पी टू के : मिपाकरांचा सायकलप्रवास.

Primary tabs

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
1 Jan 2019 - 6:56 pm
गाभा: 

राम राम मंडळी. मिपावर लिहिण्या-वाचण्याच्या छंदामुळे अनेकांची एकमेकांशी ओळख झाली, मैत्री झाली, भेटी झाल्या, भांडणे झाली. आणि काहींची लग्नेही झाली (असे म्हणतात) असा मिपाचा फार मोठा पट आहे आणि अनेकांना तो माहिती आहे. मिपावर अनेक विषयांवर लिहिणारे आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी इथे वावरतात. 'अ' पासून ते 'ज्ञ' विषयावर काथ्याकूट ते लेखन आस्वाद आपण घेत असतो. मंडळी, अशा विविध विषयांपैकी मिपावरील एक विषय सायकलींग. मिपाचं तांत्रिक काम बघणारे प्रशांतची अनेकांशी ओळख आहे. माझीही थोडीबहूत त्यांच्याशी ओळख आहे. अनेकदा वाट्सॅपवर गप्पा होत असतात. प्रशांतच्या सायकलींग आणि त्यांच्या गृपच्या सायकलींगच्या गोष्टी आपण नेहमी वाचल्या आहेत. आपल्या मिपावर या सायकलवेड्यांचा तसा आम्हा काही आळशी लोकांना त्यांच्या प्रवासाचा, त्यांच्या व्यायामाचा, चिवटपणाचा, त्यांच्या हौशीपणाचा त्रासच होतो. आपण झोपेतून पांघरुन काढले की यांचे पहाटे किती वाजता निघून कितीतरी किलोमिटर फेरफटका झालेला असतो.

मंडळी, अशा या मिपाकर सायकलवेड्यांचा आणखी एक मोठा पराक्रम वाचण्यात आला. मिसळपाव या संकेतस्थळावर प्रशांत तायडे स्वत: संगणक अभियंता आहे, त्यांची ओळख संग्राम सिंह पाटील (संगणक अभियंता), शैलेश खडतरे (संगणक अभियंता) आणि किरण वेताळ (स्थापत्य अभियंता) यांच्याशी झाली. मिपाचे जसे जगभर वाचक लेखक आहेत तसा सायकलस्वारांचाही समूह आहे. लहान मोठ्या अशा टप्प्यांचे सायकल दौरे यशस्वी झाल्यानंतर एक मोठा सायकलप्रवास या चौघांनी नुकताच पूर्ण केला. पुणे ते कन्याकुमारी ही सायकल सफर पुणे इथून सुरु होऊन कराड, निपाणी, कित्तूर. येल्लापूर, मुरुडेश्वर, उडपी, कुंबला, मडाई, कोझीकोडे, कोची, अलपी, त्रिवेंद्रम, कन्याकुमारी असा पूर्ण झाला. प्रवास जवळ जवळ १५०० किलोमिटरचा होता त्याचबरोबर हा प्रवास कोणत्याही सपोर्ट व्हेकलशिवाय केलेला प्रवास होता. दांडेलीचे घनदाट जंगलातून हा प्रवास होता. एकेकट्यांचा रात्रीचा सायकल प्रवास होता, दाट वस्तींची शहरे होती, ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय ठिकाणांची सोबत होती, त्याच बरोबर सोबत खाद्यसंस्कृतीची ओळखही त्यांना होत होती. मंडळी या सर्वांचं या ऐतिहासिक प्रवासाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

प्रशांत तायडे, संग्राम सिंह पाटील, शैलेश खडतरे, व किरण वेताळ या चौघांनीही आपापले अनुभव इथे स्वकथन केले पाहिजे असे वाटते. बाकीच्यांशी ओळख होईल आणि त्यांनाही प्रेरणा मिळेल. पुन्हा एकदा प्रशांत आणि आपल्या सर्व टीमचं मनःपूर्वक अभिनंदन.

IMG_20190101_180342IMG-20190101-WA0028IMG_20190101_180312

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

1 Jan 2019 - 7:15 pm | कुमार१

हार्दिक अभिनंदन !

लेखक - अरूण वेढीकर किंवा वेधीकर
1

https://www.misalpav.com/node/30327

आपले गुरुजी ...

विवाहाच्या सोहळ्यात आणखी एक मित्राची गाठ पडली ते आपले स्मायली फेम अतृप्त आत्मा त्यांच्या पौरोहित्याखाली शरद उर्फ चित्रगुप्तांच्या द्वितीय पुत्राचा विवाह संपन्न झाला. त्यावेळी त्यांनी तयार केलेली आकर्षक पुष्प रचना...

प्रशांतशेठ.. सणसणीत दणदणीत खणखणीत पराक्रम.. अभिनंदन..

यशोधरा's picture

1 Jan 2019 - 7:46 pm | यशोधरा

अरे वा! भारीच की. येऊद्यात प्रवासवर्णन, अनुभवांच्या कथा.

उगा काहितरीच's picture

1 Jan 2019 - 8:13 pm | उगा काहितरीच

अभिनंदन !!! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jan 2019 - 8:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी सहल ! सर्व चमूचे सज्जड अभिनंदन आणि पुढील मोहिमांसाठी अनेकानेक शुभेच्छा !

खुद्द चमूतील कोणीतरी किंवा सर्वांनी एकत्रितपणे त्यांचे अनुभव लिहावे, यासाठी सहमती !

मुक्त विहारि's picture

1 Jan 2019 - 9:10 pm | मुक्त विहारि

+ १

वाहवा. सर्वांचे अभिनंदन. या रोमहर्षक सफरीचा सचित्र वृत्तांत लवकर येऊ द्या.

नाखु's picture

1 Jan 2019 - 9:08 pm | नाखु

एकदमच वेगळी अभिमानास्पद बातमी वाचली, सक्रिय सहभागींचे अभिनंदन आणि बिरुटे सरांचे आभार.

घरकोंबडा वाचकांची पत्रेवाला नाखु
ंंचेच

तेजस आठवले's picture

1 Jan 2019 - 9:21 pm | तेजस आठवले

अभिनंदन, आता एक झक्कास सचित्र वृत्तांत येउद्या.

पद्मावति's picture

2 Jan 2019 - 12:03 am | पद्मावति

भन्नाट आणि अभिमानास्पद! सर्व चमूचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील अनेक सफरींसाठी शुभेच्छा.

Blackcat's picture

2 Jan 2019 - 7:42 am | Blackcat (not verified)

अभिनंदन

प्रचेतस's picture

2 Jan 2019 - 8:34 am | प्रचेतस

प्रशांतच्या सायकलवारीचे रोजच्या रोज अपडेट्स मिळत होतेच.
लै भारी वाटलं. मिपाकरांनी 'करुन दाखवलं'.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jan 2019 - 11:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>मिपाकरांनी 'करुन दाखवलं'.

त्यांनी करून दाखवलं ! पण एक मिपाकर म्हणून तुम्ही कधी काहीतरी धाडस करून दाखवा...?

-दिलीप बिरुटे

त्यांनीदेखील हल्ली प्रदीर्घ बाईकस्वारीच्या मोहिमा (सोलो) सुरु केल्या आहेत असं रॉयल एनफिल्ड प्रवक्त्याकडून कळतं.

शैलेन्द्र's picture

2 Jan 2019 - 9:50 am | शैलेन्द्र

लेख पाहिजे म्हणजे पाहिजेच...

नि३सोलपुरकर's picture

2 Jan 2019 - 9:55 am | नि३सोलपुरकर

सर्वांचे अभिनंदन आणि पुढील अनेक सफरींसाठी शुभेच्छा.

प्रशांत, संग्राम, किरण आणि शैलेश
मनापासून अभिनंदन! प्रवास वर्णन वाचायला आवडेल... लवकर लिहिते व्हा! वाट बघतोय...

मोदक's picture

2 Jan 2019 - 2:49 pm | मोदक

+११

अभिनंदन..!!!

sagarpdy's picture

2 Jan 2019 - 6:23 pm | sagarpdy

+११

लेखनासोबत भरपूर छायाचित्रे, चलचित्रे देखील येउद्या.

पुकपु बरं वाटेल. पी काढा.

चौथा कोनाडा's picture

2 Jan 2019 - 6:17 pm | चौथा कोनाडा

अभिनंदन !

सविस्तर वृताणंताच्याप् रतिक्स़्क्षेत !

प्रशांत's picture

3 Jan 2019 - 12:56 pm | प्रशांत

धन्यवाद लोक्स

धागा कर्त्याचे विशेष आभार्स

लेख येणारच

एक झलक..

आबाची भूक आणि धमाल

१. वेळ साधारण दुपारी १, मंगलुरू च्या अलीकडे एका नदीवरचा ब्रीज , लोखंडी गर्डर वरचा , आबा माझ्या पुढे होता अचानक थांबला (कनफुज) , मला विचारले आता कुठे जायचे आहे ?

मी विचारात पडलो इथे काय चौक नाही की तीन रस्ते नाही , ब्रिज वर येणारा एक रस्ता आणि जाणारा दुसरा याव्यतिरिक्त फक्त नदीत उडी मारणे हा एकच पर्याय होता , बरं ज्या रस्त्याने आम्ही आलो तिकडे परत जाण्याचा प्रश्न नव्हता ,थोडक्यात समोर एकमेव रस्ता आहे आणि हा भावड्या रस्ता विचारतोय ,तेवढ्यात सरपंच जवळ आले त्यांना घडलेला प्रकार सांगितला सरपंच हसून उत्तरले चला आबा आता पुढे जेवायचे आहे .

२. भर उन्हात रस्त्यावर संत्र्या विकणारा लुंगीधारी बघून पू क टीम थांबली काय काय घ्यावे यावर विचार विनिमय झाला , पीटर म्हणाला कलिंगड घेऊ ( समोर कलिंगडाच्या ढीग पडलेला ) आबा प्रश्नार्थक नजरेने पिटरकडे - कुठे आहेत कलिंगड आम्ही बोट दाखवलं हे काय आहेत इथे , तर आबा म्हणे छे हे काय कलिंगड आहे का ,कलिंगड कसं असतं मोठं वगैरे , हिरवं , गोल ह्याव त्याव .... बरं हे इतक्या आत्मविश्वाने आबा म्हणाला की जणू आबांच्या घरी कलिंगड पिकत असावी
काही वेळ पिटरला वाटले खरंच हे कलिंगड नाही त्याने मला विचारले सांगा तुम्हीच हे कलिंगड आहे का नाय ते
त्यावर माझे उत्तर : हो ते कलिंगड च आहे पण आबाला भूक लागली आहे
*तू पिछली बार नही था ना*

k

2

टर्मीनेटर's picture

3 Jan 2019 - 1:09 pm | टर्मीनेटर

अभिनंदन... लेखाची झलक आवडली. विस्तृत वर्णन लवकर येउद्यात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jan 2019 - 2:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

दुकानाची डिस्प्ले विंडो आवडली. आता सगळे गोडाऊन उघडे करा. :)

अभ्या..'s picture

3 Jan 2019 - 1:50 pm | अभ्या..

भारीच की

टवाळ कार्टा's picture

3 Jan 2019 - 7:01 pm | टवाळ कार्टा

बाब्बो

मार्गी's picture

6 Jan 2019 - 8:22 am | मार्गी

सर्वांचे अभिनंदन! संग्रामसिंहांचे अपडेटस स्ट्राव्हा व फेबूवर बघत होतोच. आता सविस्तर वृत्तांत वाचायची उत्सुकता आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Jan 2019 - 2:36 pm | राजेंद्र मेहेंदळे

सर्व सहभागी मंडळींचे अभिनंदन!! लेख येउ द्या सविस्तर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jan 2019 - 9:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रशांतसेठ, सायकल सफ़रीचं सविस्तर वर्णन वर्ष २०१९ मधे येईल काय ? :)

-दिलीप बिरुटे
(खोडसाळ लंबर एक)

देशपांडेमामा's picture

10 Jan 2019 - 2:17 pm | देशपांडेमामा

पुणे कन्याकुमारी टीम ..लेख कधी येणार ?

तुमच्या पराक्रमाची गाथा वाचण्यास उत्सुक आहेत सगळे ..लिहा पटापट

देश

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Jan 2019 - 2:23 pm | ज्ञानोबाचे पैजार

लेखमालेच्या प्रतिक्षेत आहे
पैजारबुवा,

मार्कस ऑरेलियस's picture

16 Jan 2019 - 1:40 pm | मार्कस ऑरेलियस

प्रशांतशेठ ,

जोरदार अभिनंदन !

एवढा लांबचा पल्ला सयकल वरुन ! कौतुक करावं तेवढं थोडं आहे !

ट्रम्प's picture

17 Jan 2019 - 11:11 pm | ट्रम्प

मिपावरील सायकल वीरांचे पराक्रम वाचून ! वाचून !! शेवटी मी सुद्धा सायकल चालवायला सुरवात करून एक वर्ष झाले .
या एक वर्षात किमान 300 दिवस * 18 की मि म्हणजे 5400 की मि तरी सायकल चालवली असेल . पाठिमागे वळून पाहताना एवढा मोठा डोंगर सर केल्यामुळे स्वतःला स्वतःचाच अभिमान वाटतो . या माझ्या मार्गात दीपस्तंभा सारखे काम मिपावरिल अदन्यात वीरानीं केले आहे !!!!!

कंजूस's picture

18 Jan 2019 - 8:17 pm | कंजूस

जोरात जाणाऱ्या मोठ्या वाहनांच्या बाजूने डगमगत हलकी सायकल रोज दीडशे किमी हाणायची फार कंटाळवाणे होत नाही का?

यशोधरा's picture

22 Jan 2019 - 5:07 pm | यशोधरा

ओ प्रा डॉ, कधी येतंय हे प्रवासवर्णन?
वाट बघून बघून कंटाळा आला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jan 2019 - 4:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आश्वासने नेहमीच चांगली असतात. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

सहमत. प्रशांत हा मिसळपाववरील आयडी लिखाणाबाबत वायदेआझम अतएव होपलेस आहे असे निरीक्षण नोंदवून ठेवत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jan 2019 - 5:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाय जमत, वेळ नाय, तर स्पष्ट म्हणावं की नाय जमणार. पण, उगाच सुंदर सुरुवात करायची लोकांची उत्कंठा वाढवायची आणि मग लिहायचं नाय, याला काही अर्थ नाही.

आपलंच पाहा, आपल्याला मिपावर ललित लेखन करुन चारपाच वर्ष झाली असतील. पण, आपण कधी आता लवकरच लिहितो वगैरे काही बोलत नाही. आपल्या अशा स्वभावामुळे आम्ही आपले फ्यान आहोत.

-दिलीप बिरुटे

आपण तर काय तितकंही लिहिणं बंद केलंत.
उगा मिपावरील फालतू राजकीय धाग्यांवर व्यस्त असता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jan 2019 - 10:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण तर काय तितकंही लिहिणं बंद केलंत.

आता आमचं काय आम्ही म्हातारी माणसं, कधी कधी उबळ येते तितकीच.
पण, आपण आपला उजेड नियमितपाडला पाहिजे असे वाटते.

उगा मिपावरील फालतू राजकीय धाग्यांवर व्यस्त असता.
मला जे वाटतं ते मी करतो. आता तर तुमच्या जीद्दीवर एखादा राजकीय धाग्यात डोकं लावून येतो.

-दिलीप बिरुटे

शशिकांत ओक's picture

2 Feb 2019 - 12:53 pm | शशिकांत ओक