गाभा:
आजच, मराठी साहित्य संमेलन होऊ देणार नाही, अशी वारकर्यांनी घेतलेली भूमिका वाचून विषाद वाटला.
माझी सर्व वारकर्यांना हात जोडून विनंति आहे की त्यांनी ही टोकाची भूमिका मागे घ्यावी. आनंद यादव यांनी माफी मागितलेली आहे. पुस्तकही परत घेतेले आहे. तंव्हा आता आणखी ताणू नये. वारकरी हे देवाला जवळचे. आपण जेवढे देवाच्या निकट जातो तसतसे आपल्यातली दयाळूवृत्ती वाढली पाहिजे. राग, लोभ, द्वेष, मत्सर वगैरे षड्रिपु गळून पडले पाहिजेत. खर्या अर्थाने वारकरी व्हा, कुणाचे तरी 'वार'करी होऊ नका.
प्रतिक्रिया
15 Mar 2009 - 1:42 pm | नितिन थत्ते
~X(
खराटा
(रंग माझा वेगळा)
15 Mar 2009 - 2:44 pm | प्रदीप
वारकर्यांपैकी एक ह. भ. प. बंडातात्या कराडकर म्हणाले:
"संतांच्या जीवनावरील प्रेमप्रकरणे साहित्यिकांनी छापायला सुरुवात केली तर आम्ही ते मुळीच सहन करणार नाही"
हे जर खरे असेल*, तर त्याने छान करमणूक झाली. खरं तर हे मी एकलव्य ह्यांच्या 'आजची मुक्ताफळे' मध्ये टाकणार होतो. पण तितक्यात हा धागा पाहिला, म्हणून येथे देत आहे.
[* वार्ताहर कधीकधी चुकुन अथवा जाणूनबुजून जे काही बोलले गेले असेल त्याचा विपर्यास करू शकतात, ही शक्यता अमान्य करत नाही].
15 Mar 2009 - 3:45 pm | सुनील
बालपणापासून पंढरीच्या वारकर्यांबद्दल असलेली आपुलकीची भावना गेल्या काही वर्षांपासून नष्ट व्हायला सुरुवात झालेलीच होती (ह्याला कारण काही थोडे वारकरी असू शकेल, पण संपूर्ण वारकरी समाजच बदनाम होत होता).
आनंद यादव यांच्या पुस्तकात काय लिहिले आहे याची कोणतीही शहानिशा न करता त्यांच्यावर टीका करणे आणि त्यांना पुस्तक मागे घ्यायला लावण्यात कोणताही शहाणपणा नव्हता. Dow प्रकरणातही वारकर्यांनी राजकारणच अधिक केले. आणि आता हा प्रस्तुत प्रकार म्हणजे मूर्खपणाचा कळसच आहे.
अवांतर - वारकर्यांचा मुक्काम पुण्यात असतो तेव्हा पुण्यातील बार आणि कुंटणखाने ओसंडून भरतात, हे कशाचे द्योतक?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
15 Mar 2009 - 4:51 pm | योगी९००
अवांतर - वारकर्यांचा मुक्काम पुण्यात असतो तेव्हा पुण्यातील बार आणि कुंटणखाने ओसंडून भरतात
सुनिलभाऊ, तुम्हाला हो हे कसे ठावूक..? (ह.घ्या.)
खादाडमाऊ
15 Mar 2009 - 5:30 pm | श्रावण मोडक
पुण्याच्या दक्षिणेकडे काही वर्षांपूर्वी झालेल्या एका साहित्यसंमेलनानंतरही असे झाल्याची (म्हणजे बुधवार आणि बारमध्ये गर्दी झाल्याची) कुजबूज कानी आली होती. (मुद्दाम ठळक करतो. हो! भलत्या शंका नकोत.)
19 Mar 2009 - 8:21 pm | सूहास (not verified)
म्हणजे आता त्या॑ना "बारकरी"म्हणायचे का ?
अवा॑तरःह्या शब्दाचा पे॑ट॑ट घ्यायचा विचार आहे सध्या आमचा
सुहास..
"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
15 Mar 2009 - 7:58 pm | प्रकाश घाटपांडे
समांतर- हे तीही माणसेच असल्याचे द्योतक
आमचे गुर्जी म्हणायचे कि वारीत सगळेच असतात हौशे गवशे नवशे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
15 Mar 2009 - 8:43 pm | mamuvinod
निषेध निषेध निषेध
वारकर्यानि राजकारण केले याबद्द्ल!
बाकि मि स्वत वारि करतो .काहि लोकामुळे सगळ्याना बदनाम करु नका हि कळकळिची विन॑ति मित्रा॑नो
बाकि देहुकरा॑चे राजकारण सदान॑द मोरे॑मुळे हे मात्र खरे
जय हरि
16 Mar 2009 - 1:23 am | हरकाम्या
मुळातच माझ्यामते वारकरी ही जमात निरुद्योगी जमात आहे. ही मंडळी झेन्डे घेउन
वाजत गाजत निघतात, वाटेत यांच्या खाण्यापिण्याची सोय होते.
काहीही कश्ट न करता ही मंडळी दरवर्शी हिंडत असतात. यांना साहित्यसंमेलनाविशयी
बोलण्याचे काहीही कारण नाही . यांनी आपली वारी नीट करावी. उगाच नसत्या फंदात
पडू नये नाहीतरी संत तुकारामांनी यांना संदेश दिलेला आहेच की
" ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असु द्यावे समाधान "
16 Mar 2009 - 5:11 am | विकास
कदाचीत वारकरी यादवांना "मऊ मेणाहूनी" पेक्षा "कठोर वज्राहून" हे सिद्ध करून दाखवत असावेत :-)
बाकी प्रकाशरावांनी म्हणल्याप्रमाणे - ती देखील माणसेच आहेत त्यातील काही अंश हा बुधवारात मिळाला म्हणून सर्व वारकरी "एकाच माळेचे" मणी आहेत असे म्हणायचे कारण नाही :-)
बाकी हरकाम्याचा प्रतिसाद वाचताना काही विचार आले :-)
>>>मुळातच माझ्यामते वारकरी ही जमात निरुद्योगी जमात आहे. ही मंडळी झेन्डे घेउन वाजत गाजत निघतात...
अहो ते फक्त वर्षाकाठी दोनदा वारी करतात (ते पण सर्वजण नेहमी करत नसतीलच...). इथे आपण सर्वच (माझ्यासकट) मिपावर दरोज वारी करतो. मग आपण कुठली जमात होवू? ;)
>>>काहीही कश्ट न करता ही मंडळी दरवर्शी हिंडत असतात.
तितकेसे पटले नाही. त्यांच्यासारखे दिंडीमधे आपण इतके चालत जाऊ शकू का? (नुसतेच शरीराने म्हणत नाही, मनाने देखील...)
>>>यांनी आपली वारी नीट करावी. उगाच नसत्या फंदात पडू नये
हे बाकी मान्य!
16 Mar 2009 - 6:20 am | अडाणि
हरकाम्ययांचे मुद्दे काही बरोबर नाहीत....
-
अफाट जगातील एक अडाणि.
16 Mar 2009 - 9:15 am | भडकमकर मास्तर
संपलेल्या विषयाला पुन्हा राजकारणी फोडणी असे मी म्हणेन..
अवांतर :
ती कादंबरी अगदीच सुमार होती, त्यातले उल्लेख अगदीच अनावश्यक असे माझे वैयक्तिक मत आहे...
बाकी आता सारे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचे राजकारण चालू आहे ...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
17 Mar 2009 - 9:54 am | मी असाकसा वेगळा...
"मुळातच माझ्यामते वारकरी ही जमात निरुद्योगी जमात आहे. ही मंडळी झेन्डे घेउन
वाजत गाजत निघतात, वाटेत यांच्या खाण्यापिण्याची सोय होते.
काहीही कश्ट न करता ही मंडळी दरवर्शी हिंडत असतात."
या वाक्याचा जाहीर निषेध......
17 Mar 2009 - 10:28 am | वेताळ
कांदबरीत देखिल आक्षेपार्ह काहीच नाही आहे.तसेच यादवानी जाहिरमाफी देखिल मागितली आहे.परंतु त्याच्या अंगावर धावुन जाउन वारकर्यानी खुपच मुर्खपणा केला आहे. देवाच्या नावाने त्यानी आता राडा करायला जी सुरुवात केली आहे ते बघुन आता वारकरी संप्रदायाबद्दल लोकांचे मत बदलत चालले आहे. शरणागताला माफी करावी हे जर ह्याना कळत नसेल तर हे कसले वारकरी?
वेताळ
17 Mar 2009 - 5:30 pm | छोटा डॉन
>>अवांतरः पंढरपुर मध्ये सर्वात जास्त वेश्याव्यवसाय चालतो.
ह्या वर्षातले आंतरजालावरचे सर्वात विनोदी विधान ...!!!
=)) =)) =))
वेताळसाहेब, तुम्ही काय वारकर्यांवर वार करायचा म्हनुन हे लिहलं आहे का ?
म्हणजे हे आतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण वगैरे आहे का ?
नसल्यास कुठल्या बेसवर आपण हे विधान केलेत ? हा डेटा आपल्याला कुठुन मिळाला ? म्हणजे पब्लिक जे बोंबलतं की पुण्या मुंबईत जन्नत आहे ते साफ वेडे ठरले की ...
असो.
आपले विधान हे खरोखर सत्य असल्याचे आपल्याला वाटत असल्यास मी आपणाला अजुन थोडी आतल्या गोटातील माहिती सांगतो ...
पंढरीतमध्ये वाळवंटच्या एका कोपर्यात "न्युड बीच" आहे व तिथे अनेक धंदे चालतात ...
भारतातला सर्वात मोठ्ठा तरंगता कॅसिनो चंद्रभागेवर आहे ...
पंढरीत घरांपेक्षा जुगाराचे अड्डे जास्त आहेत ...
अफु, गांजा व इतर मादक पदार्थांच्या लागवडीत पंढरीचा आशियात प्रथम क्रमांक लागतो ...
अनेक ईटालियन माफिया, दाऊद, राजन वगैरे आपल्या गँग्स पंढरीत बसुन चालवतात ...
इथे डुप्लिकेट नोटा छापायचा कारखानासुद्धा आहे ...
भारतभरच्या चोरलेल्या गाड्यांना इथेच नवे रुपडे चढवुन पुन्हा चढ्या भावाने त्या विकल्या जातात ...
अजुन बरेच आहे, सांगेन हळुहळु, काय ?
" प्रिय संपादकोहो, वर वर पाहताना माझा प्रतिसाद जरी सणकी वाटला तरी सत्य तसे नाही. त्यावरचा वेताळसाहेबांचा प्रतिसाद इथे बराच काळ होता. मी फक्त त्याला त्यांच्याच शैलीत उत्तर दिले आहे. सबब, माझा प्रतिसाद उडवायच्या आधी कॄपया वेताळसाहेबांच्या ह्यावर स्पष्तीकरण येण्याची वाट पहावी ...
कारण त्यांनी केलेले विधान हे वरकर्णी जरी साधे वाटत असले तर वास्तविक ते अतिशय गंभीर मानायला हवे ..."
------
( आतल्या गोटातला ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
17 Mar 2009 - 5:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
डानराव, कंपूबाजीची सुरूवात तिकडूनच झाली असणार ना? नाही तुम्हालाच सगळ्यात जास्त माहिती असेल म्हणून आपलं विचारलं!
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
17 Mar 2009 - 3:49 pm | चिरोटा
म्हणजे ह्या व्यवसायाची पन्ढरी पन्ढरीच?
18 Mar 2009 - 12:34 am | सुक्या
डाउ च्या आंदोलनापासुन वारकर्यांना (त्यांच्या नेत्यांना) राजकारणाची चटक लागली. लोकांना नाक घासुन माफी मागायला लावण्यात त्यांना असुरी आनंद मिळायला लागला. सध्याचे आंदोलन हे त्याचेच फलीत आहे. वास्तवीक आनंद यादवांनी माफी मागुन पुस्तक मागे घेतलं तेव्हाच हे प्रकरण मिटायला हवे होते. वारकर्यांचा आणि साहित्य सम्मेलनाचा तसा काही संबंध नाही. त्यामुळे यादवांनी अध्यक्षपद सोडावे ही मागणीच आवस्तव आहे. ह्या मागणीमागे संत तुकारामांची बदनामी झाल्यामुळे आलेली उस्फुर्त प्रतिक्रिया नव्हे तर राजकारण जास्त आहे. वारकरी सांप्रदायात शिरलेल्या ह्या असुरी प्रव्रुतींचा जाहीर निषेध. तळागालातला वारकरी, ज्याला लिहिता वाचता येत नाही किंवा त्याचा आवांतर वाचनाशी काहीही संबंध नाही त्याचा / त्याच्या श्रध्देचा वापर काही लोक करुन घेत आहेत. मला खात्री आहे की या आंदोलनकर्त्या वारकर्यांपैकी बहुतेकांना आनंद यादव कोण आहेत हे माहीतही नसेल.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
19 Mar 2009 - 8:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>मला खात्री आहे की या आंदोलनकर्त्या वारकर्यांपैकी बहुतेकांना आनंद यादव कोण आहेत हे माहीतही नसेल.
19 Mar 2009 - 10:03 am | विसोबा खेचर
हेरंबसाहेबांशी सहमत, आता हा वाद मिटावा.
आता निदान यापुढे तरी ज्ञानोबा-तुकोबांच्या आपल्या थोर संतांबाबत, संतपरंपरेबाबत कुणीही सोम्यागोम्या चिखलफेक करणार नाही अशी आशा आहे.
आनंद यादवांना योग्य तो धडा मिळाला. त्यांनी राजिनामा दिला हे बरेच झाले. तुकोबांबाबत काहीबाही बरळणारी व्यक्ति मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मुळीच असता कामा नये..
भागवत धर्माचा विजय असो..
पंढरीनाथाचा विजय असो..
लालबागच्या राजाचा विजय असो...
धन्यवाद..
आपला,
(वारकरी) तात्या.
19 Mar 2009 - 8:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आनंद यादवांना योग्य तो धडा मिळाला. त्यांनी राजिनामा दिला हे बरेच झाले. तुकोबांबाबत काहीबाही बरळणारी व्यक्ति मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मुळीच असता कामा नये..
हा हा हा ! ज्याची त्याची मतं असतात ! आपल्या मताचा आदर आहेच. :)
कादंबरी मागे घ्या ; घेतली. माफी मागा, मागितली. राजिनामा द्या ! दिला....!
आता बरं वाटतंय का वारकर्यांनो ! ... काही राहिलं असेल तर सांगा ! आनंद यादव तेही करतील.
वारकर्यांनो जिंकलात ! पण या निमित्तानं आम्ही मात्र ठरवलंय, यापुढे दर एकादशीला चिकन,मटन,खायचे, आणि (बदमाश )वारकर्यांच्या नावाने दोन घोट उडवून शिमगा साजरा करायचा !
-दिलीप बिरुटे
(संतापलेला )
19 Mar 2009 - 8:26 pm | छोटा डॉन
++++१,
सरांच्या प्रतिसादासाठी आमच्या टाळ्या ...!!!
बिरुटेसर आगे बढो, हम तुम्हारे साथ है ...!!!
अवांतर : आम्ही आमच्या उण्यापुर्या २५ वर्षाच्या आयुष्यात हजारोवेळा पाहिलेला वारकरी आणि सध्या मिडीयात दिसणारा वारकरी ह्यात जमिन आस्मानाचा फरक आहे.
आम्ही पाहिलेला वारकरी असा नव्हता ...
आता हे नवे वारकरी एकदा हटकुन पहायला हवेतच, बघु तर भागवतधर्माची पताका उंच धरणारे हात कसे आहेत ते ...
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
19 Mar 2009 - 8:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉन्या, यावरुन आठवलं ! आमचं गाव तालुक्याचं ठिकाण, आमच्या एका मित्राकडे दींडी उतरायची. तेव्हा त्या थकलेल्या वारकर्यांना पाणी देतांना, त्यांच्याशी हितगुज करतांना, सायंकाळी आमटी आणि बाजरीची भाकर वाढतांना काय आनंद मिळायचा सांगू.. अरे एक वारकरी वर्षानुवर्ष आमच्या ओट्यावर गप्प्पा मारायला यायचा..'हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा' म्हणत म्हणत खूप गप्पा मारायचा...!पैठणला एकनाथ षष्ठीला जातांना आजही तो वारकरी भेटतो जराही न बदललेला..मात्र या नव्या (आधुनिक ) वारक-यांना एकदा भेटलं पाहिजे ! ( धुतलं पाहिजे )
पुढच्या वर्षी आमचा हा पारंपरिक वारकरी भेटला तर, त्यांना विचारणार आहे, तुम्ही आनंदयादवांची कादंबरी वाचली का म्हणून !
-दिलीप बिरुटे
19 Mar 2009 - 9:36 pm | छोटा डॉन
आत्तापर्यंत मी प्रत्यक्ष पाहिलेल्या, वाचलेल्या, ऐकलेल्या आणि अनुभवलेल्या विवीध प्रकारच्या वारकर्यांचे थोडेसे विस्तॄत वर्गीकरण करता येईल किंवा त्यांचे गुणधर्म वेगवेगळे सांगता येतील ...
* पुर्वीचा वारकरी :
आता,
* आजचा वारकरी ( अगदी लेटेस्ट )
असे बरेच आहे, हळुहळु लिहीन ...
बाकी कुणाचा अपमान नाही करायचा पण एकदा "आत्मपरिक्षण जरुर करावे" हे मात्र आग्रहाने सुचवावेसे वाटते.
असो.
------
( बरेच वारकरी पाहिलेला ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
19 Mar 2009 - 9:52 pm | लिखाळ
डाऊ प्रकरणात वारकरी एकजूट झाले (कोणाच्या फायद्यासाठी ते नक्की माहित नाही) आता ती संघटित शक्ती सतत वापरात ठेवली पाहिजे नाहितर डाऊच्या वेळी केलेले संघटनेचे कष्ट वाया; असा एकदंरीत प्रकार असू शकेल. अधूनमधून त्यांच्या संघटनेला वापरुन घेण्यात कुणाचा मोठा फायदा दिसतो.
सध्याचा धुरळा काही तात्विक वाटत नाही. यादवांची मते-लिखाण-कर्तृत्व हा वेगळा मुद्दा राहील. त्याबद्दल तुकोबांबाबत आदर असलेल्या प्रत्येकाच्या मताला किंमत द्यावी लागेल.
-- लिखाळ.
19 Mar 2009 - 10:55 pm | छोटा डॉन
लिखाळरावांशी पुर्णतः सहमत ...
आपण अगदी अचुक विष्लेषण केले आहे.
>>यादवांची मते-लिखाण-कर्तृत्व हा वेगळा मुद्दा राहील. त्याबद्दल तुकोबांबाबत आदर असलेल्या प्रत्येकाच्या मताला किंमत द्यावी लागेल.
एकदम करेक्ट ...!!!
काही पुरावा नसताना असे बिनबुडाचे लिहणे चुकीचेच आहे व त्याबद्दल त्यांनी माफी मागितली हे योग्य नव्हे आवश्यकच आहे.
मात्र आमचा फक्त ह्या निमीत्ताने होणार्या "राजकारणाला, पुंडाईला आणि संघटनेच्या शक्तीचे वारंवार प्रदर्शन करुन इतर फायदा बघण्याला " विरोध आहे ...
तुकोबांबद्दल आणि त्यांच्यावर होत असलेल्या चिखलफेकीला विरोध करण्यांचाही आदर आहेच.
असली चिखलफेकीची हीन आणि हिडीस कॄत्ये कधीही निषेधार्ह्यच ...!!!
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
20 Mar 2009 - 3:33 pm | सूहास (not verified)
म्हणजे आता..
आधी "घोटोबा",मग 'मिट'ओबा,शेवटी विठोबा !! का
वा वा..
सुहास..
"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
20 Mar 2009 - 11:32 am | अभिरत भिरभि-या
स्वतःला देवाचे दास म्हणवणार्यांची ही उघड उघड झुंडशाही आहे.
आम्ही ठरवू तो नियम, तोच कायदा; म्हणवणार्यांना डोईजड करणे महाराष्ट्राला महागात पडेल.
नव्याने गवसलेले हे ब्लॅकमेलिंगचे अस्त्र अनेक ठिकाणी वापरले जाईल असे दिसते.
'क्षमा हाच धर्म' न मानणारे हे लोक वारकरी नाहीत.
पुरोगामी (???) महाराष्ट्राची एकूण वाटचाल आता तालिबानीकरणाकडे सुरू झाली म्हणायची.
20 Mar 2009 - 12:33 pm | सुधीर कांदळकर
उतरवून हवीं ती अनैतिक कृत्यें करावींत उदा. खोटें बोलणें, मद्यप्राशन, अभक्ष्यभक्षण वगैरे व नंतर पुन्हां माळ घालावी असे या वारकर्यांचे तत्त्वज्ञान असतें असें मी पाहिलेल्या वारकर्यांवरून घेतलेलें माझे निरीक्षण आहे.
पण दुर्दैवानें एकाहि मान्यवर साहित्यिकानें यादवांची बाजू घेतलेली नाहीं. बैलबाजारावेळीं जसे बहुतेक सगळे साहित्यिक एक झाले होते तसे. दुर्गाताईंसारख्या पुरुष साहित्यिकांची उणीव जाणवते.
खरें तर यादवांच्याच अध्यक्षतेखाली हे संमेलन व्हायला हवें होतें. मद्य व सामिष भोजनासह.
सुधीर कांदळकर.
20 Mar 2009 - 1:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
वारकरी समाजाबद्दल मला फार माहिती नाही त्यामुळे त्याबद्दल काहीही प्रतिक्रिया नाही. (तरीही मूठभर लोकांकडे पाहून सामान्य विधानं होऊ नयेत ही अपेक्षा!) पण हे विधानः
दुर्गाताईंसारख्या पुरुष साहित्यिकांची उणीव जाणवते.
यातला पुरूष हा उल्लेख नक्कीच खटकला.
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
20 Mar 2009 - 4:24 pm | सुधीर कांदळकर
संदर्भ आहे १९७५ सालचा. आणीबाणी चालू होती. संमेलनाच्या अध्यक्ष होत्या दुर्गाताई. तोपर्यंत एकाहि साहित्यिकानें आणीबाणीविरुद्ध चकार शब्द काढला नव्हता. दुर्गाताईंनींच प्रथम आणीबाणीचा निषेध केला. म्हणून एका मान्यवर साहित्यिकांनीं, बहुधा पुलं नी दुर्गाताईंचा 'मराठीतील एकमेव पुरुष साहित्यिक असा गौरव केला होता. त्यांनी आवाज केल्यावरच इतरांना कंठ फुटला. त्या तर माझें दैवत आहेत. तरी आपल्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमस्व.
सुधीर कांदळकर.