आता पुलवामा.

शब्दानुज's picture
शब्दानुज in काथ्याकूट
14 Feb 2019 - 11:14 pm
गाभा: 

सगळ्या न्यूज चॅनलवरची आजची ही बातमी. सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झालेला आहे. यात आपले चाळीसहून अधिक जवान शहीद झालेले आहेत.जैश -ए - मोहम्मदने याची जबाबदारी घेतली आहे.

या हल्यात माझ्या माहितीप्रमाणे दोन थिअरी समोर आल्या आहेत. एका कारमद्दे सुमारे दोनशे किलो स्फोटके भरलेली होती हा यातला समान धागा. एका थिअरीप्रमाणे ही स्पोटकाने भरलेली कार जवानांच्या ताफ्यावर जावून धडकली आणि स्फोट झाला. दुस-या थिअरीप्रमाणे रिमोटने कारमधील स्फोटके उडवण्यात आली.

यानंतर ठरलेली छापील 'मुहतोड जवाब'ची उत्तरे आपण ऐकत राहायची. निशेषाचे फलक नाचवायचे.
पुन्हा सर्जिकल स्ट्राईक की अजून काही यावर चर्चा होणार आणि प्रश्न तसाच भिजत पडणार.

बाहेरचे लोक येऊन स्थानिक तरूणांना भडकावतात हे समजू शकते पण हे तरूण भडकले जातातच कसे ? जर ते लोक ब्रेन वॉशकरु शकतात आपले सरकार काही लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे नेमून पडद्याआड वा समोरासमोर तरूणांना समजावू शकत नाहीत का ? सेनेपेक्षा पुर्ण सायलॉजिस्टकडून ट्रेन झालेले धर्मोपदेशक तरूणांना असल्या मार्गापासून जाण्यास का बरे रोखू शकणार नाहीत ?

असे करायचे कि सरळ मिलिटरीला मोकळे मैदान द्यायचे ? बंदूकीचा धाकावर शांतता किती दिवस टिकवून ठेवता येते ?

बाकीचे देश सरळसरळ दुस-या देशात आपले सैन्य घुसवतात तेव्हा आंतरराष्ट्रीय दबाव नसतो. भारतानेच हे असले दबावाचे अोझे किती दिवस वागवायचे ? असला दबाव न झुगारता येण्यासारखा असतो का ?

आर्थिक निर्बंध लागल्यास काही दिवस आर्थिक निर्बंध सहन न होण्याइतकी आपली अर्थव्यवस्था कमकुवत आहे का ?

आपल्याच भागावर दुसरा देश राज्य करतो आहे , तिथून दहशतवादी कॅंप चालवत आहे हे उघड असताना आपण तो मिळवण्यासाठी काहीच का करायचे नाही ?

एवढे आधुनिक तंत्रज्ञान आणि सैन्य केवळ स्वसंरक्षणार्थच का वापरावे ? स्वताः युद्धाची सुरवात आपण करत नाही ही मिरवण्याची गोष्ट आहे का ?

छोटमोठ्या उपचारच सतत घेत रहावे की सरळ एक शस्त्रक्रिया करून, त्यातला धोका स्विकारून मोकळे व्हावे ?

मुद्दे विस्कटलेले आहेत ह्याची जाणीव आहे. काहिंना हे बालीशही वाटतील तरीही जाणकारांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. अवांतर वादावादी नसतील ही अपेक्षा

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

14 Feb 2019 - 11:42 pm | अर्धवटराव

शहीदांना श्रद्धांजली _/\_
:(

Chandu's picture

15 Feb 2019 - 12:33 am | Chandu

वेट अँड वॉच

Chandu's picture

15 Feb 2019 - 12:33 am | Chandu

वेट अँड वॉच

Blackcat's picture

15 Feb 2019 - 4:41 am | Blackcat (not verified)

श्रद्धांजली

जालिम लोशन's picture

15 Feb 2019 - 1:50 pm | जालिम लोशन

अतिरेक्यांना की जवानांना.

नावातकायआहे's picture

15 Feb 2019 - 2:45 pm | नावातकायआहे

तुम्हाला हा प्रश्न पडला त्यातच आपली "बौधिक आणि मानसीक पातळी" लक्षात आली.

उगा काहितरीच's picture

15 Feb 2019 - 7:16 am | उगा काहितरीच

शहिदांना श्रद्धांजली !
खूपच दुर्दैवी घटना. शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये या घटनेचे कुणीही कोणत्याच प्रकारचे राजकीय भांडवल करू नये , सर्व देश शहिदांच्या दुःखात सहभागी आहेच. एकजुटीने परत परत अशा घटना घडू नये यासाठी मुळावर घाव घालावा.
शहिदांचे बलिदान कुठल्याही परिस्थितीत व्यर्थ जाऊ नये!

दिगोचि's picture

15 Feb 2019 - 7:38 am | दिगोचि

सर्व म्रुत जवानाना श्रद्धान्जली. जखमी जवानाना शुभेच्छा. या होणार्या दुर्घ्टनान्ची कारणे अनेक आहेत. त्यापैकी पाकिस्तानातून येणारे दहशतवादि हे एक व दुसरे म्हणजे इस्लाम आणि तिसरे म्हणजे सम्विधानातील कलम ३७०. गेली काही वर्षे ऑस्ट्रेलियात जेथे सर्व धर्मीयाना समान वगवले जाते तेथे मुसल्मान युवकानी अनेकाना ठार मारले आहे. याचे कारण ते मारेकरु मध्यपूर्वेत चाललेले युद्ध हे देतात. त्यामुळे सरहद्द बन्द केली तरी व आर्थिक परिस्थिति बदलली तरीहि दुर्दैवाने हे असेच चालू राहील.

गणपा's picture

15 Feb 2019 - 8:06 am | गणपा

जवानांना श्रधांजली _/\_

दुर्दैवानं आज भाजप विरोधीपक्षात असतं तर त्यांनी जे केलं असतं तेच सध्यचा विरोधीपक्ष करतोय. निदान असल्या प्रसंगी तरी राजकारण्यांनी आपले हेवेदावे बाजूला ठेऊन देशापाठी ठामपणे उभं रहायला हवं.
काश्मिरला आजवर देत आलेलं स्पेशल स्टेटचं कवचकाढुन सैन्याच्या हातातल्या बेड्या काढाव्यत. इतकी वर्षे गोंजारून काहीच फरक पडत नाहीये.

थंडकरून नंतर घास (बदला) घेतला ही जाईल कदाचीत, आणि ते बरोबरही असेल. पण ज्यांनी आज आपला मुलगा/नवरा/बाप/भाऊ गमावलाय त्यांच सांत्वन कसं व्हवं?
मुळात असे बदले घ्यायची वेळ पुन्हा पुन्हा आपण येऊ देतो हेच कुठे तरी चुकतय नाही का?
लेखकासारखेच अनेक प्रश्न मलाही पडतात. उत्तरं मात्र सापडत नाहीत.

शहिद जवानांच बलिदान व्यर्थ जाऊ नये. _/\_

अर्धवटराव's picture

15 Feb 2019 - 10:06 am | अर्धवटराव

शत्रु किंवा शत्रुत्व संपल्याशिवाय अशा जखमा मिळायचं थांबणार नाहि. भविष्यात काय वाढुन ठेवलय कोण जाणे :(

पूर्ण पाकिस्तानी जनता भारताची शत्रू नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते संपवणं ही भाषा नाही पटत .पण दृष्ट विचाराचे जे bhartach द्वेष करतात त्यांना संपवलाच पाहिजे .
आता शत्रुत्व का आसवे शेजारी राष्ट्रात .aiktar स्वार्थासाठी किंवा खरोखर अन्याय होत आसेल तर .
दोन्ही देशांचा विचार केला तर फक्त स्वार्थासाठी काही दृष्ट प्रवृत्तीचे लोक चालू ठेवत आहेत त्यातील दृष्ट प्रवृत्तीचा विनाश नक्कीच केला पाहिजे

शहीद जवानांना श्रद्धांजली.
अतिशय अस्वस्थ वाटत आहे..

खूपच दुःखदायक आणि संतापजनक घटना आहे .
आता पर्यंत आपल्या खूप शूर जवानांनी मातृभूमी साठी जीवाची आहुती दिली आहे .आपण श्रद्धांजली देवून आणि संताप व्यक्त करून घटना विसरून जावू पण ज्यांनी पती गमावला आहे ज्यांनी मुलगा गमावला आहे .ज्यांनी बाप गमावला आहे त्यांनी दुःख कसं visarav .
जम्मू आणि Kashmir ha अशांत भाग आहे आणि कधी ही हल्ला होवू शकतो ह्याची सैन्य दलातील अधिकाऱ्यांना जाणीव आसलीच पाहिजे 2500 जवान जेव्हा ऐका जागेवरून moove करतात तेव्हा खूप काळजी घेतलीच पाहिजे होती थोडी सुधा लापरवाही धोकादायक होवू शकते ह्याची जाणीव नेहमीच ठेवली पाहिजे जवानाचा जीव खूप किमती आहे .रस्ता मार्ग सुरक्षित नसेल तर हवाई मार्गे जवानांची वाहतूक करावी नियम बघत बसू नये . जवानांच्या राहण्याच्या ठिकाणी लोकवस्ती आसेल तर सरकारनी ताबडतोप ती hatvavi आणि 2/3 km cha area मध्ये दिसता क्षणी गोळी मारण्याचे आदेश 12 महिने हवेत मानव अधिकार नंतर पहिला जवान सुरक्षित पाहिजेत .

बाप्पू's picture

15 Feb 2019 - 11:22 am | बाप्पू

शहीद जवानांना भावपुर्ण श्रद्धांजली. !

जितका रोल आतंकवाद्यांचा आहे तितकाच काश्मीर मधल्या रॅडिकल मुस्लिम लोकांचा आहे. लोकल सपोर्ट शिवाय इतका मोठा हल्ला करणे शक्य नाहीये.
सामान नागरिक कायदा, इतर धर्मियांना सेकुलर या नावाखाली दिली जाणारी सूट आणि स्वातंत्र्य, लोकसंख्या नियंत्रण, कलम 370 हाटवने या उपायांनीच या पाकड्या आणि काश्मिरी दहशतवादी लोकांना वठणीवर आणले जाऊ शकते.. हा लॉन्ग टर्म उपाय आहे.

बाकी सर्जिकल स्ट्राईक, घरात घुसून मारणे, इ इ तत्कालीन उपाय देखील तितकेच गरजेचे आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Feb 2019 - 12:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

शहिद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. :(

डँबिस००७'s picture

15 Feb 2019 - 1:06 pm | डँबिस००७

शहीद जवानांना श्रद्धांजली.
अतिशय अस्वस्थ वाटत आहे कारण हे जवान अश्या परिस्थितीला तयार नव्हते.

ट्रुप मुव्हमेंटच्या प्लॅनिंग मध्ये चुक झालेली त्यामुळेच अश्या प्रकारची घटना घडु शकलेली आहे.

अश्या प्रकारची स्फोटकांनी भरलेली गाडी रस्त्याच्या विरुद्ध बाजुने ह्या ताफ्यावर आदळते ह्याच्यातच सर्व आलेल आहे !!

आता काश्मिरमध्ये कारवाईच्या वेळेला दगडफेक करणार्या मुलांना तरुणांना गोळ्याच घालायचे आदेश द्यावेत अन्यथा अश्या अनेक परिस्थीतींला तोंड द्यावे लागेल !

ट्रुप मुव्हमेंटच्या प्लॅनिंग मध्ये चुक झालेली त्यामुळेच अश्या प्रकारची घटना घडु शकलेली आहे.
अश्या प्रकारची स्फोटकांनी भरलेली गाडी रस्त्याच्या विरुद्ध बाजुने ह्या ताफ्यावर आदळते ह्याच्यातच सर्व आलेल आहे !

३०० किलो स्फोटकांनी भरलेली गाडी पुलवमाच्या रस्त्यावर कशी काय आली ?
ह्या रस्त्यावर चेक पोस्ट नाही का ? अस प्रश्न विचारला जातोय !!
मुळात पुलवामा रस्त्यावर तीन चेकपोस्ट होते ! डिसेंबर मध्ये एका काश्मिरी तरुणाने भरधाव गाडीने त्यातल्या दोन चेकपोस्ट उडवल्या व तिसर्या चेकपोस्ट उडवण्या आधी तिथल्या सैनिकाने ह्या
काश्मिरी तरुणाला गोळीने उडवले !
काश्मिरच्या मुफ्ति मेहबुबानी त्या सैनिकाची बदली करवली व चेकपोस्ट बंद केले!
चेकपोस्ट नसल्याने ईतका मोठा अनर्थ झाला !!

ट्रुप मुव्हमेंटच्या प्लॅनिंग मध्ये चुक झालेली त्यामुळेच अश्या प्रकारची घटना घडु शकलेली आहे.
अश्या प्रकारची स्फोटकांनी भरलेली गाडी रस्त्याच्या विरुद्ध बाजुने ह्या ताफ्यावर आदळते ह्याच्यातच सर्व आलेल आहे !

३०० किलो स्फोटकांनी भरलेली गाडी पुलवमाच्या रस्त्यावर कशी काय आली ?
ह्या रस्त्यावर चेक पोस्ट नाही का ? अस प्रश्न विचारला जातोय !!
मुळात पुलवामा रस्त्यावर तीन चेकपोस्ट होते ! डिसेंबर मध्ये एका काश्मिरी तरुणाने भरधाव गाडीने त्यातल्या दोन चेकपोस्ट उडवल्या व तिसर्या चेकपोस्ट उडवण्या आधी तिथल्या सैनिकाने ह्या
काश्मिरी तरुणाला गोळीने उडवले !
काश्मिरच्या मुफ्ति मेहबुबानी त्या सैनिकाची बदली करवली व चेकपोस्ट बंद केले!
चेकपोस्ट नसल्याने ईतका मोठा अनर्थ झाला !!

Pakistan var अत्यंत कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि त्या बरोबर सीआरपीएफ chya वरिष्ठ अधिकाऱ्याने हलगर्जी पण केला आसेल तर त्याच्या वर सुधा अत्यंत कठोर कारवाई आवशक्य आहे .चूक तर कुठे तरी झालीच आहे

काश्मीर ची लोकसंख्या 1.5 करोड आहे भारतातील सर्व राज्यात समान ह्या काश्मिरी लोकांना घर आणि जमीन द्या .
आणि काश्मीर मध्ये फक्त आणि फक्त फोर्स च आसेल .
ह्याचा हा फायदा होईल लोकांच्या अडून कोण्ही गुन्हेगार सुटणार नाही .

विजुभाऊ's picture

15 Feb 2019 - 2:29 pm | विजुभाऊ

राजेश लॉजिकली हे किती शक्य आहे? आणि किती दिवसासाठी? जे लोक येतील त्याना परत पाठवण्याची व्यवस्था काय.
एका सरकारने कश्मिरी पम्डीताना खोर्‍यातून हलवले त्या नंतर ते लोक पुन्हा घरी परत जाऊ शकले नाहीत.
आणि तेथून जे लोक येतील. ( तुमच्या मते दीड कोटी ) ते कसे येतील. वाटेत त्यांची सुरक्षा कशी घेणार? ते इथे आल्यावर कुठे रहाणार?
तुमच्या बुद्धीमत्तेचा आदर करुनही म्हणावेसे वाटते .उगाच काय कळफल मिळाला आहे म्हणून उगाच वाट्टेल ते टायपायचे?

टवाळ कार्टा's picture

15 Feb 2019 - 4:17 pm | टवाळ कार्टा

आणि यामुळे अख्या देशात जागोजागी स्लीपर सेल्स तयार झाले तर त्याची जबाबदारी कोणाची?

समीरसूर's picture

15 Feb 2019 - 2:08 pm | समीरसूर

खूप वाईट घटना! सगळ्या हुतात्मा झालेल्या जवानांना विनम्र श्रद्धांजली! हा क्रूरपणा बघून संताप येतो खरा पण त्याहीपेक्षा जास्त आपण काहीच करू शकत नाही या असहायतेचा राग येतो. दुर्दैवाने या प्र्श्नावर उत्तर तितकेसे सोपे नाही. हा प्रश्न इतक्यात मिटणारा नाही. मला वाईट वाटतं त्या जवानांचं, त्यांच्या माणसांचं! तरुण जवान एका झटक्यात मरण पावले. जगात कुठलीच गोष्ट अशी नाही ज्यासाठी कुणाला स्वतःचा अतिमौल्यवान जीव गमवायला लागावा. युद्ध, दहशतवाद या कारणांनी तर शेकडो-हजारो-लाखो जवान बळी जात असतात. त्यांना हे ही नीटसं माहित नसतं की त्यांच्या जीव कदाचित काही लोकांच्या मूर्खपणामुळे जातोय.

चौथा कोनाडा's picture

15 Feb 2019 - 3:12 pm | चौथा कोनाडा

शहिद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. :(

Blackcat's picture

15 Feb 2019 - 4:00 pm | Blackcat (not verified)

पुलवामा CRPF हमला: बीजेपी सरकार ने किया था रिहा, आज तक बना हुआ है सिरदर्द.

https://www.bbc.com/hindi/india-47242896?ocid=socialflow_facebook

डँबिस००७'s picture

15 Feb 2019 - 4:27 pm | डँबिस००७

नेहेमी प्रमाणेच ह्याची असंवेदनशील प्रतिक्रिया !!

Blackcat's picture

15 Feb 2019 - 6:09 pm | Blackcat (not verified)

31 दिसेम्बर काळा दिन - स्वतंत्र धागा काढला होताच की.

त्या प्रकरणी बाजपेयीं प्रधान , अडवाणी गृहमंत्री व डोवाल सरकारच्या बाजूने अतिरेक्यांशी बोलणी करायला होते.

जालिम लोशन's picture

15 Feb 2019 - 8:24 pm | जालिम लोशन

बहुतेक राष्ट्रविरोधी विचारधारेचा दिसतो आहे.एकतर नाव बदलुन प्रतिक्रिया टाकतो आणी दोन श्रधांजली कोणाला वाहतो आहे स्पष्ट टंकत नाही.

Blackcat's picture

15 Feb 2019 - 8:34 pm | Blackcat (not verified)

नाव न सांगायला मी जेनेरिक मेडिसिन नाही,

ब्रँडेड आहे.

भारत देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली.

पण आज हे ज्या अतिरेक्यामुळे झाले , त्याला एकेकाळी भाजपा सरकारने अभय दिले होते , जनतेने हेही विसरू नये , अन ह्यातून योग्य तो धडा घ्यावा.

तो विमान अपहरणा मुळे सोडावा लागला होता. त्या वेळेस जो निर्णय घेतला तो सर्व देशाचा होता. पक्षा चा काहीच संबन्ध लावू नका
अभय दिले असे म्हणून नका. सुदैवाने काँग्रेससहीत सर्वच विरोधी पक्षानी याचा दोष भाजप वर ठेवलेला नाहीय्ये. इतका प्रगल्भ पणा दाखवलेला आहे.
हीच गोष्ट जर काँग्रेस सरकार असताना घडली असती तर भाजप ने ते पाप शिलालेख करून रोजउगाळले असते

डँबिस००७'s picture

16 Feb 2019 - 11:37 pm | डँबिस००७

नाव न सांगायला मी जेनेरिक मेडिसिन नाही,
ब्रँडेड आहे.

काय सांगताय काय ? तुम्ही ब्रँडेड ? उल्हास नगरच्या लोवेस्ट ड्युप्लिकेटला स्वतःला ब्रँडेडे म्हणवुन घेताना बघावे लागेल असे वाटले नव्हते !

अहो तुमची आता पर्यंत मिपावरचे अवताराची गणती तुम्हाला स्वतःलाच नसेल ईतके ड्युप्लिकेट तयार केलेत तुम्ही ईतक्या कमी वर्षांत!!

विनिता००२'s picture

15 Feb 2019 - 4:28 pm | विनिता००२

शहिद जवानांना श्रध्दांजली __/\__

शहिद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली.

डँबिस००७'s picture

15 Feb 2019 - 5:12 pm | डँबिस००७

पुलवामाच्या दुःखद घटनेवर प्रतिक्रिया देताना नवज्योतसींग सुद्धुने आपली पाक धार्जिणी विचारसरणी पुढे केलेली आहे !
पाकिस्तान बरोबर चर्चा केल्याशिवाय हा प्रॉब्लेम सुटु शकणार नाही, असे हल्ले होतच रहाणार अस तो म्हणाला !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Feb 2019 - 8:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारताला जयचंदांची कमी कधीच भासलेली नाही. :(

सिद्ध ला हे समजत असाल पाहिजे की पाकिस्तान कधीच मान्य करणार नाही की हल्ला मध्ये पाकिस्तानच हात आहे मग पाकिस्तान शी काय चर्चा करायची .
मग चर्चा करायची कोणाशी ज्यांनी हल्ला केला त्या संघटनेशी ते तर हे धर्मकार्य समजतात .

शब्दानुज's picture

15 Feb 2019 - 8:39 pm | शब्दानुज

बाहेरचे लोक येऊन स्थानिक तरूणांना भडकावतात हे समजू शकते पण हे तरूण भडकले जातातच कसे ? जर ते लोक ब्रेन वॉशकरु शकतात आपले सरकार काही लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे नेमून पडद्याआड वा समोरासमोर तरूणांना समजावू शकत नाहीत का ? सेनेपेक्षा पुर्ण सायलॉजिस्टकडून ट्रेन झालेले धर्मोपदेशक तरूणांना असल्या मार्गापासून जाण्यास का बरे रोखू शकणार नाहीत ?

जर मुळ कारण धार्मिक असेल तर उपाय धार्मिक का नसतात ? या अतिरेक्यांविरुद्ध बोलणारे आणि मुस्लिम समाजात मान/ वजन असणारे कोणी मौलवी असतील की.

अशांना मॉब सायकॉलॉजी शिकवून , नीट पढवून कश्मीरला पाठवले तर काय होईल?

जर असे नसतील तर त्यांना ठरवून प्लांट करणे एवढे अवघड आहे का ?

डँबिस००७'s picture

16 Feb 2019 - 11:43 pm | डँबिस००७

जर मुळ कारण धार्मिक असेल तर उपाय धार्मिक का नसतात ?

जेंव्हा पासुन ईस्लाम सुरु झालेला आहे तेंव्हा पासुन उपाय शोधत आहेत मिळालेला नाही अजुन !!

तुम्ही कारण विचारत आहात म्हणजे तुम्ही ईतके नाईव्ह आहात की खरच तुम्हाला माहिती नाही ?

ज्या धर्मातच जिहाद शिकवला जातो तर त्याविरुद्ध धर्म रक्षण करणारे मौलवी तरी कसे जातील ?

शब्दानुज's picture

17 Feb 2019 - 12:18 pm | शब्दानुज

मला विचाराल तर इस्लामचे दोन मुखवटे आहेत. एक जो कट्टर आहे , ज्यात इतर धर्माला जागा नाही , जिहादमद्धे इतर धर्मांना संपवणे हे आहे.

दुस-या मुखवटा हा की इस्लाम म्हणजे शांतता , जिहाद म्हणजे चुकीच्या गोष्टीविरुद्ध दिलेला लढा. इत्यादि इत्यादि (चु.भु.दे.घे.)

आता मुळ ग्रंथात अमूक एक सांगितलेले आहे असे आपण मानले की विषय संपला. तिथे आपल्यासमोरचे सगळेच मार्ग बंद होतात.

आपण हातात हे आहे की या दोन भुमिकांबद्दल जाणूनबुजून गोंधळ उडवून देणे. मूळ ग्रथांत काही का असेना , जो मुखवटा भारताच्या हिताचा असेल असा त्याचाच प्रचार जोरकसपणे करणे.

पहिल्या उग्रवादी मुखवटाच्या प्रचार उघडपणे कोणताही मौलवी करणे हे आता तेवढे सोपे राहिलेले नाही. जर तसा कोणी प्रकार केलाच तर त्याला कायद्याची भाषा शिकवणे आलेच.

जे मौलवी म्हणतात की इस्लाम म्हणजेच शांतता (मनात काही का असेना) त्यांना काश्मीरमद्दे नेवून तीच वाक्ये बोलायला लावणे.

आता तिथे नेणे म्हणजे उचलली बॅग आणि पाठवणे असे नक्कीच अपेक्षित नाही. आधी त्यांना पढवणे , तयारी करून घेणे , इतर राज्यात जनाधार मिळवून देणे , नेटवर त्यांची भाषणे टाकणे , त्यांच्या जाहिराती करणे, सभा भरवणे , यांची भाषणे जम्मुत पोहचली जातील याची काळजी घेणे
दहशतवादी हल्ले झाले की हे इस्लामविरोधी आहे असे फतवे वारंवार काढणे इत्यादि इत्यादि

जाकिर नाईक हे वक्त्याचे समाजावर पडणा-या प्रभावाचे एक अतिशय नकारात्मक उदाहरण आहे. भारतहित जोपासणारा आणि तथाकथित इस्लामच्या चौकटीत बसणारा वक्ता उभा करणे आवश्यक आहे. उदा तारिक फतेह. (या माणसाला मानणारा समाज कितपत आहे ह्याबद्दल शंका आहेच. केवळ एक उदाहरण म्हणून ते नाव दिले आहे.वादावादी नसावी.)

थोडक्यात जर मूळ ग्रंथावरील विश्वासाला तुम्ही धक्का लावू शकत नाही तर त्या ग्रंथातील हिताच्याच गोष्टी जोरकसे पुढे आणणे आणि अहिताच्या गोष्टीं जर असतील तरीही त्या गोष्टी त्या ग्रंथात नाहीतच , तुम्ही चुकीचे अर्थ लावत आहात हे पटवून देणे हे होणार नाही का ?

२५ कोटी (वा जी असेल तितकी) लोकसंख्या असताना आपणा असे २० -२५ सुद्दा मौलवी न भेटणे एवढी वाईट परिस्थिती आहे ?

अशी अवघड परिस्थिती खरेच असेल तर सरकारने पडद्याआड अशा मौलवींना उभे करायला हरकत नसावी.

हे केवळ नव्या पिढीसाठी करणे शक्य आहे. ही पिढी तरूण होईपर्यंत हिंसाचार थांबवणे तरीही अवघड असणारच आहे.

शब्दबम्बाळ's picture

15 Feb 2019 - 9:00 pm | शब्दबम्बाळ

हुतात्म्यांना श्रद्धांजली!

काय बोलावे... किती जीव जावे लागतील या अघोषित युद्धात? कोणाची चुकी, कोणाचा बदला, कोणाची कडक निंदा... काय साध्य होणार...

ज्या कुटुंबांनी त्यांचे जिवलग गमावले त्यांनी काय करावं...
निदान ज्यांनी हौताम्य पत्करले आहे त्यांच्या मुलाबाळांना सर्व शिक्षण निःशुल्क करण्यात यावे, कुटुंबासाठी आरोग्यसेवा देण्यात यावी, सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्यक्रम देण्यात यावा.
या सगळ्याने गेलेले परत जरी येणार नसले तरी त्यांच्या कुटुंबाना "देश" आमच्यासोबत आयुष्यभर आहे हे तरी आश्वासन आपल्याकडून राहील.

आणि या सगळ्या सेवा दिल्या गेल्या तर त्या कधीच कुठल्या सैनिकाच्या कुटुंबाला वापरू लागू नयेत याची खबरदारी सरकारी यंत्रणांनी डोळ्यात तेल घालून घ्यावी.
जय हिंद!

सौन्दर्य's picture

15 Feb 2019 - 9:12 pm | सौन्दर्य

सर्व प्रथम ह्या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना विनम्र अभिवादन आणि श्रद्धांजली.

राष्ट्रीय पातळीवर ह्याचा योग्य तो आढावा घेतला जाईल आणि कृतीही होईल. ह्या सर्व गोष्टींबरोबर शहीद जवानांच्या कुटुंबियासाठी आर्थिक मदतीची तेव्हढीच गरज आहे. घटना घडून गेल्यावर आपण काही दिवस हळहळतो, दुखी होतो, श्रद्धांजली वाहतो, सोशल मिडीयावर लिहितो पण ह्या सर्वाबरोबर मागे राहिलेल्या कुटुंबियासाठी मदतीची आणि ती देखील आर्थिक, फारच जरुरी असते. सरकार त्या दृष्टीने योग्य पावले उचलील, सर्व शहिदांच्या परिवाराला शक्य तेव्हढी मदतही मिळेल, पण आपण सामान्य नागरिक म्हणून आपली थोडीफार जबाबदारी पार पाडली पाहिजे असं मला वाटते. सीमेवर जवान डोळ्यात तेल घालून जागृत असतो म्हणून आपण आपापल्या घरात निर्धास्त होऊन झोपू शकतो.

आपल्यातला प्रत्येक जण चाणक्यासारखी शेंडीला गाठ नाही मारू शकणार पण शक्य तेव्हढी आर्थिक मदत जरूर करू शकतो असे मला वाटते. माझ्या एका मित्राने ही साईट https://bharatkeveer.gov.in सुचवली आहे. मी शक्य तेव्हढी आर्थिक मदत करून माझा खारीचा वाटा उचलणार आहे.

मदनबाण's picture

15 Feb 2019 - 9:12 pm | मदनबाण

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जड़ पर वार करो तो बडे से बडा पेड़ भी गिर जाता है !
पाकिस्तान सगळ्या त्रासाची जड़ [ मूळ ] आहे, त्याच्यावरच वार केला तर हा सगळा इतक्या वर्षांचा रक्ताचा पाट कायमचा बंद होइल.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खून का बदला खून

Blackcat's picture

17 Feb 2019 - 12:22 am | Blackcat (not verified)

कस्टम ड्युटी : पाकमधून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर २०० टक्के कर

वृत्तसंस्था, नवी दिल्ली
राजनैतिक क्षितिजावर पाकिस्तानला एकटे पाडण्याची व्यूहरचना आखली जात असतानाच, भारताने पाकची आर्थिक नाकेबंदीही सुरू केली आहे. पाककडून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर भारताने २०० टक्के कस्टम ड्युटी आकारण्याचा निर्णय शनिवारी घेतला. त्याचवेळी पाकच्या दहशतवादी संबंधांची सर्व माहिती जागतिक व्यासपीठावर जाहीर करून या देशाला मिळणारी आंतरराष्ट्रीय आर्थिक मदत रोखण्यासाठीही भारताने पावले उचलली आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने शुक्रवारी पाकिस्तानचा 'सर्वाधिक पसंत देश' (मोस्ट फेव्हर्ड नेशन) हा दर्जा काढून घेतला. त्यापाठोपाठ आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पाकमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील कस्टम ड्युटीत वाढ केली आहे. सन २०१७-१८मध्ये पाकमधून भारतात होणारी निर्यात ४८ कोटी ८५ लाख डॉलर (सुमारे ३४८२ कोटी रु.) होती. त्यामुळे या निर्णयाचा पाकला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

Blackcat's picture

17 Feb 2019 - 12:24 am | Blackcat (not verified)

असे काय आहे की जे फक्त पाकिस्तानात मिळते ? 4000 कोटी भारत पाककडून आयात करतो !

आणि कस्टम ड्युटी डबल केली , तर इथला आयातदार भारत सरकारला डबल कर देईल ना ? म्हणजे नुकसान पाकिस्तानचे की आपल्या जनतेचे ?

डँबिस००७'s picture

17 Feb 2019 - 10:09 am | डँबिस००७

तुम्ही निर्बुद्ध आहात हे प्रत्येक वेळेला दाखवलेच पाहिजे असे आहे का ??

व्यापारी वस्तु विकत घेतो परत विकण्यासाठी !! २००% कस्टम ड्युटी भरल्यावर पाकिस्तानातुन आलेला माल हा भारतात उपलब्ध असलेल्या मालापेक्षा तिनपट महाग होतो असा महाग माल कोण विकत घेणार ??

Blackcat's picture

17 Feb 2019 - 10:42 am | Blackcat (not verified)

तुम्हीही अती निर्बुद्ध आहात,

पाकिस्तानच्या प ने भारतातील भ व्यापाऱ्याला माल विकला,

प हा त्याचे पैसे पूर्ण घेऊन माल डिलिव्हर करणार, म्हणजे त्याला भ ने त्याचे पूर्ण पैसे दिले, उधारीवर करायला हा गल्लीतला व्यवहार नव्हे, उदा 100 रु

पूर्वी त्यावर कस्टम ड्युटी समजा 20 रु होती

आता तो माल बंदरात किंवा कार्गो तळावर आला , सरकार बोलले , 100 अधिक कस्टम ड्युटी 40 भरा आणि माल घेऊन जा,

त्यांनतर तो माल महाग झाल्याने भ च्या घरात पडून राहील, प चे 100 व मोदी सरकारचे 40 त्यांचे त्यांना मिळणारच.

सातवी आठवी गणिताची पुस्तके जरा वाचून या.

डँबिस००७'s picture

17 Feb 2019 - 11:02 am | डँबिस००७

व्यापारी माल विकत घ्यायच्या अगोदर त्या मालावर किती ड्युटी पडेल व तो माल कितीला विकावा लागेल ह्याचा विचार करतो.

पाकिस्तानातला माल आता नॉर्मल किमतीच्या ३ पट पडेल. अशी वस्तु भारतातल्या व्यापा र्याच्या नफ्यासकट भारतात विकु शकणार नाही हे सर्व साधारण व्यापार्याला समजेल मग तो माल विकत घेणारच नाही !! पाकिस्तानातला माल भारतातील व्यापार्याने विकत घेऊ नये ह्याच साठी हा प्रयत्न चालु आहे.

आनन्दा's picture

17 Feb 2019 - 8:30 pm | आनन्दा

२००% केली आणि दुप्पट केली याच्या मध्ये थोडासा फरक आहे.
पण जाउ दे. तुम्हाला कोण समजावणार?

तुमचा चाहता वर्ग दुरावतोय अश्या वागण्याने! थोडी तरी मेथड ठेवा मॅडनेस मध्ये!!

डँबिस००७'s picture

17 Feb 2019 - 11:04 am | डँबिस००७

Blackcat

तुम्ही किती निर्बुद्ध आहात त्याचे उदाहरण तुम्ही वेळोवेळी दिलेलेच आहे !! त्यात अजुन एक भर !!

बाकी पाकिस्तानच्या वस्तु महाग होणार म्हणुन जो कळवळा तुमच्या तोंडावर दिसतो आहे तो बघुन आंनंद होत आहे !!

डँबिस००७'s picture

17 Feb 2019 - 11:07 am | डँबिस००७

२०० % ड्युटी म्हणजे १०० रु च्या वस्तुवर २०० रु कस्टम

वस्तुची भारतातली किंमत १०० रु मुळ किंमत + २०० रु कस्टम ड्युटी = ३०० रु

हे सर्व साधारण गणित तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही शाळेत गेलेला नव्हता हे सिद्धच होत आहे !!

Blackcat's picture

17 Feb 2019 - 11:52 am | Blackcat (not verified)

तसे धरले तरी भारतीय होलसेलरच खड्ड्यात जातो, पाकिस्तानच्या प चे 100 व मोदी सरकारचे 200 खिशातून घालवून तो माल घरात ठेवणे परवडणार नाहीच,

पाकिस्ताआतून भारतात शेती माल , द्राय फ्रुट , जिप्सम व सिमेंट येते म्हणे.

भारत पाक मुख्य दळणवळण गुजरात बंदरातून चालते म्हणे ! गुजरातवाले बघून घेतील ना ?

डँबिस००७'s picture

17 Feb 2019 - 12:07 pm | डँबिस००७

तुम्ही डोक्यावर पडले आहेत हे सिद्ध करत आहात !!

विशुमित's picture

17 Feb 2019 - 1:27 pm | विशुमित

तुम्ही डोक्यावर पडला आहात म्हणून तुमच (असं) डोक चालतय.

जागतिक व्यापार विषयी काहीतरी जागतिक नियम आहेत आणि ते सर्व राष्ट्रांना लागू आहेत त्या मुळे बंदी करता येत नाही पण हेवी duty लावायचा अधिकार प्रत्येक देशाला आहे .
Aikdya देशाच्या वस्तू चांगल्या असतील आणि त्या महाग सुधा खरेदी करायची तयारी आसेल तर रोखू शकत नाही

डँबिस००७'s picture

17 Feb 2019 - 12:06 pm | डँबिस००७

Aikdya देशाच्या वस्तू चांगल्या असतील आणि त्या महाग सुधा खरेदी करायची तयारी आसेल तर रोखू शकत

भारतातील ग्राहक हा स्वस्त वस्तुच घेणारा ग्राहक आहे त्या मुळे चीनच्या भरमसाठ वस्तु ईथे विकल्या जातात पण त्याच बरोबर चीनच्या वस्तुवर बॅन घालण्याची साद आली तर चीनच्या वस्तुंवर ग्राहक स्वतः बॅन घालायला पुढे येतो.
पाकिस्तान भारताला स्वस्त अ‍ॅग्री प्रोडक्टस देत आहे जे भारतात सुद्धा पिकतात ! त्यानिमित्त्याने भारतातील शेतकरी आपला माल जास्त विकु शकतील.
WTO च्या जागतिक व्यापार नियम नुसार इतर देशांच्या वस्तुवर बंदी करता येत नाही त्यामुळे भारत हे करत नव्हता

Blackcat's picture

17 Feb 2019 - 12:41 pm | Blackcat (not verified)

तस काय नाय होणार.

भारत पाक मुख्य व्यापार गुजरातेतूनच होतो ,

चार दिवसांनी राष्ट्रप्रेमाची भरती ओसरली की पुन्हा होईल पूर्वीसारखे.

डोवालच्या ब्रिटिश पोराच्या कम्पनीत एक पाकिस्तानी पार्टनर आहे म्हणे, त्याचे दुकान झाले का बन्द ? पाकिस्तानने इतके भारतीय लोक मारले म्हणून इतकी रिएक्शन , मग ब्रिटिशांनी काय कमी भारतीय मारले होते ?

पाकिस्तानने इतके भारतीय लोक मारले म्हणून इतकी रिएक्शन ......
मग ब्लॅककँट,
काय रीऍक्शन द्यायला हवी भारताने हे सांगता का प्लिज ?

ट्रम्प's picture

17 Feb 2019 - 5:51 pm | ट्रम्प

त्या काळ्या मावुला रेल्वे स्टेशन वर 5 रु चा कुल्हड़ मधला चहा पिवून स्टेशन वरचे फुकट चे वाय फाय वापरून प्रतिसाद टंकायची सवय आहे , त्या मुळे तो सतत वायफट बरळत असतो .

शब्दानुज's picture

17 Feb 2019 - 1:17 pm | शब्दानुज

आपण काय टाईप करत आहात याची नक्की जाणीव आहे का आपल्याला ?

एकाने खुन केला म्हणजे दुस-याला खुन करण्याचा परवाना मिळत असतो का ? इंग्रजांनी मारले म्हणून पाकिस्तानने येऊनही मारावे असे वाटते का तुम्हाला ?

आणि अमूकने तमूकला मारले एवढाच याचा मर्यादित अर्थ नसतो. काही गणवेशधारी सैनिकांना मारणे हे त्या देशाच्या सार्वभौमत्माला दिलेले आव्हान असते. त्यासाठी तितकाच ताकदीचा प्रतिसाद देणे आवश्यक असते. हे सरळसरळ युद्धासाठी आव्हान देण्यासारखेच आहे.

व्यापारावर निर्बंध हे तर काहिच नाही. आपल्या जागी जर ईस्राइल , अमेरिका असती तर सरळ युद्ध झाले असते याचे भान ठेवा.

Blackcat's picture

17 Feb 2019 - 1:54 pm | Blackcat (not verified)

पाकिस्तानने येऊन खून करावेत , असे मी म्हटले नाही,

हल्ल्याचा निषेधच केला आहे,

डोवालचे दुकान बंद झाले का , इतकेच विचारले

Blackcat's picture

17 Feb 2019 - 1:59 pm | Blackcat (not verified)

टाटा उद्योग पाकिस्तानशी अजिबात व्यवहार करत नाही , असे फेसबुकवर आले होते.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

17 Feb 2019 - 2:22 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

सहमत.
वीरमरण आलेल्या सैनिकांना श्रद्धंजली.
अजित डोवाल ह्यांच्या मुलाची ब्रिटनमध्ये हेज-फंड कंपनी असल्याचे वाचले होते. ती कंपनी त्याने जेमीनी सर्विसेस ह्या सौदी कंपनीला विकली. ह्या शिवाय 'इंडिया फाउंडेशन' ह्या संस्थेवरही तो आहे. ह्या संस्थेत अनेक राजकारणी पण आहेत. काही महिन्यांपुर्वी ह्या संस्थेला पैसा कोठून मिळतो अशी विचारण झाली होती पण त्याल उत्तर देण्यास सर्वानीच नकार दिला. असो.
गेल्या २ महिन्यात ३/४ हल्ले सी.आर.पी.एफ.वर झाले होते.
डिसेंबर- अनंतनाग- https://www.ndtv.com/india-news/6-security-personnel-injured-in-grenade-...
११ जानेवारी ला श्रीनगरच्या लाल्चौकात हल्ला https://www.tribuneindia.com/news/jammu-kashmir/militants-hurl-grenade-a...
११ फेब्रुवारीला ग्रेनेड हल्ला - http://risingkashmir.com/news/4-cops-3-crpf-men-among-11-injured-in-pall...

Blackcat's picture

17 Feb 2019 - 6:02 pm | Blackcat (not verified)

व्यापारावर निर्बंध हे तर काहिच नाही. आपल्या जागी जर ईस्राइल , अमेरिका असती तर सरळ युद्ध झाले असते याचे भान ठेवा.

मग मोदीना करायला सांगा युद्ध , त्यासाठीच तर निवडून दिले होते ना ?

लोकांच्या सांगण्यावरून थोडीच होणार आहेत युद्धे ? आपला शस्त्रसाठा काय आहे , किती आहे तिथली भौगोलिक परिस्थिती काय असल्या गोष्टी माहिती नसताना केवळ आपण युद्ध करा असे मोघम बोलण्यात काही अर्थ नाही. आणि पंतप्रधानांना सल्ले देण्याइपत मी मोठा नाही.

अमेरिका सारखा देश शस्त्रास्त्रे, तंत्रज्ञान, बळकट अर्थव्यवस्था याबळावर दादागिरी करू शकतो. आपणास ती मुभा सहज उपलब्ध नाही.

केवळ हल्याची तिव्रता दाखवण्यासाठी अमेरिका युद्ध करेल असे म्हटले आहे.

बाकी आपण सरकार विरोधी जरी असाल तरी सरकार शक्य ती कारवाई करेल यावर विश्वास ठेवण्याखेरीज तुमच्या वा माझ्या हातात काही नाही. तेव्हा वाट पहा.

Blackcat's picture

17 Feb 2019 - 8:16 pm | Blackcat (not verified)

हायला , काँग्रेसच्या काळात तर लोक सरकारला बांगड्या पाठवत होते की.

मी नुसते युद्ध करायला सांगितले तर सरकारविरोधी?

जाईल तिथे गांधींना नमस्कार करतात अन आता नेहरूंचे पंचशील की पंचतत्वे! हे भाजप आहे की काँग्रेस ?

डँबिस००७'s picture

17 Feb 2019 - 8:45 pm | डँबिस००७

तुमच्या भ्रष्ट काँग्रेसने केले होते ना राज्य ६५ वर्ष मग का नाही केला बंदोबस्त अहिंसेच्या मार्गाने ?

ब्रिटीशांना देशा बाहेर घालवल अहींसेच्या मार्गाने मग देशा बाहेर कधी कधी आक्रमण / युद्ध करणार्या देशाशी अहिंसा कामी आली नाही ?

टवाळ कार्टा's picture

17 Feb 2019 - 4:51 pm | टवाळ कार्टा

इथली चर्चा वाचून मिपा प्रशासन झोपा काढत आहे याची खात्री पटते