परवानगी

निशा's picture
निशा in काथ्याकूट
20 Sep 2008 - 3:01 pm
गाभा: 

नमस्कार! मी एक लायब्ररीयन आहे. आमच्या लायब्ररीत संपुर्ण भारतातून ९० पेपर येतात.
माझ्या वाचनात आलेले लेख, कविता, बातम्या मी तुमच्या सोबत शेअर करु इच्छिते.
मी असे लेखन करु शकते का?

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

20 Sep 2008 - 3:07 pm | प्रकाश घाटपांडे

जरुर. मूल स्त्रोताचा संदर्भासहित लिहावे. लिंक द्यावी. साहित्य जालावर नसेल तर छापील संदर्भाची माहिती द्यावी.
प्रकाश घाटपांडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Sep 2008 - 4:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वागत आहे.

माझ्या वाचनात आलेले लेख, कविता, बातम्या मी तुमच्या सोबत शेअर करु इच्छिते.

कवितेंवर, लेखांवर, आगळ्या-वेगळ्या बातम्यांवर आपणास भाष्य नक्कीच करता येईल आणि त्याबरोबर आम्हा वाचकांना त्यावर मत मांडता येईल, काही नवीन माहिती मिळेल. तेव्हा आपले विचार इथे जरुर शेअर करा.

अधिक माहितीसाठी, खुलाशासाठी, मदतीसाठी, मिपाचालकांशी इथे संपर्क करा.

हे मिसळपावाचे धोरण :
http://www.misalpav.com/node/1196

मागे येथे कोणीतरी पु. ल. देशपांडे यांचे साहित्य जसेच्या तसे देऊ लागले होते, ते अयोग्य मानले गेले. बहुधा दुसर्‍या कुठल्या लेखकाचे लेखन जसे च्या तसे दिले तर तसेच मानले जाईल.

स्पष्ट खुलासा तात्या करतील.

विसोबा खेचर's picture

21 Sep 2008 - 12:39 pm | विसोबा खेचर

स्पष्ट खुलासा तात्या करतील.

लिहिणार्‍या प्रत्येक माणसाबद्दल व त्याच्या लेखनाबद्दल मिपाला अत्यंत आदर आहे परंतु मिपा सभासदांव्यतिरिक्त इतर कुणाचेही लेखन, तसेच पुढे ढकललेली इपत्रे इत्यादी लेखन मिपावर प्रसिद्ध करण्यास बंदी आहे.

एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून अन्य ठिकाणच्या दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद देण्यास हरकत नाही.

इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन जर मिपाकरांनी वाचावे व त्याच्यावर चर्चा घडवून आणावी असे जर एखाद्याला/एखादीला वाटत असेल तर त्याने/तिने संबंधित लेखनाचा दुवा द्यावा...

जर काही आस्वादात्मक, कलात्मक, अनुवादात्मक भाष्य करायचे असेल तरच मिपाव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेली एखादी कविता/गझल/लेख/ संदर्भाकरता म्हणून मिपावर प्रसिद्ध करण्यास हरकत नाही....

मिपा हे केवळ अन् केवळ मिपाच्या सभासदांना त्यांनी स्वत:नी केलेले लेखन प्रसिद्ध करण्याकरता बनवले गेलेले संस्थळ आहे याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे ही विनंती...

तात्या.

सूहास's picture

18 Mar 2009 - 5:41 pm | सूहास (not verified)

मलाही बरेच दिवस असा प्रश्न होता.

सुहास..

"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

विकि's picture

20 Sep 2008 - 11:46 pm | विकि

ते लेख,कविता,बातम्या जरूर लिहा .सतत नवनविन वाचणे त्यावर चर्चा करणे हा माझा स्वभाव आहे त्यामूळे आपण लवकरात लवकर लिहावे ही विनंती. शक्यतो साम्यवाद ,मराठी भाषेत विज्ञान साहित्य कमी असल्यामूळे भौतिक-रसायनशास्र,भूगोल ,इतिहास,राज्यशास्र,ग्रंथालयशास्र या विषयावरील लेख आपल्याकडे असल्यास आपण येथे लिहावेत .

निखिलचं शाईपेन's picture

18 Mar 2009 - 5:31 pm | निखिलचं शाईपेन

ब्लॉग वर लिहून त्याची लिंक इथे देता येईल ...

निखिलचं शाईपेन's picture

18 Mar 2009 - 5:32 pm | निखिलचं शाईपेन

अर्थात मुळ लेखकाच्या नावासहीत...

जयेश माधव's picture

21 Mar 2009 - 10:54 pm | जयेश माधव

खुपच छान!आयडीया,निशा.
कीप ईट अप!!
जयेश माधव

नरेश_'s picture

22 Mar 2009 - 10:23 am | नरेश_

स्वागत आहे.

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.