पाण्यातला दरवाजा

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in मिपा कलादालन
12 Mar 2019 - 7:14 pm

wg

एस्ना वॉटर लॉक. नदीवर धरण बांधल्यावर उंच भाग व सखल भाग रस्त्याने घाट बांधुन जोडता येतात पण जलवाहतुकीचे काय? यासाठी उंच भाग आणि सखल भाग या दरम्यान एक गोदी बांधली जाते. एका टोकाला उंचावरचा जलभाग आणि दुसरीकडे सरळ रेषेत खोल भाग. मधोमध गोदी आणि दोन्ही बाजुंना भक्कम दरवाजे. जहाज आत येताना गोदीत पूर्ण पाणी भरले जाते म्हणजे येणार्‍या जहाजाच्या जलपातळीसमान. खोल भागाकडचे दरवाजे बंद केले जातात, समान पातळीवरचे दरवाजे उघडुन जहाज आत घेतले जाते. दरवाजे पूर्ववत बंद होतात. जहाज दोराने गोदीच्या काठावरील दगडी खुंटांना बांधले जाते. मग खोल पाणी असलेल्या टोकाकडचे दरवाजे उघडले जातात व जहाज जागच्या जागी खाली खाली जात दुसर्‍या टोकाच्या पाण्याच्या पातळीवर येते . दोर सोडले जातात व जहाज निघुन जाते व दरवाजे पूर्ववत बंद होतात

प्रतिक्रिया

कंजूस's picture

13 Mar 2019 - 5:28 am | कंजूस

छान.

प्रभाकर पेठकर's picture

15 Mar 2019 - 1:47 am | प्रभाकर पेठकर

इजिप्तच्या नाईल नदीवरील एस्ना लॉक्स अनुभवले आहेत. जगभरात मला वाटतं असे लॉक्स ७-८ आहेत. नायगारा नदीवरही असे लॉक्स आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Mar 2019 - 6:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त..! माहितीबद्दल आभार.

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

15 Mar 2019 - 9:46 am | यशोधरा

असेच म्हणते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Mar 2019 - 9:48 am | डॉ सुहास म्हात्रे

थ्री गॉर्जेस धरणाजवळील पाचपैकी एक 'लॉक'

चौथा कोनाडा's picture

19 Mar 2019 - 4:42 pm | चौथा कोनाडा

सुंदर फोटो आणि माहिती !

अत्रुप्त आत्मा's picture

26 Mar 2019 - 3:51 pm | अत्रुप्त आत्मा

प्लस वण!

मदनबाण's picture

27 Mar 2019 - 3:44 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सौगंध मुझे इस मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा... :- PM Narendra Modi