गिरणी कामगार देशोधडीला लागण्यामागे जबाबदार कोण?

घाशीराम कोतवाल १.२'s picture
घाशीराम कोतवाल १.२ in काथ्याकूट
17 Mar 2009 - 10:40 am
गाभा: 

गिरणीचा तो गप्प धुरांडा
ओकीत नाही आता धूर
परि भोंग्याची उगा भैरवी
ऐकुनी येतो भरुनी ऊर...!!!

आताच चंद्रकांत गोखले यांची काहि मुक्तके वाचली त्यावरुन हा सारा लेखन प्रपंच करत आहे मिपाकर ह्याविषयी सांगोपांग चर्चा करतील अशी आशा आहे


उध्वस्त गिरणगावांचे प्रातिनिधिक स्वरुप एका बाजुला बंद गिरणीची चिमणी तर एका बाजुला धनदाडंग्यांचे
टोलेजंग टॉवर आता गिरण गावाचे टॉवर गाव नाव होणार

१९८० सालि बोनसची टक्केवारी वाढवून मिळावी म्हणून गिरण्यांतील कामगारांनी संप पुकारला. या संपाचे नेतृत्व शिवसेनाप्रणीत गिरणी कामगार सेनेने केले. संपाला चार दिवस झाल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, बोनस रक्कम वाढवून मिळणे अवघड असून संप मागे घेण्याचे आवाहन करताच कामगारांनी नाराजी व्यक्त करून मैदान सोडले. थेट डॉ. दत्ता सामंतांच्या घाटकोपर येथील कार्यालयावर ते धडकले. कामगारांच्या आग्रहाखातर सामंत यांनी लढ्याचे नेतृत्व करायचे मान्य केले. केवळ बोनसच्या मागणीसाठी संप न करता ५८ कापड गिरण्यांतील अडीच लाख कामगारांना भरगच्च पगारवाढ व इतर फायदे मिळावेत म्हणून १८ जानेवारी १९८२ पासून संप पुकारण्यात आला. संपाला गिरणी कामगारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. सहा महिने होऊनही गिरणी कामगार कामावर जात नव्हते. मुजोर गिरणी मालक व भांडवलशाहीला शरण गेलेल्या सरकारची संप दडपून टाकण्याची भूमिका यामुळे १९८२च्या दीर्घ काळ चाललेल्या ऐतिहासिक संपाचा अंत कामगारांच्या अध:पातात झाला.

मुंबईतील मालकांनी संप मोडण्यासाठी गिरण्या सुरू केल्या खऱ्या, परंतु अधिक काळ गिरण्या चालविणे त्यांना शक्य नव्हते. गिरण्यांतून मिळालेले भांडवल त्यांनी पूवीर्च इतर उद्योगांमध्ये गुंतविले होते. सरकारचे दुर्लक्ष, आधुनिकीकरणाचा अभाव व गैरव्यवस्थापन यामुळे हा उद्योग आजारीपणाच्या विळख्यात सापडला. मुंबईतील गिरणी मालकांनाही हा उद्योग चालविण्यात रस राहिला नव्हता. गिरण्याच्या जमिनीवर त्यांचा डोळा होता. आधुनिकीकरणासाठी बिनव्याजी भांडवलाची आवश्यकता असल्याने अतिरिक्त जमीन विक्रीची परवानगी सरकारने द्यावी, अशी मागणी गिरणी मालकांनी सुरू केली. कामगार संघटनांचा जमीनविक्रीला प्रखर विरोध होता. सरकारही परवानगी देण्यास तयार नव्हते. जमीन विक्रीची परवानगी न दिल्यास आपण गिरण्या बंद करू अशा धमक्या मालकवर्ग देऊ लागला. १९८७ ते १९८९ या कालावधीत मालकांनी दहा गिरण्या बंद केल्या. २० हजार कामगारांचे संसार त्यांनी रस्त्यावर आणले.

तर ह्या मुंबईतल्या गिरणी कामगार देशोधडीला लागण्यामागे जबाबदार कोण?

१ संपाचे नेतृत्व करणारे डॉ दत्ता सामंत
२ मुजोर गिरणी मालक
३ आपले नालायक राज्य सरकार

छायाचित्र गुगलसेवे वरुन
लेखाचा भाग मटा वरुन

प्रतिक्रिया

mamuvinod's picture

17 Mar 2009 - 11:33 am | mamuvinod

अगोदर तुमचे मत काय आहे ते आम्हाला सा॑गा व मग आम्हाला विचारा;कसे?

परिकथेतील राजकुमार's picture

17 Mar 2009 - 11:41 am | परिकथेतील राजकुमार

कोतवाल साहेब तुमचे आणी आमचे काहि वैर नाहिये पण एक गोष्ट खटकली म्हणुन मुद्दाम लिहित आहे. आपल्या लेखातील काहि भाग हा महाराष्ट्र टाईम्स च्या एका लेखातुन जशाच्या तसा उचलला गेला आहे, परंतु त्यासाठी आपण मटा चे सौजन्य मान्य केल्याचे कुठेच दिसत नाही, असे का ? दुसर्‍याची विद्वत्ता स्वतःच्या नावावर का खपवायची हो ?

लेखनचौर्याचा महाविरोधक
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

घाशीराम कोतवाल १.२'s picture

17 Mar 2009 - 11:49 am | घाशीराम कोतवाल १.२

मला फक्त विचार मांडायचे होते ते मी मांडले फक्त लेखातला काहि भाग समान आहे आपण लिन्क दिल्या बद्दल धन्यवाद आणी चुकुन
मी लिन्क द्यायची राहिल्या बद्दल माफि असावी

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

घाशीराम कोतवाल १.२'s picture

17 Mar 2009 - 11:46 am | घाशीराम कोतवाल १.२

आज ह्या मुंबईतुन गिरणी कामगार देशोधडीला लागण्यासाठी डॉ दत्ता सामंत सर्व मिल मालक
तेव्हडेच राज्य सरकार ही जबाबदार आहे
मुंबईतील गिरण्या बंद झाल्यावर बेरोजगारी वाढली रिकाम्या हाताला काम नव्हते
मग उदय झाला मराठी भाईचा ह्या गिरणी कामगारांची मुले मग बनली भाई कारण रिकाम्या हाताला काम नव्हते
हिंदीत एक म्हण आहे खाली दिमाग शैतान का घर होता है !
याच प्रमाणे घरी खायचे वांदे झाले होते मग हि मुल तथागीत भाईच्या सापळ्यात अलगद अडकली
कारण त्यामुळे त्यांच्या घरचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला होता लोक त्यांना वचकुन राहात होत
त्यांचा रुबाब दरारा वाढला मग सुरु झाले टोळी युध्द मग गलोगली रक्ताचे पाट वाहु लागले
हि पोर किड्या मुग्यांसारखी मरु लागली एक तर पोलिसांच्या गोळी ने किंवा विरुध्द टोळी कडुन बळी पडले
आज हे तथाकित भाई डॉन एक तर देशाबाहेर आहेत किंवा राजकारणात आहेत पण मेले बिचारे गिरणी कामगारांची पोर

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

चिरोटा's picture

17 Mar 2009 - 11:55 am | चिरोटा

लोकशाही वगैरे असली तरी राज्य सरकारने वेळिच परिस्थिती आटोक्यात आणायला पाहिजे होती. मात्र त्यावेळी राज्य आणि केन्द्रात अस्लेल्ल्या लोकाना सम्प मोडणे राजकिय द्रुष्ट्या फायद्याचे होते.त्यावेळचे मुख्यमन्त्री (भोसले की अन्तुले) आणि इन्दिरा गान्धी ह्याना सामन्त प्रभावि आणि डोइजड होतिल ही भिती होती.म्हणुन सामन्त कोन्ग्रेस मध्ये असुनपण राज्य आणि केन्द्र सरकारने काहिच केले नाही.दत्ता सामन्त ह्यन्च्या कामगार आघाडीने पण जास्तच ताणुन धरले.'गिरणी कामगारान्शिवाय मुम्बै चालु शकत नाही' ही गुर्मी त्याना होती.
गिरणी मालकाना जास्त जबाब्दार धरता येणार नाही.जमीन त्यान्ची,त्या जमिनीला आलेले सोन्याचे भाव आणी डबघाइला आलेला धन्दा ह्यामुळे त्यानाही गत्यन्तर नव्हते.

मराठी_माणूस's picture

17 Mar 2009 - 12:05 pm | मराठी_माणूस

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, बोनस रक्कम वाढवून मिळणे अवघड असून संप मागे घेण्याचे आवाहन करताच कामगारांनी नाराजी व्यक्त करून मैदान सोडले

वर म्हटल्या प्रमाणे जर संप तेंव्हाच मागे घेतला असता तर , पुढील समस्या निर्माणच झाल्या नसत्या . अशा परीस्थीतीत स्वतः कामगार कीतपत दोषी ?

घाशीराम कोतवाल १.२'s picture

17 Mar 2009 - 12:11 pm | घाशीराम कोतवाल १.२

तेव्हा शिवसेना नुकतीच वयात आली होति आणी गिरणी कामगार सेना हि बालक होति त्यातल्या त्यात
कामगारांचा लाल बावट्या वर भयंकर विश्वास होता आणी त्यांना वाटले होते कि ह्यांच्या मुळे तरी बोनस आणी पगार वाढ मिळेल
म्हनुन पन त्यां बिचार्‍यांना काय माहित कि हा संप त्यांना किति महाग पडेल अहो ह्यांच्या नेत्याचा खुन पडला मुंबईतल्या गिरिण्या
बंद झाल्या तरी अधीक्रुतरित्या अजुनही हा संप मिटलेला नाही

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

प्रदीप's picture

17 Mar 2009 - 12:23 pm | प्रदीप

कामगारांचा लाल बावट्या वर भयंकर विश्वास होता आणी त्यांना वाटले होते कि ह्यांच्या मुळे तरी बोनस आणी पगार वाढ मिळेल

ह्यात लाल बावटा कुठे आला? सामंताच्या 'कामगार आघाडी'चा व लाल बावट्याचा काहीही संबंध नाही. लाल बावटा हे कम्युनिस्ट पार्ट्या अथवा अगदीच झाले तर शे. का. प. ह्यांच्या युनियन्सच्या संदर्भात वापरतात. जे भगवे अथवा हिरवे नाही, ते लाल असे तर नाही ना आपणाला म्हणायचे?

चिरोटा's picture

17 Mar 2009 - 12:34 pm | चिरोटा

आज भारत अमेरिकेच्या मान्डीला मान्डी लावुन त्यान्च्या हो त हो मिसळतो.त्यावेळी रशिया असायचा.६० आणि ७०च्या दशकात परळ्चे दळवी बिल्डिन्ग म्हणजे लाल भाइन्चा अड्डा होता.जवळ्पास सर्व युनियन्स लाल भाइन्कडे होती.त्यावर मात करण्यासाठी कोन्ग्रेसने शिव सेनेला लाल भाइन्वर सोडले.सेनेने मराठी/अमराठी मुद्दा वापरुन युनियन्स फोडायचे प्रयत्न केले कधी सरळ हल्ले करुन तर कधी धमक्या वापरुन.सामन्त लाल भाइ नव्हेत्.ते कोन्ग्रेस मध्ये होते. नन्तर विश्वास उडाल्यावर ते त्यातुन बाहेर पडले.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

17 Mar 2009 - 12:42 pm | घाशीराम कोतवाल १.२

भेन्डीबाजार साहेब हे मला माहित नव्हते आपण दिलेल्या माहिति बद्दल आभारी आहे
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

सुनील's picture

17 Mar 2009 - 2:06 pm | सुनील

अशीच चर्चा पूर्वी झालेली आहे.

कृपया हा लेख आणि त्यावर मी दिलेली ही प्रतिक्रिया वाचा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रदीप's picture

17 Mar 2009 - 3:19 pm | प्रदीप

बँग ऑन स्पॉट आहे. ह्यापुढे काहीही अधिक लिहीण्यासारखे नाही. सर्व काही जे यायचे ते ह्या प्रतिक्रियेत अचूक आलेले आहे.

विकास's picture

17 Mar 2009 - 11:56 pm | विकास

>>>बँग ऑन स्पॉट आहे. ह्यापुढे काहीही अधिक लिहीण्यासारखे नाही. सर्व काही जे यायचे ते ह्या प्रतिक्रियेत अचूक आलेले आहे.

अगदी हेच म्हणावेसे वाटले. बाकी दत्ता सामंत आणि लाल बावट्याचा काहीच संबंध नाही ही देखील वस्तुस्थिती आहे.

जाता जाता...

मॅसॅचुसेट्स राज्य (बॉस्टन राजधानी) आणि आसपासचा परीसर (ज्याला न्यू इंग्लंड म्हणतात) तेथे पण अशाच अनेक गिरण्या होत्या. मात्र कालांतराने त्या या ना त्या कारणाने हलवून आधी अमेरिकेतच दक्षिणेकडील राज्यात गेल्या, नंतर त्या आता बर्‍याचशा अजून खाली मेक्सिकोत गेल्या आहेत. त्याची कारणे पण स्थानिक अर्थव्यवस्था हीच होती. मात्र येथे असले संप करून फ्सवून झाले नाही कारण उद्योजकांनी त्यांच्या उद्योगाला योग्य निर्णय घेताना कुणाचा तरी (दत्ता सामंतसारख्यांच्या) उपयोग करून पाठीत सुरा खुपसण्याचा उद्योग केला नाही. आज हा भाग कापड गिरण्या आणि इतर कारखान्यांच्या बाबतीत अगदीच मर्यादीत झाला आहे आणि सेवा, आरोग्य, शिक्षण आणि बौद्धीक क्षेत्रात आघाडीवर आहे.

असे बदल घडत असतात ते प्रत्येकाला त्या वेळेस समजतीलच अथवा पचतीलच अशातला भाग नसतो. पण ते पारदर्शीपणे झाले तर समाजासाठी चांगले ठरते. तसेच नवीन अर्थव्यवस्थेसाठी मिळवून घेणे हे कठीण असले तरी काम करणे हे सर्वांनाच महत्वाचे ठरते.

त्यावेळेस ज्या अनेक चुका घडल्या त्यातील एक चूक होती: वृत्तपत्र, बुद्धीवादी आणि राजकारण्यांनी दाखवलेली "राष्ट्रीयकरणाची" वेडी आशा...ते हवे तसे घडले नाही आणि घडणार नव्हतेच कारण उद्योजकांना तेथून हलायचे होते हे निश्चितच होते.

काल गिरणी कामगारांच्या बाबतीत झाले तसेच आज कॉलसेंटर्सच्या आणि इतर अनेक आयटी संबंधी उद्योगांच्या बाबतीत...

गिरणी संपात मराठी माणूस भरडला गेला म्हणून एक वास्तव ओरडा होतो. म्हणूनच "गिरणी कामगार देशोधडीला लागण्यामागे जबाबदार कोण?" या ऐवजी त्यातून आपण एक समाज म्हणून काही शिकलो अथवा शिकणार आहोत का? हा आजचा जास्त प्रश्न आहे असे वाटते.

सुनील's picture

18 Mar 2009 - 12:51 pm | सुनील

बँग ऑन स्पॉट आहे. ह्यापुढे काहीही अधिक लिहीण्यासारखे नाही. सर्व काही जे यायचे ते ह्या प्रतिक्रियेत अचूक आलेले आहे.
धन्यवाद!

कृषिप्रधान अर्थव्यवस्थेतून औद्योगिक अर्थव्यवस्था आणि औद्योगिक अर्थव्यववस्थेतून सेवाक्षेत्रीय अर्थव्यवस्था ह्या चढत्या पायर्‍या आहेत. हे जेवढे राष्ट्राबाबत खरे आहे तितकेच शहराबाबतदेखिल.

विकास यांनी न्यू इंग्लंडचे उदाहरण दिले आहेच अगदी तसेच ते लंडनबाबतही घडले. अगदी पद्धतशीरपणे तेथील कारखाने हलवले गेले. पण हे झाले अत्यंत पारदर्शीपणे, लोकजागृती करून. मुंबईही त्याच मार्गाने जात आहे पण इथे पारदर्शीपणाचा अभाव, सवंग घोषणा करून सस्ती लोकप्रियता मिळवणार्‍यांचा सुळसुळाट.

गिरणी संपात मराठी माणूस भरडला गेला म्हणून एक वास्तव ओरडा होतो. म्हणूनच "गिरणी कामगार देशोधडीला लागण्यामागे जबाबदार कोण?" या ऐवजी त्यातून आपण एक समाज म्हणून काही शिकलो अथवा शिकणार आहोत का? हा आजचा जास्त प्रश्न आहे असे वाटते.
सहमत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

संदीप चित्रे's picture

19 Mar 2009 - 1:28 am | संदीप चित्रे

अगदी योग्य प्रतिक्रिया सुनील

अन्या दातार's picture

17 Mar 2009 - 8:20 pm | अन्या दातार

कुठलीही गोष्ट जास्त ताणली की तुटते. डॉ. दत्ता सामंतांनी जेवढे ताणले तेवढ्याच त्वेषाने गिरणीमालकांनीही मुद्दा ताणला. सरकारची निष्क्रियता ही अचंबित करणारी आहे (त्यामागे गिरणीमालकच असतील हे सांगायला ज्योतिषाची गरज नको)

चिरोटा's picture

18 Mar 2009 - 12:23 pm | चिरोटा

काल गिरणी कामगारांच्या बाबतीत झाले तसेच आज कॉलसेंटर्सच्या आणि इतर अनेक आयटी संबंधी उद्योगांच्या बाबतीत...

हे सध्या होतच आहे.बर्याच कम्पन्यानी आय्.टी कर्मचारी कपात चालु केली आहे.एकदम खुप कर्मचारी काढुन हन्गामा होण्यापेक्षा कम्पन्या आठवड्याला थोडे थोडे कर्मचारी काढतात्.शिवाय 'आम्हाला अजुनपण योग्य माणसे मिळत नाहीत' असेही म्हणतात.सुदैवाने इन्टरनेट् वगैरे क्रान्ती झाल्याने स्वत:चा विकास करण्यास भरपुर वाव आहे.परन्तु स्पर्धा पण खुप आहे.आज तुम्ही केवळ तुम्च्या आजुबाजुच्याच नाही तर तुमच्या क्षेत्रातल्या जगभरच्या लोकान्शी स्पर्धा करत असता.

पिवळा डांबिस's picture

19 Mar 2009 - 3:56 am | पिवळा डांबिस

आमच्या इथे पूर्वी कस्टमर सर्विस/ कॉल सेंटर म्हटले की भारतीय असायचे. अभिमान वाटायचा.
पण आताशी या सेवा श्रीलंका, ईजिप्त, कंबोडिया इत्यादि. इथून घेण्याचा कल दिसतो आहे...
भारतापेक्षा ते जास्त स्वस्त पडतं असं कारण दिलं जातं. खरं काय ते देव जाणे....

वरील मूळ लेखात गिरणी मालक, डॉ. सामंत आणि राज्य सरकार यांना संभाव्य दोषी म्हणून लिहिले आहे. पण खुद्द संप करणार्‍या गिरणी कामगारांचं काय? त्यांचा यात थोडादेखील दोष नाही काय? हे पटायला जरा अवघड वाटतं, कुणी जाणकार यावर प्रकाश टाकू शकेल काय?

विकास's picture

19 Mar 2009 - 8:40 am | विकास

वरील मूळ लेखात गिरणी मालक, डॉ. सामंत आणि राज्य सरकार यांना संभाव्य दोषी म्हणून लिहिले आहे. पण खुद्द संप करणार्‍या गिरणी कामगारांचं काय? त्यांचा यात थोडादेखील दोष नाही काय? हे पटायला जरा अवघड वाटतं, कुणी जाणकार यावर प्रकाश टाकू शकेल काय?

(सर्वप्रथम, मी जाणकार वगैरे नाही आणि "आहे" असा अजिबात गोड गैरसमज नाही! थोड्याफार माहीती आणि वाचनावर आधारीत. तेंव्हा चु.भू.समजून घ्यावी!)

कामगारांचा थोडाफार दोष आहे असे नक्कीच म्हणता येईल. मात्र तसे म्हणताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात असे वाटते:
तत्कालीन कामगारांची ह्या संबधातील व्यावहारीक समजशक्ती. तत्कालीन म्हणायचे कारण इतकेच की तेंव्हा तसे म्हणाल तर जीवन साधे असल्याने "आपण बरं आपलं काम बरं" म्हणत गुण्यागोविंदाने जगताना वाईट हेतूंचे विश्लेषण वगैरे करणे हे त्यांना जमले असेलच असे नाही.
कुठेतरी पैसे वाढतील अशी वेडी आशा लागली असेल तर त्यात नवल नाही. ती कुणालाही लागते.
कामगार युनियनच्या गुंडगिरीला तोंड देण्याची ताकद एकट्यादुकट्यात नसते आणि सामुहीक येण्याची हिंमत होत नाही. हे काही केवळ कामगारांनाच लागू नाही.

मात्र नंतर यावरून धडा घेतला तो पुणेकर कामगारांनी. टेल्कोमधे असाच एक नवीन दत्ता सामंत - मला वाटते - त्याचे नाव काहीतरी नायर असे होते, तो झाला. त्याने पण बेमुदत संप चालू केला. सुरवातीस त्याला आशेने आणि भितीने कामगारांनी पाठींबा दिला. पण नंतर प्रकरण हाताबाहेर जात आहे असे लक्षात आल्यावर त्याला चोप देऊन बाहेर काढले आणि टेल्कोची ताळेबंदी थांबवली.

संप न करता थोडाफार मध्यम मार्ग काढण्यात दत्ताजी साळवी यांनी चालू केलेली भारतीय कामगार सेना आणि दत्तोपंत ठेंगंडींनी चालू केलेला भारतीय मजदूर संघ (भामस) यशस्वी ठरले. एका माहीतीप्रमाणे आज भामस भारतातील सर्वात मोठी कामगार संघटना आहे.

पिवळा डांबिस's picture

19 Mar 2009 - 8:17 pm | पिवळा डांबिस

थॅन्क्यू, विकास!