सेल्स गिमिक्स

Primary tabs

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
4 Feb 2019 - 4:50 pm
गाभा: 

सेल्स गिमिक्स
-------------------
आपलं प्रोडक्ट मार्केट मध्ये खपावे म्हणून सेल डिपार्टमेंट अनेक क्लुप्त्या लढवत असते
आमच्या जुन्या काळात डोंगरे बालामृत घर घरात पोहोचले होते
चवीमुळे लहान नन्हो बाळे पण ते आनंदाने घेत असत
हि गोष्ट ग्राईप वॉटर च्या डोळ्याला खुपली
बालामृत मध्ये अफूच्या बोन्डाा चा रस असतो असा अप प्रचार सुरु झाला
या मुळे तान्ह्या बाळाच्या मेंदूला धोका असे विधान करण्यात आले
परिणाम स्वरूप प्रोडक्त्त बंद झाले कारखान्याला टाळ लागलं
व मालक कर्जाच्या ओझ्याखाली दाबल्यानं भ्रमिष्ट झाला
आज हि ग्राईप वॉटर जोरात चालू आहे
डोंगरे यांचा नामो निशाणा राहिला नाही
-
९० साली वोलस कंपनीने क्वालिटी आईस्क्रीम कंपनी बळकावयाचें ठरवले
क्वालिटी च्या चीफ प्रोसेस म्यानेजला फितवले पैसे देऊन
ब्याचेस च्या ब्याचेस स्पॉईल होऊ लागल्या
कंपनीस तोट्यात जाऊ लागली
शेवटी क्वालिटी ने कंपनी वॊल्स ला विकून टाकली
आज वाल्स नावाचा डन्का वाजत आहे
-
क्या आपके टूथ पेस्ट मी नमक है ? असे विचारत आपल्या शुभ्र दन्त पंक्ती दाखवणा-या करीना माधुरीला आपण रोज पहातो
या जाहिरातीचा खर्च कैक कोटीच्या घरात असतो
अमेरिकेतील एका टूल डिझायनर ने एक क्लुप्ती लढवली व आपली योजना म्याकलींन कंपनीच्या मालकाला विकली बदल्यात त्याला भक्कम कमाई झाली
त्याने टूथ पेस्ट ची लोळी ज्या चोचीतून येते त्याचा डाय मीटर २५०% टक्क्यांनी वाढवला
परिणाम स्वरूप जी टूथ पेस्ट महिनाभर जायची ती २० दिवसात संपू लागली
कंपनीचा सेल विना जाहिरात वाढला कम्पनीने व त्या इंजिनियर ने पैसा कमवला
-
पेप्सी कोला भारतात येण्यास आतुर होता
महाकाय मार्केट त्याला खुणावत होते
पण थम्ब्स अप जोरात चालू होते
मार्केट मध्ये त्यांची वितरण विक्री व्यवस्था अभेद्य होती
पेप्सी ने आपला मोर्चा किरकोळ टप-या वडाप्पा बनवणारी दुकाने या कडे वळवला
त्या ना पढवून ठेवले
तप्त उन्हाळ्यात जेव्हा गीं-हाइक थम्प्स अप माहे त्यावेळी तापते मालक म्हणायचा साव है मगर गरम है पेप्सी दिसू थंडा है
पेप्सीचा बिल्ला दुकानदार जपून ठेवत असे
गीं-हाइक हो म्हणायचे
सायंकाळी एका बिल्ल्याला एक रुपया मिळत असे
हा म्हणता पेप्सी ने मार्केट कमावले
थम्स अप मोडी च्या भावत गेले
आज पेप्सी कोलाचा बोलबाला आहे
थम्स अप ब्रँड त्यांनी तसाच ठेवला व विकत आहेत
म्यांगोला व गोल्ड स्पॉट मात्र मिरिंडा नावं विकला जातो
-
आपणस पण असे किस्से माहीत असतील तर शेर करावेत

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Feb 2019 - 5:01 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

गेला रे तो काळ अवी. उद्योजकांनी येणार्या काळाची पावले ओळखून त्यात बदल करायचा असतो. थम्स्प-अप म्हणतोस तर ती कंपनी रमेश चौहान ह्यांनी कोकाकोलाला विकली.

जालिम लोशन's picture

4 Feb 2019 - 9:16 pm | जालिम लोशन

थम्पसअपचे सगळे outsource bottling plant कोकाकोला वाल्यांनी विकत घेतले व बाजारातील त्पांनचा supply बंद केला.

गवि's picture

4 Feb 2019 - 5:01 pm | गवि

रोचक विषय.

इतरही अनेक अशा गोष्टी, भानगडी, जुगाड असतील.

जाता जाता, बाय द वे, थम्स अप हा ब्रँड कोका कोला कंपनीने घेतला, पेप्सीकोने नाही.

दीपक११७७'s picture

4 Feb 2019 - 7:48 pm | दीपक११७७

भारी विषय आणि मांडणी, काही आठवलं तर नक्की लिहिलं इथे

दीपक११७७'s picture

4 Feb 2019 - 7:48 pm | दीपक११७७

भारी विषय आणि मांडणी, काही आठवलं तर नक्की लिहिलं इथे

सर टोबी's picture

4 Feb 2019 - 9:36 pm | सर टोबी

आपल्या किश्श्यातील बऱ्याच गोष्टी सांगोवांगीच्या गोष्टी असाव्यात असे वाटते. तरीपण 'उद्योग विश्वातील विस्मयकारक गोष्टी' असा एकूणच मोठा विस्तार असणाऱ्या विषयाला अनुसरून अभ्यासू प्रतिसाद यावेत या तुमच्या भावना पोहोचल्या. तरीपण या सांगोवांगीच्या गोष्टींचा समाचार घेऊ या.

डोंगरे बालामृत हे कधीच आघाडीचे उत्पादन नव्हते. उलट खूप बोलबाला असणारे परंतु शून्य अस्तित्व असणाऱ्या गोष्टींचे प्रतीक म्हणून दत्तो वामन पोतदार किंवा असेच कोणीतरी डोंगरे बालामृतचा दाखल द्यायचे. बऱ्याच वर्षांपूर्वी वरुणराज भिडे यांनी अशा बऱ्याच कर्णोपकर्णी प्रसिद्ध असणाऱ्या परंतु सत्य नसणाऱ्या घटनांचा मागोवा घेतला होता. त्यात दक्षिण मुंबईच्या एका हॉटेलमध्ये ब्रिटिश राजवटीत अपमान झाला म्हणून स्वतःचे आणि ब्रिटिश सुद्धा अभिमानाने राहतील अशा हॉटेलची निर्मिती करणाऱ्या जमशेटजी टाटा यांचा किस्सा, ताज हॉटेल बांधून झाल्यावर, आपल्या कल्पनेपेक्षा विपरीत वस्तूची निर्मिती झाली म्हणून तडक गेटवेच्या भिंतीवरून समुद्रात जीव देणारा रचनाकार, लिरिलच्या जाहिरातीतील पहिल्या मॉडेलचा शूटिंगच्या दरम्यान झालेला अपघाती मृत्यू वगैरे गोष्टींचा समावेश होता. लिरिलची मॉडेल म्हणे सूर मारण्याच्या प्रसंगात, डोके दगडावर आपटून मृत्यू पावली. ज्या दिग्दर्शकाने हि जाहिरात उलट्या क्रमाने शूट केली (म्हणजे ओले केस बोटांच्या चिमटीमध्ये निथळून घेणे, दगडावर ठेवलेल्या लिरिलच्या वडीकडे तिरपा कटाक्ष टाकणे, धबधब्याखाली डोके इकडे तिकडे हलवून तुषारांचा आनंद घेणे, आणि शेवटी सूर मारणे) त्याच्या टेलेपथीला सलाम!

एखादे प्रस्थापित उत्पादन कोको कोलाच्या पद्धतीने उखडून टाकणे हे अविश्वसनीय आहे. कोको कोलाने बॉटलिंग पार्टनर्स आपल्या बाजूने वळवून घेतले आणि पारले कंपनीला व्यवसाय करणे मुश्किल केले. विक्रेत्यांना भरपूर कमिशन, भरपूर क्रेडिट देणे वगैरे युक्त्या वापरल्या जातात. कोको कोलाने पार्लेची उत्पादने विकत घेतल्यानंतर ती बाजारात विकनेच बंद केले होते. त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या मूळ उत्पादनांचीच विक्री धोक्यात आली. शेवटी थम्प्स अप आणि लिमका यांचे उत्पादन त्यांना परत सुरु करणे भाग पडले. परंतु गोल्ड स्पॉट मात्र त्यांनी यशस्वीरीत्या बंद पाडले.

क्वालिटी आईस्क्रीमच्या बाबतीत, क्वालिटी आणि लिव्हर यांच्यात सामंजस्य करार आहे अशी माहिती मिळते.

हा म्हणता पेप्सी ने मार्केट कमावले
थम्स अप मोडी च्या भावत गेले

हे खोटे आहे.
थम्स अप अजूनहखतेपते. उलट थम्स च्या यशामुळे पेप्सी ला "ग्रो अप मुन्ना " ही कँपेन चालू करावी लागली.
थम्स अप हे पारले कंपनीने कोका कोला ला विकले.
आजही थम्स ची त्याना स्पर्धा वाटते.
पेप्सी आणिकोकाल्कोला ने ने स्थानीक ब्रँड्स कसे डबघाईला आणले याचे अनेक किस्से आहेत.
उदा : स्पर्धक कंपनीच्या पेयाच्या रिकाम्या बाटल्या खरेदी करून त्याना त्या पुन्हा वापरासाठी उपलब्ध करुन न देणे ई.

टूथपेस्टच्या ट्य्प्प्बचे तोंड २५०% ने वाढवल्यावर किती होईल अंदाज तरी आहे का?

म्यांगोला आणि थम्सअप सर कोणत्याही कोल्ड्रींगला नाही.

भंकस बाबा's picture

6 Feb 2019 - 8:42 am | भंकस बाबा

ला पाठिंबा देण्यासाठी mtnl आणि bsnl लंगडे केले गेले होते, त्या बदल्यात कोणाच्या तरी जावयाला स्ट्रेटेजिक गुंतवणूक म्हणून एक रूपयाने शेयर पण अलॉट झाले होते

भंकस बाबा's picture

6 Feb 2019 - 8:43 am | भंकस बाबा

ला पाठिंबा देण्यासाठी mtnl आणि bsnl लंगडे केले गेले होते, त्या बदल्यात कोणाच्या तरी जावयाला स्ट्रेटेजिक गुंतवणूक म्हणून एक रूपयाने शेयर पण अलॉट झाले होते

भंकस बाबा's picture

6 Feb 2019 - 8:52 am | भंकस बाबा

अंधेरी पश्चिम मुंबई येथे असलेल्या बैठया म्हाडा वसाहतीत बिल्डरने पुनर्विकास करण्याचे करार केले , म्हाडा कंडीशन व ज्यानी वन प्लस केले आहे त्यांच्या करारात मोठी तफावत होती. बिल्डरला दुप्पट जागा ज्यानी अतिरिक्त बांधकाम केले आहे त्याना द्यावी लागणार होती. कोणी एका सेवाभावी संघटनेने जनहित याचिका दाखल केली व कोर्टाने नोटिस पाठवून अतिरिक्त बांधकाम तोडायला लावले . आता वर बांधकामच नाही तर करार कसले !

अनुप ढेरे's picture

6 Feb 2019 - 12:02 pm | अनुप ढेरे

असाच किस्सा इंडिका लाँच झाल्यावर स्पर्धकांनी अडथळा आणण्यासाठी केलेल्या क्र्लृप्तीबद्दल ऐकला आहे. स्पर्धकांनी पुणे मुंबै ये जा करणार्‍या इंडिका चालवणार्‍या ड्रायव्हर लोकांना गाडी बिघडलेली नसताना, रस्त्याच्या बाजुला बॉनेट उघडुन ठेवायला पैसे दिले. जाणायेणार्‍या लोकांना दिसताना काय दिसलं की गाडी बंद पडली आहे आणि ती गाडी इंडिका आहे. असं अनेकदा आणि अनेक ठिकाणी दिसल्यास नक्कीच गाडीच्या दर्जाबद्दल संशय मनात येतो लोकांच्या.
खखोदेजा

चौथा कोनाडा's picture

16 Apr 2019 - 5:18 pm | चौथा कोनाडा

हा किस्सा मी पान ऐकलेला आहे !

स्वलिखित's picture

10 Feb 2019 - 3:30 pm | स्वलिखित

दुसऱ्याची बुंगवायचीच म्हणल्यावर jio चेच उदाहरण घ्या

Chandu's picture

11 Feb 2019 - 6:07 pm | Chandu

पुणे बंगलोर हायवे वर खूप धाबे आहेत.आमच्या गाव च्या एकाने पण टाकला.पण तो competition मुळे चालत नव्हता.त्याने गावात लया चार पाचजणां ना सांगून त्यांच्या कार्स धाब्या पुढे नुसत्या ला वून ठेवल्या.रोज त्या गाड्या पुसायचा..नन्तर एका दिवंगत नटाचा मोठा फोटो लाव ला .
मग काय धंदा फुल.

पुणे बेंगलोर हायवे, खंबाटकी बोगद्याच्या अलीकडचे हॉटेल का???
मोठा माणूस फेम??

चौथा कोनाडा's picture

16 Apr 2019 - 5:19 pm | चौथा कोनाडा

मी या धाग्याचे नाव "सेक्स गिमिक्स" असं वाचलं.
उघडला अन फसगत झाली ना राव !