टीना, मोदीजी आणि डिसऍडव्हान्टेज

Primary tabs

mrcoolguynice's picture
mrcoolguynice in राजकारण
16 Dec 2018 - 7:24 pm

अटलजींनी, २ खासदार संख्या असलेल्या भाजपच्या कितीतरी आधीपासून, आणि नंतरही कितीतरी वर्षे, भाजपची धुरा सांभाळली. त्यांनी ८० च्या दशकातच, अनेक तत्कालीन युवा नेतृत्वगुण असलेले उमेदवार हेरून त्यांना ग्रुम केलं. त्यांनी प्रभावीपणे तत्कालीन भाजपाची भक्कम दुय्यम फळी उभारली.
८० च्या दशकात महाजन/स्वराज/राजनाथसिंह (व इतर अनेक) यांचे कर्तृत्व अटल बिहारी वाजपेयी यांनी बरोबर हेरले. भाजपाची भक्कम दुय्यम फळी उभारली.

मोदीजींनी गेली काही वर्षे भाजपाची धुरा सांभाळली आहे. गेल्या काही वर्ष्यात भाजपाला केंद्रात व अनेक राज्यात सत्तेपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. नुकत्याच झालेल्या (डिसेंबर २०१८) विधानसभा निवडणुकीतील पराभवाने भाजपाला थोडासा धक्का नक्कीच बसला आहे, परंतु त्यामुळे सुतक करावे असं काही वातावरण नाही. आजवर अनेक पेचप्रसंग आले आणि गेले पण, त्यातून निभावून जाण्याची क्षमता/अनुभव मोदीजींत नक्कीच आहे.
मोदींवरती श्रद्धा असलेल्या कार्यकर्त्यांचे पक्षांतर्गत बळ मोदीजींच्या मागे आहे, जनमानसातील त्यांची प्रतिमा अजूनही लोकप्रिय आहे.

पण मोदीजी एकाकी पडलेत का ? भाजपच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचा विचार केल तर , (प्रकृती अस्वास्थ्यामुळे किंवा इतर कारणामुळे जर) मोदीजींच्या अनुपस्थितीत, भाजपला केंद्रीय निवडणुकीत लीड करायला, दुसऱ्या फळीतल्या (भविष्यात) भाजपचा चेहेरा बनू शकेल असं एकही नाव डोळ्यासमोर येत नाही.
भाजप थिंक टॅन्कच्या निसटलेल्या धोरणांपैकी हे एक असावे काय ?

पक्षांतर्गत-टीना* फॅक्टर भाजपचा डिसऍडव्हान्टेज ठरेल काय ?

(*टीना = There Is No Alternative = अशी पर्सिव्हड राजकीय स्थिती की जिथे नेतृत्वाला पर्याय उपलब्ध नसतो )

प्रतिक्रिया

रेहान वद्रा ला अध्यक्ष केले तर?
तुम्ही पण खुश मी पण खुश.. कसे?

याचा अर्थ काँग्रेस मध्ये या पूर्वी आणि आताही टीना इफ़ेक्ट नव्हता अशी गोड्समजूत आम्ही करून घ्यायची का ?
नाही म्हणजे तुमच्या सतत भाजप वर काढलेल्या लेखांचा अर्थ तोच होतोय !!!

mrcoolguynice's picture

17 Dec 2018 - 11:24 pm | mrcoolguynice

भाजपाचे नेतृत्व नितीन गडकरींना देण्याची मागणी

भाजपाचे नेतृत्व नितीन गडकरींना देणे ही काळाची गरज आहे असे मत विदर्भाचे शेतकरी आणि आदिवासी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी गडकरींकडे भाजपाचे नेतृत्व द्या अशी मागणीही एका पत्रकाद्वारे केल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा 2019 च्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा भाजपाचे नेतृत्व नितीन गडकरींना द्यावे असे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. त्यांनी त्यांचे हे पत्र संघ परिवारातील सर्व ज्येष्ठांना दिले आहे.

पक्ष नेतृत्वाला नोटबंदीचा निर्णय, जीएसटी लागू करण्याचा निर्णय याचा फटका मागील तीन वर्षांपासून बसतो आहे. कृषी आणि आर्थिक क्षेत्रातील व्यापाऱ्यांना मंदीचा फटकाही तीन वर्षांपासून बसतो आहे. गॅस जोडणीचा मुद्दा, जागतिक कच्च्या तेलांच्या किंमती हाताळण्यात आलेले अपयश या आणि अशा अनेक विषयांवर संघ परिवारात चिंतन सुरु आहे. अशाच वातावरणात किशोर तिवारी यांनी हे पत्र संघ परिवारातील सगळ्या ज्येष्ठांना लिहिले आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांची धुरा जर नितीन गडकरी यांच्या खांद्यावर देण्यात आली असती तर मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आली असती असेही तिवारी यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे. तसेच छत्तीसगढ आणि तेलंगण या दोन राज्यांमध्ये भाजपाची दैना झाली नसती असेही त्यांनी म्हटले आहे. देशाला विकासाची आणि युवकांना रोजगाराची गरज आहे. अशात हुकूमशाही पद्धतीने सरकार चालवणारे नेते समाजाला आणि देशाला घातक सिद्ध होतात. भारताला हा इतिहास नवा नाही. भाजपाने नेतृत्व नितीन गडकरींकडे द्यावे डिसेंबर 2012 मध्ये केलेली चूक दुरुस्त करावी अशीही विनंती किशोर तिवारी यांनी पत्राद्वारे केली आहे.

mrcoolguynice's picture

17 Dec 2018 - 11:28 pm | mrcoolguynice

बुधवार, 12 डिसेंबर 2018
पुणे : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्षात सगळेजण घाबरतात. आज भाजप हाच मुडद्यांचा पक्ष झाला आहे,'' अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी बुधवारी टीका केली. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ज. स. करंदीकर व्याख्यानात "सद्य राजकीय स्थिती आणि माध्यमे' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्या वेळी "पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर मोदी यांच्या नेतृत्वाला कोणी आव्हान देईल का,' या प्रश्‍नाचे उत्तर देताना सिन्हा म्हणाले, "मोदींच्या नेतृत्वाला भाजपमधून कोणी आव्हान करणार नाही. हे सगळे घाबरले आहेत.'' "भाजपच्या कार्यपद्धतीत आगामी सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत खूप मोठा बदल होईल असे दिसत नाही. कारण, बदल करणे हे फक्त भाजपच्या दोन जणांच्या हातात आहे,'' असे पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे नाव न घेता स्पष्ट केले.
सिन्हा म्हणाले, "पाच राज्यांच्या निवडणुकीत "योगी कार्ड' चालले नाही. तसेच, सामजात फुट पाडून मते मिळविता येतात, हे देखील शक्‍य झाले नाही. यातून हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपच्या यशांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होते.'' "2012, 2013 मध्ये तुम्ही विचार केला होता का, की मोदी पंतप्रधान होती. तेही इतक्‍या ताकदीने? त्या वेळी ते तर एका राज्याचे फक्त मुख्यमंत्री होते. मोदींना पर्याय मिळू शकत नाही, इतकी देशाची गुणवत्ता ढासळली आहे? मोदींना पर्यायी उमेदवार जनता निवडेल,'' असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

कळपातुन बाहेर पडलेल्याना भवितव्य नसते , फुसकी विधाने करून लोकांचे चे लक्ष वेधन्याचा प्रयत्न चालला आहे !!
अगदी तुमच्यासारखेच हो !!!!!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

19 Dec 2018 - 7:35 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"मोदींना पर्याय मिळू शकत नाही, इतकी देशाची गुणवत्ता ढासळली आहे? "
अगदी योग्य प्रश्न उपस्थित केला आहे सिन्हा साहेबांनी. खरे तर राजकीय पक्ष काय किंवा संघटना काय, पर्याय हे आपसूक तत्कालिन व्यवस्थेतून मिळत असतातच. राजकीय पक्षांबाबत बोलायचे तर आधी पर्याय आणी मग पर्याय पाहून मतदान असे होत नाही. ही नविन फॅशन गेल्या ५/१० वर्षातील आहे असे आमचे मत. म्हणजे "मोदी की राहूल" किंवा "गडकरी की राहूल" ? वगैरे. नुकत्याच झालेल्या निवडणूकांनी तेच दाखवून दिले . मध्य प्रदेशात काँग्रेसचा चेहरा कोण होता ? छत्तीसगडमध्ये?
"दुसऱ्या फळीतल्या (भविष्यात) भाजपचा चेहेरा बनू शकेल असं एकही नाव डोळ्यासमोर येत नाही."
का बरे ? सुषमा स्वराज का नाहीत ? गडकरी का नाहीत ? सीतारामन का नाहीत ? चेहरा म्हणजे समाजमाध्यमांवर २ कोटी फॉलोअर्स, शाब्दिक कोट्यांचे ट्वीट्स, सतत स्वतःलाच झळकत ठेवणे ईतपतच मर्यादित आहे? ह्यातील कोणतेही 'गूण' नसताना मनमोहन सिंगांनी १० वर्षे सरकार चालवले ना?

mrcoolguynice's picture

19 Dec 2018 - 9:04 pm | mrcoolguynice

का बरे ? सुषमा स्वराज का नाहीत ? गडकरी का नाहीत ? सीतारामन का नाहीत ?

पुढील लोकसभा निवडणूक आपण लढवणार नाही , हे सुषमाजींनी आधीच डिक्लेअर केलंय. (चू भू दे घे)

दूरान्वयानेही प्रतिस्पर्धी होऊ शकेल असा संशय असलेला माणूस सद्य सर्वोच्च नेतृत्वाला घातक समजला जातो. त्यामुळे गडकरीजीं यांना दुर ठेवण्यात येईल.

निर्मला सीतारामन (सध्यातरी शहा-मोदीजींचा माणूस आहे ) त्यामुळे त्या पक्षांतर्गत स्वबळावर खंबीरपणे पाय रोवून उभे राहून , काही भूमिका घेऊ शकतात का / तशी क्षमता त्यांच्यात आहे का ? हे पाहणे रोचक ठरेल.

सुबोध खरे's picture

19 Dec 2018 - 7:49 pm | सुबोध खरे

मनमोहन सिंगांनी १० वर्षे सरकार चालवले ना?
पहिली पाच वर्षे चालवले नंतर नुसते ढकलले असे म्हणता येईल.

अशा मागणी चा ठराव दिल्ली विधानसभेत आप या सर्किट पक्षाने पास करून केंद्रसरकार कड़े पाठवला !!!!
आणि आता इथुन पुढे नयनरम्य फटाक्याची आतिशबाजी बघायला भेटणार अस वाटतंय .
पण कदाचित भाजप वर त्वेशाने हल्ला करणारे कांग्रेसजन रागा , सुरजेवाला ,चिदंबरम मुग गीळून गप्प बसतील

दुसर्‍या एका धाग्यावर टाकलेला प्रतिसाद इथेही संयुक्तिक वाटला म्हणून टाकतो -

मोदींना पर्याय म्हणून विरोधी पक्षात कुणी नाही ही वस्तुस्थिती आहे. तसेही मिडियावर याबद्दल आधीच चर्चा सुरू आहेतच.
मग आत त्यावर उपाय म्हणून भाजप मधूनच कुणी पर्याय उभा करून पक्षांतर्गत भांडणे लावण्याचा / फूट पाडण्याचा हा डाव तर नसावा.. ??
[हा प्रश्न प्रस्तुत लेखकावर नसून मिडियावर आहे हे इथे नमूद करतो.]

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Dec 2018 - 11:40 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मोदींना पर्याय म्हणून विरोधी पक्षात कुणी नाही ही वस्तुस्थिती आहे

पर्याय बघून मतदार मतदान करीत नाहीत रे राघवा. १९६६ साली शास्त्री गेल्यावर कोण पर्याय होता? इंदिरा गांधींना गुंगी गुडिया म्हणायचे. राजीव गांधी, नरसिंह राव,देवे
गौडा,, गुजराल हे पंतप्रधान होण्याआधी पर्याय होते ?
लोकशाहीत पर्यायाची वाट बघायची नसतेच.. तो आपसूक तयारच होतो असे आमचे मत.

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

मोदींना पर्याय म्हणून विरोधी पक्षात कुणी नाही ही वस्तुस्थिती आहे.

मी या आधी एक धागा काढला परंतु फारच कमी माहिती मला मिळाली मिळाली प्रतिक्रियेतून .
((टीना, मोदीजी आणि त्यांचे कौतुक करण्याची इच्छा))
गाभा : संसदेत बहुमत असलेला एकपक्षीय पंतप्रधान (उदा नेहरूजी, राजीव गांधीजी, मोदीजी), हा पंतप्रधानपदी कोणते निर्णय घेऊशकतो, शिवाय ते तडीस नेऊ शकतो, कि जे, युती /आघाडीचा बहुपक्षीय पंतप्रधान (नरसिम्हा राव, वाजपेयीजी, मनमोहनजी) घेऊ शकत नाही ?
संसदेत बहुमत असलेला एकपक्षीय पंतप्रधान असण्याचे काय बेनेफिट असतात देशाला ?
लोकांना ते कसे समजावुन सांगता येऊ शकतील ?

"मोदीजी हाच एकमेव पर्याय आहे " हे कश्याच्या आधारे आपण लोकांना समजावून सांगू शकू ?

नुकत्याच (डिसे २०१८) झालेल्या ५ राज्याच्या विधानसभेच्या रिजल्ट मोदीजींच्या एकमेवतेच काँट्रीब्युशन किती ?

मोदींना पर्याय म्हणून विरोधी पक्षात कुणी नाही ही वस्तुस्थिती आहे.

पण दुसऱ्या अँगलने
मोदींना पर्याय म्हणून पक्षांतर्गत तरी काही पर्याय आहे का ?
कारण (प्रकृती अस्वास्थ्यामुळे किंवा इतर कारणामुळे जर) मोदीजींच्या अनुपस्थितीत, भाजपला केंद्रीय निवडणुकीत लीड करायला, भाजपचा चेहेरा बनू शकेल असं एकही नाव डोळ्यासमोर येत नाही.

माझ्या प्रतिक्रीयेचे प्रयोजन दुसर्‍या ओळीत आहे -

मग आत त्यावर उपाय म्हणून भाजप मधूनच कुणी पर्याय उभा करून पक्षांतर्गत भांडणे लावण्याचा / फूट पाडण्याचा हा डाव तर नसावा.. ??

बाकी पर्याय कितीही आणि कोणीही उभे केलेत तरिही जनता शेवटी ज्याच्या पारड्यात तोच पुढे.. हे मात्र मान्य.

बाकी पर्याय कितीही आणि कोणीही उभे केलेत तरिही जनता शेवटी ज्याच्या पारड्यात तोच पुढे.. हे मात्र मान्य.

अतिशय सहमत ...

आणि म्हणूनच
"मोदींना पर्याय म्हणून विरोधी पक्षात कुणी नाही ही वस्तुस्थिती आहे." किंवा
"भाजप मधूनच कुणी पर्याय उभा करून पक्षांतर्गत भांडणे लावण्याचा / फूट पाडण्याचा हा डाव"
असे कॉन्टेक्स्ट फक्त चर्चापुरक म्हणूनच उरतात.
शेवटी ५४०+ लोकप्रतिनिधींच्या हातीच, पंतप्रधान कोण ? होणार /न होणार ... हेच संसदीय लोकप्रणालीचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
...लोकांच्या हाती फक्त, " आपल्या मतदारसंघाचे (त्याच्या भल्याचे), कुठला उमेदवार अतिशय बेस्ट रिप्रेझेन्टेशन करू शकतो, त्या उमेदवाराला मत देणे "
एव्हडेच हाती असते.

डॉ मनमोहन सिंग यांचावर 'ऍक्सिडेंटल पी एम' नंतर अतिशय शेलक्या शब्दता टीका होत असताना,
त्यांचे विरोधकही , त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, असा आरोप त्यांच्यावर करू शकत नाहीत.
किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सर्व वरिष्ठ दर्जाच्या मंत्र्यांपासून , सचिवांपासून , अधिकाऱ्यांपासून , त्यांनी पत्रकांना कधीही ऍक्सेस ब्लॉक केला नव्हता.
किंवा त्यांनी कुठल्याही चॅनेल्स ना वाळीत टाकले नव्हते. आपल्या पक्षातील कुठल्याही प्रवक्त्याला कुठल्याही चॅनेल पासून आडकाठी केलेली नव्हती.
.
.
जाता जाता ...
{{यशाचे अनेक बाप असतात. पण अपयश अनाथ असते, असे सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले असून यशाप्रमाणे अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
https://www.loksatta.com/maharashtra-news/leader-should-take-blame-also-...
}}

ट्रेड मार्क's picture

25 Dec 2018 - 3:45 am | ट्रेड मार्क

भाजपाला बहुमत मिळालं तर मोदी पंतप्रधान होतील नाहीतर बघतील कोणाला करायचं ते. सुषमा स्वराज, गडकरी, पियुष गोयल, सुरेश प्रभू असे कितीतरी नेते आहेत. नाहीतर ज्यांना बाजूला सारले गेले म्हणून बऱ्याच इतर पक्षातल्या लोकांना दुःख होतंय ते अडवाणीजी पण आहेत. नाहीतर अमित शहा?

काँग्रेसला बहुमत मिळालं तर मग सोनीयाचे दिन येतील, म्हणजे राहुल पंप्र होईल. मग मिपावरच्या धाग्यांची आणि प्रतिसादांची संख्या कमी होईल की काय अशी शंका वाटतीये. धागे आलेच तर भारतातून कसा सोन्याचा धूर निघू लागला असे स्तुतीपर येतील.

कडबोळं झालं तर जिथे जनतेने व्हीपी सिंग, देवेगौडा, चंद्रशेखर सारखे पंप्र चालवून घेतले तिथे काय कोणी पण चालेल ना? जमलं तर जमलं नाही तर परत निवडणूक परत घ्यायचा पर्याय आहेच. त्यातल्या त्यात बरं कामकाज करत असेल तर ५ वर्ष चालवून घेता येईल. मग भरपूर पत्रकार परिषदा होतील, विमाने भरभरून पत्रकारांना विविध दौऱ्यांवर नेले जाईल. मग सगळ्या न्यूजमधून सरकार कसे चांगले आहे याचे भरभरून दाखले दिले जातील. आणि मग गेल्या ४-४.५ वर्षात असहिष्णुता वाढीला लागल्याने ज्यांना तगमग होत होती ती थांबेल. प. बंगाल मध्ये कशी पूर्ण सहिष्णुता आहे तशी संपूर्ण देशात नांदेल.

बरं कामकाज म्हणजे कर्जमाफी केली, भरपूर सबसिडी दिली की ते सरकार चांगलं. खरं तर या निवडणुकीत सर्व छोट्या व्यापाऱ्यांचे कर्ज माफ करायची घोषणा कोणीतरी करावी. जो पक्ष अशी घोषणा करेल तो बहुमताने निवडून येईल. नंतरच्या निवडणुकीत ठराविक रकमेच्या आतले गृहकर्ज माफ करावे. मज्जाच मज्जा.

पर्यायाची गरज नसते. एखाद्याला लाथ मारायची ठरवली जनतेने कि ..
https://www.loksatta.com/lekha-news/girish-kuber-article-about-popular-l...

लोकांना आधी मनमोहन सिंग नकोसे झाले आणि मग त्या नकोसेपणातून नरेंद्र मोदी हा पर्याय उभा राहिला.

गिरीश कुबेर | December 17, 2018 05:10 pm

लोकसत्ता आणि श्री गिरीश कुबेर यांनी श्री कुमार केतकर यांचा पराकोटीच्या भाजप द्वेषाचा वारसा पुढे चालवला असल्यामुळे त्यांचे एकंदर लिखाण फारच पूर्वग्रहदूषित आणि एकांगी झालेले आहे. त्यामुळे त्याबद्दल बोलणे सोडून दिलेले बरे.

mrcoolguynice's picture

24 Dec 2018 - 7:31 pm | mrcoolguynice

मग तुमच्यामते , "पूर्वग्रहदूषित आणि एकांगी" नसलेले आणि कोणाचाही द्वेष न करता , समतोल पद्धतीने
भूमिका मांडणारे कोण पत्रकार आहेत ? कृपया त्यांची नावे सान्गा.

सुबोध खरे's picture

24 Dec 2018 - 8:29 pm | सुबोध खरे

दुर्दैवाने एकही नाही. एकतर उजवीकडे किंवा डावीकडे झुकलेले आहेत.
पण तरीही "हिंदू" सारखे डावीकडे झुकलेले वृत्तपत्र जेंव्हा मोदी सरकारची तारीफ करते किंवा पांचजन्य हे रास्व संघाचे मुखपत्र मोदींवर टीका करते तेंव्हा तेंव्हा त्यात तथ्य आहे हे मान्य करता येते.
पण सामना किंवा लोकसत्ता (किंवा कुमार केतकर) हे केवळ पराकोटीचा द्वेष आणि पूर्वग्रहदूषितच बातम्या देताना दिसतात तेंव्हा त्यांची विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यातच सापडते.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Dec 2018 - 12:58 am | माईसाहेब कुरसूंदीकर

गिरीश कुबेर अनेक वेळ सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना दिसतात त्यात काही वावगे वाटत नाही.
अरविंद पांगारिया, अरविंद सुब्रमण्यम, सुरजीत भल्ला, हे ख्यातनाम अर्थतज्ञ.. पण हे ही सगळे राजीनामा देऊन निघुन गेले. नंतर रघुराम राजन सारख्यांना मुदतवाढ न मिळणे.. आणी आत उर्जित् पटेल...
काहीच चुकत नाही आहे सरकारचे ?

सुबोध खरे's picture

25 Dec 2018 - 9:57 am | सुबोध खरे

सरकारच्या धोरणावर टिका करणे हा वृत्तपत्रांचा अधिकार आहे किंबहुना सरकारचे कुठे चुकते आहे ते दाखवून देणे हा या चौथ्या स्तंभाचे काम आहे पण टीका करताना केवळ द्वेषमूलक नसून वस्तुस्थितीवर आधारित असावी.

लोकसत्तेत आणि सामना मध्ये मोदी सरकारच्या विरुद्ध बातम्या मोठे मोठे मथळे देऊन पुढच्या पानावर छापले जातात आणि असत्य बाहेर आले कि कुठल्यातरी कोपऱ्यात एक बारीकशी बातमी असते कि आम्ही दिलगीर आहोत. हि निष्पक्ष पत्रकारितेची लक्षणे अजिबात नाहीत.
मोदी सरकारचा विरोधासाठी विरोध करताना लोकसत्तेने पणे भीमा कोरेगाव हिंसाचारात अटक झालेल्या नक्षलवादी लोकांचे समर्थन केले होते.
कालच मुंबई उच्च न्यायालयाने श्री तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज फेटाळताना त्यांच्या विरुद्ध सज्जड आणि सकृतदर्शनी पुरावे आहेत असे लिहिले आहेत. याबद्दल कुबेर यांचे आता मौन असेलच. जेंव्हा गैरसोयीचे असेल तेंव्हा ते केवळ बातमी देऊन ते गप्प बसतात आणि कुठेही जराशी फट मिळाली कि लगेच उच्च रवाने मोदी सरकारवर टीका सुरु होते मग त्यात वस्तुस्थिती किती आणि अतिशयोक्ती किती याचा संबंध नसतो.
हीच स्थिती न्यायमूर्ती लोया यांच्या कथित संशयास्पद मृत्यू बद्दल होती. लोकसत्तेने इतके विखारी लेख लिहिले होते कि न्या लोया यांच्या बरोबर मृत्यूसमयी उच्च न्यायालयाचे दोन न्यायमूर्ती स्वतः हजर होते आणि त्या दोघांनी हा नैसर्गिक मृत्यू आहे हे शपथपत्र सादर करून सांगितले आहे हेही ते विसरले.(ज्यांना याबद्दल शंका आहे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मुळापासून संपूर्ण वाचावा)
सर्वोच्च न्यायालयात बोलावून त्या न्यायमूर्तींची "उलटतपासणी घ्यावी" असले अर्ज करणारे श्री प्रशांत भूषण सारखे दीड शहाणे वकील यांच्या हो ला हो मिळवणे हे लोकसत्ता सारख्या वृत्तपत्राला शोभणारे नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Dec 2018 - 10:17 am | माईसाहेब कुरसूंदीकर

लोयांबद्दलचे सर्व लिखाण https://caravanmagazine.in/tag/bh-loya येथे वाचले. निरंजन टाकले ह्या ज्येष्ठ पत्रकाराने अतिशय उत्तम संशोधन केले आहे. लोया ह्यांना मारण्यात आले असे आमचेही मत आहे. कारण

  1. मुंबई उच्च न्यायलयाचे न्यायाधीश मोहित शह ह्यानी लोया ह्यांना १०० कोटीची ऑफर दिली होती. अमित शहांना पाहिजे तसा निकाल देण्यासाठी.( https://www.youtube.com/watch?v=JnVzN-kwyaU&t=213s )
  2. लोया ह्यांच्या नातेवाईकांना सकाळी ५ च्या सुमारास निधन झाल्याची बातमी देण्यात आली तर मृत्युची वेळ ६:३० अशी पोलिस रिपोर्टमध्ये आहे.
  • लोया ह्यांचा मोबाईल मृत्यूनंतर ३ दिवसांनी परत करण्यात आला. त्यावरील सर्व डेटा डिलीट केला होता.
  • लोया ह्यांच्या डोक्यावर जखम झाल्याचे दिसत होते. मात्र पोस्ट मॉर्टेम करणार्या डॉक्टरांनी त्याची नोंद केली नाही. पोस्ट मॉर्टेम करणारे डॉक्टर हे सुधीर मुनगंटीवारांचे जवळचे नातेवाईक.
  • रवीभवन ह्या सरकारी गृहावर लोया व ईतर राहिले होते. त्या दिवशी दहाहून अधिक कर्मचारी रात्रपाळीवर होते. एकाही कर्मचार्याने ही घटना पाहिल्याचे म्हंटले नाही.
सुबोध खरे's picture

25 Dec 2018 - 10:31 am | सुबोध खरे

माईसाहेब
हे सर्व सज्जड पुरावे सादर करून तुम्ही सर्वोच्च न्यायालयात परत सार्वजनिक हिताचा खटला का दाखल करत नाही?

जाता जाता -- कोर्टासमोर उलटतपासणीला किती जण सामोरे गेलेले आहेत? तेथे आपणच अगोदर केलेले प्रत्येक विधान आपल्याला तंतोतंत आठवत नाही त्यामुळे होणारी कुचंबणा कशी असते हे एकदा अनुभवून पाहावे. विशेषज्ञ साक्षीदार म्हणून जाण्याचे दोन प्रसंग आले असताना जाणवलेली गोष्ट.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Dec 2018 - 11:14 am | माईसाहेब कुरसूंदीकर

सज्जड पुरावे असले तरी कट करणार्या व्यक्तीपर्यंत पोचण्यास किती वेळ लागतो हे सज्जन कुमार(१९८४ शीख दंगल) प्रकरणात आपण पाहिले आहे. लोया ह्यांच्या आधी न्यायाधीश जे.टी.उत्पत हे होते. त्यांनी अमित शहांना न्यायलयात हजर राहण्यास सांगितले. काही दिवसात त्यांची बदली झाली व लोया ह्यांची नियुक्ती झाली.लोया ह्यांच्या घरात ह्रुदयविकाराचा कोणाचाही ईतिहास नाही. लोया ह्यांची प्रकृती उत्तम होती. जो ई.सी.जी. सादर केला गेला, त्यानुसार तज्ञांच्या मते तीव्र ह्रुदयविकाराचा झटका असू शकत नाही.
नातेवाईकांना न विचारता पोस्ट्मॉर्टेमचा निर्णय, डोक्यावरची जखम, तीन दिवसांनी मोबाईल संघाच्या कार्य्कर्त्याने परत करणे, शव मुंबईला न नेता लोया ह्यांच्या गावी नेणे, रवीभवनच्या सरकारी कर्मचार्यांना काहीच कल्पना नसणे., रवीभवन ह्या व्ही.आय.पी. निवासस्थानात सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बंद असणे..सगळेच संशयातीत आहे.

सुबोध खरे's picture

25 Dec 2018 - 11:58 am | सुबोध खरे

म्हणूनच म्हणतोय कि
तुम्ही सर्वोच्च न्यायालयात

परत

सार्वजनिक हिताचा खटला का दाखल करत नाही?

सुबोध खरे's picture

25 Dec 2018 - 12:14 pm | सुबोध खरे

माईसाहेब
ऐकीव माहिती वर विसंबून तुम्ही मोठे मोठे आरोप करताय हे तुमच्या एकंदर अगोदरच्या ख्यातीच्या विरुद्ध दिसते आहे. आपण बरेच वेळेस समतोल विचार करत होतात
परंतु शेवटी आपली मूळ विचारसरणी उघडी पडली आहे.
एकदा सर्वोच्च न्यायालय काय म्हणते आहे आणि त्यात तुम्ही केलेल्या बिनबुडाच्या आरोपांचे सविस्तर आणि मुद्देसूद खंडन केलेले आहे. तेवढे वाचून पहा.
https://www.livelaw.in/loya-case-supreme-courts-reasons-dismissing-petit...
वेळ काढून जरा हा ११४ पानी निकालही नीट वाचून पहा हि विनंती .
https://drive.google.com/file/d/1i0FLEpW2vrhMkn2GZucR7Zs1rVSam7zj/view

सुबोध खरे's picture

25 Dec 2018 - 1:06 pm | सुबोध खरे

जाता जाता -- हा निकाल न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी लिहिला आहे. याच न्यायमूर्तीनी आधार खटल्यात इतर चार न्यायमूर्तींच्या विरोधात आपला वेगळा निकाल दिला होता म्हणून याच भंपक पुरोगामी लोकांनी (प्रशांत भूषण आणि कंपनी) त्यांची तळी उचलून धरली होती. आणि याच खटल्यात हेच भंपक लोक याच न्यायमूर्तींना "पूर्वग्रहदूषित" म्हणून सांगत होते.

दुटप्पीपणा हा या सर्व पुरोगामी बुद्धिवादी लोकांचा स्थायीभाव झाला आहे

Blackcat's picture

28 Dec 2018 - 2:53 pm | Blackcat (not verified)

न्यायालयाचा शब्द हेच अंतिम असेल तर

सलमान खानला आता कुणीही हरीणमार्या , खुनी वगैरे म्हणू नये.
आणि बोफोर्समध्येही सगळे बाइज्जत बरी झाले आहेत.

सुबोध खरे's picture

28 Dec 2018 - 7:57 pm | सुबोध खरे

@ Blackcat
१) संशयाचा फायदा देऊन एखाद्याला सोडणे वेगळे
आणि
२) केवळ राजकीय फायद्यासाठी बिनबुडाचा आरोप सिद्ध करण्यासाठी एकही पुरावा नसल्यामुळे न्यायालयाने पुढे चौकशी करण्यास नकार देणे ( ज्यात संपूर्ण न्यायसंस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आणि न्यायमूर्तींवरहि आरोप केलेले असूनही न्यायपीठाने न्यायालयाच्या अवमान केल्याबद्दल अर्जदार वकिलांवर कार्यवाही केली नाही पण कठोर ताशेरे मात्र ओढलेले आहेत)
या दोन गोष्टीतील फरक आपल्याला समजत नसेल तर आपल्याला कायद्याचे मूलभूत ज्ञान नाही असेच म्हणावे लागेल.
बाकी सर्व वितंडवाद आहे.
आपण दोन्ही केस मधील न्यायालयांचे निकालपत्र मुळातूनच वाचून पहा एवढीच मी आपल्याला

विनंती

करू शकतो.
बाकी आपली मर्जी.

Blackcat's picture

28 Dec 2018 - 9:26 pm | Blackcat (not verified)

काय फरक आहे ? एक लिफ्टने वर गेला , एक जिन्याने गेला , इतकाच फरक.
दोघांचे फायनल स्टेटस निर्दोषच.

सुबोध खरे's picture

29 Dec 2018 - 9:40 am | सुबोध खरे

वा:, काय उच्च विचारसरणी आहे?

गॅंग वॉर मध्ये मारला गेला गुंड काय
किंवा
आग लागलेली असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवायला जाताना मारला गेलेला अग्निशमन दलाचा जवान एकाच पातळीवर आहेत.
दोघांचे फायनल स्टेटस एकच :मृत्यू

आपले चरण कुठे आहेत. त्यांचा फोटो पाठवावा. देवघरात ठेवेन म्हणतो.

कोर्टाने निर्दोष मुक्त केला की दोघेही घरीच जातात , कुणीही तुरुंगात जात नाही,

उसळीत फरसाण घाला नैतर फरसण्यात उसळ , गोल पाव घ्या नैतर त्रिकोणी,
शेवटी मिसळपावच

सुबोध खरे's picture

29 Dec 2018 - 1:28 pm | सुबोध खरे

हो ना

गुंड आणि सज्जन

दोघेही स्मशानातच जातात. कशाला सत्कृत्य वगैरे म्हणायचं.

म्हणूनच म्हटलंय ना

आपले चरण कुठे आहेत. त्यांचा फोटो पाठवावा. देवघरात ठेवेन म्हणतो.

Blackcat's picture

29 Dec 2018 - 1:46 pm | Blackcat (not verified)

तुम्ही मुद्दाम चुकीची उदाहरणे घेतली आहेत,

तो गुंड नाही , हे कोर्टाला समजले म्हणूनच सोडून दिले

सुबोध खरे's picture

29 Dec 2018 - 6:01 pm | सुबोध खरे

तुम्ही बधिर आहात का?
मी स्मशानात जाणाऱ्या गॅंगवॉरच्या गुंडाबद्दल( आणि अग्निशमन दलाच्या जवानाबद्दल) बोलतो आहे. सलमान खान बद्दल नाही

गब्रिएल's picture

29 Dec 2018 - 2:17 pm | गब्रिएल

जाऊद्या डाक्टरसायेब, आखिर ज्यो त्यो आपल्या इचाराच्या लेवल्वरच र्‍हाणार... नायतर त्येंनी डोक्यावर घ्येतलेल्या आवडत्या नेत्यांच्या पावलांचा आपमान व्हईल ना. =))

सुबोध खरे's picture

29 Dec 2018 - 12:52 pm | सुबोध खरे

माईसाहेब
न्यायमूर्ती लोया यांनी श्री अमित शाह हे निर्दोष आहेत असे म्हटले होते असते इतकेच नव्हे तर श्री अमित शाह याना गोवण्यासाठी राजकीय स्वार्थासाठी सी बी आय तपासणी करत होती असे हि म्हटले आहे.
आपण कुठल्या तरी "कारवान" सारख्या मासिकाच्या खोटारडेपणावर( हे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकाल पात्रात निसंदिग्ध शब्दात म्हटले आहे) भरवसा ठेवून बेफाट आरोप करत होतात. आपली मूळ मनोवृत्ती उघड होत आहे.
एक आगाऊ पणाचा सल्ला-- आता निवृत्त होऊन तुमच्या ह्यांना घेऊन कुरसुंदीला निवांत जाऊन रहा. हे "राजकारण" तुमच्या प्रकृतीला झेपणारे नाही
Although BJP president Amit Shah was discharged in the case in 2014, judge Sharma mentioned the order that was passed by the judge in his case

. "My predecessor

has, while passing an order of discharge in the application of accused number 16 [Amit Shah] clearly recorded that the investigation was politically motivated," the judge said.

https://www.indiatoday.in/india/story/sohrabuddin-encounter-case-cbi-pro...

सुबोध खरे's picture

29 Dec 2018 - 12:54 pm | सुबोध खरे

न्या लोया नव्हे न्यायमूर्ती गोसावी यांनी असे म्हटले आहे.
टंकन चुकी बद्दल क्षमस्व

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

29 Dec 2018 - 3:12 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बाबा रे सुबोधा, जरा निवांत.
१) गुजरात कॅडरचे आय पी. एस. रजनीश राय ह्यांनीच प्रथम वंजारा/पांडियन ह्यांना अटक करून गुन्हा दाखल केला होता. २००७ मध्ये
२)ह्यानंतर ही केस सी.बी.आय.कडे सोपवण्यात आली. रजनीश राय ह्यांच्या करियरमध्ये मग अनेक अडथळे आणले गेले हे वेगळे सांगायला नको.
३)सी.बी.आयने चौकशी करून अनेक अधिकार्यांवर खटले दाखल केले. त्यात अनेकांना शि़क्षाही झाली.
४) मे २०१४ नंतर पद्धत्शीरपणे अधिकार्यांना पुन्हा कसे नोकरीवर घेण्यात आले ते आपणास माहित आहे.
गुजरात सरकारच्या सेवेत कुणी अधिकारी असतील तर विचारून पहा. (आम्ही विचारले आहे). जी माहिती आहे ती अशी.
१) २००३ च्या मर्च मध्ये भाजपाचे मंत्री हरेन पंड्या ह्यांची हत्या करण्यात आली. नंतर अनेक संशयिताना प्कडण्यात आले व सोडून देण्यात आले. हत्येची सुपारी शहा/मोदी ह्यांनी सोहराबुद्दीनला दिली होती.
२) सोहराबुद्दीन कोण ? तर गुजरात्/राजस्थान भागात राजकारण्यांची 'कामे' करणारा एक स्थानिक गुंड. पंड्या ह्यांची हत्या केल्यानंतर त्यांनी शहांना व काही मंत्र्यांना धमकावण्यास सुरुवात केली. सोहराबुद्दीन आता डोईजड होत असल्याने त्याला संपवणे ही शहा ह्यांची गरज होती.
३) सोहराबुद्दीनच्या हत्येची सुपारी डी.जी. वंज्रारा ह्यांना देण्यात आली .
घरात सावरकरांची तसबीर लावणारे अमित शहा आता कायदेशीररीत्या सुटलेही पण वस्तुस्थीती ही आहे.

सुबोध खरे's picture

29 Dec 2018 - 6:04 pm | सुबोध खरे

माई साहेब,
तुम्ही ते कुरसुंदीचे घर साफसूफ करून घ्यायचे पहा.
उगाच वडाचं तेल वांग्यावर काढून काहीही होणार नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

29 Dec 2018 - 8:42 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

तुझ्या प्रतिसादात फक्त वैयक्तिक टिपण्णी. दुसरे काहीच नाही?
२०१२ पासून सी.बी. अधिकारी संदीप तामगडगे हे तुलसीराम प्रजापतीच्या एनकाउंटरची चौकशी करत आहेत.
Amit Shah, 3 IPS officers among main conspirators, say probe officer
https://indianexpress.com/article/india/tulsiram-prajapati-encounter-ami...

ट्रेड मार्क's picture

30 Dec 2018 - 1:03 am | ट्रेड मार्क

शहांनी १०० कोटींची लाच द्यायचा प्रयत्न केला आणि जस्टीस लोयांनी ती नाकारली म्हणून त्यांचा खून करण्यात आला असं म्हणतात. अगदी हिंदी सिनेमाची स्टोरी झाली की. पण इथे फक्त दाम आणि दंड यांचा वापर केला गेला? हिंदी सिनेमातल्यासारखे नात/ नातीला ओलीस ठेवून पाहिजे तो निकाल का पदरात पडून घेतला नाही?

हे सगळं कोणासाठी? तर ज्याच्या नावावर जवळपास ६० गुन्हे आहेत अश्या गुन्हेगाराचा एनकाउंटर केला म्हणून. अमित शहा/ मोदींनी हे सर्व कधी केलं तर २००३ मध्ये, जे २००२ आधी कोणाला माहीतही नव्हते. २००१ मध्ये नुकतेच मुख्यमंत्री झालेल्या मोदींकडे आणि शहांकडे २ वर्षातच एवढी पॉवर आणि संपत्ती आली होय? ज्याच्या आरोपातून स्पेशल कोर्ट, सुप्रीम कोर्ट यांनी अमित शहा यांच्याशकत एकूण २२ लोकांना आरोपातून मुक्त केलं. एवढाच नव्हे तर तत्कालीन CBI ने तपास निष्पक्षपणे न करता आधीच काही लोक टार्गेट ठरवून त्याप्रमाणे तपास केला असे नोंदवले आहे.

यासाठी या सर्व जजेसना किती पैसे मिळाले असावेत बरं? पुरोगामी लक्षणांमध्ये अजून एक भर पडली म्हणायची. जे लोक अगदी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांवर विश्वास ठेवत नाहीत पण आधी कधीही नाव न ऐकलेल्या कारवान नावाच्या मासिकावर विश्वास ठेवतात.

अजून एक म्हणजे या पुरोगामी लोकांना सुकन्या देवी आणि तिच्या नाहीश्या झालेल्या कुटुंबाबद्दल आठवत नाही. आरोपीला कोर्टाने पुरावे नाहीत म्हणजे पिडितांपैकी कोणीच सापडत नाही म्हणून मुक्त केले तेव्हा कोर्ट अतिशय निष्पक्ष न्यायदान करते असं वाटतं. म्हणजे जगातील चौथ्या नंबरच्या श्रीमंत राजकारण्याने पैसे चारले नाहीत असे ठाम पणे वाटते पण ज्यांची संपूर्ण संपत्ती ३५ कोटींच्या आसपास आहे अश्या अमित शहानी मात्र १०० कोटींची लाच देऊ केली यावर विश्वास बसतो?

यातून एक गोष्ट मात्र सिद्ध होते मोदी/ शहा या खेळात अगदीच नवखे आहेत. इथे जे जे आपल्या सर्वोच्च कुटुंबाच्या आडवे गेले ते ते सगळे मेले किंवा नाहीसे झाले पण कोणाला कसलीही शंका अली नाही. याला म्हणतात सफाई.

असो... पुरोगाम्यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार? पण माई तुम्हीसुद्धा?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Dec 2018 - 6:48 am | माईसाहेब कुरसूंदीकर

१०० कोटींची लाच देऊ पाहणारे उच्च न्यायलयाचे न्यायाधीश मोहित शहा. ( https://www.youtube.com/watch?v=JnVzN-kwyaU&t=12s ) अमित शहा नाहीत. ़ कृपया व्हिडियो पहा. लोया ह्यांची बहिण सांगतेय ते. बहिणीचे, लोया ह्यांच्या वडिलांचे मानसिक संतुलन बिघडले आहे असे म्हणायचे आता?
ह्या मोहित शहांबद्दल आणखीही काही तक्रारी होत्या. https://www.youtube.com/watch?v=6kWDBtdZv0U

ट्रेड मार्क's picture

30 Dec 2018 - 10:39 am | ट्रेड मार्क

त्याच बहिणीने नंतर काय सांगितलं त्यासाठी ही पण लिंक बघा.

मग आता काय या बहिणीला १०० कोटी मिळाले का?

उच्च न्यायलयाचे न्यायाधीश मोहित शहा यांनी लाच देऊ केली म्हणताय पण हे कारवान मॅगझीन आणि वायर सोडून बाकी कुठेही दिसत नाहीये. सुप्रीम कोर्टाने तसेच स्पेशल कोर्टाने सुद्धा हे आरोप बाद ठरवले आहेत. तुम्हाला निरंजन टकले बद्दल फारशी माहिती नाहीये का?

अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही दिलेल्या लिंक मधील व्हिडीओमध्ये त्यांची बहीण म्हणतेय की जस्टीस लोया सर्वांना सांगत होते की ते एक महत्वाची केस लढत आहेत आणि त्यांच्यावर दबाव आहे वगैरे. मृत्यूच्या आधी १२-१५ दिवस धमकीचे मेसेजेस आले होते आणि म्हणून मोबाईल ३-४ दिवसांनी परत दिला तेव्हा सगळे मेसेजेस डिलीट केले होते. मोबाईल वरचे मेसेजेस डिलिट करायला असा किती वेळ लागतो? हँडसेट मधून मेसेजेस डिलीट केले तरी सर्वरवर ते मेसेजेस असतात आणि ते परत मिळवताही येतात. तसेच त्यांचा बेल्ट चुकीचा लावला होता, शर्टाची बटन्स वर खाली होती. जर हे सगळं नीट करायचं म्हणलं असतं तर असा किती वेळ लागला असता? ६.१५ ऐवजी ६.३० ला कुटुंबियांना फोन करता आला नसता का?

ज्याच्याकडे १०० कोटी रुपये लाच द्यायला आहेत त्याला जर खूनच करायचा म्हणलं तर कोणाला शंका येणार नाही प्रकारे करता आला नसता? तसेच ज्याची १०० कोटी फक्त एका जजला द्यायची तयारी आहे तो तेच पैसे वापरून आपल्याला पाहिजे तो जज आणून पाहिजे तसा निकाल का लावू शकणार नाही? १०० कोटी ही खरंच प्रचंड मोठी रक्कम आहे हो. त्यातूनही सोहराबुद्दीन सारखा ५०-६० केसेस असलेला गुंड मारला गेल्याची केस आहे ती, जरी अगदी अमित शहांनी त्याला मारण्याची सुपारी दिली असेल तरी एक गुंड मेल्याचं कोणाला वाईट वाटायचं काय कारण आहे? १०० कोटी लाथाडून मरणाला जवळ करण्याइतका या जमान्यात तरी कोणी असेल असं तुम्हाला तरी वाटतं का?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Dec 2018 - 2:10 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

तुम्हाला निरंजन टकले बद्दल फारशी माहिती नाहीये का?

नाही बुवा. तूच येथे सांग. लोयांच्या जवळच्या नातलगांनी हे प्रशन उपस्थित केले. त्यानुसार कारवानने त्यात संशोधन केले. तू म्हणतोस ते काही अंशी पटतेही. लोयांना मारायचे असते तर त्यासाठी सरकारी विश्रामगृह कशासाठी निवडायला हवे? शिवाय धमकी आल्यावर लोया ह्यानीच सरळ का नाही तक्रार केली पोलिसांत ? ते स्वतः सी.बी.आय. न्यायाधीश होते. पण मृत्युनंतर सगळीकडे एवढ्या तृटी आहेत त्यामुळे शंका निर्माण होणे साहजिक आहे.

ट्रेड मार्क's picture

31 Dec 2018 - 6:22 am | ट्रेड मार्क

जस्टीस लोयांच्या मृत्यूसमयी त्यांचे नातेवाईक जवळ नव्हते त्यामुळे त्यांच्या मनात शंका असणे स्वाभाविक आहे. त्यातून टकले सारखे "पत्रकार" त्यांच्या मनःस्थितीचा फायदा घेऊन काय काय त्यांच्या मनात भरवत असतील काय माहित.

मृत्युनंतर सगळीकडे एवढ्या तृटी आहेत त्यामुळे शंका निर्माण होणे साहजिक आहे.

मी तर म्हणतो म्हणूनच शंकेला वाव नसावा. जो माणूस १०० कोटी लाच म्हणून देऊ शकतो तो एखादा हाय प्रोफाईल किलर हायर करू शकत नाही? किंबहुना एक मस्त प्लॅनच बनवून प्रोफेशनल टीम बनवून कोणाचाही अगदी परफेक्ट गेम वाजवू शकतो का नाही? शर्टाची बटणं, पॅन्टचा बेल्ट हे नीट लावले नव्हते ही किती ढोबळ चूक आहे की नाही? पोस्टमॉर्टेम केलेल्याच्या शर्टावर रक्ताचे डाग दिसले यावरून त्यांचा खून झाला हा निष्कर्ष काढणे म्हणजे जरा अतीच नाही झाले?

तुम्ही म्हणता तसे जर त्यांना धमक्या येत असत्या तर केस सोडण्यापासून, सुट्टीवर जाणे, पोलीस कमिशनर कडे कम्प्लेंट करणे अश्या गोष्टी ते निश्चितच करू शकले असते. त्याही पुढे जाऊन जर मला निकाल माझ्याबाजूने लावून घ्यायचा आहे आणि त्यासाठी १०० कोटी इतकी मोठी रक्कम मी देऊ शकतो तर मग तीच रक्कम वापरून मला पाहिजे तो न्यायाधीश का आणू शकत नाही? किंवा बड्या वकिलांची फौज उभी करून तारीख पे तारीख का खेळू शकत नाही? किंवा परस्पर जजला धमकी व लाच देण्यापेक्षा साक्षीदार गप्प करणे/ पुरावे बदलणे अश्या गोष्टी का करणार नाही?

सुबोध खरे's picture

31 Dec 2018 - 10:13 am | सुबोध खरे

पोस्टमॉर्टेम केलेल्याच्या शर्टावर रक्ताचे डाग दिसले यावरून त्यांचा खून झाला हा निष्कर्ष काढणे म्हणजे जरा अतीच नाही झाले?

कशाला लोकांच्या फडतूस शंकांना उत्तर देत बसताय. त्या माईंनी निकालपत्र वाचलेलंच नाही. उगाच पुरोगामी आणि समतोलपणाचा आव आणण्याचा भंपक प्रयत्न आहे.
मी लोकांना परत परत तेच सांगतो कि आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून निकालपत्र नीट वाचत जा. परंतु आपलेच म्हणणे पुढे रेटण्याचा अजेंडा असलेले लोक आजकाल मिपावर फार झाले आहेत.

इतक्या सर्व (PIL) सार्वजनिक न्यायासाठीच्या अर्जांवर निकाल देताना न्यायालयाने एक एक मुद्दयाचे संपूर्ण खंडन केलेले आहे
निकालपत्रात या गोष्टींचा संपूर्ण उल्लेख आहे. अर्जदारांनी केवळ न्यायसंस्थेला बदनाम करण्यासाठी नुसते बिनबुडाचे आरोप केलेले आहेत असे स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.
reply sent by Dr RK Sharma to AIIMS:“
Thanks for your mail, I would like to state that I have been
grossly misquoted by Caravan magazine regarding death of
Judge Loya. The conclusions drawn are imaginary. I had
general discussion with the reporter. I do not agree with
contents of report published which are ascribed to me. I have
not given any report regarding death of Judge Loya.“
न्यायालयाने "कारवान मासिक" यांचा खोटारडेपणा उघड पाडलेला आहे (पान ९४)
डॉ हरीश पाठक प्राध्यापक आणि विभागप्रमुख न्यायवैद्यक शास्त्र के इ एम रुग्णालय मुंबई यांचा संपूर्ण पोस्ट मॉर्टेम बद्दल विस्तृत अहवाल निकालाच्या पृष्ठ ९६ ते १०२ वर दिलेला आहे. त्यात त्यांच्या शर्टावर रक्ताचे डाग कसे आले पासून प्रत्येक मुद्द्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण आहे.
After autopsy examination is over, the incisions over neck,
chest, abdomen and head on the dead body are sutured after
putting the dissected organs back in to the cavities. In spite of
every precaution being taken to make sure that there is no
leakage of post mortem blood from the stitched post mortem
wounds, sometimes, minor leakage of blood tinged body fluid
can happen. The chances of such leakage become high when
bodies are being transported for long distances as it had
happened in the present case.
पण मीच खरा कसा आहे हे ढोल बडवून सांगणाऱ्या लोकांना सत्य ऐकूच येत नाही.
मी निकालपत्र संपूर्ण वाचलं होतं तेंव्हाच माझ्या लक्षात आलं होतं कि केवळ मोदी विरोधासाठी लोक कुठल्या पातळीपर्यंत खाली जाऊ शकतात.
माईंचा भंपक पुरोगामी मुखवटा फाडून आतला चेहरा उघडा करायचा होता म्हणून मी वरील संदर्भ दिले नव्हते.

या सर्व प्रकरणात माझा स्वतःचा कोणताही अभिप्राय(ओपिनियन) नाही(मी डॉक्टर आहे तरीही) तर न्यायालयाने दिलेला पुराव्यासहित स्पष्टीकरण आहे.

असो.

ट्रेड मार्क's picture

1 Jan 2019 - 12:45 am | ट्रेड मार्क

कशाला लोकांच्या फडतूस शंकांना उत्तर देत बसताय.

तुमचं म्हणणं पण बरोबर आहे, पण मी आपलं लेमॅन टर्म्स मध्ये सांगून बघितलं. पण जर डोळ्यावर झापडं लावूनच बसायचं असेल तर आपण काही करू शकत नाही. तरी एक/दोन वेळा सांगून बघायचं.

दुसरं म्हणजे माळ आहे पण बघायचंय की हे लोक मुद्देसूद प्रतिवाद करू शकतात का. ते करू शकत नाहीत हे आत्तापर्यंत बरेचवेळा सिद्ध पण झालेलं आहे. म्हणूनच मग वैयक्तिक हल्ले करण्यात येतात किंवा त्रागा करण्यात येतो. म्हणून मी शक्यतो मुद्देसूद लिहिण्याचा आणि त्याला डेटा किंवा लिंक सुद्धा देतो. पटलं तर पटलं!