आय टी कंपन्या बऱ्याच वेळा ले ऑफ करतात म्हणजेच अर्थात आपल्या एम्प्लॉयीना नारळ देतात . तशा बऱ्याच कंपन्या अगदी नॉन आयटी कंपन्याही ले ऑफ करतात पण कमीतकमी त्यांच्या एम्प्लॉयीना भरपाई देतात . (टेल्को , बजाज वैगेरे ) पण आयटी कंपन्या मात्र फक्त नोटीस पिरेडचे पैसे देतात . कंपनी त्यांना रेसिग्नेशन द्यायला लावते. सभ्य भाषेत त्याला पिंक लेटर मिळाले असेही म्हणतात. रेसिग्नेशन नाही दिले तर टर्मिनेट करू अशी भीती घालतात . मग बिचारे एम्प्लॉयी मुकाट रेसिग्नेशन देतात . त्यांची एकजूट नसल्याने ते कोणाकडे दाद मागू शकत नाहीत . मोठा पगार हा नुसता दिखावा असतो कारण खूपशा लोकांनी घरे घेतलीत . पुण्यामुंबईत घर घ्यायचे म्हणजे करोडो रुपयांचे फ्लॅट असतात. त्याचे हफ्ते , लाईफस्टाईल मेंटेन करण्यात सगळा पगार खर्ची पडत असतो त्यामुळे सेविंग्ज नसतेच आणि असे ले ऑफ झाले कि काही खरे नसते . अक्षरशः दुसरा जॉब मिळोंपर्यंत पूर्णतः वाट लागते कारण घराचे हफ्ते थकवणे शक्य नसते .
हे सर्व का लिहिले तर मी माझ्या कंपनीतले आतापर्यंतचे दोन ले ऑफ पहिले आता तिसरा होऊ घातलाय त्यामुळे डोक्याचा नुसता भुगा झालाय . ज्यांना काढले जाते त्यांच्याकडे त्यांचा परफॉर्मन्स कसा चांगला नव्हता म्हणूनच त्यांना जायची वेळ आली ह्याच नजरेने पाहतात . मॅनेजरचे राजकारण पण काहींना भोवते. एखादा प्रोजेक्ट जातो त्यात क्लाएन्टला किती फुंडींग मिळाले , त्याचा व्यवसाय किती वाढला , आपल्या कंपनीने त्यांच्याकडून किती नफा काढला , इथली तिथली माणसे बदलणे अशा बऱ्याच फॅक्टरवर प्रोजेक्टचे जाणे अवलंबून असते पण सर्वात शेवटी त्याचे खापर एम्प्लॉयी वर फोडून त्यांची हकालपट्टी होते . आतापर्यंत तुम्ही त्यांना का ठेवले त्यांचा परफॉर्मन्स नव्हता तर? पण जोवर कंपन्यांचा फायदा असतो तोवर त्या ठेवून घेतात , भरघोस नफा कमावतात आणि नको असेल तेंव्हा सरळ त्यांना काढून टाकतात . शिवाय ह्या आयटी कंपन्यात तुम्ही एकदा शिका तुम्हालाते कायम उपयोगी पडेल असे कधीच होत नाही , नेहमी स्वतःला अपडेट करत राहा, त्यासाठी खर्च करा , स्वतःला छानछोकी मेंटेन करत रहा , पार्ट्या वगैरे करा , टीमला खुश ठेवण्यासाठी पार्ट्या करत राहा असले उद्योग करावे लागतात . सतत तुम्ही गुलाम असल्यासारखे क्लायंटचा शब्द झेला , त्यासाठीचे पराकोटीचे टेन्शन , स्ट्रेस घ्या पण बिन बोलता तोंडात साखर पेरून काम करत राहा असले उदयॊग करावे लागतात .हे सर्व असह्य होऊन दर फ्रायडेला दारूचे ग्लास रिचवा , दर अर्ध्या तासाला भकाभका सिगारेटी फुंका ...हेच लाईफ होऊन गेलेले असते .
काही उदाहरणे द्यायला आवडतील , पहिल्यांदा जेंव्हा ले ऑफ झाला तेंव्हा एकाची बायको गरोदर होती . रोजची टेन्शन पेलवणार नाही म्हणून ह्याने तिला रिझाईन द्यायला लावलेले . आईवडील ह्याच्यावरच अवलंबून. त्याने कंपनी अगदी लहान होती तेंव्हापासून काम केलेले म्हणजे कंपनि मोठी होण्यात त्याचा नक्कीच हाथ होता .अशा वेळी त्याला व आणखी पंधरा जणांना अर्ध्या तासाच्या नोटीसवर काढून टाकले . टेन्शन ने इतका गोंधळला होता कि बास . कंपनीने काढून टाकताना त्याच्या योगदानाचा विचार केला नाही . घरी सांगितलेस का म्हणल्यावर ,"घरी सांगायची हिम्मत नाही म्हणाला ". त्याला बरेच दिवस जॉब मिळाला नव्हता . किती अवघड आहे अशा स्थितीत जॉब जाणे . त्याच वेळी नुकतेच कॅम्पस मधून रिक्रूट केलेले चार जणांना काढून टाकले . वाळल्यासंगे ओलं जळतंय तसा प्रकार झालेला . बिचाऱ्यांची कॅम्पस मधल्या पुढल्या संधी पण हुकल्या आणि पुन्हा फ्रेशर म्हणून जॉब शोधणे किती अवघड . त्यात एक मुलगी खूप कष्टाने शिकून आलेली ती तर असं झाल्यामुळे इतकी रडली होती कि बास . अर्ध्या तासात कंपनी इमेल अकाउंट बंद झाले . आपल्या सॅलरी स्लिप पण त्यांना फॉरवर्ड करायला जमले नाही .
एकाने नुकतेच होम लोण घेतले होते , काही बॅकअप नाही , डाउनपेमेंट सुद्धा इथून तिथून लोकांकडून उसने घेतले होते. ते परत करण्याचे शेड्युल होते . त्याला हे कंपनीला समजावता समजावता नाकी नऊ आले . कसेतरी त्याला घेतले , पण कधीही संबध नसलेल्या टेकनॉलॉजि वर टाकले आणि शिवाय भारतातच दुसऱ्या लोकेशनला पाठवून दिले . इतके अवघड झाले कि बिचार्याला आपणहून राजीनामा द्यावा लागला .
दुसऱ्या ले ऑफ च्या वेळी काहींना अड्जस्ट करण्यासाठी भलत्याच टीम मधल्या लोकांना जावे लागले . त्यांना चार दिवसाच्या मुदतीवर काढले . जबरदस्त मनस्ताप दिला . दोन महिन्यात पाहिजे तो जॉब मिळण्यासाठी एकजण आपल्या दोन महिन्याच्या बाळाला बायकोला हिथेच सोडून दुसरीकडे जॉब ला गेला. मोठी मुलगी शाळेत , तिला नवीन शहरात ऍडमिशन घेणे अड्जस्ट होणे अवघड वाटले . त्यानेही जवळपास ६ वर्षे ह्या कंपनीत जॉब केला होता . तो गेला तेंव्हा बाकी टीमची पण गोची झाली होती , मॅनेजर तर बिचारा रडकुंडीला आला होता , नवीन लोकांना घेऊ न कसे काम करायचे म्हणून ते हि चार दिवसाच्या केटीवर .
कंपन्या करोडो रुपये मिळवतात आणि पाहिजे तेंव्हा लोकांच्या पोटावर पाय आणतात. काहीतरी कायदे व्हायला हवेत . अवघड आहे एकूण . कंपन्यांच्या मालकांना काहीही फरक पडत नाही . अशा परिस्थितीत नक्की काय करायचे? कंपन्यांशी लॉयल राहणे किती घातक असू शकते . होम लोन घेताना काय करायचे , नवीन जॉब मिलोपर्यंत कसा पेशन्स टिकवायचा ह्यावर ह्यात चर्चा व्हावी असे वाटते . कायदे असले तर कोणते ? त्यासाठी काय क्रायटेरिया असतो वैगेरे मुद्दयांवर चर्चा अपेक्षित आहे . अगोदर अशी चर्चा झाली असल्यास त्याचा धागा हि अवश्य द्यावा .
प्रतिक्रिया
24 Oct 2018 - 3:15 am | रुपी
असे ले-ऑफ होतात तेव्हा कंपनीबद्दल / मॅनेजमेंटबद्दल राग वाटणे साहजिक आहे. पण खरं सांगायचा तर नोकरी करायची तर ह्या बाबी ग्राह्य धरायलाच हव्यात.
शेवटी मॅनेजमेंटवरही खरचांचा मेळ घालण्याची जबाबदारी असतेच, त्यामुळे कॉस्ट कटींग करण्यासाठी बर्याचदा ले-ऑफ होत राहतात. शिवाय कधी एखाद्या पोझिशनची गरज राहिलेली नसते, एखादे प्रोडक्ट बंद करावे लागते. रि-ऑर्ग झाले तर नव्या ंएनेजमेंटचे काही लोकांची फार जमत नाही.... आमच्याकडे तर आता अर्धा तास काय, ५ मिनिटेही मिळत नाहीत. एच.आर. स्वतःच त्या व्यक्तीकडी येतात आणि लगेच त्यांचे वैयक्तिक सामान घेऊन जायला सांगतात. देखरेख ठेवायला तेवढा वेळ तिथेच उभे राहतात! पॅकेज वगैरे मिळते. मला वाटतं सॅलरी स्लिप्स इ. गोष्टी विनंती करुन नंतरही घेता येत असाव्यात.
खरं तर होम लोन, लाइफस्टाइल इ. साठी एखादा बॅक-अप प्लॅन असायलाच हवा. सेकंड इनकम म्हणतो तशी काहीतरी सोय आजच्या काळात तरी असायलाच हवी. पगार नसेल तरी ५-६ महिन्यांचा खर्च निघेल एवढी तरतूद असावीच.
बर्याच लोकांमध्ये क्षमता असेल तर २-३ महिन्यांनी किंवा अजून कालावधीने का होईना, त्यांना अजून चांगली संधी मिळाल्याचं पाहिलं आहे.
24 Oct 2018 - 11:34 am | जेडी
कमीत कमी २-३ महिने तग धरायचा म्हणजे कमीतकमी ३ सॅलरी एव्हढे पैसे शिल्लक हवेत हे पटतय पण जेव्हा माणुस घर घेतो तेव्हा डाऊन पेमेंट साठी स्वत:जवळची सर्व पुंजी लावतो त्यामुळे पुन्हा तेवढे पैसे जमवणे अशक्य होवुन बसते. तसेही तुम्ही एम्प्लोयीला काढुन टाकणारच असता तर ॲटलीस्ट त्याला २ महिने द्यायला काय हरकत आहे, अर्धा तासात घरी जा असे सांगणे किती चुकिचे आहे.
25 Oct 2018 - 1:23 am | रुपी
२ महिने?! तुमच्या इतर प्रतिसादात वाचून तुमच्या कंपनीत १५० लोक आहेत, त्यामुळे अश्या कंपन्यांना ते परवडणे अशक्य आहे.
काही मोठ्या कंपन्या थोडीफार मुदत देतात (२-३ आठवडे. २ महिने इतकी मुदत दिलेली मी तरी कधीच ऐकली नाही), पण त्यांना ते शक्य असते. महत्त्वाच्या बर्याच टूल्सचे अॅक्सेस ते काढून घेतात. सगळ्या कंपन्या हे करता येण्याइतक्या समर्थ नसतात.
आमच्याकडे आधी आद्ल्या दिवशी कळायचे. पण कुणीतरी त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, नशीबाने कंपनीला ते रिकव्हर करता आले. पण आता ते नकोच म्हणून त्यांनी अगदी ऐन वेळीच सांगायचे ठरवले असावे.
तुम्ही लेखात लिहिलंय तसं ले ऑफ झालेल्यांकडे बघणार्यांची काहींची मानसिकता तशी असतेही, पण परफॉर्मन्स हे कारण नसेल तर दुसरी नोकरी शोधण्यात फार अडचण येऊ नये.
तुम्हाला जर डोक्याचा भुगा झालाय असे वाटत असेल तर तुम्ही स्वतःच दुसरी नोकरी शोधलेली बरी.
बाकी इतर काही प्रतिसादांशी सहमत.. ले-ऑफची भीती असो वा नसो, अंथरुण पाहूनच पाय पसरलेले बरे.
24 Oct 2018 - 5:44 am | कंजूस
सहा महिन्यांनी तुमचा जॅाब सोडावा लागेल - अशा नोटिसा देता येतील.
24 Oct 2018 - 8:54 am | पाषाणभेद
आयटी मध्ये एक युनीअन झाली आहे. नाव आठवत नाही. ती याबाबत लढते आहे.
सगळा प्रकार उद्वेगजनक आहे.
खुपसारे पदर आहे यात. याबाबत काही करता येणे तुर्तास अशक्य आहे. नोकर्यांचीच शाश्वती राहीली नाही. महापुरात मोठी झाडे लवकर जातात लव्हाळे वाचतात, असेही होते.
24 Oct 2018 - 12:02 pm | जेडी
कोणती युनियन, शोधुन सांगाल का प्लीज?
25 Oct 2018 - 9:32 pm | चौथा कोनाडा
फाईट : FITE (फोरम फॉर आय टी एम्प्लॉइज)
आयटी, आयटीईएस, बीपीओ, केपीओ, टेलेकॉम कर्मचार्यांसाठी भारतात स्थापन झालेली ही पहिली ट्रेड युनियन आहे.
साईट : http://fite.org.in
24 Oct 2018 - 9:55 am | नेत्रेश
आपला जॉब कीतीही चांगला असेल तरीसुद्धा दर ६ महीने / १ वर्षांनी दुसरीकडे ईंटर्व्ह्यु देत रहावा. आपली मार्केट मधली खरी कींमत नेहमी आजमावत रहावी.
सर्व खाजगी कंपन्या केवळ नफा कमवण्यासाठीच बनल्या आहेत. कर्मचार्यांचा भल्यासाठी नाही. मालकांची व समभागधारकांचे हीत प्राधान्याने पहाणे हे अप्पर मॅनेजमेंटचे कायदेशीर कर्तव्य आहे.
कर्मचार्यांचे भले मोठे पगार व सुवीधा या फक्त त्यांची प्रॉडकटीव्हीटी व रीटेंशन वाढवण्यापुरती व पर्यायाने कंपनीचा अधीक फायदा व्हावा या कारणासठी असतात.
त्यामुळे कर्मचार्यांनी कंपनीशी बांधील रहावे, एकनिष्ठ रहावे अशी कंपनीची अपेक्षा नसते. (शंका असल्यास ऑफर लेटर पहावे - अॅट वील एम्प्लॉयमेंट).
प्रत्येक कर्मचारी हा स्वतःच्या करीयरसाठी, नोकरीसाठी स्वतःच जबाबदार असतो.
म्हणुनच म्हणतो, बॅग भरुन तयार रहावे, आपला जॉब कीतीही चांगला असेल तरीसुद्धा दर ६ महीने / १ वर्षांनी दुसरीकडे ईंटर्व्ह्यु देत रहावा. आपली मार्केट मधली खरी कींमत नेहमी आजमावत रहावी.
24 Oct 2018 - 12:00 pm | जेडी
त्यामुळे कर्मचार्यांनी कंपनीशी बांधील रहावे, एकनिष्ठ रहावे अशी कंपनीची अपेक्षा नसते. (शंका असल्यास ऑफर लेटर पहावे - अॅट वील एम्प्लॉयमेंट)
वरील वाक्य मला थोडे बरोबर नाही वाटत, त्यांना नुसते कळले जरी एम्प्लोयी बाहेर शोधत आहे तरीही लगेच त्याला २ -३ महिने तो रिटेन होईल असे बघतात, त्याच्या जागी नवीन शोधुका त्याला काढायची तयारी करतात.
दर सहामहिन्या ने स्वत:ला अजमावत मात्र रहायला हवे हे १००% पटलेले आहे
24 Oct 2018 - 12:09 pm | सर्वसाक्षी
या समस्येची व्याप्ती प्रचंड असून ती मातं पुरती मर्यादित नाही.
एकेकाळी नोकरीला लागल्यावर पहिले सहा महिने हा निरिक्षण/ प्रशिक्षण काळ असायचा. मग ते यशस्वी रित्या पार पाडल्यावर चाकर 'पक्का' व्हायचा.
हल्ली कन्फर्मेशन या शब्दाला काहीही अर्थ नाही. एफ एम सी जी, सी डी, बी पी ओ इथे सुद्धा अस्थिरता प्रचंड आहे. अनेक कंपन्या आपली कामे अनेक छोट्या कंपन्यांना वाटून देतात ज्यायोगे ते काम करणारे कर्मचारी हे मूळ कंपनीचे कर्मचारी नसून त्या सेवादात्या/ पुरवठादार छोट्या कंपनीचे कर्मचारी असतात. अनेक उद्योगात असे करण्यामागे कर्मचार्यांचा उपद्रव व अवास्तव मागण्या आणि बंधनमुक्त, मनाप्रमाणे वर्तन हे आहे. पाच पैशात नाश्ता मिळतो म्हणून कँटिनमध्ये एकमेकाला वडे फेकून मारल्याचे वा मेनु प्रमाणे नाशता मिळाला नाही यासाठी काम बंद करण्याचे प्रकार घडलेले आहेत. शिवाय युनियनची दादागिरी, कार्यकर्ते काहीही काम न करता उनाडणार या सगळ्यातून काम बाहेरुन करुन घेण्याची गरज निर्माण झाली. मालक कर्मचारी संबंध संपले आणि फक्त पैशाचा हिशोब उरला.
जेव्हा कंपनीला गरज असते तेव्हा ते आलेल्या उमेदवाराला त्याच्या मिळकतीच्या पेक्षा ३० - ४०% अधिक वेतन देऊन रुजु करुन घेतात. गरज संपली की सोडुन देतात. अनेकदा मोठा पगार मोठे पद पाहुन उमेदवार बरच काही कबूल करतो, मग कालांतराने बोललेले करता आले नाही की नाना कारणे ( ती रास्तही असू शकतात) दिली जातात पण कंपनीचा पवित्रा असा असतो की या समस्या आहेत म्हणुनच तुम्हाला जे काही मागितले ते देउन भरती केले. जर सगळे घटक अनुकुल असते काम सोपे असते तर तुम्हाला इतके पैसे मोजुन का घेतले असते?
अनेकदा काही चूक नसतानाही प्रकल्प रखडला, अपेक्षित नफा झाला नाही म्हणुन कर्मचारी कमी केले जातात. कधी माणसे भरपूर पण अपेक्षित भार नाही म्हणुन नाहक कुणाची तरी नोकरी जाते. दुर्दैवाने अशी वेळ आली तर आपण तळाच्या दहा टक्क्यात असू नये तसेच थोड्या कालांतराने नवी कौशल्ये आत्मसात करुन आपली पात्रता व आवश्यकता निर्माण करणे आणि एका ठिकाणी एकच काम फार काळ न करणे, आपल्या सहकार्यांच्या एक पाउल पुढे राहणे आवश्यक आहे.
जंगलातून जात असताना जर वाघाची डरकाळी ऐकू आली तर पळताना आपली स्पर्धा वाघाशी नसते तर आपल्या बरोबरच्यांशी असते की सर्वात मागे पडून वाघाच्या तावडीत सपडणारा मी असता कामा नये.
24 Oct 2018 - 12:49 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
पुर्वीच्या एल.आय.सी. /पोस्टातल्या नोकर्या बर्या म्हणायच्या.! हल्ली ते क्लाउड्/ए.आय.मुळी नोकर्या आणखी कमी होणार आहेत असे वाचले आहे. शिवाय संगणकीय भाषांत होणारे बदल कारणीभूत आहेत असे आमचे मत. म्हणजे १९९८-९९ साली एक वेब साईट बनवायला २/३ महिने लागयचे. आता ? तेव्हा ३/४ लोक लागत. आता ?
24 Oct 2018 - 1:07 pm | विजुभाऊ
क्लाऊडमुळे सगळेच ढगात आहेत माई.
तुमचे हे पोष्टात होते तेंव्हाची गोष्ट वेगळी होती.
तार खात्यामुळे लोकांना तातडीने महिती मिळायची ( केली की नाही तुमच्या सुतकाची सोय तार खात्याने बेंबट्या.... असा मी असामी )
आत अया पुढे सोफ्टवेअर स्वतःचा सॉफ्टवेगर प्रोग्रम बनवू लागतील तेंव्हा सगळेच रीकामे ठरतील
कॉल सेंटर ची कामे तंत्रज्ञान सुधारले म्हणून कमी झाली ( १०० माणसंऐवजी ८/१० माणसेच लागू लागली.)
उद्या रीलायन्स , बीग बाजार , यांसारख्या मॉल्स मुळे गावागावातली वाण्याची दुकानेही बंद होतील.त्यावेळी त्या दुकानदारांनी कोणाच्या नावाने ओरडायचे
ड्रायव्हरलेस कार मुळे ड्रायव्हरच्या नोकर्या जातील, अपघातांचे प्रमाण अत्यल्प होईल,
ट्राफीक पोलीसांची कामे कमी होतील,
ए टी एम आणि नेट ब्यांकिंग मुळे ब्यांकेतील ग्राहकांची गर्दी अगोदरच कमी झालेली आहे.
भाजीवाले बाजारात न बसता धंदा करतील.
हे चित्र फार लाम्ब नाही. येत्या चार पाच वर्षात दिसेल.
पण नव्या टेक्नॉलॉजीमुळे जी माणसे घरी बसतील त्यानी काय करायचे हा मोठाच प्रश्न आहे.
त्या परिस्थितीत एक शक्यता रहाते की जर जागतीक युद्ध झाले आनि त्यातून बरीचशी टेक्नीकल कपॅबिलीटी सम्पली तरच लोकांना पुन्हा काम मिळेल
24 Oct 2018 - 1:13 pm | अभिजित - १
या IT मधील लोकांनी आपल्या बाबा , काका इ इ लोकांना बघितलं नोकरी करताना. एकदा लागली कि पक्की. त्यांना वाटतं आपली पण पक्की. असं काही नसतं हे कळे पर्यंत उशीर झालेला असतो.
छानछोकी मेंटेन करत रहा , पार्ट्या वगैरे करा , टीमला खुश ठेवण्यासाठी पार्ट्या
याची कोणी जबरदस्ती करतो काय ? स्वतःची इमेज वाढवण्याकरता हि फालतुगिरी चालते. बंद करा.
करोडो रुपयांचे फ्लॅट असतात. त्याचे हफ्ते , लाईफस्टाईल मेंटेन करण्यात सगळा पगार खर्ची
जर का कोणी १ वर्ष लोन करता बॅकअप पुरवणार असेल तरच घर घ्यावे. पूर्वचि पिढी काय वेडी होती काय ? उशिरा / सेटल झाल्यावर घर घ्यायला. जे नोकरीत सुखचित्र दिसतेय ते कायम टिकणारे नाही हि जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी. हॉटेलिंग / lifestyle / फॅन्सी शॉपिंग सर्व फालतुगिरी आहे. अंथरूण पाहून पाय पसरावे.
थोडक्यात नोकरी गेली तर रडण्यात काय अर्थ नाही. आणि हे प्रकार आता वाढतच जाणार आहेत हे लक्षात ठेवावे.
24 Oct 2018 - 1:41 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
योग्य बोललास रे अभिजिता. तीशी उलटायच्या आतच २ बी.एच.के. व मोठी गाडी घेणारे तरूण्/तरूणी पाहिले आहेत. अर्थात चूक नाही त्यात पण आय.टी/एम बी.ए. च्या नोकर्या ह्या ईतर उद्योग्धंद्याना पूरक म्हणून आहेत हे ध्यानात पाहिजे.
24 Oct 2018 - 1:42 pm | mrcoolguynice
Not Only IT
टेलिकॉममधील ६० हजार रोजगारांवर टांगती तलवार
टेलिकॉममधील ६० हजार रोजगारांवर टांगती तलवार
24 Oct 2018 - 2:25 pm | लई भारी
मोठ्या आकाराच्या आयटी सर्व्हिस कंपन्यांमध्ये थोडा वेळ बेंच वर ठेवून घेणे किंवा इतर कुठल्यातरी प्रोजेक्टवर(कदाचित दुसऱ्या शहरात) पाठवणे या मार्गाने थोडी फार सोय होऊ शकते. प्रॉडक्ट कंपन्या थोडं बरं पॅकेज देतात अशा वेळी. पण मध्यम/लहान आकाराच्या सर्विस कंपन्या मध्ये असं तडकाफडकी काढून टाकण्याचे प्रकार जास्त होतात असं वाटतं.
बऱ्याच वेळा स्टॉक मार्केट मधील स्थिती सुधारण्यासाठी सुद्धा असे प्रकार केले जात असावेत कारण यानंतर कंपनीचा खर्च कमी दाखवला जातो जेणेकरून शेअर वधारतो.
अर्थात, मी काही तज्ञ नाही आहे, थोड्याफार अनुभवावरून लिहितोय. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.
पण कंपनीच्या प्रेमात न पडता स्वतःला अद्यावत ठेवणे याला पर्याय नाही. बाकी प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे बॅकअप असणं किंबहुना मुळात होम-लोन इ. मोठे पाऊल घेताना ह्या गोष्टी गृहीत धरूनच प्लॅनिंग करावं. (कोण आहे रे जो मला आरसा दाखवतोय! ;-) )
24 Oct 2018 - 2:27 pm | कंजूस
>>होणारे बदल कारणीभूत आहेत असे आमचे मत.>>
ह्यांचे मत काय?
24 Oct 2018 - 4:33 pm | विजुभाऊ
पण मध्यम/लहान आकाराच्या सर्विस कंपन्या मध्ये असं तडकाफडकी काढून टाकण्याचे प्रकार जास्त होतात असं वाटतं.
भारतीय आय टी कंपन्या यात आघाडीवर आहेत. काही अमेरीकन कंपन्यादेखील आहेत. या सर्व बड्या कंपन्या आहेत.
24 Oct 2018 - 5:23 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
बाकी सगळं ठिक आहे, कदाचित विचाराला प्रवृत्त करणार आहे. पण हे अजिबात पटले नाहीये:
कोणीही आणि कोणतीही कंपनी किंवा परिस्थिती तुम्हाला ह्या पैकी काहीही करायला भाग पाडू शकत नाही.
24 Oct 2018 - 5:31 pm | जेडी
मी स्वत: हे फेस करते, लोक साधे राहणार्यांना काही येत नाही. असे समजतात. शिवाय बरीच मुलं लेडीज मॅनेजर बरोबर काम करायला पण नाखुश असतात कारण मुली त्यांना अशा पार्ट्यांना घेवुन जात नाहीत.
24 Oct 2018 - 5:38 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
कुठल्या कंपनीत आहत तुम्ही?
कश्या लोकांबरोबर काम करताय तुम्ही?
24 Oct 2018 - 5:47 pm | जेडी
मी एका आय टी कंपनीत काम करते, १५० लोकांची कंपनी आहे. मी ॲडमीन वैगेरे नाही, प्रोजेक्ट मॅनेजर आहे. क्लायंटला थोडेही वाकडे बोलुन चालत नाही. कोणतीही कंपनी स्वत:हुन तुम्ही हे करा म्हणत नाही पण टिम बरोबर रॅपो ठेवा म्हणते, त्यासाठी बजेट देते . आता मला सांगा, मी काही त्यांना दारु पिन्याच्या पार्टयात घेवुन जात नाही..।
24 Oct 2018 - 9:26 pm | आनन्दा
तुमचं नाव जेडी आहे म्हटल्यावर लोकांच्या इतक्या अपेक्षा असणारच
24 Oct 2018 - 9:59 pm | जेडी
जेडी म्हणजे Jack Daniel नाही हो
24 Oct 2018 - 10:15 pm | आनन्दा
साधारण 5 वर्षांपूर्वी भारतातली एक आघाडीची सर्व्हिस आणि प्रॉडक्ट दोन्हीमध्ये नावाजलेली कंपनी मी 30 टक्के इंक्रेमेंट वॉर जॉईन केली.
जॉईन करताना कंपनी तुला कधीही काढून टाकणार नाही वगैरे वगैरे सांगितलेले होते.
जॉईन झाल्यावर 4 महिन्यात वातावरण बदलायला लागले.. खूपच वर, म्हणजे executive लेव्हल ला भयंकर पॉलिटिक्स सुरू होते, आम्ही तर प्रोग्रामर लेव्हल होतो.. पण तरीही बातमी एक दिवस फुटलीच.
आमच्या डायरेक्टर सकट सगळी प्रॉडक्ट टीम कॅनडा च्या मेन टीम ने layoff च्या कात्रीने कापून टाकला होता.
सुदैवाने आम्ही भारतात होतो, आणि कंपनीने आम्हाला बेंच वर टाकले.. 3 महिने सलग नोकरी जायची टांगती तालावर डोक्यावर. 3 महिन्यांनी आम्हाला कुठेतरी जिथे जागा असेल तिथे खुपसून विषय संपवून टाकला.. निम्मे लोक अगोदरच कंपनी सोडून गेले होते.
आता मी कसा अडकलो बघा -
कंपनीच नाव चांगलं होते, त्यामुळे जॉईन झालो तेव्हा मला अतिशय स्पष्ट (तथाकथित) जॉब सिक्युरिटी होती. त्यावर विसंबून मी
1. घर घेतलं
2. घराचं डाउन पेमेंट करायला पर्सनल लोण घेतलं
3. चार वर्षे कंपनीत आता राहणारच हे गृहीत धरून कंपनी लीज वर कार घेतली..
आता वर्षभरात 7-8 हजारांनी पगार वाढेलच हे गृहीत धरून अगदी इमर्जन्सी साठी थोडेसे पैसे हातात ठेवून यात पूर्ण कफल्लक झालो.
पगार लाखात असून पण हप्ते गेल्यावर हातात 20000 शिल्लक राहायचे.
जेव्हा ले ऑफ करणार असे कळले, तेव्हा मी बाहेर जॉब बघायला गेलो, तर आताच पगार 30 टक्के वाढलेला असल्यामुळे नवीन वाढ मिळेना. कंपनी लीज कार ही अश्या परिस्थिती लायबिलिटी होते, कारण ती तोडल्यास 4 वर्षांचे सरळ व्याज बँकेला आंदण म्हणून द्यावे लागते. माझ्याकडे नव्हते 50000, तर 200000 कुठूब देऊ?
मग प्राप्त परिस्थितीत काय होते ते बघत बसने इतकेच हातात होते. 3 महिन्यानी एक प्रोजेक्ट मिळाला कसाबसा, तो घेतला, नोकरी स्थिर केली. दोन वर्षात 2000रु नी पगार वाढला.. कसेतरी 2 वर्षे सहन केले, आणि कंपनी लीज कार ब्रेक इव्हन ला आल्याबरोबर कंपनी सोडली.
आता सरळ कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो.. 2 वर्षांनी मला खूप शिकवलं, माझे करिअर दोन वर्ष मागे गेलं, आणि इतर बऱ्याच गोष्टी झाल्या.
पण आता इतकं शिकलोय,
1. की नोकरी म्हणजे तुमचा हक्क नव्हे,
2. मालकाला गरज आहे म्हणून तो तुम्हाला नोकरी देतो, तुम्हाला गरज आहे म्हणून नाही
3. कोणत्याही क्षणी तुम्हाला नोकरी सोडावी लागली तरी तुम्ही किमान 3 महिने राहू शकाल इतकी बचत पाहिजे, रोखीत.
4. भविष्यकाळ आपण पाहिलेला नाही, तेव्हा निवृत्तीची सोय आपली आपणच केली पाहिजे..
5. घराकडे लायबिलिटी म्हणून न बघता asset म्हणून बघा
25 Oct 2018 - 1:26 am | मुक्त विहारि
1. की नोकरी म्हणजे तुमचा हक्क नव्हे,
2. मालकाला गरज आहे म्हणून तो तुम्हाला नोकरी देतो, तुम्हाला गरज आहे म्हणून नाही
3. कोणत्याही क्षणी तुम्हाला नोकरी सोडावी लागली तरी तुम्ही किमान 3 महिने राहू शकाल इतकी बचत पाहिजे, रोखीत.
4. भविष्यकाळ आपण पाहिलेला नाही, तेव्हा निवृत्तीची सोय आपली आपणच केली पाहिजे..
5. घराकडे लायबिलिटी म्हणून न बघता asset म्हणून बघा
एकदम सही.....
25 Oct 2018 - 2:12 pm | जेडी
स्वानुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद, खुपच उपयोगी सल्ला.
26 Oct 2018 - 7:38 pm | Nitin Palkar
अतिशय छान प्रतिसाद! अनुभवाच्या पाठबळावर आधारित असल्याने अधिक भिडला. पैकी दोन मुद्द्यांबद्दल थोडीशी मतभिन्नता.....
3. कोणत्याही क्षणी तुम्हाला नोकरी सोडावी लागली तरी तुम्ही किमान 3 महिने राहू शकाल इतकी बचत पाहिजे, रोखीत.
:---> या इथे ३ ऐवजी ६ हवेत हे वैम. कारण आज ३ महिन्यात योग्य पर्याय मिळेल याची शाश्वती कमी झाली आहे. बफर(मराठी शब्द आठवत नाही) अधिकच असावा.
5. घराकडे लायबिलिटी म्हणून न बघता asset म्हणून बघा.
:---> घर जो पर्यंत कर्जमुक्त होत नाहीय तो पर्यंत ती लायबिलिटीच आहे. कारण गृहकर्जाच्या हप्त्यापेक्षा भाडे केव्हाही कमीच असते...वैम.
26 Oct 2018 - 10:57 pm | आनन्दा
मी asset असे वेगळ्या अर्थाने म्हणालो.
वेळ आली तर ते विकायची तयारी ठेवा, आणि सामान्यपणे आपल्या घराची किंमत आणि आपल्यावरील गृहकर्ज या गोष्टी समान ठेवा, जेणेकरून तुम्ही 3-4 महिन्यात आली वेळ तर घर विकून मोकळे व्हाल..
मी जेव्हा अश्या दृष्टीने घराकडे बघायला सुरुवात केली तेव्हा मला खऱ्या अर्थाने टेन्शन फ्री आयुष्य जगता यायला लागले..
मी नोकरी सोडून कॉन्ट्रॅक्ट जॉब घेतला तेव्हा हा asset आणि liability चा हिशोब मांडला होता.
26 Oct 2018 - 8:23 pm | राजेंद्र मेहेंदळे
आणि आपण जात्यात नाही तरी सुपात आहोत याचे जाणीव झाली.
मीही एका मा.तं. कंपनीत प्रोजेक्ट लीड म्हणुन काम करणारा ४० जणांची टीम असलेला कामगार. माझे काही अनुभव
बहुतेक वेळा असे अचानक शॉर्ट नोटिस ले ऑफ छोट्या कंपनीत होतात. शिवाय मॅनेजर/ मॅनेजमेंट शी वाजले वगैरेही कारणे पुरतात. एच.आर नावालाच असते.
मोठ्या कंपनीत बेंच वगैरे प्रकार असल्याने २-३ महिने निघतात. पण एखादा माणुस माझ्या स्किल् चेच काम करेन नाहीतर बेंचवर राहीन असे अडुन बसला आणि आलेले प्रोजेक्ट नाकारत राहिला तर मात्र कठीण होते. म्हणजे नवीन स्किल शिका किवा आपल्या स्किल ची नवीन नोकरी शोधा हेच पर्याय राहतात.
बरेच जण आला त्या प्रोजेक्टला हो म्हणतात पण मग काही काम करत नाहित. नंतर त्यांना इंप्रुव्ह्मेंट प्लॅनमध्ये टाकुन काढावे लागते. ह्यात ५-६ महीने निघुन जातात. थोडक्यात ज्यांना सिस्टीमची चांगली माहिती असते ते कंपनीला खेळवत राहतात असेही प्रकार बघितले आहेत.
काही लोकाना प्रोजेक्ट किवा कंपनीशी काही घेणे नसते. एकेका मॅनेजरची पिलावळ त्याच्याबरोबर जॉब बदलत फिरत राहते. मग स्किल वगैरे बाजुलाच राहिले, जो रोज मॅनेजरबरोबर चहा पाण्याला फिरतो त्याचीच वट चालते आणि त्यालाच संधी मिळत राहतात. असो.
26 Oct 2018 - 9:10 pm | जेडी
अगदी हेच चालते
25 Oct 2018 - 12:05 am | सतिश म्हेत्रे
पुढच्या वर्षी पासून आम्हाला पण ह्या क्षेत्रात पाउल ठेवायचे आहे. त्यामुळे जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा ही नम्र विनंती. पुढील धोक्यांची आधिच कल्पना असेल तर त्या तयारीने रहायला बर...
25 Oct 2018 - 12:44 am | विशुमित
आय टी त नोकरी लागल्यावर, फ्लॅट घेण्यापेक्षा 2 एकर शेती घ्या. कधीच उपाशी मरणार नाही.
शेती शिवाय मजा नाही..!!
(ज्यांच्या कडे 7/12 नाही त्यानी जरश्या / शेरडा विकत घ्याव्यात. कोंबड्या पण चालतील. फक्त वराह पालनाच्या भानगडीत पडू नये!)
25 Oct 2018 - 1:38 am | मुक्त विहारि
शेती शिवाय मजा नाही..!! =====> +१
ज्यांच्या कडे 7/12 नाही त्यानी जरश्या / शेरडा विकत घ्याव्यात. कोंबड्या पण चालतील. -----> शेळ्यांना सांभाळायला मनुष्यबळ लागते असे पाहण्यात आहे आणि कोंबड्यांच्या व्यापारात माझ्या एका मिताने जबरदस्त आर्थिक फटका खाल्ला आहे.शिवाय ह्या व्यवसायातून सुट्टी नाही.
25 Oct 2018 - 1:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
कमाल आहे !
एकीकडे, "शेतीत फायदा नाही म्हणून शेतकरी आत्महत्या का करत आहेत" असे म्हटले जाते
आणि दुसरीकडे, "
आय टी त नोकरी लागल्यावर, फ्लॅट घेण्यापेक्षा 2 एकर शेती घ्या. कधीच उपाशी मरणार नाही.
असे !!!शेती शिवाय मजा नाही..!!
नक्की काय भानगड आहे ?!
25 Oct 2018 - 5:55 pm | विशुमित
मी फायदा तोट्या बाबत चकार शब्द काढला नाही.
उपाशी मरणार नाही असे म्हटले आहे.
,,,,
बी पेरूण, पीक काढण्यात जी जुवारी मजा आहे ती कदाचित कॅसिनो मधे जाऊन सोंगट्या खेळण्यात पण मिळणार नाही बाबत आपले एकमत होऊ शकतं.
म्हणून शेती शिवाय मजा नाही असे म्हटले.
25 Oct 2018 - 8:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
असं होय ! :)
25 Oct 2018 - 12:47 am | विशुमित
आय टी मधील बरेच जण मिपा सारख्या संकेतस्थळावर पडिक असतात असे ऐकून आहे.
25 Oct 2018 - 2:14 pm | जेडी
माझ्या आॅफिसमधले मी सोडुन कोणच नाही बा मिपावर
25 Oct 2018 - 5:57 pm | विशुमित
मला पण असेच वाटायचे.
26 Oct 2018 - 7:49 pm | Nitin Palkar
हा हा हा ....
यू डोंनो. मिपा इज क्रियेटिव्ह थिंग.....
26 Oct 2018 - 8:08 pm | विशुमित
खरंच पहिला मी पडिकच होतो मिपावर.
आता वनलाईनर लिहायलाच वेळ मिळतो.
....
एकदा एचआर मधला माझ्या मागं येऊन उभा राहिला होता. मी मिपावर इतका गुंग होतो की मला कसलीच चाहूल नव्हती.
म्हणतोय कसा " तू आहे होय 'विशुमित', शेतकर्याचा कैवारी.
.....
माझी जागा बदलून डायरेक्टर च्या केबीन समोर दिली आहे. उ का चू करता येत नाही.
25 Oct 2018 - 12:49 am | मुक्त विहारि
डिस्क्लेमर : हा प्रतिसाद कुणालाही वैयक्तिक उद्देशून नाही.त्यामुळे, विचारवंतांनी दूर राहिलेले उत्तम...
तुम्ही अतिशय योग्य प्रश्नाला वाचा फोडलीत, ह्या बद्दल मनापासून धन्यवाद.
पण, हा प्रश्र्न फार पुर्वी पासून आहे.
ह्यावर आमचे एक गुरु, चाणक्य ह्यांनी "कौटिल्याच्या अर्थशास्त्र" ह्या ग्रंथात, ह्या गोष्टीचा उत्तम परामर्ष घेतला आहे आणि एकूण-एक सगळ्या युद्धांचा अभ्यास केला तर........
ज्याच्या कडे योग्य ती हत्यारे, योग्य त्या वेळी, योग्य त्या जागी आणि योग्य त्या प्रकारे वापरायची कला होती, तेच युद्धात जिंकले.नौकरी असो किंवा व्यवसाय किंवा रोजचे व्यवहार...ह्या ४ही गोष्टींचे पालन ज्याच्याकडून होते, त्याला भविष्यकाळ जड जात नाही.
आणि आपले रोजचे जगणे, हे पण युद्धा सारखेच असते.....
ज्याच्या कडे योग्य ती हत्यारे ===> आपले वाढते ज्ञान, मग ते चपला शिवणे असो किंवा केस कापणे किंवा नौकरी....
योग्य त्या वेळी ====> दुसर्याची गरज ओळखून
योग्य त्या जागी ====> भरपूर पैसे मिळत असतील तर आजही केस कापणारा , घरी येऊन केस कापतोच.
योग्य त्या प्रकारे वापरायची कला ===> उत्तम न्हावी चेहरे पट्टी बघून केस कापतो.
नमनाला थोडे सल्ले दिले, आता काही गोष्टींकडे वळतो.
-----------------------------------
अशा परिस्थितीत नक्की काय करायचे?
मुळात आपण नौकरी किंवा अर्थार्जन का करतो? तर, आपल्याला कुणाकडे हात पसरायची वेळ येऊ नये म्हणून..... दुपारी १२ वाजता आणि रात्री ८ वाजता कुणीही स्वतःची भाकरी मुद्दामहून कुणालाही देत नाही.त्यामुळे अन्नाची सोय ही सर्व प्रथम, दुसरी कपड्यांची. मला स्वतःला ३-४ जीन्सच्या पँट्स आणि ३-४ साध्या पँट्स आणि ६-७ शर्ट्स भरपूर होतात.सध्या माझे वय ५२ आहे, पण अद्यापही स्वतःचा फ्लॅट नाही.पण स्वतःची ७१ गुंठे जागा आहे.जर मला माझ्या खेडेगावात फुकट रहायला मिळत असेल तर, मला लोकांना दाखवायला फ्लॅट बांधायची हौस नाही.आमचा तुकड्या पण झोपडीतच राहिला तर गाडग्याला झोपडी पण न्हवती.मग आमच्या सारख्या पामराला, फ्लॅटची पण काय गरज?
शिवाय ४५लाखात घर घेण्यापेक्षा, त्या व्याजात (महिना ३०,०००) घर संसार करता येतो आणि लोनचे टेंशन पण रहात नाही.सध्या हेच केले आहे.
आता भाड्याची घरे पण, हवी तितकी मिळतात आणि तुम्ही जर योग्य घरमालक शोधलात तर १५-२० वर्षे तुम्ही दर ११ महिन्यांचा करार करून पण राहू शकता.आता असे घरमालक निदान आमच्या डोंबोलीत तरी भरपूर आहेत.मुले परदेशी आणि ती परत यायची शक्यता नाही आणि घरमालकाचा स्वतःचा दुसरा फ्लॅट आहेच.असे घरमालक भरपूर.त्यांना वेळच्या वेळी भाडे देणारा आणि घराला बाधा येईल असे न वागणारा किंवा सोसायटीला त्रास न देणारा, भाडेकरू असेल तर, डोंबिवलीत तरी त्रास होत नाही.
कंपन्यांशी लॉयल राहणे किती घातक असू शकते?
कंपन्यांशी लॉयल राहणे, मला तरी फायद्याचेच ठरले आहे.मुळात, कंपनीला पण उत्तम माणसे हवीच असतात.नाझ्या स्वतःच्या माझ्या स्वतःकडून फार मोठ्या अपेक्षा कधीच न्हवत्या. तरी पण एकदा संधी मिळाली म्हणून एका मोठ्या कंपनीत, मोठी पोस्ट मिळाली म्हणून, एक अनुभव म्हणून काम केले.१२५कोटीचा प्रोजेक्ट आणि १७ इंजिनियर, १८-२० काँट्रॅक्टर आणि ४००-४५० कामगार हाता खाली होते.पण त्या कामाचा आनंद मिळाला आणि भरपूर अनुभव (मनसोक्त शिव्या खाल्या) पण मिळाला.योग्य वेळी कंपनी सोडली आणि परत एकदा परदेश वारी केली.
पण कंपनीशी लॉयल राहिल्यामुळे, आजही तिथल्या बॉस बरोबर खेळी-मेळीचे संबंध आहेत.आता गुलामगिरी करायचीच नसल्याने, कुठल्याच कंपनीत नौकरीत जाणार नाही, ही बाब अलाहिदा, पण दरवाजे उघडे आहेत.
कंपनीचा मालक तुम्हाला कधीच ओळखत नसतो, पण तुमचे बॉस आणि तुमच्या बॉसचा बॉस मात्र तुम्हाला ओळखत असतोच.आपल्या ज्ञानावाचून किंवा आपल्याला मदतीला घेतल्या शिवाय त्यांना यश मिळता कामा नये इतपत ज्ञान आणि ते ज्ञान फक्त तुमच्याकडेच ठेवण्याचे कौशल्य तुमच्या कडे हवेच.नाहीतर कवचकुंडले नसलेल्या कर्णासारखी अवस्था होते.
माझे ते माझे आणि तुझे ते ही माझेच, असा तुमचा स्वभाव नसेलही, पण शेकडा ४०% ते ५०% लोकांचा हाच स्वभाव असतो.विशेषतः जिथे नौकरीची शाश्वती नाही, तिथे तर जास्तच.
म्हणजे कंपनीला जर KOBALच्या ऐवजी C++ वाले हवे असतील तर, तुम्हाला C++ यायलाच हवे.नाहीतर तुम्हाला नारळ मिळणारच.कारण बॉस स्वतः एकवेळ C++ शिकेलही पण बॉसचा बॉस C++ शिकण्याचे चान्सेस कमी. (मी अजूनही KOBAL आणि C++ च्याच जमान्यात आहे, ह्यावरून तुम्ही माझ्या आय.टी. मधल्या ज्ञानाची केलेली परिक्षा योग्यच आहे.)
-------------------
होम लोन घेताना काय करायचे?
लोन मग ते कुठल्याही व्याजाने का असेना, घेऊच नये.विशेषतः कार, फ्लॅट,परदेश वारी साठी...शैक्षणिक लोन पण, शक्यतो घेऊ नये.कारण शिक्षण पूर्ण केल्या नंतर नौकरी मिळेलच ह्याची खात्री कुणीच देऊ शकत नाही....मी मुळातच एका जागी स्थिर न राहणारा, त्यामुळे ह्या आयुष्यात स्वतःचे असे पक्के घर कधीच बांधणार नाही...आणि तशी वेळ आलीच तर बांबूची झोपडी फक्त बांधीन किंवा मग डोम टाईप घर बांधीन आणि ते पण व्याजाचे पैसे वाचले तरच...स्वस्त आणि दर ५ वर्षांनी नविन घर....
-------
नवीन जॉब मिळेपर्यंत कसा पेशन्स टिकवायचा?
मुळामध्ये, प्रत्येक कंपनीत एक नोटीस पिरियड दिलेला असतो. माझ्या प्रत्येक कंपनीत वेगवेगळा नोटीस पिरियड होता.एका कंपनीत ३ महिन्याचा नोटीस पिरियड होता.(ती कंपनी, मी एका दिवसात सोडली पण आजही, त्या कंपनीतल्या बॉस बरोबर उत्तम संबंध असल्याने, त्याचा २ वेळा नौकरी संबधात फोन येऊन गेला आणि ते पण बॉस बरोबर एकदाही पार्टी न करता.)
विलास मुणगेकर आणि दा.कृ.सोमण ह्यांच्या बरोबर चर्चा करतांना त्यांनी एक वाक्य सांगीतले, स्वतःला स्वतंत्र करा.कुठल्याही आर्थिक पारतंत्रात जखडून घेऊ नका.तुमची जर रोज सिंगल माल्ट प्यायची कॅपॅसिटी असेल तर ब्लेंडेड स्कॉच प्या आणि ब्लेंडेड स्कॉच प्यायची कुवत असेल तर, इंडियन प्या...पण शक्यतो पिऊच नका..कारण काही काही सवयी एकदा लागल्या की सुटत नाहीत.उपवासाचा मुळात तोच अर्थ असतो, एक दिवस उपाशी राहिलात, तर कमीत-कमी गरजात दिवस काढायची सवय राहते.एक उदाहरण देतो...
एका सौदीला विचारले, हे तेल संपले की पुढे तुमचे काय?
तो म्हणाला, सोपे होईल....आम्ही परत उंट हाकायला सुरुवात करू.पण बाकीचे जग तेलाशिवाय जगू शकणार नाही.
दर वर्षी अरबस्तानातील लोक काही दिवस तंबूत घालवतात.मग ते कुवैती असोत किंवा सौदी... माझे सौदी बॉस तर प्रसंगी उंटीणीचे, सॉरी सांडणीचे पण दूध प्यायचे.
थोडक्यात काय तर, तुमच्या गरजा जितक्या कमी तितके तुमचे टिकून रहायचा कालावधी जास्त....
--------
कायदे असले तर कोणते?
थोडे परखड लिहितो....
मुळात हे असे कायदे हवेत कशाला? नौकरी हवीच कशाला? नौकरी करणारा श्रीमंत होईलही पण शेवटी तो गुलामच.प्रत्येक माणसांत व्यवसाय कौशल्य असतेच, आणि निदान स्वतःची मीठ-भाकरी स्वतः कमावण्या इतके कौशल्य तरी असतेच.(देवाची मुले, म्हणजे मेंदू विकसित न झालेली मुले, सोडून) पण मराठी माणसाला गुलामगिरी इतकी अंगवळणी पडली आहे की, आपण आर्थिक गुलाम तर आहोतच आणि वैचारिक पण गुलाम झालो आहोत. गल्लो-गल्ली वाढत असलेली बाबा-महाराज-आई-माई ह्यांच्या मंदिरांचे प्रमाण, हेच दाखवते....एक लेख वाचला होता.केमाल पाशाने, तुर्कस्थान मधील सर्व बाबांना धंदा बंद करायला लावला आणि तुर्कस्थानाची प्रगती झाली..
आणि कामगारांच्या बाजूचे कायदे आले की कंपन्या दुसरा मार्ग निवडतात....काँट्रॅक्ट लेबरचा...आणि तो तर सगळ्यात घातक आणि तो पण निवडता आला नाही की, मग स्थलांतर करतात....मुंबईतल्या कंपन्या बंद पडायला, जमिनीचे वाढते भाव हे प्रमूख कारण आणि न परवडणारा कामगार वर्ग हे दुसरे कारण...नोसिल बंद पडली पण त्याच जागी आय.टी. कंपन्या सुरु आहेत.कारण नोसिलच्या कामगाराच्या आत्ताच्या पगारापेक्षा, आय.टी. इंजिनियरचा पगार कमी आहे.
---------
आता, एक शेवटचा मुद्दा लिहितो....राग मानू नये...
मुळात, शाळेत व्यवहार ज्ञान शिकवले जातच नाही, त्यामुळे अडचणी आल्या, तर पुढे काय? ह्याची कुठलीही ठराविक उत्तरे नसतात.आपली शालेय शिक्षण पद्धती, आमच्या काळांत तरी कारकून तयार करायची फॅक्टरी होती आणि माझ्या मुलांनाही हाच अनुभव आला.त्यामुळे निव्वळ शालेय शिक्षण घेणारी व्यक्ती, अशा व्यावहारिक अडचणी आल्या की भांबावून जाते.
एखादी कंपनी बंद पडली तर, कुणी दुसरी नौकरी पत्करतो तर कुणी स्वतःचा व्यवसाय स्थापन करतो.इथे दोघांनाही जगण्याची समसमान संधी मिळते.तर काही जण व्यसनांच्या आहारी जातात किंवा मग काळ्या व्यवसायांकडे वळतात.तुम्ही कुठल्या मुशीतून घडला आहात, ह्यावर अशा गोष्टींचा फार व्यापक परिणाम होतो.
व्यवहार ज्ञाना वर आधारीत एक सुंदर पुस्तक आहे...."छळछावणीतील दिवस"...लेखक व्हिक्टर फ्रँकल....आणि "विशेष पर्व" हे "विशे" नावाच्या कंपनीच्या मालकाचे आत्मचरित्र.....
ज्यु छळछावणीतून फार कमी लोक वाचले.आणि अशा लोकांचा जेंव्हा अभास केला गेला तेंव्हा, असे समजले की.....एव्हढ्या भयाण परिस्थितीतही त्या वाचलेल्या लोकांनी, त्यांना स्वतःलाच तगवण्याचा, वाचवण्याचा, जगवण्याचा प्रयत्न केला.कारण, त्यांच्याकडे जगण्यासाठी "कारण" होते.एखादे "उद्दिष्ट" होते किंवा एखादे काही तरी "कार्य" होते.
जगण्याचे कारण समजले की, "कसं" जगायचे? हे त्यांना समजत गेले, मग त्यासाठी ते धडपडले, कोणत्याही परिस्थितीत जगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि जगण्याचे मार्ग शोधून काढले.
आपण सगळेच तसे ह्याच परिस्थितीत असतो.मग आपण व्यवसाय करत असो किंवा नौकरी.व्यवसाय वाढ करण्यापेक्षा, दुपारी १ ते ४ दुकान बंद ठेवणारा व्यावसाइक आणि स्वतःच्या नौकरीची काळजी न करणारा, पुढचे शिक्षण न घेणारा नौकरदार, ह्यांचा भविष्यकाल अंधःकार मय होण्याचे चान्सेस जास्त.
आमचे डॉन व्हिटो कॉर्लिऑन ह्या बाबतीत म्हणतात, मुळात अशी वेळच येऊ देऊ नये.उगाच ड्रग मध्ये पैसे ओतण्यापेक्षा, जुगार किंवा इमारती बांधणे किंवा सिनेमा तयार करणे अशा कायदेशीर व्यवसायात पैसे गुंतवणे योग्य.थोडक्यात काय? तर परिस्थिती अस्थिरच असते.अज्जुन चार कायदेशीर व्यवसाय करा.व्यवसायांना मरण नाही.
एक शेवटचे उदाहरण देतो.
इंद्रा नुयी, ज्यावेळी पेप्सीकोच्या अध्यक्षा झाल्या त्यावेळी, सकाळी ५ ते १० ह्यावेळेत विकले जाणारे प्रॉडक्ट कंपनीकडे न्हवते.त्यावेळी त्यांनी ओट्स बनवणार्या एका कंपनीला सामावून घेतले आणि ट्रॉपिकानाला पण सामावून घेतले.ह्या दोन कंपन्यांमुळे पेप्सिकोला मस्त फायदा झाला.
प्रत्येक व्यक्तीने, आपल्या फावल्या वेळेचा, सदुपयोग स्वतःच्या कौटुंबिक भल्या साठी केला पाहिजे, हेच मी उदाहरणातून शिकलो.(पेप्सिको कडे सकाळी ५ ते १० ह्या वेळेत विकले जाणारे पदार्थ आधी न्हवते.आधी ते लेज किंवा सॉफ्ट ड्रिंक्स विकत होते.अमेरिकन झाले तरी, सकाळी-सकाळी नाश्ता म्हणून कुणी, लेज आणि पेप्सी पित नाही.म्हणून मग ओट्स आणि फळांचे रस)
रात्री घरी येऊन, बिनडोक टी.व्ही. मालिका बघायच्या की व्हॉटस-अप वरील फालतू गप्पांत भाग घ्यायचा की उगाच हिंदी सिनेमा नट्यांवरील गॉसीपिंग वर भाग घ्यायचा, की कुणाचे आत्मचरित्र वाचून, स्वतःचेच भविष्य घडवायचा प्रयत्न करायचा? हा ज्याचा त्याचा प्रश्र्न.
डिस्क्लेमर : "मी सांगतो तेच सत्य", हा माझा दावा कधीच न्हवता.....पण चुकून ह्या प्रतिसादाने, कुणाला तरी "मुवि" म्हणजे सर्वज्ञ, असा समज झाला असल्यास, आधीच माफी मागतो.
25 Oct 2018 - 1:48 am | विशुमित
डिस्क्लेमरची बिलकुल गरज नव्हती.
....
जीवनरहस्य उलगडून दाखवलेत.
25 Oct 2018 - 6:39 am | तुषार काळभोर
ज्याच्या कडे योग्य ती हत्यारे, योग्य त्या वेळी, योग्य त्या जागी आणि योग्य त्या प्रकारे वापरायची कला होती, तेच युद्धात जिंकले.नौकरी असो किंवा व्यवसाय किंवा रोजचे व्यवहार...ह्या ४ही गोष्टींचे पालन ज्याच्याकडून होते, त्याला भविष्यकाळ जड जात नाही.
थोडक्यात काय तर, तुमच्या गरजा जितक्या कमी तितके तुमचे टिकून रहायचा कालावधी जास्त....
.(ती कंपनी, मी एका दिवसात सोडली पण आजही, त्या कंपनीतल्या बॉस बरोबर उत्तम संबंध असल्याने, त्याचा २ वेळा नौकरी संबधात फोन येऊन गेला आणि ते पण बॉस बरोबर एकदाही पार्टी न करता.)
प्रत्येक व्यक्तीने, आपल्या फावल्या वेळेचा, सदुपयोग स्वतःच्या कौटुंबिक भल्या साठी केला पाहिजे
मुवि साहेब, नोकरदार माणसाच्या जीवनशैलीचे सार सांगितलं.
25 Oct 2018 - 8:09 am | माईसाहेब कुरसूंदीकर
अगदी योग्य लिहिले आहेस रे मुवि. पण हे मराठी माणसाच्या जीवनाचे सार होय.. असे ह्यांचे मत.(ह.घ्या.) . ईतर अमराठी लोकाना,तरूणाना मोठे फ्लॅट्स्,गाड्या,परदेश नोकर्या.. हव्या आहेत व त्यात भविष्यात काही फरक पडेल असे वाटत नाही.
25 Oct 2018 - 8:28 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर व्यावहारिक आणि "केले ते सांगितले" प्रकारचा प्रतिसाद ! मुवि rocks !
26 Oct 2018 - 12:07 am | मुक्त विहारि
धन्यवाद...
25 Oct 2018 - 10:44 am | सतिश म्हेत्रे
तुम्हाला COBOL म्हणायच आहे का? अणि ते नोकरी ऐवजी नौकरी खटकत.
25 Oct 2018 - 1:25 pm | मराठी_माणूस
हेच विचारणार होतो
25 Oct 2018 - 1:34 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"COBOL" च असणार. वाय.टू.के. च्यावेळेस हे नाव सारखे यायचे. कुशाग्र बुद्धिमत्तेचे अनेक भारतीय तंत्रज्ञ त्यावेळी अमेरिकेत जाउन "COBOL" मध्ये काम करतात. अमेरिकन तंत्रज्ञाना जे जमत नाही ते ह्याना जमायचे असे वाचले होते. नंतर मग "COBOL" नंतर जावा,पाय्थॉन वगैरे नावे ऐकु यायला लागली.
25 Oct 2018 - 11:54 pm | मुक्त विहारि
स्पेलिंग मिस्टेक...
25 Oct 2018 - 1:21 pm | mrcoolguynice
अभी इस प्रतिसादके लिये, हम ...
बोले तो बोले क्या ? करें तो करें क्या ?
. .
.
वाह मुविजी वाह !
25 Oct 2018 - 2:08 pm | जेडी
धन्यवाद मुवी, खुपच छान प्रतिसाद.
25 Oct 2018 - 6:55 pm | अभिजित - १
स्वतःचे घर नाही ? १५ वर्षा पूर्वी ५ लाख ला घेतलेल्या घराची किंमत आज ५५ लाख आहे. हेच प्रमाण सर्वत्र असेल , मुंबई ठाणे पुणे इथे असे वाटते.
बाकी सर्व प्रतिसादाशी पूर्णतः सहमत .
25 Oct 2018 - 11:53 pm | मुक्त विहारि
१८ वर्षांपुर्वी ५ लाखाच्या "बसणी"च्या जागेची किंमत आज ५ कोटी आहे.
१८ वर्षांपुर्वी आमच्या पुज्य पिताश्रींकडे ५ लाख होते.त्यांना सल्ला दिला, की ह्या जागेत पैसे गुंतवू या.ते आपले फिक्स डिपॉसिटच्या मागे लागलेले.त्यामुळे तिथे गुंतवणूक करायची माझी आर्थिक कॅपॅसिटी नसल्याने, मला ही संधी पटकावता आली नाही.आज पण बसणीला गेलो की, संधी हुकल्याचे दू:ख होते.
त्यावेळी जर बसणीच्या जागेत गुंतवणूक केली असती तर ३०% आयकर भरूनही ३.५ कोटी शिल्लक राहिले असते.शिवाय निदान ५ वर्षे तरी मनसोक्त हापूसचे आंबे खाल्ले असते आणि मिपाकरांना फुकट वाटले असते.आंब्याच्या लागवडीचा आणि देखभालीचा खर्च फक्त महिना १०००/-रुच पडला असता कारण नोकर घरचा आणि कलमे पण फुकट.आत्याचे यजमान कलमे आणि नोकर द्यायला तयार होते.पाणी पण त्यांच्याच विहिरीचे देणार होते.
आणि आज बर्याचशा, रत्नागिरी-गणपती पुळे बसेस, बसणी मार्गे जात असल्याने, पुर्वी जो थोडा-फार वाहतूकीचा प्रॉब्लेम होता, आता तो पण राहिलेला नाही.
२०१२ मध्ये गुंठ्याला ३,०००च्या भावाने घेतलेल्या शेत-जमिनीला आज १८ ते २० हजार गुंठे भाव आहे. ६वर्षात ६ पट भाव कुठलाच फ्लॅट देत नाही.
असो,
शेतीच्या जमिनीचे भाव फ्लॅट पेक्षा चढतेच असतात, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
25 Oct 2018 - 6:59 pm | झेन
चांगली चर्चा,
जिसका जळता हैै उसको कळता है
मुवि __/\__
2 Nov 2018 - 12:03 pm | रानरेडा
कम्पनीमध्ये जॉब किंवा काम असे बनवले असते कि - जर ते करणारा नसेल - तो गेला तर फार झटपट दुसऱ्या कोणाला तरी ते करता यावे .
लोक नोकरी सोडूनच जात नाहीत - यापेक्षा हि इतर गोष्टी घडतात . एम्प्लॉयी मरण पावतात , काढुन टाकावे लागतात . आजार पडतात , घरी प्रॉब्लेम येतात . कायद्याच्या कचाट्यात येतात , अपघात होतात.
या गोष्टी होताना सर्वानी पहिले आहे - यामुळे कोथळा कम्पनी बंद पडली आहे . किंवा अशा लफड्यातून जाऊन सर्वाना तोटा होतॊ का ?
गंमत म्हणजे अति सिनिअर लोकांना कोठलीही पूर्वसूचना न देता काढण्याची प्रथा आहे . कारण ते लोक राहून नुकसान करू शकतात . अनेकदा तर मिटिंग रूम मधून सरळ घरी जायला सांगतात ( बाकी सामना नन्तर पाठवा जाते ) किंवा अनेकांचा कम्प्युटर acess काढला जातो .
अगदी सी इ ओ ला काढल्याची किंवा सी इ ओ मरण पावल्याची उदाहरणे आहेत . पण कम्पनी बंद पडली नाही .
तर EVERYONE is replaceable. काही वेळा थोडा वेळ लागतो इतकेच . अनेक ठिकाणी तर कम्पनी पॉलिसी मध्येच कोठल्याही गोष्टी वर अधिक अवलंबित्व ( Dependance ) येणार नाही याची काळजी घेतली जाते . व्हेंडर सुद्धा अनेक ठिकाणी ३-४ घेतात ते या साठी!
- खास आदमी यो को भी याद दिलाना चाहिये
कि वो कभी भी
आम बन सकते है!
- कंपनी (२००२ - राम गोपाल वर्मा - अजय देवगण मलिक भाई च्या भूमिकेत )
25 Oct 2018 - 12:17 pm | सस्नेह
बैलाचा डोळा हो मुवि !
बाकी फार दिवसांनी दिसलात !
येवा आणि एकदा आमच्या घरला वैनींना घेऊन !
25 Oct 2018 - 11:55 pm | मुक्त विहारि
जरूर येणार ....
25 Oct 2018 - 1:17 pm | आशु जोग
चांगली चर्चा सुरु आहे
25 Oct 2018 - 2:16 pm | मार्मिक गोडसे
मस्त प्रतिसाद. सध्या एकापेक्षा अधिक दगडांवर पाय ठेवून काम करतोय, सगळे छंद जोपासून हवा तितका आरामही घेतो.
25 Oct 2018 - 8:32 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
म्हणजे कसे रे मार्मिका ?
26 Oct 2018 - 12:52 am | मार्मिक गोडसे
माईसाहेब, अवांतर वाचनामुळे शेअर मार्केट ट्रेडिंगमधून कमाई आणि फोटोग्राफीमधून भटकंतीही (क्लायंटच्या कृपेने फुकटात) केली. छोटे व्यवसायही करून बघितले. नोकरी करत नाही, आणि कर्ज काढून कुठलीच वस्तू घेत नाही. कुठल्याही व्यवसायातून झालेला ९०% फायदा शेअर मार्केटमध्ये गुंतवतो. परतावा अपेक्षेपेक्षा अधिक मिळतो,त्यामुळे आर्थिक तणाव शून्य. एफडी, mutual fund, सोन्यात शून्य गुंतवणूक.चेक पेमेंट देणेघेणे पुरता बँकेत बचत खाते.उगाच जास्त कामं घेत नाही, आराम घेतो.बाईक, एस टी, ट्रेन , भाड्याच्या गाडीने प्रवास करतो. स्वतःची चारचाकी घ्यावी असं वाटत नाही.
26 Oct 2018 - 9:25 am | मुक्त विहारि
+ १
कर्ज काढणे म्हणजे आपली कबर आपणच खोदणे....असे माझे मत...
26 Oct 2018 - 9:52 am | सुबोध खरे
मी या मताशी सहमत नाही.
मी कर्ज काढूनच राहते घर आणि दवाखाना घेतला. त्यानंतर दोन घरे कर्ज काढून घेतली होती ती कर्जे फेडून आता ८ वर्षांनी पाच पट किमतीला विकली. या सर्व कर्जांवर आयकरातून वजावट मिळाली. शिवाय महिन्याचा हप्ता जात असल्याने आपणहून बचत झाली. आता या पैशातून स्वतःला राहायला मोठे घर घेत आहे.
पण ऋण काढून सण कधीच केला नाही. क्रेडिट कार्डावर १९८९ पासून आजतागायत एक पैसाही व्याज भरलेले नाही.
कर्ज कशासाठी काढता आहात हे फार महत्त्वाचे आहे. कर्ज काढून मी चैनीच्या वस्तू घेतल्या नाहीत.
व्यवसाय धंद्यासाठी कर्ज काढून तो करणे किंवा वाढवणे आणि कर्ज काढून मोठी मोटारगाडी घेणे यात फार मोठा फरक आहे.
26 Oct 2018 - 11:13 am | मुक्त विहारि
पण बर्याचदा, ज्याला सरकारी नोकरी नाही त्याला, अशा कर्जांच्या विळख्यातून, नोकरी सुटली तर, त्रासच जास्त होतो.
माझ्या अंदाजाने, आय.टी. कंपन्या खाजगीच असतात.
सामान्यतः आपण कर्ज घेतांना, आपण हप्ते फेडून, घरखर्च चालवू शकतो का? ह्याचा विचार करतोच आणि तसा तो करणेच योग्य.
पण, खाजगी कंपन्यांचे काही सांगता येत नाही. डोंबिवलीतील, प्रिमियर, प्रायमाटेक्स ह्या अतिशय उत्तम पगार देणार्या कंपन्या पण बंद पडल्याच.(त्या का बंद पडल्या? हा ह्या धाग्याचा विषय नाही.कधीतरी शांत पणे बोलूच.)
खाजगी कंपनीत काम करणार्याने किंवा फ्री-लान्सर म्हणून किंवा व्यावसाईक म्हणून उपजिवीका करणार्याने, कर्ज न काढणेच श्रेयस्कर.
प्रथम तहहयात, अन्नाची सोय आणि मग वैद्यकिय सेवेची सोय.(इथे मिपाकर डॉ.सोडून...कारण मिपाकर डॉ. वैद्यकिय सल्ले फुकट देतात.हा स्वानुभव आहे....विशेषतः डॉ.म्हात्रे आणि सुबोध खरे ह्यांच्या बाबतीत.)
मग वस्त्राची आणि मग घराची सोय. असे माझे मत...कदाचित चुकीचे पण असू शकेल...पण अद्याप तरी ह्या विचारसरणीमुळे, आर्थिक तोशीस अद्याप तरी, मला लागलेली नाही.
जाता-जाता......पण आजकाल मुलाचे स्वतःचे घर असल्याशिवाय, मुली लग्नाला तयार होत नाहीत, ही पण एक वस्तूस्थिती नजरेआड करता येत नाही...त्यामुळे आमच्या पिढीला, मुलांसाठी तरी घरे घ्यावीच लागतात.
घराचा विषय निघालाच आहे तर लिहूनच टाकतो.
आमच्या ओळखीतल्या एका माणसाने आयुष्य भाड्याच्या घरातच काढले पण मुलांना मात्र फ्लॅट घेवून द्यायला आर्थिक मदत केली.कारण एकच, मुलाचा स्वतःचा फ्लॅट असल्याशिवाय, मुली लग्नाला तयार होत नाहीत.
आज नाही तर उद्या बहूदा, आमच्यावर पण हीच पाळी येणार.
मुवि झोपडी में और उस के बच्चे फ्लॅट में....चलता है....यही तो जिंदगी है...बच्चे खूष तो बाप भी खूष...
26 Oct 2018 - 12:09 pm | सुबोध खरे
माझ्या बाबतीत उलट आहे. मी सरकारी नोकरी सोडताना कर्ज घेतली कारण खाजगी नोकरीत सहजासहजी कर्ज मिळाले नसते.
26 Oct 2018 - 8:23 pm | Nitin Palkar
गरजेपोटी कर्ज घ्यावे लागते,,,,, पण कर्ज घेण्यापूर्वी आपण किती कर्ज घेतोय, आणि कधी, किती आणि कसे फेडणार याचा विचार करायलाच हवा...
25 Oct 2018 - 11:18 pm | Pvdpune
हा प्रकार बाकी क्षेत्रां मद्ह्ये सुद्धा चालतो. किमान IT मध्ये उत्तम पगार व बाकी सुविधा तरी मिळतात (कधी 5 दिवसांचा आठवडा कधी काही coupons वगैरे). रिटेल वा तत्सम fields मध्ये परिस्थिती अजून गंभीर आहे. मला स्वतःला ऐका अतिशय प्रतिष्ठित रिटेल कंपनीत असा अनुभव आला आहे, ते देखील 3.5 वर्षे काम केल्यावर.
आपण आपली lifestyle आणि गरजा मर्यादित ठेवल्या तर अशा परिस्थितीत जास्त त्रास होत नाही.
26 Oct 2018 - 12:24 am | साहना
ले ऑफ हि चांगली गोष्ट आहे. अश्याने कंपनी चे नसते खर्च कमी होतात, कंपनी चांगली चालते आणि जास्त लोकांना रोजगार मिळतो. ले ऑफ करणाऱ्या कंपन्या आमच्या देशांत तसेच इतर सर्व देशांत जास्त प्रगती करतात आणि नाही करणाऱ्या कंपन्या रेल्वे, इंडियन एरलाईन्स प्रमाणे चालतात.
कर्मचारी ह्या दृष्टीने दुसर्याच्या संपत्तीवर तुमचा काहीही अधिकार नाही आणि म्हणूनच नोकरीची हमी सुद्धा नाही. तुम्हाला नोकरी तोपर्यंतच मिळेल जो पर्यंत तुम्ही कंपनी साठी फायदा करून देता. त्यामुळे एकदा तुम्ही कंपनीवर ओझे झालात कि इतर कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने तुम्हाला नारळ देणे आवश्यक आहे.
ले ऑफ विरोधांत कायदे झाले तर भारतातील गुंतवणूक कमी होईल आणि कमी नोकऱ्या निर्माण होतील आणि आम्ही पुन्हा इंदिरा गांधींच्या गरिबी हटावो समाजवादी गटारांत लोळत पडू.
टीप : काही कंपन्या रोजगार कराराचा भंग करून ले ऑफ करतात, अश्याना त्वरित आणि जबर शिक्षा करायला पाहिजे.
26 Oct 2018 - 5:50 pm | मराठी कथालेखक
ले ऑफ योग्य की अयोग्य हा प्रश्न नाही.. पण ले ऑफ ची वेळ येवू नये याकरिता कंपन्या स्वत: काय प्रयत्न करतात , कशी धोरणे अवलंबतात .. मूळात काही दीर्घदृष्टी असते की नाही हा प्रश्न आहे.. खाली एका प्रतिसादात मी लिहिलंय.
कंपन्यांनी तोट्यात जात कर्मचार्यांना सांभाळावं असं मी म्हणत नाहीये पण भरती करताना आणि पगार वाढवतानाच दीर्घकालीन विचार करायला हवा. उगाच रेल्वे , एअर इंडिया ई सरकारी आस्थापनांशी तुलना करण्यात अर्थ नाही.
ले ऑफची वेळ येवू नये म्हणून कंपन्यांनी , तर कंपनीवर तशी वेळ आलीच तरी त्यात आपण असू नये याकरिता कर्मचार्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे (म्हणजे सकारात्मकपणे गुणवत्ता, स्किल्स , परफॉर्मन्स यावर काम करुन ... राजकारण करुन नव्हे)
एखाद्या कंपनीवर वारंवार ले ऑफची वेळ येत असेल तर त्या कंपनीची अधोगती निश्चित आहे... अशी कंपनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार इतकं नक्की..
अशा कंपनीत जाताना असुरक्षिततेमूळे नवीन लोक वाजवीपेक्षा खूप जास्त पगाराची अपेक्षा करतील.. अनेक लोक तर अशी कंपनी सरळ टाळतीलच. .. आत असलेल्या लोकांच्या मनातही असुरक्षिततेच्या भावनेमुळे अस्वस्थता येईल, राजकारण वाढेल आणि परफॉर्मन्सचे बारा वाजतील.
असो.
26 Oct 2018 - 10:11 am | सुबोध खरे
नाण्याची दुसरी बाजू --आय टी क्षेत्रातील एक वास्तव (जे आय टी कर्मचारी स्वतःहून कधीही सांगणार नाहीत.)
जेंव्हा तुमच्या कौशल्याला बाजारात किंमत असते तेंव्हा जास्त पगार देणाऱ्या कंपनीकडे तडकाफडकी जाणारे आय टी कर्मचारी भरपूर आहेत. अशावेळेस हे लोक कंपनीची अडचण पाहत नाहीत. एक तर पगार जबर वाढवून मागतात किंवा सरळ बॉण्ड असेल तर पैसे भरून नाही तर असेच फटकन सोडून जातात. चालू असलेल्या प्रोजेक्ट चे काय होते याची त्यांना फिकीर नसते.
प्रकल्प चालू असताना कित्येक कर्मचारी आपल्या मागण्या मान्य करून घेताना कंपनीला वेठीस धरतात.
३०-५०% पगारवाढही देऊन अशा माणसाला ठेवून घेतात. याचा गोपनीय अहवाल वरिष्ठ व्यवस्थापनाकडे पोचतच असतो.
कंपन्या अशा माणसाचे कौशल्य काय ते शोधून त्याला पर्याय निर्माण करतात आणि पर्याय निर्माण केला कि सर्वात पहिल्यांदा अशा कर्मचाऱ्यांना गुलाबी चिठ्ठी देतात. कोणत्याही कर्मचाऱ्याला डोईजड होऊ न द्यायचे कंपनीचे धोरण असते.
SAP या तंत्रज्ञानात सुरुवातीला लोकांना प्रचंड पगार देत असत आणि पगारवाढीसाठी लोक असे इकडून तिकडे जात असत.
हा लेख मी आय गेट (पटणी) मध्ये काम करत असलेल्या एका अति वरिष्ठ माणसाशी (ज्याची आता स्वतःची पुण्यात कंपनी आहे). बोलत असताना त्याने सांगितलेली वस्तुस्थिती आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे पाच सहा वर्ष अनुभव असलेले काही अभियंते अतिशय माजोरड्या भाषेत बोलत असत.
ता क- मला आय टी मध्ये काहीही ज्ञान नाही आणि हे सर्व ऐकीव माहितीवर( मित्राने सांगितलेल्या) माहितीवर आधारित आहे.
26 Oct 2018 - 11:19 am | मुक्त विहारि
कारण, माझ्या नात्यातल्या एका स्वतःची आय.टी. कंपनी असलेल्या माणसाने पण हेच सांगीतले.
आणि मी ज्या-ज्या कंपनीत काम केले होते, तिथे पण हीच परिस्थिती होती.
टाळी एका हाताने कधीच वाजत नाही...आणि एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात...
26 Oct 2018 - 7:45 pm | विशुमित
उत्तम विश्लेषण.
जवळपास असेच आहे.
26 Oct 2018 - 12:01 pm | टर्मीनेटर
साहना आणि डॉ.सुबोध खरेंच्या प्रतिसादाशी सहमत.
साहनाजी ले ऑफ हि कर्मचाऱ्यांच्या दृष्टीकोनातून नसली तरी कंपनीसाठी चांगली गोष्ट आहे.
सुबोधजी आपण दिलेली माहिती ऐकीव असली तरी त्यात नक्कीच तथ्य आहे. अशा गोष्टी सर्रास होतात.
कॉल सेंटर्स (Customer Care), BPO (Business Process Outsourcing ), KPO (Knowledge Process Outsourcing), LPO (Legal Process Outsourcing) हि IT क्षेत्राच्या विकासातून जन्मलेली अपत्ये आहेत. व्यवसाय देणाऱ्या क्लायंटची हांजी हांजी करणे हि त्यांची व्यावसायिक गरज आणि SLA (Service level agreement) मधील अटी आणि शर्तींचे काटेकोरपणे पालन करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे.
IT क्षेत्रातील इंफोसिस , टीसीएस, विप्रो, टेक महिंद्रा सारख्या बड्या भारतीय कंपन्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डिजिटल सोल्युशन अशी कामे करत असल्या तरी त्यांचा तंबू हा मुख्यत्वे BPO आणि KPO च्या बाम्बुंवर उभा आहे. देशी/परदेशी क्लायंटस कडून मिळणाऱ्या व्यवसायावरच हेड काउंट ठरत असल्याने त्यांच्यावरही ले ऑफ ची वेळ आलेली आहे तिथे मध्यम व लहान कंपन्यांची काय कथा.
मुळात आगमनातच ह्या कंपन्यांनी इंडस्ट्री स्टँडर्ड पेक्षा कितीतरी अधिक पगार देऊन कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या होत्या, त्यामुळे ले ऑफ मिळाल्यावर अथवा स्वेच्छेने नोकरी सोडल्यावर कमी पगारावर दुसरीकडे नोकरी स्वीकारण्याची त्यांची मानसिक तयारी नसते. काहीजणांना मिळतेही लवकरच दुसरी चांगली नोकरी पण ज्यांना नाही मिळत त्यातले बरेच जण नैराश्याने ग्रासून जातात.
वरचा मुक्तविहारींचा प्रतिसादही छान आहे. माझ्या मते जॉब सिक्युरिटी नसलेल्या ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी IT तील चांगल्या पगाराच्या जॉब कडे नोकरीच्या दृष्टीने न बघता धंद्याच्या दृष्टीने बघणे योग्य. कारण त्यांना मिळणारा मासिक पगार हा लहान वा मध्यम व्यवसाय असणाऱ्या दुकानदार किंवा व्यापाऱ्याच्या मासिक उत्पन्नाएवढा असतो काही प्रसंगी त्याहूनही जास्तीच असतो. धंद्यात जसे सगळेच दिवस चांगले नसतात तसेच वाईटही नसतात, उतार चढाव येत जात असतात. त्यामुळे चांगल्या दिवसांत होणाऱ्या लाभातून पुढे कधीतरी येणाऱ्या अनिश्चिततेसाठी बेगमी करून ठेवणे इष्ट.
26 Oct 2018 - 5:39 pm | मराठी कथालेखक
या समस्येचे मूळ अनेक वर्षांपासूनच्या आय टी कंपन्यांच्या गडबडलेल्या धोरणात आहे. दूरचा विचार केला जात नाही. आलाय प्रोजेक्ट,चांगला पैसा मिळणार आहे तर भरा घाईने मग त्याकरिता नेहमीचा बँड सोडून अधिक पगार द्यावा लागला तरी चालेल... मग असे केल्याने पगाराचा सामान्य पट्टाच अधिक उंचावतो आणि उत्तरोत्तर अधिक उंचावत राहतो. दुसरी गोष्ट अमूक टेक्नॉलॉजीचा एकच प्रोजेक्ट आलाय तरी त्याकरिता खास त्याकरिता लोक भरतील भले एक वर्षाचाच प्रोजेक्ट असेल, एक वर्षाने असे हे भरती केलेले लोक इतरत्र कुठे फिट होतील का नसल्यास त्यांची काय सोय करता येईल वगैरे काहीच विचार नसतो...फक्त लघू पल्ल्याचा विचार अशाने या कंपन्या (म्हणजे त्यांची टॉप मॅनेजमेंट) स्वतःही तणावाखाली राहतात आणि कर्मचार्यांनाही सतत दडपण.
26 Oct 2018 - 6:08 pm | अभिजित - १
एक वर्षाने असे हे भरती केलेले लोक इतरत्र कुठे फिट होतील का नसल्यास त्यांची काय सोय करता येईल वगैरे काहीच विचार नसतो
USE & THROW
26 Oct 2018 - 6:36 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
गूगल सारख्या कंपन्या वर्षाला २०-२५ लाख रुपये पगार देतात(१/२ वर्षे अनुभव असला तरी) असे ऐकले आहे. अभियंता कितीही हुशार असला तरी हा पगार अचाट वाटतो. गूगलला नफाही अतिप्रचंड मिळत असल्याने तसे असावे.
26 Oct 2018 - 9:22 pm | सतिश म्हेत्रे
माझ्या कॉलेज मध्ये मध्ये DE Shaw, Uber, Sprinklr, Intuit वगैरेंनी 20 लाखांच्या आसपास बेस सॅलरी असणार्या ऑफर्स दिल्या आहेत.
27 Oct 2018 - 12:06 am | माईसाहेब कुरसूंदीकर
पण असे काय योगदान हे लोक देतात हा प्रश्न कायम पडतो. मागणी-पुरवठा- नफा… हे सगळे मान्य पण विप्रोतला फ्रेशर ४ लाख(?) तर त्याचाच वर्गतला एखादा "Uber" मध्ये २० लाख . उत्सुकतेपोटी विचारत आहे. मध्यंतरी एम.बी.ए.चे फॅड आले होते.
27 Oct 2018 - 3:40 am | सतिश म्हेत्रे
जर तुम्ही IIT, NIT मधुन असाल तर प्रवेश घेताना तुम्ही ईतके कष्ट घेतलेले असते की त्यामुळे कष्ट करायची सवय आधीच लागलेली असते आणि गणित वगैरे विषयातील ज्ञान ईतर कॉलेज मधील मुलांपेक्षा जास्त असते. पुढे या कॉलेज मधील मुले निव्वळ कॉलेज मध्ये काय शिकवले जात आहे याचा अभ्यास न करता ईतर गोष्टी ही शिकतात (जसे की machine learning, no sql, big data). ही मुले स्वतः चे प्रॉब्लेम solving स्किल्स सुधारण्यासाठी codechef, codeforces, hackerrank अश्या वेबसाईटवर competitive कोडिंग करतात. आणि बाजारात प्रॉब्लेम solvers ना जास्त पगार आहे. या जास्त पगार देणार्या कंपन्या कोडिंग चेच प्रश्न प्रामुख्याने विचारतात. जरी ईतर tier 2,tier 3 कॉलेजेस मधील काही मुले या गोष्टी करत असतील तरी त्या कॉलेज मध्ये शक्यतो या कंपन्या जात नसल्याने या मुलांना करियर च्या सुरुवातीला तरी अश्या ठिकाणी काम करण्याची संधी सहसा मिळत नाही.
1.विप्रो कॉलेज नुसार पॅकेज बदलते. माझ्या कॉलेज मध्ये त्यांनी 10 लाखाचे पॅकेज दिले. पण तरीही त्यांना CSE चे कोणी मिळाले नाही. कारण CSE चे सगळे आधीच प्लेस झालेले.
2.IIT, NIT मधील सगळीच मुले वर सांगितलेल्या गोष्टी करतात असे नाही. मात्र बहुतेक जण करतात. पॅकेज देखील प्रत्येकाला त्याच्या योग्यतेचे मिळते.
3.IIT, NIT हे फक्त tier 1 colleges ना संबोधित करण्यासाठी वापरलेले आहे. Tier 1 मध्ये ईतर ही काही कॉलेज येतात. जसे की BITS पिलानी.
4. योगदानाबद्दल म्हणाल तर 4 5 लाख रुपये पगार देणार्या कंपन्या 20 लाख रुपये पगार देणार्या पेक्षा खूप कमी काम करवून घेतात. किंवा ते काम करण्यासाठी CSE ची पदवी असण्याची गरज नसते. त्यांना फक्त माणसे हवी असतात. मग भलेही तो माणूस केमिकल इंजिनियर का असेना. याउलट जास्त पगार देणार्या कंपन्या फक्त CS, IT साठी उघड्या (open) असतात.
5. MBA केल्यावर माणूस Software Engineer रहात नाही. त्यामुळे त्याचा पगार हा software engineer चा पगार म्हणता येणार नाही.
6. विप्रो वाल्याच्या वर्गातला Uber मध्ये - हाताची पाचही बोटे सारखी नसतात. आरक्षण असल्यामुळे एका वर्गातील सर्व जण सारख्या बुद्धीमत्तेची नसतात. माझ्या वर्गात JEE Mains AIR 306 asnara देखील आहे आणि 1 लाखावर असणारा देखील आहे. माझ्यामते सर्व जण हा गॅप फिल करू शकत नाहीत.
(हा माझा पाहिलाच मोठा प्रतिसाद आहे. काही चुका असतील तर त्या निदर्शनास आणून द्याव्यात.)
27 Oct 2018 - 10:52 am | सुबोध खरे
माझा वर म्हटलेल्या मित्राशी बोलताना मी त्याला विचारले कि आय आय टी मध्ये संगणक शास्त्रात होणार अभियंता आणि कवडे पाटील( किंवा तत्सम कोणतेही महाविद्यालय) मुंबई विद्यापीठ यातून पास झालेला अभियंता या दोघात फरक काय आहे.
(शब्दशः आय आय टी मधून पास होणार्यांना काय गूळ लागलाय?)
त्याने मला सांगितले कि आय आय टी मध्ये तळापासून वर चढत्या भाजणीने अधिकाधिक उच्च दर्जाचे गणित आणि लॉजिक (कोडींग किंवा जे काही लागते ते मला आता आठवत नाहीये) शिकवले जाते.
परीक्षेत चढत्या भाजणीने कठीण आणि गुंतागुंतीचे प्रश्न विचारले जातात आणी त्याप्रमाणे गुण दिले जातात.
त्यामुळे तेथे (आय आय टी मध्ये) पहिल्या आलेल्या मुलाला १०० गुण असतील तर ज्याला ५० गुण मिळतात त्याला पहिल्या मुलाच्या ज्ञानाची पातळी च्या तुलनेत ५० % ज्ञान असते असे नाही तर त्याला जेमतेम २० % ज्ञान असते. म्हणजेच (law of diminishing returns) ५० % मिळवण्यास जेवढी मेहनत आणि उमज असावी लागते तेवढीच उमज पुढच्या २५ टक्क्याला आणि तेवढीच उमज आणि मेहनत पुढच्या १२.५ % ला लागते.
यामुळे मॅकेन्झी (Mckinsey) सारख्य कंपन्या पहिल्या २० मध्ये आलेल्या मुलांना मुलाखतीत सखोल ज्ञानाबद्दल प्रश्न विचारून २४ लाखांपासूनवर कितीही पॅकेज देऊन उचलतात.
google qualcomm सारख्या कंपन्या अभियंते निवडताना त्याला चिपबद्दल आणि त्याच्या SYSTEM आणि SOFTWARE बद्दल किती सखोल ज्ञान(KNOW WHY) आहे ते पाहूनच इतका प्रचंड पगार देतात.
27 Oct 2018 - 11:19 am | सतिश म्हेत्रे
गूगल Qualcomm च्या तुलनेत जास्त पॅकेज देते.
गूगल मध्ये प्रामुख्याने कॉम्प्युटर engineer लागतात.
याउलट Qualcomm मध्ये प्रामुख्याने Electronics and communication engineers, electrical engineers लागतात. गूगल कधीही चिप शी संबंधित प्रश्न विचारत नाही. सिस्टम म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम हे समजले पण सॉफ्टवेअर म्हणजे नेमक काय म्हणायच आहे आपल्याला?
27 Oct 2018 - 11:27 am | सुबोध खरे
माफ करा
मला स्वतःला त्यातलं काहीही कळत नाही. मी जे लिहिलं आहे ते मित्राने सांगितलं त्याप्रमाणे आहे. त्याने सरमिसळ झाली असू शकेल. तेंव्हा एकंदर गोषवारा ध्यानात घ्यावा. क्षमस्व.
त्याने अभियांत्रिकी भाषेत सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यावरुन जातील हे मी गृहीत धरून असतो.
त्याने अजून एक गोष्ट सांगितली ती म्हणजे --कवडे पाटील महाविद्यालयात प्राध्यापक जे शिकवू शकतील तेच शिकवले जाते. अद्ययावत ज्ञान किंवा उद्योगाला काय आवश्यक आहे ते शिकवले जातेच असे नाही.
( मुळात बर्याच ठिकाणी नोकरी मिळेपर्यंत एम इ केलेले प्राध्यापक सुरुवातीला काही वर्षे अर्ध वेतनावर काम करत असतात. त्याना स्वतःलाच उद्योगात काय चाल्ले आहे ते माहिती नसते मग ते विद्यार्थ्यांना काय शिकवणार?)
यामुळे बाजारात या दोन ठिकाणहून पास झालेल्या अभियंत्याना मिळणाऱ्या मान आणि धन यात इतकी तफावत दिसून येते.
27 Oct 2018 - 11:38 am | सतिश म्हेत्रे
स्वायत्त असल्याने इंडस्ट्री मध्ये काय गरज आहे त्यानुसार ते अभ्यासक्रमात तात्काळ बदल करू शकतात. विद्यापीठांतर्गत असलेल्या कॉलेज मध्ये बदललेला अभ्यासक्रम येण्यास खूप वेळ लागतो.
IIT मधले बरेचसे प्रोफेसर हे IIT मधूनच शिकलेले असतात.
त्यामुळे प्रोफेसरांच्या गुणवत्तेत फरक हा असणारच.
27 Oct 2018 - 12:05 pm | मराठी_माणूस
त्यांना मदतही भरपुर मिळते
https://www.financialexpress.com/india-news/narendra-modi-at-iit-bombay-...
2 Nov 2018 - 10:28 pm | वीणा३
किमान ३ ते ६ (आणि मुलं असतील तर जास्तच ) महिने बॅकअप ठेवल्या शिवाय घर घ्यायची हिम्मत माझी तरी होऊच शकत नाही.
पण असे लोक आसपास खूप दिसतात कि ज्यांना पहिल्या दिवसापासून नीटच राहायचं असतं. खिशात पैसे नसले तरी चालतील पण घर "वेल फर्निश्ड " असलंच पाहिजे, कार असलीच पाहिजे, ब्रँडेड गोष्टी असल्याचं पाहिजेत. त्या लोकांचा जास्त प्रॉब्लेम होतो नोकरी गेल्यावर. काही जेनुइन केसेस असतात पण जास्त हादरा घर + कार लोन + मुलांच्या फी ने बसतो. बाकीच्या गोष्टी आपण अड्जस्ट करू शकतो.