■31 डिसेंबर हा काळा दिवस आहे ह्याच दिवशी भारताचे प्रधानमंत्री अटलबिहारी बाजपेयीं ह्यांनी कट्टर अतिरेकी व त्यांचा मास्टर माईंड ना कंदहार येथे नेऊन सोडले होते. सन 1999 ?
■अशीही बातमी आहे कि 100 कोटी रुपये परकीय चलनात दिले गेले होते. खरेच दिले गेले होते का ?
■ह्याच अतिरेक्यांनी नंतर संसदेवरील हल्ला, मुंबईतील अतिरेकी हल्ले घडवले.
■9/11 ट्वीन टॉवर वरील हल्ल्यात ह्यातील एका अतिरेक्याने मदत केली होती.
■भारतात हल्ले घडवण्यास ह्याच अतिरेक्यांनी हजारो अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले.
■हजारो नागरिक, जवान ह्यामुळेच अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले.
■आणि हे सर्व झाले भाजपा आणि बाजपेयींमुळे.
★आता इंदिरा गांधींनी अतिरेक्यांना काय वागणूक दिली होती ते बघू
★मकबूल भट्टची फाशी टाळण्यासाठी लंडन मधील भारतीय उच्चायुक्तातील कर्मचारी श्री रवींद्र म्हात्रे यांचे अपहरण JKLF ने केले.
★ रवींद्र म्हात्रे हे कनिष्ठ कर्मचारी होते. त्यांना ओलीस धरून मकबूल भट्ट च्या मुक्तीची मागणी करण्यात आली. इंदिरा गांधी यांनी तत्काळ राष्ट्रपतींना विनंती करून त्याचा दया अर्ज फेटाळून मकबूल भट्ट ला फासावर लटकावले.
★अतिरेकी संतप्त झाले आणि त्यांनी म्हात्रे यांची निर्घुण हत्या केली. इंदिरा गांधी तत्काळ म्हात्रे यांच्या वृद्ध पित्याला भेटण्यास मुंबई ला आल्या त्यांचे हात हातात घेऊन त्यांची माफी मागितली.
★मी तुमच्या मुलाला वाचवू शकले नाही, मी तुमची वैयक्तिक गुन्हेगार आहे. परंतु माझ्याकडे दुसरा मार्ग उपलब्ध नव्हता. तुमच्या मुलाच्या या बलिदानाबद्दल हा देश त्याचा कायमचा ऋणी राहील.
★याच रवींद्र म्हात्रे यांचे नाव पुण्यातील म्हात्रे पुलाला दिले गेले आहे. एक नेता म्हणून कठोर निर्णय घेणे आणि संबंधित कुटुंबाची स्वतः भेटून माफी मागणे याला सहृदयी काळीज लागते
■■■बाकी रुबिया सईद हिला सोडतानाही भाजप समर्थीत VP सिंग ह्यांचे सरकार दिल्लीत सत्तेवर होते.
■■■पुरुलिया प्रकरणातील रशियन आरोपींना वाजपेयींनीच रशियाच्या हवाली केले होते.
★★★टीप सर्व लिंक कॉमेंट मध्ये दिल्या आहेत★★★
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1991714860864245&id=10000077...
हे व्हाट्सअपवर आले होते , काही असांसदीय शब्द वगळले आहेत.
प्रतिक्रिया
1 Jan 2019 - 12:30 am | अनन्त अवधुत
मोठ्या अपेक्षेने धागा उघडला होता. मला वाटले ३१ डिसेम्बर इंग्रजी कसा वाईट आणि फाल्गुन अमावस्या कशी चांगली असे काही वाचायला मिळेल.
त्या फेसबुकी लिंक पलीकडे काही सांगायचे असेल, तुमची काही मते असतील तर मांडा.
संपादक मंडळ , असल्या इधरका कन्टेन्ट उधर वाल्या प्रचारकी पोस्ट ज्यात लेखकाची काहीच मते नाहीत, त्या बाबत काही धोरण आहे का?
1 Jan 2019 - 12:55 am | माईसाहेब कुरसूंदीकर
काय रे हे ब्लॅककॅट्या?
त्यावेळी विमानात २०० प्रवासी असावेत. तुझे वय माहित नाही पण हायजॅक झाल्याची बातमी आली आणी काही तासातच प्रवाशांच्या नातेवाईकांनी चॅनेलसवर येऊन गलका केला व "सरकारने वाट्टेल ते करावे पण आमच्या नातलगांना सोडवावे. काही झाल्यास सरकार जबाब्दार' असा आक्रोश चालु केला. अनेकांनी/मिडिया पत्रकारांनी त्यात भर घालून आता सरकारने मागण्या मान्य कराव्यात असे लिहायला चालु केले. सरकार दबावाला बळी पडले नसते तर नवल.
१९८४ साली फक्त रविंद्र म्हात्रे ह्यांचे अपहरण झाले होते. येथे २०० लोकांचे अपहरण झाले होते.
1 Jan 2019 - 6:02 am | Blackcat (not verified)
याच प्रकरणानंतर कायदाही झाला की , विमान हायजॅक झाल्यास सरकार काहीही करणार नाही. कुणाची कसलीही मागणी पुरवली जाणार नाही .
त्यामुळे विमान हायजेकची प्रकरणे कायमची बंद पडली.
1 Jan 2019 - 12:57 pm | मुक्त विहारि
असेलही....
पण तुम्ही कधी, काठमांडूहून भारतात कधी फ्लाईटने आला आहात का?
1 Jan 2019 - 2:12 pm | Blackcat (not verified)
naahee
2 Jan 2019 - 6:45 pm | नाखु
वाजपेयींचे भारतरत्न परत घेता येईल का?
मिपावर तशी काही तजवीज आहे का?
त्या दोनशे प्रवाशांच्या हत्येनंतर नक्की त्यांच्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांना "देशासाठी बलिदान"असं गौरव पुरस्काराने सन्मानित केले असते काय?
असं ओलिसांबदल्यात सोडण्याचे एकमेव उदाहरण आहे काय?
अगदी मोसाद पासून अमेरिकेत कधीच घडले नसावे ते पातक वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली घडले आहे,त्यांचे वारस नसल्याने नक्की प्राय:श्चित किती पिढ्यांनी घ्यावे?
वाचकांची पत्रेवाला नाखु
2 Jan 2019 - 6:50 pm | प्रसाद_१९८२
हे व्हाट्सअपवर आले होते , काही असांसदीय शब्द वगळले आहेत.
--
काय दिवस आलेत.
आता व्हाट्सअपवरचे भिकार संदेश देखील इथे टाकायला सुरुवात केली लोकांनी.
2 Jan 2019 - 9:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
बनावट कचरा हुडकत राहून तो गोळा करून आणि नाहीच सापडला तर खोटा कचरा बनवून, त्याची टोपली दुसर्याच्या डोक्यावर उपडी करायची आणि मग, "बघा, बघा, किती गलिच्छ माणुस आहे" अशी घसा फुटेपर्यंत बोंब मारत बसायचे, हा हताश आणि अगतिक झालेल्या राजकारण्यांचा खेळ चालू आहे. :)
4 Jan 2019 - 2:29 pm | डँबिस००७
भिकार मानसिकतेच प्रदर्शन ही ह्यांची कित्येक पुर्वजन्मापासुनची खासियत आहे !
4 Jan 2019 - 12:36 pm | जानु
अशा प्रकारचे लेख वाचल्यानंतर बाकी काही मत नाही झाले तरी माझ्यासारख्याचे काँग्रेस विरोधी मत फार नक्की होते. कारण काय ते फार स्पष्टपणे सांगता येणार नाही पण पुढच्या निवडणुकीत भाजपाला मत देणार हे निश्चित.