गाभा:
मिपा माझे संस्थळ आहे. सारे मिपाकर तत्वतः माझे बांधव आहेत. माझ्या मिपावर माझे प्रेम आहे. माझ्या मिपावरील समृद्ध आणि विविध माहितीने लगडलेल्या इतर मिपाकरांचा मला आदर आहे. त्या माहितीचा कीस काढण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणुन मी सदैव प्रयत्न करीन. मी मिपामालकांचा ,मिपाकरांचा आणि इतर वडीलधार्या माणसांचा शक्य तेवढा (च!) आदर करेन आणि प्रत्येकाशी जमेल तितपत सौजन्याने वागेन. माझे मिपा संस्थळ आणि माझे मिपाबांधव ह्यांच्याशी जमेल तितका वाद घालण्याची प्रतिज्ञा मी करत आहे. फक्त माझ्याच रेटलेल्या मुद्द्याची भलामण आणि तळी उचलणे यातच त्यांचे सौख्य सामावलेले आहे !
प्रतिक्रिया
23 Feb 2019 - 9:15 pm | श्रीरंग_जोशी
मिपा प्रतिज्ञा आवडली.
यावरुन सासुरवाडी माझा देश आहे हे विडंबन आठवले.
24 Feb 2019 - 10:30 am | शशिकांत ओक
बुद्धिवादी लोकांना प्रिय असे बोल वाटले...
24 Feb 2019 - 10:42 am | Rajesh188
संबंध नसलेला reply देणार नाही .
पोस्ट la अनुसरूनच रिप्लाय आसेल आणि विरोध ला विरोध करणार नाही.
24 Feb 2019 - 11:27 am | Blackcat (not verified)
छान
24 Feb 2019 - 8:39 pm | अभ्या..
एकसाथ नमस्ते
तुम्हाला काय समजते
25 Feb 2019 - 11:38 am | विंजिनेर
आमच्या खरडवहीवरून ढापलेली दिसतेय...
27 Feb 2019 - 6:11 pm | यशोधरा
सगळे जुने मिपाकर कधी कधीच उगवता, जरा नियमित यायला काय होते!
28 Feb 2019 - 1:33 pm | विंजिनेर
रामराम! बरी आसा मां यशोतै?
28 Feb 2019 - 1:59 pm | यशोधरा
होय, बरा आसय, तुम्ही?
27 Feb 2019 - 3:03 pm | ज्योति अळवणी
आवडली प्रतिज्ञा
1 Mar 2019 - 12:25 am | थॉर माणूस
वाह, प्रतिज्ञा खासच. :) गेल्या काही दिवसात जे काही स्ट्राईक्स झाले त्यात शहीद झालेल्या आपल्या मिपाबांधव आयडींसाठी काही दोन मिनीटाचे मौन वगैरे पण पाळायचे आहे का? :) :)