विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा..

सर्व मिपाकरांना विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा..

मिसळपाव मध्ये आपले विचार व्यक्त करण्याचा हक्क आहे का

Primary tabs

स्वामि १'s picture
स्वामि १ in काथ्याकूट
8 Apr 2019 - 10:34 pm
गाभा: 

माझे या आधीचे चर्चेचे विषय मला कुठलाही पुर्व सुचना न देता वगळले गेले. ह्या चे काय कारण असु शकते

प्रतिक्रिया

शब्दानुज's picture

8 Apr 2019 - 10:55 pm | शब्दानुज

असे चार अोळीचे धागे काढणे मिपा धोरणात बसत नाही. संपादक मंडळाला असे धागे उडवण्याचा अधिकार आहे. नवे लेखन चर्चा येथे टिचकी मारल्यास (क्लिक केल्यावर) जे समोर येते ते पुर्ण वाचा.धागा थोडा मोठा काढा त्याची पार्श्वभूमी लिहा आपले म्हणणे व्यवस्थित मांडा. असे केल्यास धागा उडवला जाणार नाही.

स्वामि १'s picture

9 Apr 2019 - 8:35 am | स्वामि १

पुढील वेळेस योग्य रीतीने लिहीन. महाराष्ट्रात रोज काहीतरी घडामोडी होतच असतात. रोज चर्चेसाठी विषय पाढवला तर चालेल का?

भंकस बाबा's picture

9 Apr 2019 - 8:42 am | भंकस बाबा

धागा चालेल.
पण शुद्धलेखनाच्या एका चुकिसाठी 5रुपये तुमच्या खात्यातून परस्पर काढले जातील.

हलकेच घ्या

स्वामि १'s picture

9 Apr 2019 - 8:59 am | स्वामि १

धन्यवाद,
हे पाच रुपये कोणाच्या खात्यात जमा होतात

हलकेच घ्या

पाषाणभेद's picture

9 Apr 2019 - 9:17 am | पाषाणभेद

तुमच्याच.
पंतप्रधान बेरोजगार लिखाई योजनेत नाव नोंदवलेले आहे काय?
नसल्यास त्वरीत नोंदणी करा. अन तुम्ही ज्या विषयावर लिहीत आहात तर मग कच्या मालाला कमतरता नाही आणि तुम्ही फारच चांगला दिवसाचा रोज पाडाल.
समोर वर्तमानपत्र ठेवले की काढ धागा अन छाप पैसे.
छान कल्पना आहे. कुणाला सांगू नका.

पाषाणभेद's picture

8 Apr 2019 - 10:56 pm | पाषाणभेद

चर्चेचे विषय कोणते होते याचा उल्लेख करूनच धागा काढायचा ना!
अन तो हि उडवला तर मग नाव गुंफून जसे कवीता करतात ना नसा धागा काढावा.
जसे:

माझे नाव अमुक तमूक आहे.
झेल घेतल्याने सामने जिंकता येतात.
या. बसा. चहा पाणि घ्या.
आणि काय नाष्टा वगैरे?
धीर धरी धीर धरी सकळ गिरीधारी.
चेच्चेन्यावर रशीयाने दमन केले.
चमचा अन काटा कसे वापरावे?
र्चे (येथे बाद)
चेरापुंजी येथे पाऊस जास्त पडतो हि आता कथा झाली आहे.

असे.

असो. हलके घ्याल.

काय समस्या आहे? काहीतरी कारण असेल.

तुम्हीं तर पाषाण भेद न करता , अगदी चुराच करुन टाक़ला पाषाणाचा ....बुक्की मारून

स्वामि १'s picture

9 Apr 2019 - 8:35 am | स्वामि १

धन्यवाद

रानरेडा's picture

8 May 2019 - 6:33 pm | रानरेडा

नाही

Rajesh188's picture

8 May 2019 - 7:22 pm | Rajesh188

तुमच्या धाग्यावर जुने जाणते mipa कर
कमेंट देत आहेत .म्हणजे तुमच्या धाग्यात स्पार्क आहे
नाहीतर 1 सुधा कमेंट नसणारे धागे सुधा इथे आहेत.
तुम्ही लिहीत रहा.