक हटके टूर कंपनी
https://www.escapar.in/
7 Jun 2019 - 12:31 pm | प्रिया१
तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणीं प्रवास केला आहे का ह्या टूर कंपनी बरोबर ....?
8 Jun 2019 - 10:47 am | संग्राम
ही माझ्या बहिणीची कंपनी आहे ... ते ग्रुप टूर करत नाहीत ... होम २ होम टूर प्लन करुन देतात .... तुम्ही एकदा सम्पर्क करुन पाहा असे सुचवतो
6 Jun 2019 - 5:34 am | कंजूस
मँगो हॉलिडे, ट्युलीप हे केसरीतून बाहेर पडलेल्या म्यानेजरांचे आहेत ना?
राज ट्रावल्स, कॉक्स & किंग्ज ?
6 Jun 2019 - 1:46 pm | समीरसूर
मी केसरीसोबत दोन आंतरराष्ट्रीय सहली केल्या आहेत. एक थायलंड आणि दुसरी सिंगापूर + मलेशिया. माझा अनुभव चांगला होता. सहली थोड्या हेक्टिक असतात हे खरे पण आम्हाला मजा खूप आली. एक तर ३०-३५ लोकांचा गृप असल्याने नवीन ओळखी होतात, विविध खेळ खेळले जातात आणि प्रवास कंटाळवाणा होत नाही. खूप गाणी-गप्पा होतात. एखादा चांगला गाणारा/री असेल तर गृपमधले इतर सदस्य त्याच्यावर/तिच्यावर विशेष प्रेम करतात. अंताक्षरी वगैरे खेळांनी आनंद द्विगुणित होतो. शिवाय जेवण सगळीकडे व्यवस्थित मिळते. कुठल्याच बाबतीत काहीच टेंशन नसते. शक्यतो सगळे लोकप्रिय स्थलदर्शन समाविष्ट असते. अगदी हटके स्थलदर्शन करायचे असेल तर मात्र स्वतः सगळे प्लॅनिंग केलेले बरे.
याउलट मी दोन महिन्यांपूर्वी केरळची सहल स्वतः एका एजंटच्या मदतीने प्लॅन केली. आम्हाला एक कार होती. सहल छान झाली पण सपक झाली. आम्ही तिघेच होतो (मी, बायको, आणि माझा दोन वर्षांचा मुलगा). माझ्यामते सहली जर २०-२५ लोकांच्या गृपमध्ये केल्यास खूप मजा येते. शिवाय आंतरराष्ट्रीय सहलींमध्ये हॉटेल, गाडी बुकिंग वगैरेचे खूप अवधान ठेवावे लागते. केसरी, वीणाने गेल्यास संपूर्ण फोकस फिरण्यावर ठेवता येतो. या सहली महाग असतात कारण या सहलींमध्ये दोन्ही वेळचे जेवण समाविष्ट असते.
स्थलदर्शन महत्वाचे असतेच पण काही छोटे अनुभव सहल अधिक खुलवतात. एखाद्या टूमदार हॉटेलमधून बाहेर पडून संध्याकाळी निवांत मारलेला फेरफटका, लॉबीमध्ये सगळ्यांचे होणारे फोटोसेशन, जेवतांना सगळ्यांशी होणार्या गप्पा, वगैरे प्रकार खूप आनंददायी असतात. आम्ही बर्याच लोकांच्या नंतर बराच काळ संपर्कात होतो. त्यातले बरेच जण फेसबुकवर माझ्या अजूनही संपर्कात आहेत. अगदी केसरीचे टूर मॅनेजरदेखील. हे टूर मॅनेजर खूप फ्रेंडली आणि उत्साही असतात. सहल कंटाळवाणी होणार नाही याची ते पुरेपूर काळजी घेतात.
मला स्वत:ला व्हिसा, हॉटेल, टॅक्सी, जेवण, विमानप्रवास, वगैरे सगळे सतत लक्ष ठेवून अरेंज करण्याचा खूप कंटाळा येतो. त्यातच वेळ आणि ऊर्जा जाते. एखादे स्थल एंजॉय करत असतांना पुढचे प्रश्न डोक्यात रुंजी घालायला लागतात. म्हणून मी शक्यतो गृप टूर्स प्रेफर करतो. अर्थात, ज्याची त्याची आवड निराळी असते.
6 Jun 2019 - 1:58 pm | गवि
बाकी सर्व ठीक पण
असं तुम्हाला वीणा केसरीच्या टूरसोबत एकदा जरी जमलं असेल तर भाग्यवान आहात. हेक्टिक वगैरे शब्द सोडा, मान वर करुन एक क्षण खांद्याच्या वरच्या लेव्हलचं दृश्य, स्थापत्य बघायलाही मिळत नाही.
एकच झेंडा (लाल अथवा पिवळा) समोर आणिक पायतळी अंगार.. पळवा खालमुंडी शेळ्यांचा कळप.
अर्थात पसंत अपनी अपनी हे खरेच.
बाकी ते सर्व जेवणे समाविष्ट हा प्रकार सहन करण्यासाठी वेगळी ताकद पाहिजे. तिकडेसुद्धा आम्हाला रोज इंडियन फूड कसं मिळालं याचा आनंद मानून सर्वत्र सांगणाऱ्या लोकांना ते आवडत असतंही, पण त्यासाठी ज्या खास अशा घाऊक टुरिस्टसाठीच अन्न घालणाऱ्या "इंडियन रेस्टॉरंट" नामक प्रकाराला त्याच्या सोयीच्या ठराविक टाईमस्लॉटसकट गाठण्यात प्रत्यक्ष सहलीचा किती वेळ फुकट जातो हे लक्षात येत नाही.
आणि तेही बहुतेक ठिकाणी फुकट वाढत असल्यासारखे गुर्मीखोर. असो.
त्यापेक्षा लंच आपले आपण असलेल्या टूर घ्याव्यात. किमान दुपारी जेवणाच्या आसपास खुले फिरण्याची मोकळीक मिळते. लोकल अन्न ट्राय करता येतं. फिरताही येतं.
6 Jun 2019 - 2:06 pm | समीरसूर
खरं आहे. :-)
सिंगापूरला आमच्या हॉटेलच्या (ऑर्किड की काहीतरी नाव होतं) बाहेरच्या सुंदर रस्त्यावर आम्ही संध्याकाळी फिरायला बाहेर पडलो होतो. जवळपास तासभर तरी आम्ही फिरत होतो. मलेशियामध्येदेखील आम्ही असे बाहेर पडलो होतो. थायलंडमध्ये आमच्यापैकी कित्येकांनी रिव्हर क्रुज विथ डिनर केली होती. ती सहलीत समाविष्ट नव्हती. आम्ही गेलो नव्हतो कारण ती खूप महाग होती. आम्हाला बाकीच्या लोकांनी खूप आग्रह केला पण आम्ही नव्हतो गेलो. नंतर मला गेलो असतो तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं. थायलंडच्या सहलीमध्ये गृपसोबत आमची इतकी मैत्री झाली होती की सहल संपल्यावर सगळेच थोडे भावूक झाले. अर्थात, नंतर सगळे आपापल्या जगात रममाण होतातच पण ते ५-६ दिवस खूप मस्त गेले होते.
6 Jun 2019 - 2:13 pm | समीरसूर
आणि त्यामुळे या सहली महाग होतात. केरळच्या सहलीत आम्ही जिथे जसे उपलब्ध असेल तसे जेवलो. अर्थात तिथेदेखील जेवणात आमचे दीड-दोन तास जातच होते. पण संध्याकाळी आम्ही जिथे साधे आणि पटकन मिळेल तिथे खात होतो. कन्याकुमारीमध्ये असेच फिरता फिरता आम्हाला स्व. एकनाथ रानडे यांनी उभे केलेले विवेकानंद केंद्र आणि रामायणावर आधारित एक सुंदर केंद्र दिसले. ते बघण्यात दोन तास कसे गेले कळलेच नाही इतके ते सुंदर होते. तिथेच एका शाकाहारी हॉटेलात रुचकर दोसा, पुरी भाजी वगैरे मिळले. हा एक अनुभव खूप भारी होता. जेवणाचा तसा काही फार सोस नसल्याने जे जसं असेल ते खाऊन निघायचे हा शिरस्ता आम्हाला सहलींमध्ये खूप कामात येतो. या तुलनेत केसरी/वीणा पूर्ण बुफे देतात आणि म्हणून त्यांच्या सहलींच्या किमती वाढतात.
6 Jun 2019 - 2:18 pm | गवि
ते जेवण अर्थात ठराविक घाऊक जागीच (मूळ मार्गावरून भरपूर डी-टूर करून, आणि तो गेलेला वेळ नंतर साईट सीइंगच्या वेळी अर्ध्या तासात उरका उरकी करुन भरून काढून) , ठराविक वेळी (जी आपल्या भुकेच्या तार्किक वेळेशी जुळणारी नसून इंडियन रेस्टॉरंटच्या सोयीच्या स्लॉटची असते, मग संध्याकाळी सहाला डिनर ठोसणे असेही प्रकार होतात).. अशा रीतीने दिलं जातं.
तशा पद्धतीने डाळ फ्राय, रोटी, मिक्स व्हेज, रायता पापड हे आणि हेच आणि हेच आणि फारतर व्हेज कढाई ऐवजी व्हेज हंडी इतकाच बदल आनंदाने स्वीकारून युरोपपासून थायलंडपर्यंत सर्वत्र आवडीने खाणारे टुरिस्ट बहुसंख्य असल्याने वीणा केसरी मागणी तसा पुरवठा करतात. आम्हाला माउंट टिटलीसवर गर्रम गर्रम पावभाजी मिळाली किंवा फ्रान्सला शामोनीच्या बर्फात वडापाव मिळाला याचा त्यांना मनापासून आनंद होतो आणि ते बाकी सर्व प्रवासाविषयी न बोलता हेच अनेक वर्षे सांगत राहतात.
दिलेल्या पै पैची वसुली हाही आपल्या जनतेचा अग्रक्रम. मग सर्व कॉलम भरले गेले पाहिजेत. तीस तीस सेकंद का होईना, प्रत्येक ठिकाणी डोकं आपटून आलंच पाहिजे. तेही पुरवलं जातं.
आपण कशा प्रकारचे टुरिस्ट आहोत हे आपण ठरवावं. मॅरेथॉन तर मुंबईतही असते.
6 Jun 2019 - 2:32 pm | समीरसूर
आमच्या सहलींमध्ये तरी दुपारचे जेवण १२:३० - १:३० च्या दरम्यान आणि रात्रीचे जेवण ७:३० - ९:०० च्या दरम्यान मिळाले. काही कारणांस्तव थोडाफार फरक झाला असेल तर तितकेच. जेवण तसे यथातथाच असते. पण चांगले, आपल्याला हवे असणारे जेवण (स्थानिक किंवा भारतीय) शोधण्यात तसाही बराच वेळ जातो. शिवाय आमचा फोकस फिरण्यावर असल्याने ५-६ दिवस जेवणाच्या बाबतीत कुठलीच तक्रार करण्याचा विचार कधी मनात आला नाही. काही लोकांनी एक-दोन वेळा जेवण तितकेसे चांगले नसल्यामुळे आरडाओरडा केला खरा पण आमच्या टूर मॅनेजरने त्यांची समजूत काढली (एवढ्या मोठ्या सहलीत थोडे इकडे तिकडे होणारच, हा आपला देश नाही, जेवण आपण नेहमीच चांगले करतो; सहलीमध्ये थोडे अधिक-उणे झाल्याने फरक पडतो का, तुम्हाला फिरण्यातला आनंद हवा आहे की जेवणातला, वगैरे). टूर मॅनेजरच्या या समजावण्यामुळे ते त्रस्त पर्यटक शांत झाल्यासारखे वाटले.
पण तुम्ही म्हणता ते काही अंशी खरे आहे. जेवण ठराविक ठिकाणी 'उरकले' जाते. ३०-३५ सदस्य असल्याने वेळ बर्यापैकी लागतो. पण ठीक आहे. सहलीच्या एकंदर अनुभवावर याचा फारसा परिणाम पडत नसावा असे वाटते.
6 Jun 2019 - 2:35 pm | गवि
हा प्रश्न युरोपात / मध्यपूर्वेत येतो. आशियाई देशांत ठीक असतं.
6 Jun 2019 - 2:47 pm | समीरसूर
या सहली थोड्याफार प्रमाणात "सगळे कॉलम भरणे" टाईपच्या असतात. उसंत क्वचित मिळते. अर्थात, कमी स्थलदर्शन असणार्या सहलीदेखील असतात. "डोक्याला अजिबात शॉट न देणार्या आणि व्यवस्थित नाश्ता-जेवण देणार्या" सहली असल्याने अशा सहलींना मुबलक ग्राहकदेखील मिळतात.
मला गृपसोबत जाणे हा या सहलींचा सगळ्यात आकर्षक भाग वाटतो. मुन्नारला एका घाटातून जात असतांना एक सुंदर दृष्य दिसले. मी हुरळून बायकोकडे पाहिले. ती शांत झोपली होती. आमचे बाळराजेदेखील निद्रादेवीच्या राज्यात पोहोचले होते. आमचा ड्रायव्हर मख्ख होता. मी गुपचूप एकट्याने ते दृष्य पाहिले आणि गप्प बसलो. आमची केरळची सहलदेखील तशी हेक्टिक होती. कोचिन, मुन्नार, अलेप्पी, पुवर, त्रिवेंद्रम, कोवलम, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम, कोचीन असा प्रवास होता. पण एखादा पदार्थ चवीला चांगला असतो पण ब्लँड वाटतो (गव्हाची खीर? सातूचे पीठ?, मैसूर पाक?, माहिम हलवा?, मेथी पुरी? मठरी? खाकरा?) तशी ही सहल झाली. मजा आया पर नशा नहीं आया...
6 Jun 2019 - 2:52 pm | गवि
आपला ग्रुप जमवणं ज्यांना शक्य आहे (उदा धागाकर्ती) त्यांना ग्रुपच्या फायद्यासाठी वीणा केसरी shepherding सहन करण्याची गरज नाही असा मुद्दा.
6 Jun 2019 - 2:56 pm | समीरसूर
मान्य आहे...मग सगळं स्वतः करण्याची तयारी ठेवायची.
6 Jun 2019 - 3:00 pm | गवि
नाय, प्रथमच जात असल्यास एंझायटी असू शकते. हवे असल्यास आपल्या प्लॅननुसार सर्व करून देतात अनेक कंपन्या. खुद्द वीणा केसरीसुद्धा. :-)
6 Jun 2019 - 3:03 pm | समीरसूर
मग काही टेंशन नाही...
6 Jun 2019 - 2:57 pm | समीरसूर
अनोळखी गृपची मजा कधी कधी खूप इटरेस्टिंग असते...
6 Jun 2019 - 3:05 pm | गवि
ते परदेशातही भेटतात।
त्या भारतीय ग्रुपसाठी दिलेली बाकीची किंमत फार जास्त असते. असा तत्सम अनेक टूर्स करून अनुभव आल्याने तो मार्ग टाळतो.
बादवे ग्रुप वाईट निघण्याचा (बॅचलर टोळके घुसणं, भांडकुदळ उपगट हे अख्खी अढी नासवू शकतात) अनुभव किती भयानक असतो हे तुम्ही पाहिलेलं दिसत नाही. योगायोगाने. आणि पाहावे लागू नये अशी सदिच्छा. तिथे ऑप्शनही राहत नाही.
त्यापेक्षा स्वतः इथून लोक जमा करून आपला ग्रुप बांधता आला तर आयडियल.
6 Jun 2019 - 3:28 pm | समीरसूर
ही रिस्क आहे खरी...
6 Jun 2019 - 2:55 pm | समीरसूर
अलेप्पीला हाऊसबोटवर दुपारी ३ पासून दुसर्या दिवशी सकाळी ९:३० पर्यंत आम्ही तिघेच होतो. बोटीचा तीन जणांचा स्टाफ होता. इतका वेगळा अनुभव मोठा गृप असल्याशिवाय नीटसा एंजॉय नाही करता येत. आम्ही थोडा वेळ बोटीचा आनंद लुटला आणि त्यानंतर बायको तिथल्या किचनमध्ये मुलासाठी खिचडी आणी बटाट्याची भाजी करण्यासाठी निघून गेली. स्टाफमधले तिघे आमच्या मुलासोबत बराच वेळ खेळले. मी बोटीवरच्या हॉलमध्ये एकटाच बसून आपला-आपला 'आनंद' घेत होतो. बारा-पंधरा लोकांचा गृप असेल तर या हाऊसबोटीची मजाच न्यारी! रात्री ८-८:३० ला आता आम्ही 'तुला पाहते रे' लावून बसतोय की काय अशी मला शंका येताच क्षणी मी ताडकन उठलो आणि...पुन्हा बसलो. अजून काय? :-(
7 Jun 2019 - 1:09 pm | मराठी कथालेखक
प्रत्येकाची आवड वेगळी हेच खरं.. मला अनोळखी लोकांत फिरायला आवडत नाही. मी आणि माझी पत्नी असे दोघेच रोडट्रिप करतो. गोव्याला हाऊसबोटीवरही दोघेच होतो (म्हणजे त्यावेळी आम्ही दोघे आणि स्टाफ यांशिवाय बोटीवर कुणी नव्हतेच) पण मला असे आवडते.
7 Jun 2019 - 1:11 pm | मराठी कथालेखक
झालंच तर लग्नाआधी मी सोलो ट्रॅव्हलर होतो.. बाईकवरुन दापोली , ईगतपूरी अशा सहली केल्या होत्या.
8 Jun 2019 - 12:16 pm | Ganes Gaitonde
Perfect!
7 Jun 2019 - 12:33 pm | प्रिया१
सहमत ... नवीन ओळखी होतात हा खरोखरीच प्लस पॉईंट आहे ... केसरी सोबत माझ्या ओळखीत एकानी अमेरिका टूर केली होती ... त्यांचा पण अनुभव चांगलाच होता ...
7 Jun 2019 - 12:35 pm | प्रिया१
page refresh मुळे चुकीच्या व्यक्तीला प्रतिसाद गेला... :P
7 Jun 2019 - 12:36 pm | प्रिया१
सहमत ... नवीन ओळखी होतात हा खरोखरीच प्लस पॉईंट आहे ... केसरी सोबत माझ्या ओळखीत एकानी अमेरिका टूर केली होती ... त्यांचा पण अनुभव चांगलाच होता ...
6 Jun 2019 - 3:09 pm | स्मिता श्रीपाद
स्वतः हुन जाणे आणि ट्रॅवल कंपनी ने जाणे या दोन्ही प्रकाराचे फायदे तोटे आहेत. त्यामुळे अमुक एकच चांगले असे आपण जनरलाईझेशन करु नाही शकत.
आपल्या सोबत जर लहान मुले, जेष्ठ नागरीक असतील तर ट्रॅवल कंपनी ने जाणे कधीही चांगलेच पडते.
विमान बुकींग, विसा, हॉटेल बुकींग, पर्यटन स्थाळांची तिकिटे काढणे, जेवणाच्या वेळा झाल्या की सगळ्यांना खाता येइइल असे हॉटेल शोधणे ( शाकाहारी व्यक्ती ग्रुप मधे असतील तर हे काम अजुन अवघड होते ) ई ई या सगळ्या गोष्टी ट्रॅवल कंपनी वाले लोक सांभाळतात.
आम्ही सिंगापुर - मलेशिय ट्रीप स्वत: बुकींग करुन केली.
१२ लोकांचा ग्रुप, त्यात २ जेष्ठ नागरीक, ५-९ वयोगटातील ३ लहान मुले आणि बाकी आम्ही त्या मुलांचे आई बाबा अशी मंडळी होती.
१२ जणांचे विमान टिकीट बुक करता करताच आमची वाट लागली. :-( ( टोटल ५ विमान प्रवास , प्रत्येकाचे नावं, जन्म तारखा नीट घालुन बुकींग करणे, त्यात पण कोणाची तरी जन्मतारीख घालताना चुकली , मग चुकीची दुरुस्ती ई ई ई....) ..
मग भरपुर शोध घेउन , वेगेवेगळ्या हॉटेल्स ना एमेल करुन, सगळ्यांकडुन डील घेउन हॉटेल बुकींग,
वेगवेगळे ब्लॉग वाचणे आणि तिथे फिरायची आयटेनेरेरी बनवणे,
जेवायच्या वेळी आपण जिथे असु तिथे योग्य हॉटेल शोधणे,
प्रेक्षणीय स्थळांची तिकिटे काढणे ई ई... काही दिवस मला असं वाटत होतं की मीच ट्रॅवल एजंट आहे की काय.
आणि प्रवासवर्णनाचे इतके ब्लॉग मी पाहिले की प्रत्यक्ष ते ठिकाण बघताना मला काही फार एक्सायटींग वाटेचना .
जिथे जाईन ते ठीकाण मी आधीच ( ऑनलाईन ) पाहिले असल्याचे फीलींग येत होते.
बर जिथे जाल तिथलेच खावे वगैरे वगैरे कल्पना छान आहेत पण जेव्हा आपण भरपुर फिरत असतो आणि त्यामुळे भुक पण भरपुर लागत असते तेव्हा अॅट द एन्ड ऑफ द दे आपल्याला आपलं काहीतरी कंफर्ट फुड च खावंसं वाटतं हे ही तितकच खरं. कितीही नाही म्हणलं तरी जेव्हा फिरणं हा प्रधान्यक्रम असतो तेव्हा आपल्या पोटाला पचेल न रुचेल ते खाउन आपली तब्बेत नीट राखणे हे मला जास्त महत्वाचं वाटतं. ( तसही आजकाल पुण्यात सगळ्या देशाचे कुझिन्स कधीही मिळतातच की. अगदी परदेशी शेफ पण असतात इथल्या हॉटेलात ;-) )
आपले आपण फिरण्यासाठी आपला ग्रुप पण तसाच हवा. सडे लोक असतील जे कधीही कुठेही कसेही फिरु शकतात ज्यांच्यासोबत लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरीक नाहीत आणि ज्यांच्यासाठी "अमुक दिवसच सुट्टी आहे तेवढ्यातच फिरा" असे बंधन नाही त्यांनी नक्की स्वतः प्लॅन करुन फिरावे. उलट मी तर म्हणेन आयटेनेरेरी प्लॅन न करता फिरावं. आपल्याला हवं त्या शहरात हवे तितके दिवस फिरणं जास्त आनंददायी असेल.
6 Jun 2019 - 3:37 pm | समीरसूर
खतरनाक आहे हे सगळं.
मी मागच्या वर्षी जुलैमध्ये चंदिगड आणि आसपासची एक-दोन ठिकाणे असा मित्रांच्या गृपसोबत फिरायला गेलो होतो. आम्ही एकएकटेच होतो त्यामुळे अफलातून मजा आली. ९-१० मित्र होतो. ४-५ दिवस गेलो होतो. ज्या मित्राने तिकिट बुक करण्याचे काम घेतले होते तो नंतर नंतर एवढा वैतागला की त्याने शेवटी जाहीर केले की मी आता काहीही करणार नाही. त्याने असा अवतार धारण केल्यानंतर सगळे त्याच्या हातापाया पडायला लागले. तू जसं ठरवशील तसं करू पण बुकिंगची वगैरे भानगड तूच हँडल कर. सगळ्यांनी आपले सल्ले बंद केले आणि एकदाचे आम्ही निघालो. :-) कुणी म्हणत होते दिल्ली फिरू, कुणी म्हणत होते सिमल्याला जाऊ, कुणाला रात्रीची फ्लाईट नको होती, कुणाला तारखा जमत नव्हत्या, कुणाला तिकिटं महाग वाटत होती, कुणाला फ्लाईटच्या वेळा सोयीस्कर नव्हत्या...नंतर नंतर कुणी त्याला फोन करून म्हटले "दिल्लीला जाऊ ना यार!" तर तो म्हणायचा "ठीक आहे, तू कर सगळं बुकिंग!" की फोन करणारा "तसं नाही रे. दिल्ली काय, नंतरही बघता येईल....एकत्र असणं महत्वाचं..." वगैरे म्हणून फोन ठेवायचा. :-)
7 Jun 2019 - 1:51 pm | प्रिया१
:)
6 Jun 2019 - 3:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
@ प्रिया१ :
माझी फिरण्याची पद्धत साधारण अशी आहे.
१. सर्वप्रथम आपण जेथे जाणार आहोत त्या जागेसंबंधी जालावर केलेले संशोधन, तेथे आपण काय बघण्यास व अनुभवण्यास जाणार आहोत हे ठरवण्यासाठी खूप कामी येते. हे माहित झाले की मग, तेथील कोणत्या आकर्षणांना भेट द्यायची आहे/नाही, काय पहायचे/अनुभवयाचे आहे आणि त्यानुसार त्यापैकी प्रत्येकाला किती वेळ (दिवस/तास) दिल्यास जास्त मजेशीर व सुखकारक वाटेल हे ठरवणे सोईचे होते. याशिवाय, काय करायचे हे अगोदरच माहीत असल्याने, सहल करताना मिळणार्या धक्क्यांवर वेळ खर्च न होता, सर्व वेळ सहलीची मजा घेण्यात घालवता येतो.
२. त्यानंतर, मी स्थानिक सहल कंपन्याच्या सहलींची माहिती जालावर धुंडाळतो. त्यातील, माझ्या आवडींशी (आकर्षणे आणि त्यांना दिलेला वेळ) जमून/जवळपास असणार्या पहिल्या तीन-चार सहलकंपन्यांशी ईमेलने संवाद सुरू करतो. त्यांच्या प्रवास कार्यक्रमात (itinerary) माझ्या आवडीप्रमाणे फेरबदल करता येतील की नाही हे विचारतो. भारतिय कंपन्या यासाठी तयार नसतात पण परदेशी कंपन्यांसाठी असे कस्टमायझेशन हा रोजच्या व्यवहाराचा भाग असतो असा माझा अनुभव आहे. यामध्ये, सहलीचा खर्च कमी-जास्त झाला तरी, आपल्याला नसलेले पर्याय काढून टाकणे व आवडते पर्याय वाढवणे, यामुळे पैशांचा जास्तीत जास्त मोबदला मिळतो. माझ्या आवडीची नसलेल्या आकर्षणांचे अनेक दिवस बदलून त्याऐवजी कंपनीच्या कार्यक्रमात नसलेली माझ्या पसंतीची अनेक आकर्षणे बर्याचदा बघितलेली आहेत.
रोज भारतिय जेवण हवे असा माझा हट्ट नसतो. किंबहुना, परदेशात फिरताना स्थानिक पाककृती चाखणे हा सहलीच्या आनंदाचा अविभाज्य भाग आहे असे मला वाटते. मध्येच एखाद्या वेळी भारतिय जेवणाची हुक्की आली तर, जराशी चौकशी केल्यास, अतीउत्तरेतील नॉर्वेमधील ओस्लोपासून ते अतीदक्षिणेतील न्यूझिलंडमधील रोतोरुआमध्ये भारतिय लोकांनी चालवलेल्या रेस्ताराँमध्ये उत्तम भारतिय जेवण मिळते. मात्र, रोजच भारतिय जेवण हवे असा हट्ट असल्यास भारतिय कंपन्यांबरोबर सहल करणे जास्त सोईचे होईल.
३. कंपन्यांशी ईमेलवर चर्चा करताना, अजिबात संकोच न करता हव्या असलेल्या/नसलेल्या सर्व बारकाव्यांची माहिती करून घ्यावी... एकही गोष्ट अंदाजपंचे किंवा 'असेच असेल' असे समजून गृहित धरू नये. याबाबतीत, चांगल्या परदेशी कंपन्या अत्यंत मनमोकळ्या असतात व त्या अश्या विचारणांचे स्वागत करतात, असा अनुभव आहे. किंबहुना, मी एकटा फिरायला गेलो असतानाही, बर्याच कंपन्यांनी, अश्या माहितीची (उदा : आहारपद्धती, आकर्षणांसंबंधी आवडी-निवडी, अॅलर्जी, बजेट, इ) स्वतःहून विचारणा केलेली आहे आणि सहलीत त्याची उत्तम अंमलबजावणी केलेली आहे. तुमचा ९-१० जणांचा गट असल्याने, तुम्हाला वरील क्र २ व ३ मुद्द्यांसंबंधात अधिकच सहकार्य मिळेल.
या मुद्द्यांची स्वतःहून कदर करणार्या कंपन्यांची सहलीतली सेवा उत्तम असते हे सांगायला नकोच. वेगळ्या शब्दांत, कंपनी ग्राहककेंद्रित असल्याचा निर्वाळा अश्या वागणूकीतून मिळतो व तसाच अनुभव सहलीत मिळण्याची शक्यता वाढते.
४. चांगल्या कंपनीची निवड आणि आपल्या आवडीप्रमाणे बदल करून घेतलेली सहल, जास्त आनंददायक आणि अविस्मरणिय बनायला मदत करेल.
५. वरील प्रकारात, तुम्हाला फक्त भारत ते फिरण्याचा देश हे विमानतिकिट स्वतःला काढावे लागेल. एकदा त्या देशात पोचल्यावर विमानतळावर स्वागत करण्यापासून ते परतीच्या प्रवासासाठी विमानतळावर सोडण्यापर्यंत सर्व जबाबदारी सहल कंपनीवर आहे, असा कार्यक्रम ठरवावा, म्हणजे सहलीत काही समस्या आली तर ती सोडवायची जबाबदारी कंपनीवर राहते आणि तुम्ही निष्काळजीपने सहलीची मजा घ्यायला मोकळे राहता.
तुमच्या सुखकारक भटकंतीसाठी अनेकानेक शुभेच्छा ! फिरून आल्यावर मिपावर सचित्र वर्णन टाकून मिपाकरांनाही तुमच्या आनंदात सहभागी करून घ्या ! :)
6 Jun 2019 - 3:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
अजून एक महत्वाचा मुद्दा...
६. परदेशी कंपन्या त्यांचा कार्यक्रम सुटसुटीत बनवतात आणि सहल फार घाईगडबडीची होणार नाही याची काळजी घेतात. असे न केल्यास, माझ्या मते, सहलीतील मजा जाऊन तो क्रॉसपाटीला शिवून यायचा एक खेळ बनतो ! :( याशिवाय त्यांच्या जास्त दिवसांच्या कार्यक्रमांत मधे मधे अर्धा ते एक दिवस मोकळा ठेवलेला असतो. ही वेळ आपापल्या आवडीप्रमाणे आराम करणे किंवा कंपनीने (जास्त किंमत भरून) दिलेल्या पर्यायी आकर्षणांसाठी वापरता येते. ही आकर्षणे लहान मुले, तरूण आणि वयस्कर व्यक्ती यांच्यासाठी वेगवेगळी असू शकतात.
6 Jun 2019 - 4:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
७. फिरताना जेवणाच्या बाबतीत असे करणे जास्त सुटसुटीत आणि कमी श्रमाचे ठरते...
अ) परदेशी कंपन्यांच्या सहलीत सगळी हॉटेल्स दर दिवसाला न्याहारीसह असतातच. त्यांची न्याहारी शाकाहारी व मांसाहारी पर्याय असलेली आणि विशेषतः भरपूर फळे असलेली असते. सहलीची पूर्ण मजा घेण्यासाठी भरपेट न्याहारी करून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे.
आ) दुपारचे जेवण पाश्च्यात्य पद्धतीप्रमाणे (कंपनीतर्फे नसल्यास) बर्गर, सँड्विच, पिझ्झा, स्थानिक फास्ट फूड, इत्यादी घ्यावे. नावाप्रमाणेच फास्ट फूड असल्याने त्या जेवणात महत्वाचा वेळ वाया जात नाही आणि फिरण्यास जास्त वेळ मिळतो. विशेषतः लहान मुले बरोबर असल्याच त्यांच्या आवडीचे सुके, प्रवासात खायला सोपे आणि खाताना कचरा होणार नाही असे पदार्थ बरोबर ठेवणे केव्हाही चांगले. दुपारचे जेवण ठीक झाले नाही तर ते मोठ्यांच्याही उपयोगी येतात.
इ) रात्रीचे जेवण हा माझ्या सहलीचा एक खास कार्यक्रम असतो ! कंपनी रात्रीचे जेवण देत नसेल तर मी मार्गदर्शकाकडून राहत्या हॉटेलपासून फार दूर नसलेल्या स्थानिक आणि भारतिय रेस्तराँची माहिती काढून घेतो. याशिवाय, काही (विशेषतः चीनमधील) शहरांत रात्रीच्या जेवणासकट करमणूकीचे कार्यक्रम असतात. मात्र त्यांना स्वतंत्रपणे भारतातूनच जालावर बुक करणे आवश्यक आहे. विशेषतः चीनमधील असे कार्यक्रम बुक करताना पैसे भरावे लागत नाही व ते जालावरून बुक करणार्या कंपन्या ३०-४०% डिसकाऊंट देतात. कार्यक्रमाच्या वेळेअगोदर थिएटरवर पोचल्यावर बुकिंग कंपनीचा एजंट तुमच्याकडून पैसे घेऊन तुम्हाला तिकीट काढून देतो. प्रवाशाने स्वतः रांगेत उभे राहून तिकिट घेतल्यास डिसकाऊंट मिळत नाही. हे कार्यक्रम माझ्या चीनच्या सफरीतील अत्यंत अविस्मरणिय क्षण होते.
7 Jun 2019 - 12:47 pm | प्रिया१
काका तुमचे मुद्दे अगदी particular आहेत ... पण सगळ्यांना घेऊन पहिल्यांदाच अशी परदेशवारी होणार आहे ... त्यामुळे foreign टूर कंपनी निवडायचे टेन्शन वाटते ... पण माहिती काढायला निश्चितच हरकत नाही ....आणि हो ...स्थानिक पाककृती चाखणे हे तर आलेच ... भारतीय जेवणच हवे असा आग्रह नाही .. परंतु almost सगळे शाकाहारी आहेत ... त्यामुळे थोडी अडचण होते ... तुम्हाला अमेरिका, thiland आणि ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड साठी अश्या काही टूर companies माहित आहेत का ज्यांच्या वेबसाइट वर काही माहिती पाहता येईल ?
BTW नॉर्वे हा देश माझ्या पण लिस्ट वर आहे आणि ते हि तुमच्या ब्लॉग मुले :) ...
6 Jun 2019 - 6:00 pm | राजेंद्र मेहेंदळे
मोठमोठ्या अनुभवी लोकांनी वर दिलेले सल्ले अतिशय मोलाचे आहेतच. पण तरीही माझे मत नोंदवतो
वीणा केसरी बरोबर मी जातच नाही कारण मला ते फार महाग वाटते. शिवाय सगळीकडे जाउन भारतीय जेवण मिळावे अशी अपेक्षा नसते. त्यामुळे विमान तिकिटे व्हिसा स्वतः करणे आणि पोर्ट टु पोर्ट सहल (हॉटेल, ट्रान्सपोर्ट, साईट सीइंग) तिथल्या किवा ईथल्या प्रवास कंपनीकडे बुक करणे हा पर्याय मला आवडतो. त्यातही हॉटेलही स्वतःच बुक केली की चांगले हॉटेल मिळाले नाही अशी तक्रार करायला जागा राहात नाही. जालावर सगळी माहिती मिळते, फोटोही दिसतात त्या मुळे कल्पना येते.
https://traveltriangle.com/ ह्यान्च्या बरोबर मी १-२ ट्रिप केल्या आहेत. अनुभव चांगला आहे.
कोरडे खाणे जसे की चिवडा लाडु ठेपले साटोरी बरोबर ठेवले तर एखादे वेळी पोटभर जेवण नाहि झाले तरी उपयोगी पडते. शक्य असल्यास सामिष जेवण (निदान चिकन) खावे म्हणजे फक्त ब्रेड व सॅलड खाउन राहयची वेळ येत नाही. शक्य नसल्यास तांदुळ बरोबर घ्यावे व काही तयार डाल फ्राय वगैरे (एम. टी.आर) घ्यावे म्हणजे हॉटेल मध्ये मायक्रो वेव्ह मिळाल्यास आणि योगर्ट वगैरे असल्यास एक जेवण होउन जाते.
लोकल बस ट्राम ट्रेनने प्रवास केल्यास त्या त्या देशाची बरीच ओळख होते. युरोपात असाल तर ते स्वस्तही पडते.
चलन शक्यतो त्या त्या देशाचे वापरावे म्हणजे हिशोबात घोळ होत नाही. क्रेडिट कार्ड असल्यास उत्तमच. कधी कधी ए.टीएम. मधुन सरळ भारतीय डेबिट कार्ड वापरुन पैसे काढले तरी दर चांगला मिळतो. श्रीलंका मॉरिशस मध्ये मला तोच सुखद धक्का होता. एखादा दिवस जास्त ठेवला तर विमान लेट/लवकर होणे वगैरे प्रसंगात उपयोगी पडते.
प्रवासात २ माणसांना मिळुन एक मोठी ट्रॅव्ह्ल बॅग व १ सॅक पुरते. शिवाय बॅगा हॉटेलात आणि सॅक पाठीवर टाकुन सोपे फिरता येते. श क्यतो १ लोकल सिम घ्यावे म्हणजे लोकल कॉल करायला बरे पडते. बाकी हॉटेलमध्ये वाय फाय असतेच.
असो. सध्या ईतकेच.
7 Jun 2019 - 12:19 am | उगा काहितरीच
मी आत्तापर्यंत २ वेळा केसरीने देशांतर्गत प्रवास केलाय. कस्टमाईज करून. विमानतळ ते विमानतळ असं बुकींग केलं होतं. अनुभव चांगला होता. दुसऱ्या वेळी केरळ मधे पुर परिस्थिती होती. तेव्हा सुरक्षितपणे बाहेर आणणे, हॉटेलचा स्टे वाढवणे , कमी करणे, हॉटेल बदलणे वगैरे गोष्टी त्यांनीच मॕनेज केल्या. (स्वतः गेलो असतो तर खूप पैसे वाया गेले असते आणि खूप मनस्ताप झाला असता) केसरी निश्चित पैसे जास्त घेतात पण मला तरी पैसे गेल्याचं वाईट वाटलं नाही.
रच्याकने स्वतः मॕनेज करायचं तर एक पर्याय असा आहे की , केसरीच्या अॉफिसमधे जायचं , सगळी माहिती (हॉटेलसगट) घ्यायची आणि तेच हॉटेल बुक करायचे. व प्लॕन पण जवळजवळ तसाच ठेवायचा.
7 Jun 2019 - 8:48 am | मानसी१
1. केवळ सोय बघायची असेल तर वीणा / केसरी उत्तम
पण ते फक्त मेन points of interest दाखवतात.
त्यातपण थोडी घाई असते. आणि काही ठिकाण महत्त्वाचे असुनही skip करतात.
मी वीणा ने 1 आणि आई -बाबा नी 4 trip केल्या आहेत. अतिशय सोईचे. पण जागा कमी दाखवल्या त्यामुळे मनस्ताप झाला. शिवाय बराच वेळ बस मधे जातो.
2. Thailand Singapore, Indonesia and Malaysia हे चार देश स्वतः आरामात फिरता येतात
आणि खर्च tours company पेक्षा बराच कमी होतो
मी Thailand and Singapore केले आहेत. वेगवेगळे. लहान मुलगी घेऊन. अजिबात त्रास झाला नाही. भरपूर फिरून होते
3. USA, Australia ,New Zealand खूप लांब प्रवास आहे. 20+ तास . सगळ्या लोकांना झेपत नाही. शिवाय USA मधे travel is either flying option or traveling by your car. So tours are better as they provide commute. पण उस गाव tours ने फिरु नये हे माझे वैयक्तिक मत आहे. फक्त 4-5 शहरात भोज्जा करून येणे ह्याला उस गाव फिरून आलो असे मी तरी नाही म्हणू शकत.
7 Jun 2019 - 1:58 pm | प्रिया१
आपण एवढे पैसे मोजणार तर लिस्ट डाउन केलेले सगळे पॉईंट्स visit करावे हि माफक अपेक्षा आहे ... पण प्रत्यक्षात मात्र अश्या अनेक तक्रारी ऐकायला मिळतात ... तसेच ह्या visits घाई घाईने उरकून घेणं ... आपल्याला वाटत असेल तरी एखाद्या पॉईंट वर थांबता ना येणं... ह्याही गोष्टी येतात... वीणा वर्ल्ड आणि केसरी पैसेही मजबूत आकारतात ... फारच confusion आहे :(
7 Jun 2019 - 4:56 pm | मानसी१
Family सोबत पहिली international trip असेल तर दुबई, Singapore किंवा Thailand करा. सरळसोट flights , visa ची.जास्त कटकट नाही आणि बर्यापैकी affordable. प्रत्येक जणांना आवडेल असे काही तरी आहे. जेवायला भरपूर options. स्वतः आरामात प्लान करता येते.
7 Jun 2019 - 5:05 pm | मानसी१
Family सोबत पहिली international trip असेल तर दुबई, Singapore किंवा Thailand करा. सरळसोट flights , visa ची.जास्त कटकट नाही आणि बर्यापैकी affordable. प्रत्येक जणांना आवडेल असे काही तरी आहे. जेवायला भरपूर options. स्वतः आरामात प्लान करता येते.
7 Jun 2019 - 5:38 pm | प्रिया१
शक्यतो थायलंडच करायचा विचार आहे ... पण अजून नक्की झाले नाही ... Thailand , फूकेत, पट्टाया, Singapore ... हे लिस्ट मध्ये वरती आहेत ... Thailand ला visa ची कटकट होणार नाही ... On arrival visa available आहे असे कळले... शिवाय affordable राहील ...
8 Jun 2019 - 1:52 pm | बबन ताम्बे
On arrival visa - सिजनला खूप लाईन असते. एक-दीड तास रांगेत थांबायला लागते. ज्यांची थांबायची तयारी नसते त्यांच्यासाठी माणशी 200 बाथ घेऊन व्हिसा देतात. ती लाईन वेगळी असते.
मी मागच्या डिसेंम्बर मध्ये थायलंडला गेलो होतो तेंव्हा भारतीयांना व्हिसा फ्री होता. ती सवलत मार्च 19 पर्यंत होती.
यावर्षीसाठी त्यांच्या ऑफिशियल वेब साईट वर चेक करणे.
7 Jun 2019 - 6:33 pm | सुनील
तुम्ही थेट टूरीस्ट कंपनी कुठली असे विचारले आहे म्हणजे टूरीस्ट कंपनीतर्फेच जायचे असे ठरवले आहे, असे दिसते. तुमच्या ९-१० जणांच्या ग्रूपमध्ये जेष्ठ नागरीक अथवा भारतीय जेवणच पाहिजे, असा आग्रह असणारे किती? असे असतील तर टूरीस्ट कंपनीने जाण्यावाचून पर्याय नाही. परंतु, असे नसेल तर स्वतः नियोजन करून जाणे केवळ स्वस्तच नव्हे तर मस्तदेखिल असते! अहो, प्रत्यक्ष टूर इतकीच मजा त्याच्या प्लॅनिंगमध्येदेखिल असते की!!
वाजवी दर हवे असतील तर किमान तीन महिने अगोदरच नियोजन करा.
सर्व प्रथम जाण्याचे ठिकाण, आपल्यकडे असणारे दिवस आणि अर्थातच बजेट ठरवून घ्या. एकदा ते नक्की झाले की विमानाची तिकिटे काढून घ्या. तीही रिफंडेबल पद्धतीची घ्या. नॉन-रिफंडेबलपेक्षा थोडी महाग पडतील पण नंतर काही कारणामुळे बेत बारगळाच तर, काही रिफंड मिळेल.
त्यानंतर राहण्याची व्यवस्था - हे दोन स्टेजमध्ये करायचे असते. सुरुवातीस booking.com वरून कुठल्यातरी हॉटेलमध्ये रूम बूक करा. यात फार विचार करू नका कारण हे बूकिंग फक्त विजा मिळवण्यापुरते असते. booking.com मध्ये सुरुवातील पैसे भरायची अट नसते. विजा मिळाल्यावर हे बूकिंग रद्द करा!
आता राहण्याची खरी व्यवस्था करायची आहे. माझ्याबाबतीत म्हणाल तर मी हॉटेलपेक्षा होम-स्टे किंवा Airbnb सारखे पर्याय निवडतो. यात स्थानिक लोकांशी संवाद होतो जो नक्कीच त्या ठिकाणची मजा दुणावतो.
(काही महिन्यांपूर्वी मिझोराममध्ये अश्याच एका मिझो कुटुंबाच्या होम-स्टेमध्ये काढले. त्या तिमजली घरातील सर्वात वरच्या मजल्यावरील दोन खोल्या त्याने पर्यटकांसाठी सजवल्या होत्या - गच्ची सहित. पारंपरिक मिझो खाना, काही अनवट ठिकाणे आणि अनेक बहुमोल सल्ले मिळाले. आता पुढील महिन्यात पॅरीसला जातो आहे तेव्हा Airbnb वरून एक अपार्टमेन्ट बूक केले आहे. त्याच्या मालकाशी मेलवरून संपर्क केला तेव्हा त्याने त्या अपार्टमेन्टलगतच युरोपातील सर्वात मोठे सायन्स म्युझियम असल्याचे कळवले. ते मी लगोलच माझ्या यादीत समविष्ट केले - जे आधी नव्हते. खेरीज, अस्सल फ्रेन्च पदार्थ खिलवणारी अनेक रेस्टॉरन्ट्स जवळपास असून, त्याचीही माहिती देण्याचे त्याने कबूल केले आहे!)
अर्थात, ९-१० जणांच्या ग्रूपमध्ये सर्वांनाच हा प्रकार मानवणारा असेल असे नव्हे. पण हा प्रकार हॉटेलपेक्षा स्वस्त पडतोच खेरीज, जर पाव, अंडी, बटर, चीज, फळे, दूध इत्यादी भरून ठेवलीत तर, सकाळचा भरपेट नाश्ता तर होतोच शिवाय, एखादे भक्कम सॅन्डविच पार्सल म्हणून नेले तर दुपारच्या जेवणाचीही सोय होते - पैसे आणि वेळ दोन्ही वाचतात. रात्री मात्र बाहेर, शक्यतो स्थानिक पदार्थ खाणे मला आवडते.
अमेरेकेत नाही पण युरोपात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम आहेच, शिवाय त्याचे काही दिवस मुदतीचे एकत्रीत असे पासदेखिल मिळतात - जसे लंडनमध्ये ओयस्टर किंवा पॅरीस पास इत्यादी - जे मेट्रो, बस, रेल्वे या सर्वांनाच चालतात. अमेरिकेत ग्रे-हाऊंड बसेस किंवा Amtrack च्या रेल्वे सर्वत्र नाहीत. त्यामुळे, कार भाड्याने घेणे हेच उत्तम.
तर अशी राहण्याची आणि वाहतुकीची व्यवस्था केलीत तर, टूर कंपनीच्या निम्म्या किमतीत सफर होते. तीही अगदी मनासारखी. हवी ती ठिकाणे, हवा तितका वेळ घेऊन पाहण्यासारखी!
10 Jun 2019 - 4:09 pm | चिनार
केसरी,वीणा वर्ल्डने कधीही फिरलो नाही. पण बऱ्याच लोकांचे अनुभव ऐकले आहेत.
बहुतांश अनुभव "खूपच आरामदायक, काहीच त्रास नाही", "फारच छान सर्व्हिस"," फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सोय केली", "आपल्याला काहीच करावे लागत नाही" वगैरे आहेत.
पण ट्रीपमध्ये काय पाहिलं किंवा किंवा काय दाखवलं ह्यावर कोणीही भरभरून बोलत नाही. सोय हा एकमेव क्रायटेरिया असेल आणि पैसे भरपूर असतील तर ह्या ट्रेव्हेल कंपन्या उत्तम आहेत ह्यात वादच नाही.
पण इतर प्रवासी लोकांना त्या सुटेबल नाहीतच.
बहुतांश वेळा त्या परवडणाऱ्या नसतात. थोडे कष्ट घ्यायची तयारी दाखवली तर तेवढ्या पैश्यात दोन ट्रिप्स होतील.
काश्मीरच्या सहा दिवसांच्या ट्रिपचा पर पर्सन चार्ज जर पन्नास हजार रुपये असेल (उदाहरण फक्त) तर दोघांचे
एक लाख रुपये द्यावे लागतात. ह्यातला राहण्याचा दर दिवशी तीन हजार रुपये पर रूम खर्च पकडू. म्हणजे सहा दिवसांचे अठरा हजार. पण आपल्याला छत्तीस हजार द्यावे लागतात. आणि रूम मिळते एकच. अर्थात नवरा बायको असतील तर एकच रूम लागेल. पण पैसे दुप्पट जातायेत.
असेच इतर खर्चाचे तपशील बघितले तर सोयीच्या नावाखाली आपला प्रचंड पैसे खर्च होतो.
10 Jun 2019 - 4:26 pm | माझीही शॅम्पेन
ह्या धाग्यावर वीणा आणि केसरी हे जवळपास सारखेच असल्यासाराख लिहिलं आहे ,
पण वीणा आणि केसरी ह्यांच्यात केसरी प्रचंड उजवा आहे
सर्व्हिस , हॉटेल दर्जा , बरोबरच स्टाफ जवळपास साऱ्याच गोष्टीत केसरी , वीणा पेक्षा खूप अंतराने पुढे आहे !!!
वीणा च्या अनेक हॉरर स्टोर्या ऐकल्या आहेत :)
10 Jun 2019 - 8:45 pm | सुबोध खरे
पर्यटन कंपन्या आपल्या कडून किती पैसे जास्त घेत आहेत (उदा. ७ दिवसाच्या सहलीसाठी त्यांचे एक लाख रुपये होत असतील आणि आपण स्वतः आरक्षण केल्याने जर ६०००० रुपयात होणार असेल) तर ४०००० रुपये अतिरिक्त होत आहेत.
आता आपला पगार ८०००० रुपये असेल तर हेच ४०००० रुपये मिळवण्यासाठी आपल्याला १५ दिवस मान मोडून( आणि मन मारून) काम करावे लागते
मग आपल्याला आरक्षण करण्यासाठी किती दिवसाचे कष्ट होतात आणि त्यासाठी किती पैसे आपण खर्च करायचे हा हिशेब करून ज्याचा त्याने करावा.
असेच एक उदाहरण-- माझ्या पुतणीचे लग्न पुण्यात होते. तेंव्हा माझ्या बायकोच्या मेकअप आणि हेअर स्टाईल साठी तेथील ब्युटी पार्लर वालीने सकाळी ७ वाजता घरी येण्यासाठी ६००० रुपये सांगितले होते. आम्ही विचार केला कि माझी बायको( एम बी बी एस आहे ), कुणा रुग्णाच्या घरी जाऊन त्याला दम्यावर इंजेक्शन देते तेंव्हा लोक ५०० रुपये देण्याला फार काचकूच करतात आणि इथे हि "१० वि पास" मुलगी घरी येण्याचा दर ६०००( रुपये सहा हजार फक्त) कोणत्या हिशेबाने लावते आहे.
यावर माझ्या बायकोने स्वतः मेक अप केला आणि माझ्या मुलीने तिला काही तरी हेअर स्टाईल( त्याला काय म्हणता माहित नाही) करून दिली. त्यात कोणताही भडक मेक अप ना होता बायको छान दिसत होती. मी हसत ६ हजार रुपये बायकोला खरेदी साठी देईन.
किंग ऑफ गुड टाइम्स आपल्याला किती थुका लावत आहेत म्हणजे आपल्या आनंदात थोडासा भर घालण्यासाठी आपण किती पैसे खर्च करत आहोत/उधळतो आहोत याचा विचार बहुतेक लोक करत नाहीत हि दुर्दैवी गोष्ट आहे.
11 Jun 2019 - 4:46 pm | समीरसूर
बरोबर आहे पण माझ्यामते केसरी/वीणाची सहल आणि आपण स्वतः आखलेली सहल या दोहोंमध्ये खर्चाच्या दृष्टीने फारसा फरक पडत नसावा. मी ६ दिवस केरळला गेलो होतो त्याचा माणशी खर्च साधारण ४०,००० (विमानप्रवासासह) पडला. केसरीची अशी सहल साधारणपणे तेवढ्याच (५००० अधिक/उणे) पडली असती. केसरीमध्ये मला अलेप्पी + कन्याकुमारी अशी सहल मिळाली नाही. बहुतेक कुठेच अशी सहल मिळाली नाही म्हणून मी स्वतंत्र एजंटकडून सहल आखून घेतली. स्वतः हॉटेल्स आणि वाहन बुक करून गेलो असतो तर कदाचित अजून स्वस्त पडली असती. केसरीचा फायदा हा आहे की हॉटेल्स सहसा चांगली मिळतात. कधी कधी चांगली रिसॉर्ट्सदेखील मिळतात. केरळमध्ये आम्हाला हॉटेल्स यथातथाच मिळाली. जेवण बर्याच ठिकाणी काँप्रोमाईज करावे लागले. शिवाय बल्क बुकिंगमध्ये केसरी/वीणा या कंपन्यांना ज्या दरात हॉटेल्स मिळतात त्या दरात आपल्याला मिळत नाहीत. केसरी/वीणासारखीच सोय-सुविधा आपण स्वतः बुक करायला गेल्यास किंमतीमध्ये बहुधा फार फरक पडणार नाही; किंबहुना आपल्याला चार पैसे जास्तच लागतील. ज्यांना आरामदायी, विनाकटकट सहल करायची आहे त्यांच्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, लहान मुले असलेल्या कुटुंबांसाठी, हनिमूनला जाणार्या जोडप्यांसाठी केसरी/वीणा/मँगोसारख्या कंपन्यांतर्फे सहलीला जाणे हा चांगला पर्याय असू शकतो. माझ्या आई-वडिलांनी केसरीसोबत केरळ, काश्मीर, हिमाचल प्रदेश, युरोप, सिंगापूर, हाँग काँग, मकाऊ वगैरे सहली केल्या. त्यांचा अनुभव खूप चांगला होता. वयानुसार ज्या समस्या होत्या त्यांचा थोडा प्रॉब्लेम झाला खरा पण मोठा गृप असल्याने सगळ्यांनी, टूर मॅनेजरने सांभाळून घेतले. वैयक्तिक सहलीत हे थोडे अवघड होते. आणि ज्येष्ठ नागरिक एकटेच वैयक्तिक सहलींवर जाऊ शकतदेखील नाही.
11 Jun 2019 - 5:08 pm | समीरसूर
प्रत्येकाच्या सहलीचा आनंद कसा घ्यावा याच्या वेगळ्या कल्पना असतात. अगदीच खाणे-पिणे, शॉपिंग यावरच सहल दवडणे मूर्खपणाचे असले तरी काही किमान सुविधा असायलाच पाहिजे असा आग्रह असणारे बरेच पर्यटक असतात. त्यासाठी त्यांची थोडे जास्त पैसे खर्च करण्याची तयारी असते. ते त्यांना परवडतदेखील असते. केसरीटाईप सहलींना जाणारे स्वतः बुकिंग करून सहलीला जाणार्यांना वेड्यात काढतात आणि स्वतः सगळं प्लॅनिंग करून सहलीला जाणारे केसरीटाईप पर्यटकांना आळशी, मूर्ख पर्यटक समजतात. हे असे चालायचेच. पसंद अपनी अपनी.... :-)
मी वेगळे अनुभव मिळणार असतील तर सहसा पैशांचा फार विचार करत नाही (आवाक्यात असेल तर). केरळमध्ये पुवर आयलंडची बोट क्रुझ माझ्या प्लॅनमध्ये नव्हती. सहल संपत आली होती आणि माझ्याकडे फारशी रोख रक्कम नव्हती. माणशी तीन हजाराची ती सुंदर क्रुझ न करणे माझ्या जीवावर आले होते. पुण्यात आल्यानंतर पुन्हा हिंजवडीच्या चक्रात अडकणे असतेच. रोज रोज थोडेच मी रिव्हर क्रुझ करणार होतो. आम्ही दोघांनी ती क्रुझ केली. खूप मजा आली. मुलाने खूप एंजॉय केले. पैसे वसूल झाले. मी पुण्यात उतरलो तेव्हा माझ्याकडे ५०० रुपये शिल्लक होते.
15 Jun 2019 - 8:38 pm | टवाळ कार्टा
मी स्वतः माझ्या नातेवाइकांसाठी २ आठवड्यांची युरोप टुर प्लान करुन देत आहे, काही मदत लागल्यास बिंधास्त व्यनी करा
थोडा लाल डबा कम झैरात
या वर्षी माझ्या मैत्रीणींना २ आठवड्यांची बजेट युरोप ट्रिप प्लान करुन दिलेली....त्यांची भारताबाहेरची पहिलीच ट्रिप होती...मस्त ट्रिप झाली
इथल्या १-२ मिपाकरांना आठवडाभराची थायलंडची ट्रिप प्लान करुन दिलेली
थायलंड - ८ दिवस ट्रिप प्लान (स्वतःच्या फॅमिलीबरोबर जाणार्यांसाठी) http://misalpav.com/node/42369
स्वतःची कस्टमायझेशन करुन ट्रिप प्लान करुन देणारी टुर कंपनी असावी अशी इच्छा आहे :)
17 Jun 2019 - 3:07 am | चामुंडराय
हि हातोटी असेल तर ...
मागे हटू नका टका
हा बिझिनेसच टाका !!
16 Jun 2019 - 2:47 pm | सुजल
मी स्वतः केसरी किव्वा वीणा च्या ग्रुप टूर्स प्रिफर करते . दोन्ही कंपन्यांमध्ये डाव -उजवं काही तरी आहेच आणि ते असणारच आपण आपल्या चॉईस नुसार दोन्ही कंपन्यांमधून निवडावी
काही वेळा मी किव्वा आजकाल बरेच वेळा केसरी ला प्रेफरन्स देते याच अर्थ असा नाही कि वीणा वाईट आहे पण तुलनेने बऱ्यापैकी उजवा आहे तो केसरीच . वीणाच्या काही टर्म्स आणि कंडिशन्स पटत नाहीत . खर्च दाखवण्याची पद्धत पण वेगवेगळी आहे. दोन्ही मधला काही ठळक फरक लिहिते कारण मी दोन्ही कंपन्यांचा अनुभव घेतला आहे
१ ) केसरीच्या टूर्स प्रथम दर्शनी महाग वाटतात पण त्या तशा नसतात हे बारकाईने बघितलं तर लक्षात येत . वीणा व्हिसा चा खर्च समाविष्ट न करून सहल खर्च दाखवते . तिथे केसरी मध्ये मात्र व्हिसा चार्जेस इन्क्लुड करून सहल खर्च दाखवते म्हणून त्यांच्या टूर ५-१० हजार ने महाग वाटतात पण प्रत्यक्षात तस नसत . वीणा ची टूर खर्च कमी दाखवण्याची हि चलाखी आहे . त्याला लोक भुलतात
२ ) वीणा च्या टूर मध्ये ओरिएंटल टूर्स खूप असतात. म्हणजे बाहेरूनच बस मधून ती ती ठिकाण दाखवली जातात . फार फार तर काही ठिकाणी फोटो काढायला ५-१० मिनिटांचा स्टॉप घेतात . तिथे केसरी मध्ये मात्र बरिचशी ठिकाण हि आतून दाखवली जातात . त्यामुळे त्यांची एंट्री फी चा खर्च टूर मध्ये समाविष्ट असतो पर्यायाने टूर खर्च वाढतो . वीणा मध्ये डेस्टिनेशन्स पण कमी दाखवल्या जातात केसरीच्या तुलनेने
३ ) टूर कॅन्सल केली तर वीणा मध्ये पैसे परत मिळत नाहीत त्याच्या जागी त्या आणि तेवढ्याच खर्चात ( थोडं फार इकडे तिकडे ) तुम्हाला दुसरी टूर घ्यावी लागते . केसरी मध्ये मात्र काही दिवसांच्या आधी टूर तुम्ही कॅन्सल केलीत तर सगळे पैसे परत मिळतात . असं संगितलं गेलं . अनुभव नाही कारण मी कॅन्सल केली नाहीये पण केसरीच्या टूर मध्ये तीन बहिणींनी हा विणा चा अनुभव सांगितला आणि आता त्या वीणा बरोबर कधीच फिरत नाहीत असं सांगितलं . कारण त्यांनी फिक्स डिपॉझिट मोडून वीणामध्ये टूर खर्च भरला पण नंतर आजारपणाच्या कारणाने टूर कॅन्सल केली तर त्यांना दुसरी टूर घ्यायला सांगितली ती पण एक वर्षाच्या आत . पैसे परत नाहीत . दुसरी टूर त्यांना तारखांच्या हिशोबाने जमत नव्हती त्यामुळे त्यांचे पैसे वाया गेले असं त्यांचं म्हणणं
४ ) एकदा वीणा च्या टूर वर मी गेले असताना क्रूझ वर केसरीचा ग्रुप पण होता . त्यांची छान खाण्यापिण्याची बडदास्त ठेवलेली दिसली आम्हाला मात्र वीणाने एक १०० रुपयांचा चहा पण दिला नाही . तुम्ही स्वतःच्या खर्चाने प्या असं सांगितल गेलं .केसरीची खाण्यापिण्याची बडदास्त टूर खर्चात समाविष्ट होती
५ ) वीणा मध्ये काही वेळा दुपारच्या चहा स्किप करतात .माझ्या सिंगापूरच्या टूरला मी हा अनुभव घेतला . दुपारचा चहाच देत नव्हते . किती सांगितलं तरी . केसरी मध्ये मात्र दोन वेळच जेवण / नाष्टा / दुपारचा चहा सगळं सगळं दिल जात
६ ) वीणाने आता बॅग्स देणं बंद केलं आहे . टूर खर्चात कपात . केसरी अजूनही बॅग्स देत आहे म्हणून त्यांच्या टूर महाग . ब्यागेचा इश्यू काही एवढा मोठा नाहीये पण त्याने टूर खर्चात थोडासा फरक पडतो . त्यातून काही जणांना वीणामध्ये बॅग मिळत नाही याचंही दुःख झालेलं मी बघितल आहे
वीणाच्या बाबतीत दोन वेळा मी स्ट्रॉंग कंप्लेंट्स नोंदवलेल्या आहेत . अतिशय वाईट आणि तापदायक अनुभव .
बाकी समीरसूर म्हणतात त्याप्रमाणे " मला स्वत:ला व्हिसा, हॉटेल, टॅक्सी, जेवण, विमानप्रवास, वगैरे सगळे सतत लक्ष ठेवून अरेंज करण्याचा खूप कंटाळा येतो. त्यातच वेळ आणि ऊर्जा जाते. " याच्याशी मात्र १०० टक्के सहमत . त्यामुळे मी पण केसरी / वीणा ग्रुप टूर्स ना प्राधान्य देते
16 Jun 2019 - 3:58 pm | सुजल
त्यातून काही जणांना तेच तेच घरातले लोक घरी पण आणि बाहेर पण सहन करायचे नसतात. तीच तीच तोंड . तेच तेच स्वभाव . तीच तिच घरची भांडण . जी घरी भांडायची तिच बाहेर जाऊन भांडायची / ज्या घरी शिव्या खायच्या त्या टूर वर पण खायच्या असं नको वाटत. त्या पेक्षा जरा अनोळखी लोकांबरोबर गेलेल कधीही चांगले म्हणून अशा ग्रुप टूर्स :)
17 Jun 2019 - 9:38 am | महेश जोगलेकर
प्रिया
मी आपल्याला वरील पैकी अमेरिका सोडल्यास इतर देशांची माहिती देऊ शकतो
परंतु त्याआधी १-२ नम्र सूचना
आपण दिलेल्या देश हे फार वेगळ्या पद्धतीचे आहेत त्यामुळे सल्ला देणे सोपे होण्यासाठी तुमचाच या सहली मागचा उद्देह्स काय ते सांगितलेत तर बरे पडेल
- उदाहरण
काय बघणे: मानव निर्मित? इतिहास वस्तू? निसर्ग?
काय खाणे? नेहमीचे कि जरा वेगळे?
इतर धडपड ( ४ व्हील ड्राईव्ह) ट्रेकिंग इत्यादी
कला ?
- एकूण वेळ
- वयोगट ( कुटुंब?)
- कोणता काळ? ( डिसेंबर मध्ये उत्तर अम्रेईकेत थंडी वेगळे आणि ऑस्ट्रेलियात उन्हाळा सिंगापोरे ला १२ महिने सारखेच
- अगोदर काय बघितले आहे?
सर्वसाधार गट असे करू शकता
- निसर्ग+ मानवनिर्मित, + पाहिलं विकसतीत देशातील प्रवास = उत्तर अमेरिका
निसर्ग + पाहिलं विकसतीत देशातील प्रवास = ऑस्ट्रेलिया + न्यू झीलंड
निसर्ग + ऐतिहासिक वस्तू वेगळी संस्कृती / खाणे = थायलंड + बाली
खाणे / जर फार धाडसी नसाल तर आणि मीठही सहल असले तर भारतीय मराठी विना / केसरी वगैरे उत्तम
वेळ:(त्याप्रमाणे खर्च )
३+ आठवडे उत्तर अमेरिका / ऑस्ट्रेलिया + न्यू झीलंड
१.५ आठवडे = सिंगापोरे इत्यादी
धडपड:
उत्तर अमेरिका/ ऑस्ट्रेलिया + न्यू झीलंड
17 Jun 2019 - 12:00 pm | महेश जोगलेकर
प्रिया , आपला मूळ प्रश्न परत वाचला आणि माझी चूक लक्षात आली कि आपण " कोणती टूर कंपनी " याबद्दल विचारले आणि मी लिहून राहिलो काय तर कोणते देश आणि काय या बद्दल!
तर परत तीच चूक करीत आहे पण कदाचित आपल्याला आणि इतरांना थोडा फायदा होईल
- आटोक्याची कौटिम्बिक सुटसुटीत टूर म्हणाल तर मी सिंगापोरे + बाली सुचवेन
तसे सिंगापोरे बरोबर मलेशिवाय पण करतात पण नुसते गेंटिंग हीघलांड चाय बाजारू गावात जाण्यापेक्षा बाली मध्ये जास्त वेळ घालवलेला बारा , आणि सिंगापोरे बघितल्यावर कवळ लॅम्पर बघण्यात काही विषे नाही म्हणून
यःची करणे अशी
व्हिसा सोप्पे
हवमान १२ महिने सारखे २७-३०
जवळ
आधुनिक सिंगापोर + वेगळी संस्कृती अजूनही शिल्ल्लक असणारे बाली बेट असे दुहेरी
काही गोष्टी सुचवीत आहे या कदाचित टूर कंपन्यांचं "साच्यातलंय" टूर चा भाग असण्याची शक्यता कमी बघ आवड असलॆ आणि वेळ असाल तर विचारात घाई
सिंगापोरे: पाहणे:
सेंट जॉन आणि कुसू बेट (वेगळं व्हिसा अलगत नाही : अर्धा दिवस पुरतो साधारण बोट भाडे $१८
रात्री ८ किंवा ८.३० चाय सुमारास, मरिना बे सँड्स येथील लाईट शो
MacRitchie Reservoir पार्क
खाणे: खादाड पांढरी
नेहमीचं टुरिस्ट ठिकाणी ना जात स्थानिक छोट्या HAwKAR सेन्टर ला जावे
हैनान चिकन राइस
पोपेय नावाचे पात्तळ स्प्रिंग रोल ( ना तळलेले आणि शाकाहारी)
मलेशिअन पद्धतीचे रोटी मर्तबा ( रोटी चनय नाही)
मारशे नावाचे स्विस पद्धतीचे जेवणगृह
बाली:
पाहणे: उलुवातु मंदिरातील संध्यकाळचा रामायण नृत्य सोहळा
उबूड गावात राहणे १-२ दिवस ( कुटा भाग टाळा फार बाजारू)
अंग रगडून घेणे ( दोन्ही पुरुष आणि स्त्रियांसाठी आणि सभ्य )
खाणे:
नासी लेमक : नारळ दुधातील भात + कोरडे चिकन + इंडोनेशियन पद्धतीचे लोणचे + तळलेले दाणे + बारीक तळलेले खारट मासे
( खरं सान्गतो पुण्याच्या जुन्या स्वाद भेळेची आठवण झाली वरून चुरलेला खमंग पोह्याचा पापड + खारे दाणे घालायचे ते मालक)
विविध फळांचे रस ( अवाकाडो)
भाजलेले साते कबाब ( तळलेलं नाही)
लेमन ग्रास चा स्वाद असलेला कोणताही पदार्थ
असो सध्या एवढेच
17 Jun 2019 - 12:04 pm | महेश जोगलेकर
अरे बापरे किती मुद्रा राक्षस विनोद केले मी ! क्षमा करा मंडळी पण देवनागरीत कसे लिहावे , मी इसकाळ वर लिहितो आणि त्याचे कॉपी पेस्ट करतो
दुसरे असे कि एकदा प्रकाशित केल्यावर त्यात दुरुस्ती कशी करावयाची?
17 Jun 2019 - 1:30 pm | चौथा कोनाडा
१. इ-सकाळ वर पण असेच लिहिता का ? चालून जाते का ?
२. माझ्या अनुभवानुसार एकदा प्रकाशित केल्यावर त्यात सुधारणा धागाकर्त्याला करता येत नाही. त्याची विनंती संपादक मंडळाला करावी लागते. (बहुतेक वेळा त्यांना सुधारणा करायला वेळ नसतो) जाणकार मिपाकर आणखी सांगतीलच.
३. देवनागरीत कसे लिहावे : सध्या मिपावर मराठी टंकन करण्यास अडचणी येत आहेत.
https://www.google.com/intl/mr/inputtools/try/
ही गुगल लिंक वापरा, आधी टंकन करा. योग्य शब्द आणि शुद्धलेखनाची खात्री करा मगच मिपावर पेस्ट करा.
हा सोपा प्रकार आहे.
बाकी, प्रतिसाद छान माहितीपूर्ण दिलेत +१
17 Jun 2019 - 2:10 pm | Nitin Palkar
तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे.स्वतः व्यवस्थित कार्यक्रम आखून सहल आयोजकांशिवाय जाऊ शकाल. सुमारे दीड वर्षांपूर्वी असेच स्वनियोजन करून एक आठवड्याची दुबई सहल आम्ही कुटुंबीय करून आलो. आंतर्जालाद्वारे विमानाची तिकिटे, व्हिसा, हॉटेल आरक्षण आदी सर्व कामे घरबसल्या होऊ शकतात. स्वनियोजित सहल किफायतशीर नक्की पडते.
17 Jun 2019 - 2:35 pm | महेश जोगलेकर
सिंगापोर मध्ये मोठा खेकडा ( मिरची वाला ) प्रसिद्ध आहे ..लाल तिखट गोड असा घट्ट रस्सा ( पिठल्यासारखा) परातीत असतो आणि मध्यभागी मोठा उकडलेले आणि बहुतेक थोडासा तळलेलं खेकडा ) सोबत पांढऱ्या लुसलुशीत पावाचे तुकडे . पण खरं सांगू यातला तो रस्सा म्हजे फारच गुळमात केचप सारखा लागतो त्यापेक्षा काळ्या मिरी तीl खेकडा जास्त चांगला लागतो
- मश्रुम चे विविध प्रकार
- मलेशिअन रेंदान्ग ( खोबरे + कँडल नट व इतर मसाले ) यातील सुके असे कोंबडीचे
गोड: आइस कचान्ग
पेय: सावर ( तुरट + आंबट) चेरी लिंबू पाणी
इच्छा असले आणि खात असाल तर तर बालीतील खासियत म्हणजे बेबेक नावाचाच डुकरांचा पदार्थ ( माफ करा सरळ शब्द वापरला)
17 Jun 2019 - 6:25 pm | टवाळ कार्टा
त्या सिंगापोरी खेकड्याच्या रश्श्याच्या आठवणीने लाळ टपकायला लागली :)
17 Jun 2019 - 2:53 pm | चौकटराजा
तुमचा मोठा ग्रुप असेल व डोक्याला काही ताप नाही असा प्लान हवा असेल तर यात्रा कंपनीच चान्गली. मी भारतात सुमारे १८ ट्रीप्स सहकुटुंब केल्या आहेत . चार जणांचा ग्रुप सबब मतभेद नाहीत .कोणत्याही वहानाने प्रवास करून पुढे जायची तयारी ठेवली की सगळे जमते. मी २०१७ मध्ये युरोपातील ३ देश पाहिले यात अशी काही स्थळे होती जी वीणा केसरी दाखवत नाही. उदा. शामोनी, मौंतरू ,मिलान जिनेव्हा ई. बर्निना पास ( तिरानो ते लुसर्न ) कोणतीही यात्रा कंपनी दाखवीत नाही .भारतातील १८ पैकी एकाही ट्रीप मध्ये मी वीणा किंवा तत्सम ट्रीप सह गेलो नाही. पण किरकोळ मनस्ताप सोडला तर काही फारसे बिघडले नाही .माझा असा अनुभव आहे की वीणाच्या एका तिकिटात मी सारे कुटुंब भारतात फिरवू शकलेलो आहे. १४ रात्री युरोपचा खर्च मला फक्त १ लाख ५ हजार प्रत्येकी इतका आला. ( व्हिसा , विमा सह ). मी स्थळ दर्शनात एक तडजोड मात्र करतो ती अशी की समजा नॉट्रे देम हे चर्च फुकट आहे तर चर्च पाहायचा आनंद तिथे मिळवायचा . त्याच्याच शेजारी एक अप्रतिमी चर्च आहे पण ते फुकट नाही सबब टाटा .केसरी तुम्हाला युंगफ्राऊ ला बर्फ पाहण्यासाठी नेईल . पण तुम्ही जर स्वीस पास काढलात तर माउंट रिगी हे तितकेच बर्फाळ ठिकाण मोफत .स्वीस सारखा महागडा देश देखील डोके लढविले तर कमी खर्चात पहाता येतो. खाण्याचा हव्यास न करणे हे स्वीस मध्ये जमले पाहिजे. तिथे राईस प्लेट २५०० रु ला आहे .
17 Jun 2019 - 2:58 pm | महेश जोगलेकर
अरे अजून एक आठवले, महत्वाचे, खास करून New Zealand आणि ऑस्ट्रेलियातील काही भाग
यात अर्थात जोखीम हि आहे पण मजा येऊ शकते खास करून कुटुंब आहे म्हणून ते म्हणजे
स्वतः गाडी/ भाड्याने घेऊन फिरणे, राहण्यासाठी गावोगावी मोटेल ,
- भारतासारखेच उजव्या बाजूचे चालक
- भारतीय ड्रायविंग परवाना चालतो ( स्मार्ट चिप )
- दिवसाचा kharch ८ जण व्हॅन = अंदाजे ७०- १०० औस्ट्रेलिअन डॉलर
1 Jul 2019 - 5:40 pm | हर्मायनी
परवाच ५ दिवसांची स्वतः आखलेली बाली ट्रिप करून आलेय. त्याबद्दल काही माहिती हवी असल्यास व्यनि करू शकता.
1 Jul 2019 - 6:02 pm | श्वेता२४
मस्त बाली भटकंती वृत्तांत लिहा की. सगळ्यांनाच फायदा होईल.
1 Jul 2019 - 9:25 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
मुख्य म्हणजे भरपूर चित्रे टाकून बालीच्या सौंदर्याला न्याय द्या. :) लेखाच्या प्रतिक्षेत आहे.
4 Jul 2019 - 1:50 pm | हर्मायनी
तोच विचार आहे..
2 Jul 2019 - 5:39 am | कंजूस
कुटुंबातल्या कुणास अओफिस कामानिमित्ताने परदेशी फिरण्याचा अनुभव असला तरच त्यास "स्वत: आखलेलली ट्रिपचा" उपयोग करता येईल. कारण वाहनव्यवस्था, हॅाटेल्सचे नियम ,चेकइन, विमान प्रवास याची थोडी ओळख असते.
15 Sep 2019 - 10:50 am | भटक्या फोटोग्राफर
मला सम्पर्क करा मी स्वत: फिरतोच पण माझा व्यवसाय पण हाच आहे मला सम्पर्क करा विहार होलिडेज नावानी आहे