लोकांनो, जरा मदत कराल का. खराडीमधल्या इऑन मध्ये इथून पुढे काम करावे लागणार आहे. त्यासाठी कुटुंबासहित शिफ्ट व्हायचे आहे. तर कोठे राहणे सोयीचे पडेल ते सांगाल का. जमेल तितक्या जवळ राहता यावे असा उद्देश आहे. पण आर्थिक क्शमता मर्यादित आहे. टू बी एच के नसला तरी चालेल. वन बी एच के अथवा अगदी वन आर के असला तरी चालेल पण शक्यतो ऑफिसाच्या जवळ हवाय. वाघोली, केशव नगर, विमान नगर वगैरे एरिया काही लोकांनी सुचवले आहेत. पण मला वाटतं वाघोलीतला बहुतांश भाग दहा बारा किलोमीटर तरी दूर पडेल. विमाननगरचेही तेच. बहुतेक केशव नगर जास्त जवळ आहे. शिवाय सोसायटी फार काही हाय फाय नसली तरी चालेल. (शक्यतो नकोच हाय फाय. भाडे फार पडेल. ) हाय फाय म्हणजे अशी सोसायटी जिच्यात व्यवस्थित चालणारे स्विमिंग पूल, जिम अशा अॅमेनिटीज असतात त्यावाल्या सोसायट्या. शक्यतो साध्यावाल्या हव्या आहेत. इथे कोणाला त्या भूभागाची माहिती व अनुभव आहे का. full furnished घेतल्यास कितपत खर्च येउ शकतो किंवा unfurnished चा किती ह्याचाही अंदाज आल्यास बरे. खरेतर unfurnished असलेलाच बरा. कारण सगळे सामान उपलब्ध आहे. राहत्या घरातूनच तिकडे शिफ्ट करायचे आहे. शिवाय पन्नासेक किमीसुद्धा होणार नाही.
प्रतिक्रिया
17 Nov 2018 - 8:14 pm | यशोधरा
इऑन च्या आसपास ज्या इमारती आहेत, तिथं पाहिलेत का? पण तिथे जरा भाडी अधिक असतील. तुम्हांला कंपनीची कॅब असेल, तेव्हा वाघोली खूप लांब नाही पडणार. तिथे शाळा, भाजीबाजार वगैरे सगळे आहे, तेव्हा तोही प्रश्न यायचा नाही. विमाननगर मध्ये काही भागांत भाडं खूप नाही, असं ऐकलंय. नक्की माहित नाही.
17 Nov 2018 - 8:16 pm | यशोधरा
लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी भागात बघू शकता बहुतेक.
17 Nov 2018 - 8:57 pm | चिंटु
लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी हे सगळे एरिया विचार करण्यासारखे आहेत. कॅब आहे तशी उपलब्ध. पण सध्याची करिअर , शिक्षण , ऑफिस आणि आयुष्यातली परिस्थिती त्या भरावश्यवर राहणे थोडे अवघड वाटते. दरदिवशी स्वतःला बराच वेळ द्यायचा आहे. शांतपणे पहाटे लवकर उठून किंवा रात्री किंचित जागून ह्या फिल्डमधल्या नव्या गोष्टी शिकायच्या आहेत. त्यामुळे ये-जा करण्यात फार वेळ देणे जरा अवघड आहे. तिथली हल्लीची ट्रॅफिक बरीच जास्त असते असे ऐकले आहे. संध्याकाळी पाचपूर्वी निघालात तर ठीक , अन्यथा फार अवघड आहे म्हणे. शिवाय ऑफिसमध्ये जरा परिस्थिती वेगळी आहे. सकाळी आठ सव्वा आठला पोचूनही पाचला निघता येईलच असे नाही. कधी कधी साडे सहा सात वगैरेही होतात. त्यामुळेच दूर आणि मोठी जागा घेण्यापेक्षा जवळ पण लहान जागा सध्या पसंतीची आहे. पण अर्थात अगदीच इऑनच्या इथली जागाही परवडणार नाही. आमच्या इकडे इ एम आय असतो त्यापेक्षासुद्धा सध्या तिथली भाडी आहेत.
पण मनापासून थेंक्यू. अजूनही काही इतर माहिती असेल तर सांगा
17 Nov 2018 - 10:11 pm | तुषार काळभोर
हा भाग चांगला राहील.
शाळा, बाजार, सर्व प्रकारची दुकाने, रुग्णालये चार पाच किमी अंतरात आहेत. केशवनगर, वाघोली, विमाननगर मध्ये घर घेतल्यास वाहतुकीची कोंडी रोजची असेल. मी रोज याच मार्गाने प्रवास करतो. फक्त वाघोली पार करायला (लेक्सीकॉन शाळा ते डिकाथलॉन) ३०-४० मिनिटे लागू शकतात. तिथून इऑन मध्ये १० मिनिटात पोचता येईल.
वाघोलीत अगदी तीन हजारात डबल रूम ते १२ हजारात 2bhk अशी मोठी रेंज आहे. मुलांसाठी CBSE प्रकारच्या भरपूर शाळा आहेत. भरपूर प्रकारची व सर्व स्तरातली हॉटेलं आहेत. दोन तीन मोठी रुग्णालये आहेत.
केशवनगर मध्ये वाघोलीप्रमाणेच सर्व काही. भाडं डबल रूमला 6000 पासून ते १६-१८ हजार 2BHK अशी रेंज आहे.(याच्या वरती पण आहे). केशवनगर आता मनपामध्ये असल्याने काही सुविधा जास्त मिळतील, पण मूळचा गावठाण भाग असल्याने काही गैरसोयी आहेत.
हे सगळं विमाननगरात पण मिळेल, भाडं केशवनगरसारखं किंवा +२०००
बायपासला समांतर एक रस्ता आहे पश्चिमेकडे (टाटा गार्ड रूम/पाण्याची टाकी). त्या रस्त्यावर बघा ६०००-१५००० रेंज मध्ये घराची सोय होईल आणि इऑन ला जाणंयेणं खूप सोपं पडेल. अगदी पीक अवर्स मध्ये सुद्धा!
19 Nov 2018 - 8:45 pm | लौंगी मिरची
येस वडगाव शेरि सेफ अँड स्वीट . आमचे घर आहे तिथे . शांत एरिया आहे . मी २००२ ते २००९ पर्यंत राहिलेय तिथे .
17 Nov 2018 - 11:32 pm | शुभां म.
खराडी ,चंदन नगर, वडगांव शेरी ,थिटे वस्ती, साईनाथ नगर या भागात रूमस भाड्याने सहज मिळतील. शक्यतो केशव नगर टाळा
18 Nov 2018 - 8:08 am | सुखी
हेचं म्हणतो.
केशवनगर ला खूप ट्रॅफिक लागेल दररोज.
चंदननगर मध्ये मिळून जाईल तुमच्या बजेट मध्ये चांगलं घर.
Wadgaosheri मध्ये, बॉलिवूड e square chya बाजूला पण बघा.
वाघोली मध्ये, खुद्द वाघोली पेक्षा खराडी अन् वाघोली या मधल्या जागा बघा. शक्यतो चोकी दानी हॉटेल क्या आजुबाजूस
19 Nov 2018 - 8:46 pm | लौंगी मिरची
मगरपट्टा सीटी ??
19 Nov 2018 - 9:20 pm | सस्नेह
Nobroker.com, magicbricks.com, 99crore acres या साईट्स धुंडाळा.हवे तितके ऑप्शन्स सर्व डिटेल्स आणि मॅपसह मिळतील.
नुकतंच मी मुलांच्या ग्रुपसाठी धनकवडीत हवा तसा फ्लॅट चारच दिवसांत शोधला.
19 Nov 2018 - 10:31 pm | मुक्त विहारि
मस्त...
आंतरजालाचा सकारात्मक उपयोग..
27 Nov 2018 - 12:38 pm | चिंटु
खुप आभार लोकांनो. तुमच्या सल्ल्यांचा उपयोग होतो आहे. पण तुर्तास असं ठरतय की आहे तिथूनच सुरुवातीचे काही दिवस प्रवास करुन पहावा. एखाद महिना वगैरे. कंपनी कॅब देते आहे. आणी जरा लवकर निघालो घरुन, म्हणजे ७.३०, ७.४५ ला तर जमण्यासारखं आहे अस्म म्हणताहेत. तर काही दिवस कॅब ने ये जा करुन बघणार आहे. सर्वांचे आभार.