मिपा वर्धनासाठी किंवा प्रसारासाठी कुणी वैयक्तिक प्रयत्न करत का ?

खिलजि's picture
खिलजि in काथ्याकूट
26 Nov 2018 - 3:49 pm
गाभा: 

अगदी प्रांजळपणे सांगायचे झाले तर आजपर्यंत बर्याच जणांना मी मिसळ पाव बद्दल सांगितलं आहे .. तिथे कसे जावे नि सदस्यत्व कसे घायचे .. किमान तीस ते चाळीस जण असतील ज्यांना मी मिपा बद्दल सांगितले आहे .. नाही म्हंटले तरी मी माझ्या आयुष्यातली पाचशे मिनिटे या मंचासाठी खर्च केली आहेत.. आणि अजूनही पुढे सत्कारणी लागतील .. मी अजून एक काम करतो ते म्हणजे काही आवडते लेख मी साठवून माझ्या मित्रपरिवारामध्ये व्यनि करतो .. जेणेकरून निदान वाचनाची आणि त्यानुषंगाने या संस्थळाबद्दल तरी ओढ निर्माण व्हावी हाच एकमेव हेतू असतो ..
तर मंडळी ,, या जागृत गडाच्या आजीमाजी शिलेदारांनी, मावळ्यांनी नि किल्लेदारांनी आतापर्यंत मिपावर्धनासाठी किंवा प्रसारासाठी काय काय प्रयत्न केले ते जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत .. जरा जाणकारांनी तसदी घ्यावी नि शक्य झाल्यास प्रकाश टाकावा हि नम्र विनंती ...

प्रतिक्रिया

माहितगार's picture

26 Nov 2018 - 5:47 pm | माहितगार

मी अशात विकिपीडिया कार्यशाळा घेतल्या नाही पण मागच्या काही महविद्यालयीन कार्यशाळातून विद्यार्थ्यांना आवर्जून मिपा आणि मायबोलीचा परिचय करून दिला होता. मिपाला नेमकी तेव्हा काही तांत्रिक समस्या असावी कि विद्यार्थ्यांना सदस्यत्व घेता आले नाही, मोकळेपणाने सांगायचे झाले तर विद्यार्थ्यांना मायबोली हा शब्द अधिक जवळचा वाटल्यामुळे मायबोलीचे सदस्यत्व घेण्यात अधिक उत्सुकता दाखवली गेली पण मायबोली वरही सदस्यत्व कसे घेतात याची मलाही कल्पना नव्हती, आणि विद्यार्थ्यांचा मायबोली सदस्यत्व घेण्याचा प्रयत्न फसला होता असे आठवते . या दोन्ही वेबसाईटनी सद्स्यत्व घेणे आणि नेहमीच्या अडचणींसंदर्भात व्हिडिओ युट्यूब दुवे उपलब्ध करावयास हवेत असे वाटते.

मागाकाका आपला प्रयत्न ऐकून खूप आनंद झाला .. पण मला तरी वाटते त्याला फसलेला नाही म्हणता येणार . कारण निदान आपण लक्षात ठेवून आठवणीने कार्यशाळेत या संस्थळांसाठी काही तरी योगदान दिले .. हेही नसे थोडके .. मला आतापर्यंत दुर्दैवाने जे पण भेटले ते वाचनाबद्दल अनासक्त असे होते . कारण एव्हढे प्रयत्न करून देखील मला आठवतंय फक्त दोन मित्रांनीच मिसळपाव बद्दल आपुलकीने विचारणा केलेली होती.. अर्थात सध्या अजून एक मित्र आवर्जून मिसळपाव वाचतोय पण तेही सदस्यत्व ना घेता .. तर हि झाली माझी जमापुंजी . हि अशीच उत्तरोत्तर वाढत जाईल हीच श्रीचरणी प्रार्थना .

माननीय संपादकांस विनंती विशेष की,
वरील प्रतिसादातील केअशु/उपयोजक यांचे खरे नाव व मोबाईल नं हे त्यांच्या पुर्व परवानगी शिवाय मी येथे टाकले, परंतु काल त्यानी मजजवळ याबद्द्ल हरकत दर्शवली. तरी संपादक मंडळास विनंती कि त्यानी सदर प्रतिसाद संपादीत करुन त्यांचे नाव व नंबर काढून टाकावे किंवा प्रतिसाद पुर्ण अप्रकाशित करावा. अन त्यांना झालेल्या किंवा होऊ घातलेल्या मनस्तापाबद्द्ल मी बिनशर्त माफी मागतो.

mayu4u's picture

24 Dec 2018 - 6:07 pm | mayu4u

केअशु/उपयोजक यांचे खरे नाव व मोबाईल नं

ही माहिती यच्चयावत मिपाकरांकडे त्यांच्या खंडीभर कायप्पा ग्रूपातून पोचली असेल. त्यांचा खरा फोटो, खरं वय, कायप्पा वर खंडीभर ग्रुप चालवण्याखेरीज पोटापाण्याचा व्यवसाय अशी काही माहिती असेल तर सांगा बुवा. निदान व्य नि करा.

श्री's picture

24 Dec 2018 - 6:46 pm | श्री

झाकली मूठ ....

उपयोजक's picture

26 May 2019 - 10:23 am | उपयोजक

विचारला तुमच्या पोटापाण्याचा व्यवसाय? शिवाय तुम्हीही अशाच वाटसप ग्रुपात पडीक असताच की.तुम्हाला काय म्हणावं?

मी चाळीसपन्नास नाही पण दहाएक जणांना मिपाधरून मराठी संस्थळाची महती पटवली. म्हणजे काय असं काही असतं हे माहीत करून देणे हे काम केलं. आग्रहवगैरे नाही केला.

पण
पण
पण
पण

१) वाटसप आणि फेसबुकावर ज्या शाबासक्या मिळतात तेवढ्याच पाहतापाहता त्यांचा वेळ संपतो.
२) बाकी मिपावर्धन कठीण आहे एवढं बोलून खाली बसतो खिलजि, नाखुगुरुजी.

प्रकाश घाटपांडे's picture

27 Nov 2018 - 11:04 am | प्रकाश घाटपांडे

सकस लिहा व सोशल मिडियावर दुवे द्या मिपाचा प्रसार आपोआप होईल.

टर्मीनेटर's picture

27 Nov 2018 - 11:31 am | टर्मीनेटर

+१

एक छायाचित्रकार's picture

27 Nov 2018 - 12:10 pm | एक छायाचित्रकार

येथे मराठी टाइप करणे जरा अवघड आहे. ते सोपे केले तर बरेच लोक आप आपले अनुभव अणि लिखाण येथे अपलोड करतील असे वाटते. जसे गुगल इनपुट कि॑वा आणखी काही. ज्यामुळे मिपाला लोक जास्त प्रतीसाद देतील.
तसेच फोटो अपलोड सुद्धा सोपे झाले पाहिजे. मला जर फक्त मिपावरच फोटो टाकायचे असतील आणि दुसरीकडे फोटो नसतील तर लि॑क कोठुन देणार. कापी पेस्टची सोय हवी.
मला तरी वाट्ते यामुळे मिपा वापरणार्या लोका॑ची स॑ख्या बरीच वाढेल.

एक छायाचित्रकार यांच्या मताशी मी बऱ्याच अंशी सहमत आहे .. यावर काही सोप्या क्लुप्त्या असतील तर बरे होईल ..

खिलजि's picture

27 Nov 2018 - 2:59 pm | खिलजि

@ कंकाका " बाकी मिपावर्धन कठीण आहे एवढं बोलून खाली बसतो खिलजि, नाखुगुरुजी." या वाक्याशी मी असहमत आहे पण आपण जो प्रयत्न केला तो नक्कीच स्तुत्य आहे .. त्याबद्दल धन्यवाद ..

मुळात हा धागा मी काढला त्याच्या मागे निव्वळ मिपाप्रेम आहे .. एक कुठेतरी जवळची जागा माणसाला आयुष्यात हवी असते मग ती कुठलीही असो , मित्रांनी फुललेला कट्टा , किंवा एखादे आवडते ठिकाण जिथे आपल्याला एक शांती मिळते , एखादा घरातला कोपरा , कुणाला बाथरूम मध्ये डुंबायला आवडते तर कुणाला अजून काही .. तसाच काहीस माझं मिपाबाबतीत आहे .. मला मिपावर दिवसातून एकदातरी चक्कर करावीशी वाटते .. सलग सुट्ट्या आल्या कि मी बेचैन होतो .. कधी एकदा कामावर हजार होतो अशी उत्सुकता लागून राहिलेली असते .. कारण मी वापरात असलेला साधा फोन .. दीडेक वर्षांपासून मी साधा फोन वापरायला चालू केला .. आता सलग सुट्ट्या आल्या कि मिपाच्या आठवणीने जीव बेचैन होतो .. लॅपटॉप पण मी इथेच केबिनमध्ये सोडून जात असल्याने घरी निव्वळ इंटरनेटमुक्त जीवन जगतो पण कुठेतरी मिपाला मिस करत असतो .. हा मिपाचा मोठेपणा आहे .. मला मान्य आहे कि इतरही संस्थळे आहेत आंजावर जी चांगली असतीलही पण जे मला मिपाकडून मिळाले त्याची तोड नाही .. मी मिपाचा शतशः ऋणी आहे आणि सदैव राहीन ..

उपयोजक's picture

27 Nov 2018 - 3:08 pm | उपयोजक

मिपाप्रसार का करायचा? कशासाठी?

वाचनाची आणि त्यानुषंगाने या संस्थळाबद्दल तरी ओढ निर्माण व्हावी हाच एकमेव हेतू असं म्हटलंय पण वाचक संख्या वाढली तर त्याचा मिपाला काय फायदा? शिवाय वाचन करायचं असेल तर आधी लिहिणार्‍यांची संख्या पण वाढली पाहिजे ना? की जे आजपर्यंत लिहित आले त्यांनीच कायम लिहायचं? मिपाची एकूण सदस्यसंख्या समजा ५ हजाराच्या आसपास असेल तर यातले नेहमी लिहिणारे,प्रतिसाद देणारे किमान ३०० जणही नसावेत.तीच तीच नावं पुन्हा पुन्हा येतात.अर्थात त्यांनी लिहू नये असा याचा अर्थ नाही.तर उरलेल्या ४७०० लोकांनीही लिहायला हवंय.लिहिण्यासारखं,शेअर करण्यासारखं या ४७०० लोकांकडे काहीच नसेल का? की हे लोक नेहमी खुर्च्या टाकून फक्त वाचतच रहाणार?

उपयोजक's picture

27 Nov 2018 - 3:11 pm | उपयोजक

मी थोडसं उलट विचारतो.हा हलवून खुंटा बळकट करण्याचा प्रयत्न समजा.गैरसमज होऊ नयेत.

मिपावर सांप्रतकाळी बर्‍याचदा लिहिणारे,वाचावं असं लिहिणारे,प्रतिसाद देणारे मिपाकर म्हणजे उदा. माहितगार,धागाकर्ते खिलजि,अभ्या...,डॉ.सुहास म्हात्रे,कुमार १,सुधीर कांदळकर,मुवि,डॉ.सुबोध खरे,टर्मीनेटर असे अजून बरेच चांगले लेखक.

यांनाच काही प्रश्न:
का लिहिता तुम्ही लोक? तुमचा रोजचा व्याप सांभाळून काही वेळ शिल्लक राहतो म्हणून लिहिता का? समजा उद्या खुप बिझी झालात तरीही लिहाल का? की इथे पूर्वी दर्जेदार लिहिणारे पण गेल्या काही वर्षात पांगलेले बरेच मिपाकर आहेत तसं काही होईल?

लिहिल्याबद्दल मिपा काही पैसे देत नाही.म्हणजे आर्थिक कारणही नाही.तरीही का लिहिता?

मिपावर लिहिल्यामुळे तुमचा कोणता फायदा होतो? मिपावर लिहायचं थांबवलंत तर तुमचं वैयक्तिक असं कोणतं नुकसान होईल?

कुमार१'s picture

28 Nov 2018 - 12:12 pm | कुमार१

हा प्रश्न नावानिशी आस्थेने विचारला असल्याने उत्तर देतो:

१. मराठीतून लेखनाचे अतिशय प्रेम.
२. आरोग्य लेखन करताना स्वतःचाही छान अभ्यास होतो.
३. वाचकांचे शंकानिरसन करताना विलक्षण आनंद होतो.

४. गेली अनेक वर्षे छापील माध्यमात लेखन करत होतो व त्याचे मिळणारे मानधनही सुखावे. पण एकेक करीत त्यातली ३ मासिके बंद पडली. त्यामुळे आता संस्थळ हेच हक्काचे माध्यम वाटते.
५. लेखन प्रकाशित करणे पूर्ण आपल्या हातात असते हा तर फार मोठा फायदा.

६. बाकी.. इथल्या लेखनाचे फायदे/तोटे याबाबतचे सखोल विवेचन मी माझ्या “लेखणी का कीबोर्ड?” या लेखात यापूर्वीच केलेले आहे.( https://www.misalpav.com/node/42843)

चांगला धागा
धन्यवाद !

सुबोध खरे's picture

28 Nov 2018 - 7:55 pm | सुबोध खरे

का लिहिता तुम्ही लोक?

१) स्वान्त सुखाय

२) लेखन करण्याच्या अगोदर आपल्याला त्याच्या अनुषंगाने बरेच वाचावे लागते. मी सिद्धहस्त लेखक नाही त्यामुळे बरेचसे लेख हे शास्त्रीय विवेचनासारखे किंवा अनुभवातून आलेलेच आहेत त्या अनुषंगाने बरेच वाचन होते यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते

३) लोकांची विरोधी मते पाहून त्याबद्दल वाचन केल्यावर आपले मत/ पूर्वग्रह चूक होते हे आढळून येते त्यामुळे आपले विमान "जमिनीवर" यायला मदत होते

४) मिपावर पार विरोधी मताचे लोक सुद्धा आहेत त्यांच्याबरोबर झालेल्या शाब्दिक चकमकीतून बऱ्याच गोष्टी शिकलो.
a) लोकांशी झालेला टोकाचा वादविवाद असला तरीही कोणाच्याही बद्दल मनात किल्मिष न ठेवता स्वच्छ मनाने जगता येते
b) तुम्ही कितीहि उत्तम वाद घाला तुम्ही लोकांचे "तोंड बंद करू शकता" त्यांचा "दृष्टिकोन बदलू शकत नाही"

५) जे जे आपणासी ठावे ते ते दुसर्याशी सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन.

@ उपयोजक: मिपा वरच्या दिग्गज लेखकां बरोबर माझे नाव वाचून आश्चर्य वाटले. मुळात मी एक वाचक होतो/आहे.
"Nobody has a monopoly on knowledge" ह्या उक्तीस अनुसरून माझे अनुभव, माझ्याकडील माहिती सर्वांबरोबर शेअर करण्यासाठी मी लिहिता झालो.
त्या अनुभवांचा वा माहितीचा एका जरी व्यक्तीला उपयोग झाला तरी मला मिळणारे समाधान हे कुठल्याही आर्थिक लाभापेक्षा नक्कीच मोठे असेल.
धन्यवाद.

खिलजि's picture

29 Nov 2018 - 12:54 pm | खिलजि

टर्मिनेटर साहेब , जसं एक उत्तम क्लिनर , उत्तम ड्रायव्हर होतो तसच आपलं आहे .. एक उत्तम वाचकच उत्तम लेखक होतो .. मी आपली लेख मालिका वाचली आहे .. सुंदर आणि माहितीपूर्ण लेखमालिका होती .. ते उपयोजन साहेब म्हणतात ते शंभर टक्के खरे आहे ... आपल्या सारख्या दर्जेदार लेखकांमुळेच भाषा समृद्ध होत असते .. मी त्या लेखमालिकेत अक्षरशः इजिप्त फिरून आल्यासारखं वाटलं .. असेच लिहिते राहा आणि अनुभव वाटत राहा

मी माझ्या मातृभाषेवरच्या प्रेमाखातर लिहितो .. आणि त्या प्रेमाला दाद देणार म्हणा किंवा अजून काही , मिपासारखं ज्वलंत व्यासपीठ मला तरी अजून सापडलेले नाही आहे .. इथे मलातरी वाटत नाही कि कुणी काही तरी अपेक्षा ठेवून लिहीत असेल .. इथे जसे वर्मावर बोट ठेवणारे मिपाकर आहेत तसेच प्रेम करणारेही मिपाकर आहेत .. आणि ते इतर कुठेही शोधून हार्टरी सापडले नाही आहेत ..

खिलजि's picture

27 Nov 2018 - 3:29 pm | खिलजि

मला तरी = हार्टरी

जर लेखकांना किंवा त्याच्या विचारांना , चांगली / वाईट दादच मिळाली नाही तर हळूहळू समृद्धीकडे झेपावणारी मराठी भाषा कालांतराने लोप पावू शकते .. मी तर म्हणतो मिपाने अजून काहीतरी दर्जेदार उपाययोजना करायला हव्यात ... जेणेकरून मिपावर्धन तर होईलच पण भाषेचेही संवर्धन होण्यात मदत होईल .. काही चांगले, भाषेसाठी तळमळ असणारे पुरस्कर्ते शोधून नवीन लेखकांना प्रोत्साहित करण्यात आले पाहिजे .. असे मला वाटते .. इथे या संस्थळावर आल्यावर माझ्या वाचनात अमूल्य भर पडली आणि पुढेही पडत राहील ..

उपयोजक's picture

27 Nov 2018 - 6:02 pm | उपयोजक

अजून एक महत्त्वाचं

समजा माझ्या २ वर्षापूर्वी लिहिलेल्या धाग्यावर कोणी आज प्रतिसाद दिला तर मला किंवा मी कोणाच्या तरी ८ वर्षापूर्वीच्या धाग्यावर प्रतिसाद दिला तर ज्यांना प्रतिसाद दिलाय त्यांना कळण्याची म्हणजे नोटिफिकेशन वगैरे मिळण्याची काही सोय मिपावर आहे का?

मला वाटत सध्या तरी हि सोय नाही आहे. कारण मला तरी अजून पर्यंत नोटिफिकेशन आलेले नाही आहे .. जे पण अभिप्राय येतात ते इथे चक्कर मारल्यावर समजतात .. एक चांगला संदेश दिला आहात आपण संपादक मंडळींना .. हि जर सोय इथे उपलब्ध झाली तर मिपाशी नाळ कायमची जुळली म्हणून समजा .. बाकी राहता राहिला खुर्च्या गरम करणाऱ्यांचा प्रश्न तर ते हि हळूहळू लिहिते होतील ..
सध्याचा विचार करता , मिपावर अधिकृतरीत्या येणारे सदस्य चांगला सहभाग नोंदवतात .. इथे बऱ्याच अंशी सकस लिखाण होते त्यामुळे ज्ञानात भर पडते ती वेगळी ..

कंजूस's picture

27 Nov 2018 - 7:31 pm | कंजूस

१) आपला कंपू नसणे,
२) नवे लेखक हे विरोधी प्रतिसाद सहन करू शकत नाहीत, ते संस्थळांवरून (केवळ मिपाच नव्हे) पळ काढतात.

एका मित्राने whatsapp वर मिपावरील एका जुन्या लेखाची लिंक पाठवली होती तो वाचायला आलो होतो! त्या लेखा सोबत आणखीही काही लेखन वाचले आणि ते आवडले म्हणून सभासदत्व घेतले! या आधी ऐसी आणि माबोवर अधून मधून फेरी असायची परंतू मिपावरील लेखनात असलेली विविधता आणि सभ्य सुसंस्कृत प्रतिसाद बघितले आणि इथेच रमलो! वर एका प्रतिसादात लिहिल्या प्रमाणे सकस लेखनाच्या लिंका शेअर करा माझ्यासारखे अजून कितीतरी वाचक नव्याने इथे दाखल होतील!

.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Nov 2018 - 10:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावरचा प्रवास चांगलाच आहे. मिपावर आपण अनेक लोकांना निमंत्रण देतो, जे मी सुरुवातीपासून करतो. आताही करतो. पण सार्वजनिक संकेतस्थळावर लिहिण्या-बोलण्याचं तारतम्य काही लोकांना नाही, त्याचं प्रशिक्षण म्हणजे मिपा एकदा समजून घेतले पाहिजे. संवाद झाला पाहिजे, विसंवाद तर कोणालाही करता येतो.

मिपावर आजही अनेक जुने जाणते लोक हजेरी लावत असतात, अनेक नवीन लोकही इथे लिहित असतात पण आपण किती व्यक्तिगत होतो, किती तटस्थ लिहितो, किती सहज मतं मांडतो यावर नव्या आणि जुन्या लोकांचा वावर इथे वाढेल. लोक येतात आणि जातात तसे मिपावरही अनेक हवशे गवशे लिहित असतात, येतात जातात रमतात मजा करतात. पण काही लोकांना आवरणे गरजेचे असते म्हणजे नव्यांना जेव्हा इथे आणतो तेव्हा त्याला इथला त्याचा वावर सुसह्य वाटला पाहिजे.

असो.

-दिलीप बिरुटे
(कट्टर मिपाकर)

खिलजि's picture

28 Nov 2018 - 4:27 pm | खिलजि

बिरुटे सर,, मी कोणत्या वर्गात मोडतो ? मी तुमचं ऐकलं कि नै ,गप्प र्हायलो कि नै , मंग ...आणि मी पण प्रचार आणि प्रसार करतो कि नै .. मंग मी पण कट्टर मिपाकर झालो कि नै ..

मिसळपावाच्या पाच हजारात १०० आयडी एकट्या कागलकरांचेच असतील कदाचित,

जमेल तशा लिंका देऊन आम्ही मिपा प्रसार करतो, चार मित्रांना आयडी काढुन दिले, ते वाचनमात्र असतात.

काही लोक छान लिहायचे, पण त्यांचं कौतुक नव्हतं कुणाला, फुकटात वाचून आवडलं तरी प्रतिक्रिया न देता निघून जातात लोक. त्यामुळे ते ही बंद पडले.

त्यामुळे लाईक सदृश्य बटणाची मागणी अजून एकदा मांडतो.

मिळुन मिसळून हा मिपा वाढ, लिहीते होणे या उद्देशाने सुरू झाला पण दुर्दैवाने त्यांची तिथं प्रतीसृष्टी झाली आहे.

उपयोजक's picture

28 Nov 2018 - 1:46 pm | उपयोजक

<मिळुन मिसळून हा मिपा वाढ, लिहीते होणे या उद्देशाने सुरू झाला पण दुर्दैवाने त्यांची तिथं प्रतीसृष्टी झाली आहे.>

व्यासपीठ उपलब्ध असूनही कलाकार कला सादर करत नसतील तर आधी दोष कलाकारांना द्यावा.व्यासपीठाला देऊ नये.

भाते's picture

28 Nov 2018 - 11:25 am | भाते

मी जेव्हा कधी मिपावर काहिही लिखाण करतो त्याचा मिपावरील लेखाचा दुवा आवर्जुन सोशल मिडिया वर टाकतो. मुळ लेख संपुर्ण चोप्यपस्ते करण्यापेक्षा मिपावरील लेखाचा दुवा देणे सोपे जाते. माझ्या लिखाणाची फुकटची जाहिरात सुध्दा होते आणि मिपाकर म्हणुन माझ्याकडुन थोड्याफार प्रमाणात मिपाप्रसार सुध्दा होतो. त्यातले किती लोक मिपा नियमितपणे वाचतात ते माहित नाही पण मला कधीतरी "अरे वा, तु मिपावर सुध्दा लिहितोस" अश्या प्रतिक्रिया येतात. शिवाय मिपाकरांच्या मला आवडलेल्या लेखांचे, मिपाच्या विशेषांकाचे आणि मिपा दिवाळी अंकाचे अनेक दुवे मी सोशल मिडिया वर नियमितपणे टाकतो.

जाताजाता
संमं / सासंमं, वरती 'मिपा विशेषांक' वर टिचकी मारल्यावर 'वाविजाप्र' चा धागा उघडत आहे याची दखल घेऊन त्यात योग्य तो बदल करावा हि नम्र सूचना.

आदिजोशी's picture

29 Nov 2018 - 2:40 pm | आदिजोशी

मिपाच्या अगदी सुरुवातीच्या सभासदांपैकी एक असल्याने मिपाविषयी पूर्वी फार प्रेम होते. दणकून लिखाण करायचो, अनेकांना मिपाविषयी माहिती द्यायचो, ह्यातल्या कित्येकांनी सभासदत्व घेतलेही. बंगळूरूस मुक्कामी असताना तिथे चक्क मिसळकट्टाही सुरू केला होता. मिपामुळे अनेक चांगले मित्रही मिळाले.

नंतर मिपाचे वातावरण खराब व्हायला सुरुवात झाली. संपादकांची मनमानी, तात्यांनी केलेले दुर्लक्ष, काही ठरावीक मेंबर्सच्या वागणूकीकडे जाणीवपूर्वक केलेला काणाडोळा, डुप्लिकेट आयडींना वेळीच न आवरणे + काही प्रमाणात प्रोत्साहनच देणे, कंपूबाजीचा अतिरेक, असल्या अनेक घटनांमुळे मिपाचं पूर्ण कॅरेक्टरच बदलून गेले. मिसळपावचे आंबण झाले. आत्ता सुद्धा हे मिपा पूर्वीचं राहिलं नाही ह्यावर जुन्या लोकांचं एकमत होईल.

सध्या इथे फार काही लिहित नाही. इच्छाही होत नाही. प्रचार तर अजिबातच करत नाही.

कपिलमुनी's picture

6 Dec 2018 - 2:11 am | कपिलमुनी

मिपा पूर्वीचं राहिलं नाही असे म्हणणाऱ्या रसिकाच्या चार पिढ्या गेल्या . सध्याच्या आयडीना इतिहास माहिती नाही.

स्वगत:- आणि तात्या अभ्यंकर.. काढावा काय ? भावेच्या डेट्स बघायला हव्यात

जाऊ दे ओ आदीसाहेब .. थोडंसं असं होतं कधी कधी .. चालायचं .. एव्हढं सुंदर संस्थळ सांभाळताना चढ उतार आलेच .. स्वतः शिवाजी महाराजांनी काही लोकांच्या भुरट्या कारभाराकडे त्यांच्या पूर्वकामगिरीच्या बळावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते .. आणि ते तसे वागले म्हणूनच स्वराज्य उदयास आले .. पण ते करणे संभाजीस जमले नाही आणि थोरल्या बाजीरावानंतर तर कुणालाच नाही ..

सुधीर कांदळकर's picture

29 Nov 2018 - 8:22 pm | सुधीर कांदळकर

लोक समाजात मोजकेच आढळतात. त्यात स्वतःच्या मित्रमंडळात कितीसे असणार? माझ्या मित्रमंडळात मोजून पाचसहाच आहेत. त्या सर्वांना मी इथल्या माझ्या आवडत्या लेखांचे म्हणजे शास्त्रीय विषय, प्रवासवर्णने, युद्धकथा इ. मिपावरील लिखाणाचे दुवे नियमितपणे पाठवीत असतो.

@उपयोजकः या प्रश्नाचे उत्तर ठाऊक नसल्यामुळे मी मलाच हा प्रश्न विचारला. त्याचा माझ्या अल्पमतीप्रमाणे उत्तर देत आहे. व्यवस्थापन शास्त्रात मॅस्लोचा हायरार्ची ऑफ नीड्स हा मुद्दा आस्थेने चर्चिला जातो. त्यात 'एस्टीम अ‍ॅन्ड सेल्फ रीस्पेक्ट’ यावरील सर्वोच्च स्थानी, 'सेल्फ अ‍ॅक्च्युअलायझेशन’ हे आहे.

नोकरीत असतांना 'एस्टीम अ‍ॅन्ड सेल्फ रीस्पेक्ट’ भरपूर मिळाला. सेवानिवृत्ती जवळ आल्यापासून मराठी अक्षरे संगणकावरून महाजालावर लिहिता येऊ लागली. त्यातून 'सेल्फ अ‍ॅक्च्युअलायझेशन’ मिळू लागले असावे. म्हणून मी लिहिणे सुरू ठेवले असावे. अनेक संस्थळापैकी मिपा हे आवडले. म्हणून मी मिपावर लिहितो.

माझ्या लेखनातून मला स्वतःचा, स्वतःच्या मतांचा, स्वतःकडील माहितीच्या सत्यासत्यतेचा शोध घेता येतो. वाचकांचे प्रतिसाद हा सर्वसाधारण सत्यासत्यता, योग्य अयोग्यता, दर्जा इ. चा बॅरोमीटर आहे असे मला वाटते. मी जरी प्रसिद्धीला हपापलेला नसलो तरी सर्वसामान्यपणे कुणीही बरे म्हटले की आवडतेच. त्यातून ज्ञानी व्यक्तीने बरे म्हटले की जास्त आवडते. (आपण चांगला लेखक म्हटल्याने माझ्या हडकुळ्या देहावर मूठभर मांस चढलेच बरे का!) मिपाएवढी साक्षेपी, ज्ञानी तरीही मनमोकळी मंडळी आणखी कुठे गवसतील? म्हणून मिपावरच लिहितो.

माम्लेदारचा पन्खा's picture

29 Nov 2018 - 11:44 pm | माम्लेदारचा पन्खा

उत्साही मिपाकरांची पुढची फळी पाहून बरं वाटलं......

मी इथल्या मैदानातला संजय बांगर, विजय दहिया किंवा दीप दासगुप्ता असेना का पण दिग्गज मिपाकर उर्फ तेंडुलकर, गांगुली किंवा द्रविड यांच्याबरोबर मैदानात यायला मिळणं हे सुध्दा शुभ लक्षण आहे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Dec 2018 - 9:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> उत्साही मिपाकरांची पुढची फळी पाहून बरं वाटलं......

खरंय.... मिपाकरांना असं वाटणं म्हणजे मिपावरचं प्रेम.
आमच्याही मिपावयात मिपावर यु झालं पाहिजे आणि त्यु झालं पाहिजे, अशा विचारांनी आम्ही भारावलेलो असायचो.

गेले ते दिवस.....

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

26 Dec 2018 - 2:53 pm | मुक्त विहारि

का लिहिता तुम्ही लोक?

===> दिसा माजी काही तरी लिहित जावे, ह्याला जागून, जे काही योग्य वाटेल ते लिहितो.

=======

तुमचा रोजचा व्याप सांभाळून काही वेळ शिल्लक राहतो म्हणून लिहिता का?

===> हो. खरे सांगायचे तर, मनात बर्‍याच गोष्टी असतात आणि लिहिलेले प्रत्येक वाक्य प्रकाशित करतोच असे नाही.कधी कधी एखादे कथानक लिहावेसे वाटते.शिवाय
छोटेखानी लेखांना प्रकाशक आणि वाचक मिळतीलच असे नाही.पण मिपावर प्रकाशन पण होते आणि वाचक पण मिळतात.

=====

समजा उद्या खुप बिझी झालात तरीही लिहाल का?

===> मनांत योग्य विषय असला तर नक्कीच लिहिन.

======

की इथे पूर्वी दर्जेदार लिहिणारे पण गेल्या काही वर्षात पांगलेले बरेच मिपाकर आहेत तसं काही होईल?

===> नाही, निदान माझ्या बाबतीत तरी असे होणार नाही.

=======

लिहिल्याबद्दल मिपा काही पैसे देत नाही.म्हणजे आर्थिक कारणही नाही.तरीही का लिहिता?

====> हो. लेखनाच फायदा होतोच. लेखन प्रकाशित केल्याचा आनंद मिळतोच.आणि त्या समाधानाची तुलना होऊ शकत नाही.

======

मिपावर लिहिल्यामुळे तुमचा कोणता फायदा होतो? मिपावर लिहायचं थांबवलंत तर तुमचं वैयक्तिक असं कोणतं नुकसान होईल?

===> एकलकोंडे पण नक्कीच नाहीसे झाले. खूप उत्तम मित्र मिळाले....उत्तम सल्लागार मिळाले...मिपावर उत्तम लेखांचे स्वागत होतेच, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

जालिम लोशन's picture

11 Jul 2019 - 2:43 pm | जालिम लोशन

म्हणजे
चाॅकलेट खायचे थांबवुन थोडे आरोग्यदायी चघळुया.

सध्य स्थितीमधे वाटसप मिपाचा स्पर्धक आहे वेळ व्यतीत व्हायच्या बाबतीत, अन्यथा मिपा डोमिनेटिंग होते