[शशक' १९] - आठवणीतली ती

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
20 Feb 2019 - 6:02 pm

तिचं कुणाशीच जास्त पटायचं नाही, पण पहिल्याच नजरेत आमच्या दोघांची गट्टी जमली.
मी लिहीत असताना ती मला खिडकीतून पाहायची. मी काय लिहितोय याची तिला खूप उत्सुकता असायची. मला उशीर झाला की तिचे डोळे दरवाजाकडे लागलेले असायचे.
कॉलेजला गेल्यावर मात्र आमचं भेटणं आणि लहानपणीचा खेळकरपणा कमी होत गेला. पण नात्यातली ओढ मात्र अगदी निरागस, पहिल्या भेटीसारखी.
पावसाळ्याचे दिवस. अंधारून आलेलं. सहज खिडकीबाहेर लक्ष गेलं, नजरानजर झाली. पण का कुणास ठाऊक, ती निघून गेली, परत कधीही न दिसण्यासाठी.
आजही खिडकीतून बाहेर पाहताना ती शेवटची नजरभेट डोळ्यासमोरून तरळून जाते.
आणि चिखलात उमटलेली तिची इवलीशी पावलं आणि म्याऊ म्याऊ प्रतिसाद मनातल्या पावसात विरघळून जातात.

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

20 Feb 2019 - 6:59 pm | पद्मावति

:)

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Feb 2019 - 9:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

आवडली. :)

विनिता००२'s picture

21 Feb 2019 - 1:10 pm | विनिता००२

वा!

+१

एकविरा's picture

21 Feb 2019 - 2:41 pm | एकविरा

छान,वयाबरोबर निरगसता संपते हेच खरे

सविता००१'s picture

21 Feb 2019 - 4:21 pm | सविता००१

खूप म्हणजे खूप आवडली

शब्दानुज's picture

21 Feb 2019 - 9:18 pm | शब्दानुज

+1

कोण's picture

21 Feb 2019 - 9:39 pm | कोण

+१

ज्योति अळवणी's picture

23 Feb 2019 - 11:07 am | ज्योति अळवणी

आवडली

प्रमोद देर्देकर's picture

23 Feb 2019 - 12:48 pm | प्रमोद देर्देकर

+१

कुमार१'s picture

23 Feb 2019 - 3:10 pm | कुमार१

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Feb 2019 - 10:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

-दिलीप बिरुटे

वन's picture

24 Feb 2019 - 1:03 pm | वन

+१

मित्रहो's picture

25 Feb 2019 - 6:52 am | मित्रहो

हा हा

palambar's picture

25 Feb 2019 - 11:09 pm | palambar

+१