विश्ववाची उत्पत्ती - प्रश्न

रणजित चितळे's picture
रणजित चितळे in काथ्याकूट
22 May 2019 - 1:58 pm
गाभा: 

बरेच दिवस एक प्रश्न मनात आहे त्याला समर्पक उत्तर सापडत नाही.
आपले विश्व बिगबॅन्गने सुरू झाले असा सिद्धांत आहे. त्या पेक्षा पडणारा मोठा प्रश्न म्हणजे, बिगबॅन्ग होण्यासाठी लागणारा पदार्थ किंवा घटना अस्तित्वात असायला हवी, तो पदार्थ किंवा ती घटना कोठून आली.

एनर्जी वा मॅटरच्या आधी काय होते. ते कोठून आले, कशातून आले व ज्याच्यातून आले ते कोठून आले ह्याला समर्पक उत्तर कोणी देऊ शकेल का.

मी जालावर प्रयत्न केला समर्पक उत्तर सापडत नाही. कोणी म्हणते की बिगबॅन्गच्याच वेळेला वेळ सुरू झाली. आता वेळ ही आपल्यासाठी आहे. वेळेच्या आधी काहीतरी असणारच. काहीच नसेल तर मग हे सगळे उत्पन्न कसे झाले. फक्त एनर्जी होती असे म्हटले तर ती आली कोठून. ती यायला जर स्पेस - अवकाश लागत असेल तर ती स्पेस - अवकाश आलं कोठून.

बिगबॅन्गच्या आधी काय होते? जर काहीच नव्हते तर उत्पत्तीसाठी लागणारे साहित्य कोठून आले? ऊर्जा कशातून झिरपली? बिगबॅन्ग घडवण्याची घटका कोणी ठरवली व बिगबॅन्ग घडवून आणणारी कळ कोणी दाबली?
कोणी वैज्ञानिक निरूपण करू शकेल का ह्या प्रश्नाचे.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

22 May 2019 - 2:34 pm | प्रचेतस

ह्याची अचूक उत्तरे कुठेच मिळणार नाहीत कारण हे सर्व सिद्धांत आहेत जे कधीही १००% सिद्ध करता येणार नाहीत.

अभ्या..'s picture

22 May 2019 - 5:24 pm | अभ्या..

आम्ही काहीही विचारले की प्रचेतसराव हेच उत्तर देतात म्हणून आम्ही त्यांना प्रश्नच विचारणे सोडले होते पण सृष्टीच्या उत्पत्तीबाबतही त्यांचे मत हेच आहे कळल्यानंतर त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला.

गवि's picture

22 May 2019 - 2:59 pm | गवि

आधी-नंतर
सुरु-संपले
नव्हते-आहे

या मूळ संकल्पना टाळल्याशिवाय आपण काहीच म्हणू शकत नाही ही आपली निरीक्षक म्हणून मर्यादा आहे, त्यामुळे दुर्दैवाने "आधी" काय "होते"?
किंवा
सध्याच्या स्पेस"पलीकडे" काय असेल?
अमुक कसं "अस्तित्वात आलं"?

अशा मूळ प्रश्नांची निव्वळ उत्तरं मिळणं सध्याच्या मर्यादांमध्ये शक्य नाही.

काहीतरी आधी नसतं आणि ते नंतर असतं किंवा बनतं अशा साच्यातच आपल्याला विचार करावा लागतो. काहीतरी आहेच आणि आपण सेकंद, मिनिटे, किलो, लिटर मोजतोय हे लक्षात घेतलं पाहिजे.

काल ही नाही आणी ऊद्या ही नाही. आज आत्ता आहे फक्त. ह्या थिअरी फक्त सरकारी पैसा खर्च करण्यासाठीचा बहाणा आहे फक्त.

काल ही नाही आणी ऊद्या ही नाही. आज आत्ता आहे फक्त. ह्या थिअरी फक्त सरकारी पैसा खर्च करण्यासाठीचा बहाणा आहे फक्त.

महासंग्राम's picture

22 May 2019 - 4:01 pm | महासंग्राम

प्रश्न पडणं चुकीचं नक्कीच नाहीये, उत्तर मिळो अथवा ना मिळो प्रश्न पडले पाहिजे आणि विचारले पाहिजेत.

तनमयी's picture

22 May 2019 - 4:16 pm | तनमयी

Shlokas from Rigveda ( Discovery of India title song )
Bharat Ek Khoj—The Discovery of India A Production of Doordarshan, the Government of India's Public Service Broadcaster.
https://www.youtube.com/watch?v=vet9pMZ0OW8
https://www.youtube.com/watch?v=1IsB7zY6qc0

The starting song consists of sanskrit shloka from Nasadeeya Sukta which is part of Rigveda.
हिरण्यगर्बस-समवर्तत-आग्रे
भूतस्य जातः पतिर-एक आसीत
स दाधार-पृथिवी-द्याम-उतेमा.म
कस्मै देवाय हविषा विधेम

सृष्टि से पहले सत नहीं था, असत भी नहीं
अन्तरिक्ष भी नहीं, आकाश भी नहीं था
छिपा था क्या, कहाँ, किसने देखा था
उस पल तो अगम, अतल जल भी कहाँ था

सृष्टि का कौन है कर्ता
कर्ता है वा अकर्ता
ऊँचे आकाश में रहता
सदाअ अध्यक्ष बना रहता
वही तो सच-मुच में जानता, या नहीं भी जानता
है किसी को नहीं पता
नहीं पता

The ending track is first shloka from Hiranyagarbha sooktam which is also a part of Rigveda.

हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकासीत ।
स दाधार पृथ्वीं ध्यामुतेमां कस्मै देवायहविषा विधेम ॥

वह था हिरण्यगर्भ सृष्टि से पहले विद्यमान
वही तो सारे भूत-जात का स्वामी महान
जो है अस्तित्वमान धरती-आसमान धारण कर
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवि देकर

जिस के बल पर तेजोमय है अम्बर
पृथ्वी हरी-भरी स्थापित स्थिर
स्वर्ग और सूरज भी स्थिर
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवि देकर

गर्भ में अपने अग्नि धारण कर पैदा कर
व्यापा था जल इधर-उधर नीचे-ऊपर
जगा चुके वो कई एकमेव प्राण बनकर
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवि देकर

ॐ! सृष्टि-निर्माता स्वर्ग-रचयिता पूर्वज, रक्षा कर
सत्यधर्म-पालक अतुल जल नियामक, रक्षा कर
फैली हैं दिशायें बाहु जैसी उसकी, सब में, सब पर
ऐसे ही देवता की उपासना करें हम हवि देकर
ऐसे ही देवता की उपासना करें हम हवि देकर

गड्डा झब्बू's picture

22 May 2019 - 4:23 pm | गड्डा झब्बू

विश्वाची उत्पत्ती
प्रेषक रणजित चितळे (रवि., १०/११/२०१३ - १४:२६)
२०१३ साली मनोगतवर लिहिलेल थोड एडीट करून इथे २०१९ मधे परत का लिहीताय? तिथे पाच सहा वर्षात उत्तर मिळाले नाही म्हणून?
फक्त त्या लेखातला अध्यात्मिक संदर्भ इथे दिला नाहीये बाकी दारू जुनीच पण बाटली नवीन. प्रश्न चांगला आहे बघू इथ तरी उत्तर मिळते का.

रणजित चितळे's picture

23 May 2019 - 2:06 pm | रणजित चितळे

हा प्रश्न तिथे विचारला होता. पण कोणी उत्तर द्यायचा प्रयत्न पण केला नाही. मला हा नेहमी पडणारा प्रश्न आहे. आध्यात्मीक उत्तर द्या पण विज्ञानाच्या कसोटीवर दिलेले उत्तर जास्त आवडेल

शब्दानुज's picture

22 May 2019 - 7:15 pm | शब्दानुज

माझ्या अल्प माहितीवर मी हे उत्तर देत आहे. या गोष्टी मलाच न कळाल्याने मी कितपत समजावू शकेन हे एक गुढच आहे. आधी काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. ती पार्श्वभुमी आधी लक्षात घेऊन पुढे जावू.

साध्या साध्या गोष्टीपासून सुरवात करू. हातात एक मस्त फुललेला ढोकळा घ्या. त्याचा आकार बघा. आता तो हातानी दाबा. जेव्हा तुम्ही हातानी दाबाल तेव्हा ढोकल्याच्या मधल्या रिकाम्या जागा/ छिद्रे भरली जातात आणि ढोकळ्याला लागणारी जागा कमी राहते.

आपल्या माहिती असणारे पदार्थ जेवढे टणक वाटतात, तेवढे ते टणक नसतात. त्यातही रिकाम्या जागा असतात. थोडक्यात आपण खुप मोठा माल खुप थोड्या जागेत दाबून बसवू शकतो.

आता हे अतिप्रचंड प्रमाणात झाले तर अख्खे ब्रह्मांड कणामद्दे दाबून बसवले जाते ! कणातून विश्व बाहेर काढता येते. विश्वाला कणात दाबता येते.

जेव्हा एखादा तारा मरतो तेव्हा असा प्रकार होतो. पण जेव्हा हे होत असते तेव्हा गुरुत्वाकर्षण मात्र भयानक वाढत जाते आणि तयार होते ब्लॅक होल! आजूबाजूला जे जे काही असेल ते ते आपल्यात अोढून घेऊ लागते. सगळा माल आत दाबून दाबून भरला जातो. या सगळ्यात महाप्रचंड गोधळ चालू असतो. धडकाधडकी चालू असते.

पण जर तुम्ही चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूवर उभे असाल तर आजूबाजूला गोंधळ दिसेल आणि तुम्ही जिथे उभे आहात तो भाग शांत असेल! ब्लॅक होलचा केंद्रबिंदू हा असाच असतो. त्याला नाव आहे "सिंग्यूलॅरिटी "

आता ढोकळा सोडा आणि हातात फळ घ्या. विचार करा की तुम्ही किडा आहात. फळाच्या एका बाजूकडून दुस-या बाजूला जाताना तुम्हा फार मोठे अंतर कापावे लागेल.

तेच तुम्ही जर फळाला मधून छिद्र पाडले तर तुम्ही दुस-या बाजूला लगेच पोहोचू शकता. याला म्हणायचे वर्म होल.

ज्याप्रमाणे एक छिद्र सगळ्या गोष्टी आत अोढत आहे ( ब्लॅक होल) त्याप्रमाणे एक छिद्र असेही असावे जे सगळ्या गोष्टी बाहेर अोकते. त्याला म्हणायचे व्हाईट होल!

ब्लॅकहोलच्या मद्दे एक तर व्हाईट होल आहे वा वर्म होल आहे असे मानतात. नक्की काय आहे हे माहिती नाही.

आता थोड्या अवघड गोष्टी समजावून घेऊ. दोन घड्याळ घ्या एक जमिवर ठेवा आणि एक १०० व्या मजल्यावर ठेवा. दोन्ही घड्याळ्यात तुम्हाला चक्क फरक दिसेल ! जमिनीवरचे घड्याळ उंचावरच्या घडाळापेक्षा हळू चालेल. (हा फरक दिसण्याइतका वा जाणवण्याइतका नसतो.)

जिथे गुरुत्वाकर्षण जास्त (जमिनीलगत) तिथे वेळ कमी वेगात काम करतो , जिथे ती कमी तिथे वेळ वेगात काम करतो. असे का हे नाही माहिती. (याचप्रमाणे वेगाचाही वेळेवर परिणाम होतो. जास्त वेग , हळू घड्याळ. हे नाही पटले तरी ते तसे आहे. )

आपण बघीतले की ब्लॅक होलचे गुरुत्वाकर्षण महाप्रचंड आहे. त्यामुळे तिथे (सिंग्युलॅरिटीमद्धे) वेळ खुपच हळू चालते वा ती शून्यच होऊन जाते.

काही तरी घडायला वेळ लागतोच. जर वेळ बंद आहे तर तिथे काहीही घडत नाही. सगळ जणू पॉज करून ठेवले आहे.

पार्श्वभुमी समाप्त...

आता येऊ मुख्य प्रश्नाकडे.

बिग बॅंगपासून या गोष्टी सुरू झाल्या हे मानवास नक्की माहिती आहे. या आधी वेळ थांबलेली होती आणि अचानक स्फोट होऊन बाहेर पडला वेळ "चालू" झाली.

पण या आधी काय यावर काहीही सिद्ध झालेले नाही. (माझ्या माहितीनुसार) यावर काही सिद्धांत मांडले जातात त्यातील काही पाहुया. सिद्धांतावर दिलेले नावे ही प्रचिलित नावे नाहीत. समजण्यासाठी मी ती दिलेली आहेत.

१) किरण सिद्धांत.
भुमिती मद्धे किरण नावाचा प्रकारात एक सुरवात बिंदू असतो पण त्याचा अंत कुठे होतो हे सांगता येत नाही.

त्याप्रमाणे असे मानतात की बिग बॅंग होताना वेळ पॉज झाली होती. त्याला लागणारी साम्रही आधीपासून तिथेच होती. जेव्हा एखादी वस्तु कुठे जाते तेव्हाच ती पुन्हा येऊ शकते. म्हणून ती तिथेच होती , कुठूनही आणण्यात आलेली नाही. हा प्रश्नच गैरलागू ठरतो त्यामुळे.

२) छेदित वर्तूळे सिद्धांत / वर्तुळ सिद्धांत
या सिद्धांतानुसार आधीच एक ब्रह्मांड अस्तित्वात होते. तिथे एक ब्लॅक होल तयार झाले. त्या ब्लॅक होलात स्फोट झाला आणि व्हाईट होल वा वर्म होल (पार्श्वभुमी आठवा) यातून आतला माल बाहेर दुस-याच ठिकाणी फेकून देण्यात आला जिथे ब्रह्मांड निर्माण झाले. पहिले ब्रह्नांड विनाश पावले (वर्तुळपुर्ण झाले ) तरी दुसरे जिवंत राहते. सायकलप्रमाणे हे काम चालते

यात व्हाईट होलमद्धे एक गडबड आहे. असाही एक सिद्धांत आहे की यामधून बाहेर पडलेला माल भुतकाळात जातो ! वेळ ऋण होते येथे कदाचित. तेव्हा बाहेर पडलेला माल हा त्या वेळी बाहेर पडतो जेव्हा तो ब्लॅक होलचा जन्मही झालेला नसतो. तोच माल पुन्हा ब्लॅकहोल तयार करतो आणि असे वर्तूळ चालत राहते.

वर्तूळाला जशी सुरवात वा अंत नाही तसेच विश्वनिर्माण होणे , विनाश होणे याला सुरवात वा शेवट नाही.

३) बुडबुड्यांच्या साखळीचा सिद्धांत
जेव्हा दोन बुडबुडे एकमेकांना धडकतात तेव्हा त्यातून अजून बुडबुडे तयार होतात. असेच दोन ब्रह्माड धडकतात आणि ब्लॅकहोल धडकून बिग बॅंग होतो असे काहिसे.

हे सर्व माझ्या अल्प माहितीवर आधारले आहे. चुकीच्या गोष्टी असण्याची शक्यता बरीच आहे.स्वताः इतरत्र शोधून माहिती काढावी.

चांदणे संदीप's picture

22 May 2019 - 9:26 pm | चांदणे संदीप

मला या विषयावर आपणाशी एकदा सविस्तर चर्चा करायची आहे.

Sandy

हा हा म्हणता आपण खासगी पुणेकरातून सार्वजनिक पुणेकर होऊन जाल! जर पुणेकर असलात तर :-))

रणजित चितळे's picture

24 May 2019 - 1:45 pm | रणजित चितळे

व वाचता वाचता विचार करत आहे

मराठी कथालेखक's picture

24 May 2019 - 2:57 pm | मराठी कथालेखक

छान लिहिलं आहे.. स्टीफन हॉकिंगची पुस्तकं वाचली आहेत का ?
त्यांनी बिग बँग पासूनच पुढे विचार करायचा, "बिग बँगच्या आधी काय होतं ?" ह्या प्रश्नाला अर्थ नाही असं काहीसं म्हंटलंय असं मी एका लेखात वाचल्याचं आठवतंय , हॉकिंगची पुस्तक मी अजून वाचली नाहीत.

रणजित चितळे's picture

25 May 2019 - 2:35 pm | रणजित चितळे

पण त्यानी बिगबॅन्गच्या आधीचे काही लिहिले नाही. एकात असे लिहिले आहे की हे चक्र आहे. बिग बॅन्ग - जगाचा शेवट परत बिग बॅन्ग----- पण प्रश्न हाच आहे की आदी सामुग्री कुठून आली.

मराठी कथालेखक's picture

7 Jun 2019 - 12:26 pm | मराठी कथालेखक

काय ? स्टीफन हॉकिंगची सगळी पुस्तकं वाचलीत ? आणि त्यानंतरही अनुत्तरीत राहिलेल्या प्रश्नांकरिता मिपावर आला आहात ? योग्यच केलंत ... बस थोडा वेळ थांबा मिपावरील हॉकिंग जरा पाय मोकळे करायला एक दोन प्रकाशवर्षे दूर गेले आहेत ते आलेत की उत्तरं मिळतीलच.

आदिजोशी's picture

23 May 2019 - 3:05 pm | आदिजोशी

आईनस्टाईन पण देऊ शकला नाही अशा प्रश्नाचे उत्तर मिपावर मिळेल ही अपेक्षा आहे का?

.....

हा प्रश्न बर्याच जणांना पडलेला आहे पण अजुन पर्यंत तरी कुणाला समाधानकारक उत्तर सापडलेले नाही.

विजुभाऊ's picture

24 May 2019 - 12:03 pm | विजुभाऊ
मराठी कथालेखक's picture

24 May 2019 - 3:23 pm | मराठी कथालेखक

रा घांचे (रागा नव्हे हं...) लेख वाचा

विश्वाचे आर्त - भाग २ - नासदीय सूक्त

महासंग्राम's picture

25 May 2019 - 11:24 am | महासंग्राम

देवाशप्पथ सांगतो माझा या विश्वाच्या उत्पातित काहीच हात नाहीये.

निसर्ग किंवा देव ह्यांनी मानवी मेंदू, डोळे,कान ह्यांना मर्यादा घातल्या आहेत त्याच्या पलीकडची कोणतीच जाणीव माणसाला होवू शकत नाही.
माणूस स्वतःच प्रश्न विचारतोय आणि माणूसच उत्तर देतोय .
विश्वाची निर्मिती कशी झाली ह्या सर्व शक्यता तेव्हाच खऱ्या आहेत असे समजले जाईल जेव्हा ह्या प्रचंड विश्वात दुसरे बुद्धिमान प्राणी मिळत नाहीत

मुळात 'उत्पत्ती' झाली कि नाहि हेच अजुन कळलेलं नाहि. आतापावेतो आपल्याला फक्त ट्रान्सफॉर्मेशन तेव्हढं थोडंफार कळलं आहे.

श्रि श्रि श्रि संत पित्रोदा म्हाराज म्हंत्यात 'हुवा तो हुवा'

विश्व कसे निर्माण झाले हा मानवी शक्तीच्या पलीकडल विषय आहे .
इथे मानवी शरीर रा विषयी सुधा मानवाला पूर्ण माहिती नाही .
विश्व कसे निर्माण झाले हा खूप मोठा प्रश्न आहे

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 May 2019 - 11:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

"हे जग मुळातून कसे निर्माण झाले?" याबाबत चर्चा करण्यास काहीच हरकत नाही. फक्त, या प्रश्नाचे आधुनिक शास्त्रिय उत्तर सर्व सर्वसामान्य माणसांच्या आणि बहुसंख्य शास्त्रज्ञांच्याही आवाक्याबाहेरचे असल्याने, मुक्त संस्थळावर त्याचे उत्तर मिळणे कठीण आहे.

Rajesh188's picture

28 May 2019 - 10:21 am | Rajesh188

100 billion star's milkyway मध्ये आहेत त्यातील एक आपला सूर्य .
आपली गलॅक्सी 100000 प्रकाश वर्ष अंतरात पसरली आहे .
बिलियन ऑफ गालॅक्सी मध्ये आपली एक galaxy.
आणि विश्वाची खरी साइज किती आहे हे सुध्दा आपल्याला माहीत नाही .
आपल्या जवळच्या ताऱ्याचे ग्रह नक्की किती आहेत ते सुधा माहीत नाही .
अशा परिस्थितीत विश्वाची निर्मिती कशी झाली हा खूप मोठा प्रश्न आहे .
जो काही अंदाज आहे तो फक्त अंदाज आहे आणि गणिती पद्धतीने सिद्ध करायचा प्रयत्न केला आहे त्यासाठी काही गोष्टी गृहीत धरल्या आहेत

हि सगळी चर्चा चालू आहे तो फक्त मटेरियल बद्दल.
परंतु अमटेरियलचे काय?
अमटेरियल ९६% आहे ना? ते कुठून आले?

बबन ताम्बे's picture

2 Jun 2019 - 12:45 pm | बबन ताम्बे

अमटेरिअल म्हणजे काय?
समजून सांगा ना प्लिज

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jun 2019 - 6:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

डार्क मॅटर म्हणायचे आहे त्यांना बहुतेक.

चामुंडराय's picture

3 Jun 2019 - 5:32 am | चामुंडराय

.

आपला सहभाग शून्य असतो तसेच विश्वाच्या उत्पत्तीत विश्वाचा सहभागही शून्य असावा असे मानायचे काय ?

आताच्या परिस्थिती मध्ये असा प्रश्न मनात आला की ह्या वर्षी पावूस पडलाच नाही तर माणूस काय करेल .
शेती आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध माणूस कसा करेल .
तर हे माणसाला शक्य नाही असा कोणताच मार्ग आधुनिक सायन्स कडे सुद्धा नाही .
पावूस कसा पडतो हे फक्त आपण सांगू शकतो पण ते सुद्धा 100 percent Satya नाही हे जेव्हा पावसा विषयी अंदाज चुकतात तेव्हा माहीत पडते .
सत्य तर हे आहे आपल्या खूप कमी माहिती आहे आपल्या स्वतःच्या ग्रह विषयी सुद्धा विश्व खूप लांबचा पल्ला आहे