मिपा प्रशासनाकडे विचारणा

mayu4u's picture
mayu4u in काथ्याकूट
25 May 2019 - 2:22 pm
गाभा: 

१. कोणते धागे ठेवावेत, कोणते उडवावेत याविषयी मिपा चं धोरण काय आहे?

२. धागा वाचनमात्र करण्याविषयी मिपा चं धोरण काय आहे?

३. कोणते प्रतिसाद ठेवावेत, कोणते उडवावेत याविषयी मिपा चं धोरण काय आहे? प्रतिसाद सम्पादित करण्याविषयी मिपा चं धोरण काय आहे?

४. कोणते आयडी ठेवावेत, कोणते उडवावेत याविषयी मिपा चं धोरण काय आहे?

अधिक माहिती:

१. चालू घडामोडी - मे २०१९ हा धागा का उडवला गेला? त्यावरचे गामा पैलवान यांचे राजीव गांधी यांच्याविषयीचे काही प्रतिसाद संपादक/मालक यांना पटणारे नव्हते यासाठी? आणि तसं असेल तर ते प्रतिसाद संपादित करणं, संबंधित आयडी ला समज देणं हे उपाय करता आले नसते का? थेट धागा उडवायचा?

२. शिवाजी महाराज -- काही रेखाचित्रे या धाग्यावर विशुमित यांनी "गुवात दगड" असे शब्द वापरले होते. ते प्रतिसाद सम्पादित करण्यात आले. रामदास हा आदिलशहा चा हेर होता असं विधान त्यांनी विनापुरावा केलं. तो धागा वाचनमात्र करण्यात आला. मग विशुमित यांना त्यांच्या विधानाचे पुरावे मागायचे कसे?

३. १ मध्ये केलेले प्रतिसाद सम्पादित करण्या ऐवजी धागा उडवला गेला. २. मध्ये प्रतिसाद सम्पादित केले गेले आणि धागा वाचनमात्र केला. यात प्रशासनाच्या ऍक्शन्स मध्ये कन्सिस्टन्सी दिसत नाही. की रामदासांना काहीही म्हटलं तर चालेल, पण राजीव गांधींना काहीही म्हणायचं नाही असं प्रशासनाचं धोरण आहे?

या लेखावरचा माझा प्रतिसाद ("तुमच्या व्यवसायात दिलेली वेळ पाळणे किती महत्वाचे असते? कबूल केलेल्या वेळेत माल देता आला माही तर काय करतात?") कोणतेही स्पष्टीकरण न देता उडवण्यात आला.

४. उपरोल्लेखित विधान केल्यानंतर, विशुमित हा आयडी त्यानंतर बरेच दिवस ऍक्टिव्ह होता. गा पै यांचं सदस्यत्व मात्र त्वरित रद्द केल्याचं दिसतंय. हा वेगवेगळा न्याय का? कोणाविरुद्ध तक्रार आहे, यापेक्षा तक्रारकर्ता कोण आहे यावर काय ऍक्शन घ्यायची हे ठरतं का?

मिपा ची सुरुवात अन्य संस्थळावरची बंधनं झुगारून देण्यासाठी झाली, असं ऐकून/वाचून आहे. मग या वरच्या बाबी मिपा च्या स्थापनेच्या मूळ हेतूलाच हरताळ फासत नाहीत का?

विचारणा प्रशासनाकडे केलेली असली, तरी अन्य सदस्यांनी त्यांचं मत मांडावं, ही विनंती!

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

25 May 2019 - 3:09 pm | महासंग्राम

www.misalpav.com/node/13199

www.misalpav.com/node/15709

मिपा प्रशासनाने आणि मालकांनी उपद्रवी धाग्यांवर आणि आयडींवर वेळोवेळी योग्य अशी कारवाई केलीये असं आमचं वैयक्तिक आणि स्पष्ट मत आहेत.

जालिम लोशन's picture

25 May 2019 - 3:10 pm | जालिम लोशन

ह्या मधील सिमारेषा जेवढी धुसर असते तेव्हढीच तुम्ही ऊपस्थित केलेले प्रश्न आणी adminच्या कायदेशीर अडचणी ह्यात असु शकते. त्यामुळे अधिकाराचा वापर करण्यावर सार्वजनिक चर्चा करण्यापेक्षा व्यनि करा.

हा धागाच उडवण्यात आला तर तू काय करणार रे दाद्या..? =))

महासंग्राम's picture

25 May 2019 - 3:33 pm | महासंग्राम

जल्ला मैदानाच्या बाहेर षटकार

किंवा माझाच आयडी उडवला तर मी काहीच करू शकत नाही हे मला माहित आहे. पण म्हणून जे काही दिसतंय ते गप्प बसून बघत रहाणं मला तरी मान्य नाही.

नाखु's picture

26 May 2019 - 4:12 am | नाखु

मुद्दा क्रमांक दोन व तीन अतिशय आवश्यक विचारणा केली आहे आणि माझा सुस्पष्ट पाठींबा आहे

हेर म्हणून अपमानास्पद हेटाळणी करण्याचे प्रयोजन कुणालाही खटकले नाही याचा अर्थ येथील इतिहासप्रेमी,साक्षेपी संपादक यांच्यातील न्यायप्रियता लोप पावून पुरोगामित्वाच मुकूट डोक्यावर चढविण्याचा सोस नडला असावा
अन्यथा जाहीर समज दिली असतीच असती.

गामा अशा कुणाचेच मित्र नसावेत असं समजण्यास पूरेपूर वाव आहे.

वाचकांचीच पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला

मिसळपाव प्रशासन समतोलपणे आणि कसलाही भेदभाव न करता काम करते असे एक माजी संपादक म्हणून म्हणावेसे वाटते. संपादक हे ही आपल्यासारखेच काम करून संपादनाचे काम करत असतात. काहीवेळा नजरचुकीने एखादा धागा, प्रतिसाद संपादन करायचे राहूनही जात असेल पण म्हणून त्या धाग्याला/आयडीला अभय दिले असे होत नाही. उपरोक्त आयडी उडवला गेला त्यामागे केवळ हेच कारण असावे असेही नव्हे, त्या आयडीचे जातीयसूचक प्रतिसाद मीही कित्येकदा पाहिलेले आहेत व अजूनही हा आयडी कायम कसा ह्याबाबत नवलही व्यक्त केलेले आहे. संपादक मंडळ अथवा मिपा मालक कोणालाही तडकाफडकी उडवत नाहीत.
शेवटी मिपा व्यवस्थापन हे देखील कुणालाही १००% समाधानी ठेवू शकत नाहीत, एकावर कारवाई केली तर विरोधातला नाराज होतोच म्हणून व्यवस्थापन पक्षपात करते असे नव्हे.

तेजस आठवले's picture

28 May 2019 - 4:48 pm | तेजस आठवले

कागलकरांच्या डुआयडी फौजेपुढे हतबल झालेले प्रशासन आठवले.ते ठरवून केलेले हल्ले आणि मिपाची लांडगेतोड. :(
गापै आणि प्रशासनात काय वाद झाला माहित नाही, मात्र फार काही विशेष झाले नसेल आणि शक्य असेल तर गापै(आणि इतर बऱ्याच आयडींना) यांना परत आणावे, ही विनंती.
विशुमित यांनी पुरावेही देणार नाही आणि माफीही मागणार नाही असा निगरगट्टपणा दाखवला होता.त्यांच्यावर काही ऍक्शन घेतली होती काय?

तसंही बरेच चांगले चांगले आयडी मिपावरून स्वतःहून उडाले आहेत आणि बऱ्याच आयडींना लिहावेसे वाटत नाही.मिसळीची तर्री पातळ झालीय हो...