एव्हढ्यातच काय गुंतवणुक केलीत?

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in काथ्याकूट
17 Oct 2017 - 1:59 am
गाभा: 

एव्हढ्यातच काय बचत केलीत? या धाग्यावरुन सुचले म्हणुन टंकतो आहे. एव्हढ्यातच काय गुंतवणुक केलीत?

माझे सांगयचे तर फार पुर्वी उत्पन्न कमी असताना आणि राष्ट्रीय बचत पत्रे ऑन मॅच्युरीटी (मराठी शब्द?) करमुक्त असताना त्यात पैसे गुंतवायचो. शिवाय पी.पी.एफ मध्ये पैसे टाकयचो. आणि एल. आय. सी च्या २-३ पॉलिसी होत्या (अजुन आहेत, पण केवळ पुर्ण करायच्या म्हणुन चालवतोय).

पण राष्ट्रीय बचत पत्राच्या उत्प न्नावर कर लागु झाला, पी.पी.एफ चे व्याजदर कमी झाले. मग काही काळ सोन्यात गुंतवणुक केली. पण घर घेताना ते सर्व विकले. शिवाय मध्येच गृहकर्जाचे हप्ते सुरु झले त्यामुळे बचत करणे काही काळ थांबलेच.

कालांतराने गृहकर्ज फेडले. मग बँकेत एफ. डी. करु लागलो, पण त्याच्या व्याजावर पुन्हा आयकराचा प्रश्न आला. शिवाय एफ. डी चे व्याजदर दिवसेन्दीवस कमी होत चालले आहेत. शेअर्स चांगला पर्याय आहे, पण रोज च्या रोज लक्ष ठेवायला वेळ नाही. शिवाय चुकिच्या शेअर्समध्ये पैसे घालुन नुकसान होण्याची भिती आहेच.

सेकंड होम किवा जमिन घेउ नये अशा मताचा मी आहे कारण लागेल तेव्हा हुकमी पैसे मिळतीलच याची खात्री नाही. शिवाय फायदा (अ‍ॅप्रिसिएशन) किती होइल सांगता येत नाही.

१-२ मित्रांशी बोलुन आता म्युच्युअल फंडा विषयी माहिती घेतो आहे. स्मॉल कॅप, मिड कॅप , लार्ज कॅप, इक्विटी फंड, डेट फंड, ई एल एस एस, हायब्रीड फंड, ब्लबॅलन्स,बॅलन्स फंड वगैरे वगैरे. वेबसाईटस वर त्यातील काहिचा परतावा फारच चांगला म्हणाजे २० ते २५ टक्के वार्षिक आहे. थोडे प्रयोग चालु आहेत.

तर मंडळी आपण कुठे गुंतवणुक करता/करावी?

प्रतिक्रिया

अमर विश्वास's picture

17 Oct 2017 - 7:35 am | अमर विश्वास

राजेंद्रजी
याआधीही या विषयांवर दोन धागे आले होते त्यावर उत्तम चर्चा झाली आहे ..

कृपया वाचा ...
http://www.misalpav.com/comment/938709#comment-938709
http://www.misalpav.com/comment/939644#comment-939644

अजुनही काही प्रश्न असतील तर जरूर विचारा

अनुप ढेरे's picture

17 Oct 2017 - 9:24 am | अनुप ढेरे

केवळ निर्देशांकाच्या भरार्‍यांच्या बातम्या वाचून, किंवा गेल्या २/३ वर्षातले परतावे पाहून शेअर बाजारात येत असाल तर सावधान. पास्ट गेन्स डू नॉट गॅरंटी फ्युचर गेन्स. पुढील ५/६ वर्ष ज्या पैशाला हात लावायचा नाही असेच पैसे शेअर बाजारात गुंतवावे असा थंबरूल आहे. एखादा ( पेड) इन्वेस्ट्मेंट अ‍ॅडवायझर पकडून सल्ला घ्या. "फ्री अ‍ॅडवाइज विल कॉस्ट यू."

अमर विश्वास's picture

17 Oct 2017 - 10:55 am | अमर विश्वास

अनुपजी
नुसती एक प्रतिक्रिया आऊट ऑफ काँटेक्स्ट वाचू नका .. गैरसमज होईल ...
माझी प्रतिक्रिया येथे कॉपी पेस्ट करत आहे

SIP च्या माध्यमातून गुंतवणुक सुरु करत आहात हे उत्तम आहे .. मी स्वतः: गेली आठ वर्षे SIP करतो आहे व माझा Equated Yearly Return १५% आहे .. (सध्या मार्केट वर असल्याने १५% पण सर्वसाधारण पणे १२% ते १५% या दरम्यान रिटर्न्स मिळाला आहे ... सध्या FD चे दर ८% आहेत )

आपल्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो :
१. प्रत्येक महिन्याच्या कोणत्या तारखेला फंड युनिट्स विकत घेतले जातील हे आपल्याला ठरवता येते का? येत असल्यास तारीख बदलता येते का? असल्यास किती वेळा बदलू शकतो?
-- आपण महिन्याच्या कोणत्या तारखेला SIP घ्यायची ते ठरवु शकता. ३-४ SIP असतील तर तारखा ५, १०, १५, २५ अशा ठरवू शकता जेणेकरुन महिन्याभरातील चढ उतारावर मात करता येईल. या तारखा बदलता येतात. पण SIP चा वापर हा रोजच्या चढ उतारावर दीर्घ मुदतीच्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून मात करणे हा असल्याने ह्या तारखा बदलून फारसे काही साध्य होणार नाही. याबद्दल शेवटी थोडे लिहितो.

२. एसआयपी चा कालावधी बदलणे शक्य असते का? म्हणजे मी एसआयपी ५ वर्षासाठी सुरु केली तर नंतर तो कालावधी कमी करता येतो का (जसे कि ३ वर्ष)? त्याचप्रमाणे एसआयपी चा कालावधी वाढवता येतो का? म्हणजे मी एक वर्षाचा एसआयपी सुरु केला आणि ६ महिन्यानंतर वाटले कि कालावधी वाढवून २ वर्ष करावा तर ते शक्य असते का कि नवीन एसआयपी सुरु करावा लागतो?
-- SIP चा कालावधी नसतो. तुम्ही SIP करता ते बहुतेक सगळे फंड्स Open Ended असतात. SIP सुरु करताना कालावधी द्यायची गरज नसते. एक महिन्याच्या पूर्वसूचनेने SIP बंद करता येतो. त्यामुळे बिनधास्त SIP सुरु करा

३. एखाद्या महिन्यात पैसे भरू शकलो नाही तर काय होते? काही penalty असते का?
-- SIP हे तुमच्या बँक खात्यातुन auto-debit होत असतात. (हाच पर्याय सर्वोत्तम आहे) एखाद्या महिन्यात खात्यात पुरेसा निधी नसेल तर SIP Debit होत नाही. लागोपाठ २ महिने (किंवा ३ महिने ..नक्की आठवत नाही) असे झाले तर SIP बंद होतो. अर्थात आपण तोपर्यंत गुंतवलेले पैसे तसेच राहतात व ते पाहिजे तेंव्हा काढुन घेता येतात. अर्थात पहिल्या मुद्यात लिहिल्या प्रमाणे SIP चा खरा फायदा Long Term Continuous investment असेल तरच होतो. तेंव्हा असे SIP बंद होणे टाळावे
४. एखाद्या महिन्यात SIP Amount पेक्षा जास्त पैसे भरून SIP फंड मध्येच युनिट्स विकत घेता येतात का?
-- SIP Fund असे काही वेगळे फंड नसतात. नेहमीच्या ओपन एंडेड स्कीम मध्ये SIP हा गुंतवणुकीचा एक मार्ग आहे. त्यामुळे त्याच फंड मध्ये One time investment कधीही करता येते. अर्थात पुन्हा वरचाच मुद्दा ... continuous ..... तेंव्हा एकदम जास्त रक्कम हातात आली तर ती एखाद्या शॉर्ट टर्म फंडात ठेवावी व त्याला संलग्न अशी SIP करावी

५. मुदतीपूर्वी युनिट्स विकता येतात का? असल्यास त्यावर exit load पडतो का? आणि short term capital gain असेल तर एसआयपी वर टॅक्स भरावा लागतो का?
--- आधी लिहिल्याप्रमाणे हे ओपन एंडेड स्कीम असतात .. कधीही पैसे काढता येतात. अर्थात एका वर्षाच्या आत पैसे काढले तर इन्कम टॅक्स भरावा लागतो . एका वर्षानंतर Mutual Funds चे इनकम टॅक्स फ्री आहे. कारण फंडस् चालवणाऱ्या कंपन्या Divident Distributution Tax भरतात

६ . SIP आणि Flexi-SIP यात काय फरक आहे? Flexi-SIP मध्ये महिन्याच्या कोणत्याही तारखेला युनिट्स विकत घेण्याची मुभा असते का?
---- Flexi SIP म्हणजे जेंव्हा मार्केट खाली जाते तेंव्हा तुम्ही जास्त investment करावी अशी अपेक्षा असते. अशा स्कीम्स मधे मार्केट चा P/E रेशो बघतात. जर baseline P/E रेशो जर १०० धरला आणि तुमची SIP ५००० ची असेल तर P/E रेशो ३० झालेलं तर तुम्ही १५००० गुंतवावे ... पण अशा प्रकारच्या स्कीम मध्ये तुमची महिन्याची रक्कम वरखाली होत जाते. त्यामुळे दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीची इच्छा असेल तर Flexi-SIP टाळावे Flexible SIP plans are extremely complicated and there are very few schemes with this option in the market आणि Flexi SIPs may give higher returns but may not build a bigger corpus या दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या

आणि जात जाता ..
१. जुनी हिरो होंडा ची ऍड होती .. fill it , shut it , forget it .. हे सूत्र लक्षात ठेवावे. एकदा SIP चालु केल्यावर दर तीन महिन्यांनी (Quarterly) वअवलोकन करावे. रोज फंड व्हाल्यू पाहु नये :)
२. फंड निवडताना काळजी घ्यावी. फंड चे वेगवेगळे प्रकार असतात .. growth oriented, balance इत्यादी. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारातील फंड निवडावेत
३. स्मॉल कॅप फंड शक्यतो टाळा
४. तुम्हाला जी रक्कम किमान ३ वर्षे लागणार नाही तीच SIP मध्ये गुंतवा. महिन्याची SIP amount तेव्हढीच ठेवा जी तुम्ही ३ वर्षे सलग ठेवू शकता. तसेच गुंतवलेली रक्कम किमान ३ वर्षे तरी काढावी लागणार नाही. तरच SIP चा खरा फायदा होईल. मी SIP सुरु केले तेंव्हा फक्त ५००० महिना गुंतवत होतो. नंतर जसे शक्य होईल तशी दरमहा गुंतवणूक वाढवत गेलो
५. शेवटचे .. एकाच फंडात मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा ३-४ फंडात विभागुन करा

ऑल द बेस्ट

सोमनाथ खांदवे's picture

19 Oct 2017 - 6:59 pm | सोमनाथ खांदवे

Mrf चा भाव यका शेर ला सगळ्यात ज्यास्त 63,879 रु यव्हढा कसा कै वो ?

कारण गेल्या अनेक वर्षात शेयर कधीही split झाला नाही की कधीही मॅनॅजमेन्ट ने शेयर वर बोनस दिला नाही. परंतु कंपनी चांगली असल्यामुळे शेयर चा भाव वाढतच राहिला काळानुसार आणि सध्या ६४००० च्या आसपास आहे.

श्री गावसेना प्रमुख's picture

20 Oct 2017 - 9:54 am | श्री गावसेना प्रमुख

असे कसे म्हणतात बोनस मिळाला आहे ना दोनदा

मी वर म्हणल्याप्रमाणे गेल्या अनेक वर्षात बोनस मिळालेला नाही. शेवटचा बोनस हा १९७५ साली दिला ज्याला आता ४० वर्ष उलटून गेली

सुबोध खरे's picture

19 Oct 2017 - 7:49 pm | सुबोध खरे

तो १०० रुपयाचा शेअर आहे

सोमनाथ खांदवे's picture

20 Oct 2017 - 5:24 pm | सोमनाथ खांदवे

खरच लै मोठ्ठ आश्चर्य आहे , ज्या कोनाकड mrf चे शेर अस्तिल त्यों लै मालामाल व्हनार .

सोमनाथ खांदवे's picture

20 Oct 2017 - 5:33 pm | सोमनाथ खांदवे

आत्ताच गुगलभावु ला ईचारल तर एम आर एफ ची आजची किम्मत 70400 हाये , अन 5 वर्षात 523 % रिटर्न दिल म्हंतोय .

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Jan 2019 - 3:13 pm | राजेंद्र मेहेंदळे

एका ओळखीच्या बिल्डरची स्किम काही कारणाने अडकली आहे. (ठिकाण तळेगाव). स्किम छोटी आहे आणि रेराच्या कचाट्यात येत नाही.४ मजले पुर्ण बाधुन(स्लॅब, भींती वगैरे) तयार आहेत आणि २-३ फ्लॅट बुक झाले आहेत.पण प्लॅस्तरींग , दरवाजे , टाईल्स व ईलेक्ट्रिक काम रखडले आहे. त्याला थोडे फंडिंग मिळाले (३०-४० लाख) , तर तो पुढच्या ६ -८ महिन्यात सर्व काम पुर्ण करुन फ्लॅट विकेल आणि १६-१८ टक्के व्याजाने पैसे परत करेल. सर्व व्यवहार चेकने होईल.

तर या स्किममध्ये पैसे गुंतवावे का? (माझे बजेट साधारण ५-८ लाख) मिपाकर जाणकार मंडळींच्या सल्ल्याच्या प्रतीक्षेत.

हा शेणात हात घालण्याचा प्रकार होईल असं वैयक्तिक मत आहे.
(हा सल्ला नाही. केवळ माझं मत आहे. )

सुबोध खरे's picture

9 Jan 2019 - 6:52 pm | सुबोध खरे

पुढच्या ६ -८ महिन्यात सर्व काम पुर्ण करुन
काम पूर्ण झाले नाही तर?
चेकने पैसे दिलेत आणि त्याने माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून हात वर केले तर?

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jan 2019 - 9:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

एका ओळखीच्या बिल्डरची स्किम काही कारणाने अडकली आहे.

स्किम अडकली आहे... पण ती का अडकली आहे ते माहीत नाही... म्हणजेच समस्या काय आहे याबद्दल खात्रीची माहिती नाही.

तो पुढच्या ६ -८ महिन्यात सर्व काम पुर्ण करुन फ्लॅट विकेल आणि १६-१८ टक्के व्याजाने पैसे परत करेल.

वरचे तथ्य पाहिले तर, या वाक्याच्या सत्यात येण्याबद्दल, फारच मोठ्ठे प्रश्नचिन्ह आहे.

समस्येबद्दल खात्रीची माहिती मिळत नाही तोपर्यंत, ती सुटेल की अजून जास्त गंभीर होईल हे ठरवणे, अंधारात दगड मारल्यासारखे होईल.

तेजस आठवले's picture

9 Jan 2019 - 10:12 pm | तेजस आठवले

विचारही करू नका.तळेगाव हे बऱ्यापैकी हरभऱ्याच्या झाडावरचे ठिकाण आहे.४ मजले आणि प्रत्येक मजल्यावर ४ सदनिका जरी धरल्या तरी १६ पैकी ३ च बुक झाल्यात म्हणजे २०% पण बुकिंग नाही.स्लॅब आणि भिंती झालेत म्हणजे ५०% पेक्षा कमी काम झाले आहे.१८% व्याजाचं कधी स्वप्न जरी पडलं तरी ते खोटं समजा.

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Jan 2019 - 4:25 pm | राजेंद्र मेहेंदळे

प्रत्येक मजल्यावर २ फ्लॅट आहेत. १बी.एच.के. आणि २ बी.एच.के. म्हणजे एकुण ८ फ्लॅट पैकी २ -३ बूक झालेत.

सुबोध खरे's picture

15 Jan 2019 - 12:41 pm | सुबोध खरे

अशा गुंतवणुकीत कधीही अडकू नका.

बिल्डर सज्जन असेलही पण गेल्या काही वर्षात सज्जन बिल्डर परिस्थितीच्या रेट्यात अडकल्यामुळे हवालदिल आणि अगतिक झालेले पाहिले आहेत.

आपले पैसे ८ लाख देणार ८ महिन्यांसाठी त्यात आपल्याला १० % अधिक व्याज मिळेल ( १८ टक्के बिल्डर देणार त्याविरुद्ध मुदत ठेवीत ८ %) यात आपला नफा जास्तीत जास्त ५३ हजार.

सध्या २-३ फ्लॅट बुक झाले आहेत आणि आताच बिल्डरकडे पैसे नाहीत म्हणजेच तो लोकांच्या पैशाने इमारत बांधत आहे. उरलेलं फ्लॅट विकले गेले नाहीत तर तो तुम्हाला पैसे कुठून देणार आहे? त्याला झेपत असलेले सर्व कर्ज तो काढून बसलेला आहे (त्याचा हप्ता त्याला अगोदर फेडावा लागेल)

अन्यथा १८ % व्याजाने बाजारातून बिन तारण कर्ज का उचलणार आहे

५३ हजार रुपयाविरुद्ध ८ लाख रुपये भांडवल बुडाले त्याचे नुकसान हा हिशेब करून पहा आणि निर्णय घ्या

दादा कोंडके's picture

10 Jan 2019 - 12:43 am | दादा कोंडके

असले व्यवहार कधीही करू नका. नेहमी गुंतवणुक पारदर्शक असली पाहिजे. त्यानंतर जोखिम वगैरे इतर बाबी येतात.

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Jan 2019 - 4:27 pm | राजेंद्र मेहेंदळे

मी ही हाच विचार करणार्‍यांपैकी आहे. पण थोडी कॅलक्युलेटेड रिस्क घेउन बघायला काय हरकत आहे अशा विचारात होतो. म्हणुन ईथे विचारले.

सुबोध खरे's picture

10 Jan 2019 - 10:43 am | सुबोध खरे

@राजेंद्र मेहेंदळे

"ओळखीच्या बिल्डरची"

हा तुमचा सख्खा भाऊ आहे का?

नसेल तर ओळखीला "काहीही अर्थ" नसतो.

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Jan 2019 - 3:31 pm | राजेंद्र मेहेंदळे

सक्खा भाऊ असता तर मदत म्हणुन असेही दिले असते मोबदला न मागता. पण ईथे शंकेला जागा आहे म्हणुनच तर जाणरांचे मत घेतोय.

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Jan 2019 - 4:28 pm | राजेंद्र मेहेंदळे

जाणकारांचे* असे वाचावे