आफेलकुकन अर्थात ऍप्पल केक !!!

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
13 Mar 2009 - 1:20 am

साहित्य
१२५ ग्राम बटर/तूप/लोणी,१२५ ग्राम साखर,३ अंडी,लिंबाची किसलेली साल १ चमचा
१.५ चमचा लिंबाचा रस,१ चिमूट मीठ,२०० ग्राम मैदा,१/४ कप दूध
२ चहाचे चमचे( कापून/फ्लॅट) बेकिंग पावडर
३ ,४ मध्यम आकाराची सफरचंदे
कृती
बटर भरपूर फेटणे, साखर घालून फेटणे,अंडी घालून फेटणे.१ चिमूट मीठ,लिंबाची साल व रस घालणे आणि फेटणे.मैद्यात बेकिंग पावडर मिक्स करणे. हा मैदा थोडा थोडा घालत फेटणे‌. शेवटी दूध घालून फेटणे.
सफरचंदाच्या साली काढून फोडी करणे (खाण्यासाठी फोडी करतो तशा) व त्या फोडींमध्ये सुरीने खाचा मारणे.

ज्या भांड्यात केक करायचा असेल त्याला बटर लावून घेणे व त्यात केकचे मिश्रण एकसारखे पसरणे.त्यावर सफरचंदाच्या फोडी उभ्या लावणे.खाचा मारलेला भाग वर आणि निमुळता भाग मिश्रणात थोडा बुडेल अशा सर्व फोडी लावणे.
अवन प्री हिट करणे.१८० अंश से. वर साधारण ४५ मिनिटे बेक करणे.
बेक करून गार झाला की वरून पिठीसाखर पेरून सुशोभीत करणे.
व्हिप्ड क्रिम बरोबर खाणे.

प्रतिक्रिया

पक्या's picture

13 Mar 2009 - 1:27 am | पक्या

वॉव.. छान दिसतोय केक, स्वातीताई.

चतुरंग's picture

13 Mar 2009 - 1:35 am | चतुरंग

स्वातीताई एकदम जोरदार पुनरागमन!! स्वागत आहे!!!
सोनेरी रंगाचा केक अफलातून दिसतोय! वा, चाखायलाच हवा लवकरच! =P~ =P~

(बेकर)चतुरंग

नंदन's picture

13 Mar 2009 - 2:08 am | नंदन
सहज's picture

13 Mar 2009 - 10:21 am | सहज

हेच म्हणतो. वेलकम बॅक.
सोनेरी रंग जबरदस्त!!

विसोबा खेचर's picture

13 Mar 2009 - 1:39 am | विसोबा खेचर

स्वाती,

इतकी सुंदर चित्र टाकून जळवल्याबद्दल तुझ्याशी कट्टी फू..! :)

(शाळूसोबती) तात्या.

भाग्यश्री's picture

13 Mar 2009 - 1:39 am | भाग्यश्री

काय सुरेख दिसतोय केक.. श्या.. मी केक्स खाणं कमी करतीय( कालच कॅरट केकचा मोह टाळलाय!) आणि तुम्ही इतक्या सुंदर रेसिपी देता! अवघडे !!

http://bhagyashreee.blogspot.com/

आता या वेळेला ऍप्पल पिकींगला गेलो कि नक्की करून पाहिन.

अनामिक's picture

13 Mar 2009 - 2:02 am | अनामिक

मस्तं आहे केक.. तोंडाला पाणी सुटले!
ब्लेंडरने फेटले तर चालते का? कितीवेळ फेटावे?

-अनामिक

शाल्मली's picture

13 Mar 2009 - 2:23 am | शाल्मली

सह्ही दिसतोय एकदम सोनेरी रंगाचा आपफेलकुखेन!!
आता नक्की करून पहाणार.
तू ग्रेट केकबहाद्दर आहेस!! :)

--शाल्मली.

शितल's picture

13 Mar 2009 - 2:57 am | शितल

>>तू ग्रेट केकबहाद्दर आहेस!!
हेच म्हणते.
केक पाहुन पटकन खावासा वाटत आहे. :)
लवकरच करून पाहीन ,मागे एकदा मी ऑरेज केक केला होता तो ही मस्त लागत होता.

लिखाळ's picture

13 Mar 2009 - 6:48 pm | लिखाळ

सह्ही दिसतोय एकदम सोनेरी रंगाचा आपफेलकुखेन!!
आता नक्की करून पहाणार.
वा ! :)

तू ग्रेट केकबहाद्दर आहेस!!
सहमत आहे.
केक फारच छान दिसतोय. एकदम मस्तं .. आगमन जोरात आहे..
-- लिखाळ.

प्राजु's picture

13 Mar 2009 - 10:02 pm | प्राजु

तू केक बहाद्दर आहेस.
मस्तच केक. फारच मस्त.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

किट्टु's picture

13 Mar 2009 - 3:33 am | किट्टु

मस्तच दिसतो आहे केक.. तोंडाला पाणी सुटले! =P~

नक्की करुन पाहिल..

--किट्टु

रेवती's picture

13 Mar 2009 - 5:06 am | रेवती

फार वाईट वाटलं.... आत्ता केक लग्गेच खाता येत नाहीये म्हणून!;)
भारी पाकृ, तसेच फोटू!

रेवती

विंजिनेर's picture

13 Mar 2009 - 8:16 am | विंजिनेर

स्वाती तै,
मला वाटते ह्यात लिंबाऐवजी युझु घातले तर त्याने अजुन वेगळा आणि चांगला स्वाद येतो. बरोबर ना?

छोटा डॉन's picture

13 Mar 2009 - 8:19 am | छोटा डॉन

स्वातीताईचे पुन्हा एकदा धडाक्यात पुनरागमन ..!!!
जय हो ...

ऍप्पल केक दिसायला अफलातुन दिसतो आहे. संध्याकाळी खायला एकदम भारी वाटेल असा अंदाज आहे.
फोटुही लै भारी ...

बाकी आता एकेक रेसिपी लक्षात ठेवायला हव्यात, पुढच्या वेळी येईन तेव्हा सगळे एकेक करुन खाऊन जाईन ;)
छे, एक एक्सेल शीटच बनवुन ठेवायला हवी.

------
( हावरट ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

झक्कास केक दिसतो आहे.बनवायलाच हवा ह केक्..पाककृती बद्दल धन्यवाद.
वेताळ

मैत्र's picture

13 Mar 2009 - 9:55 am | मैत्र

रुडीशॅम मध्ये खाल्लेला आफेल कुखेन आणि काफी ची आठवण आली!!
मस्त सफरचंदाच्या फोडी. जर्मनी आणि हॅसेन ची खासियत...
खूप छान पा कृ... धन्यवाद!

संजय अभ्यंकर's picture

13 Mar 2009 - 10:22 am | संजय अभ्यंकर

Es Gefaelt mir sehr Gut!
Danke Schoen!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

स्मिता श्रीपाद's picture

13 Mar 2009 - 11:18 am | स्मिता श्रीपाद

स्वातीताई,

मस्तच आहे ग पा़कॄ...

आज इतके दिवसांनी तुझी पाकॄ पाहुन मस्त वाटलं...

आता रोज नाही तरी दर आठवड्याला १ अशी पाकॄ नक्की हवी :-)

-स्मिता श्रीपाद.

श्रेया's picture

13 Mar 2009 - 12:35 pm | श्रेया

मला शाहाकारी केक च्या रेसिपि हव्या आहेत आणि त्या कुकर मध्ये करण्याची पध्द्त

स्वाती राजेश's picture

13 Mar 2009 - 6:33 pm | स्वाती राजेश

रेसिपी आणि फोटो मस्तच!
सफरचंदऐवजी ऑरेंजच्या फोडी घालून सुद्धा मस्त होतो केक...करून पाहा.रेसिपी सेम

अनुजा's picture

13 Mar 2009 - 8:50 pm | अनुजा

काय सुंदर दिसतोय केक! रेसिपी पण सोपी वाटतेय...
स्वातीताई, सफरचंद कोणत्याही प्रकारची चालतील का ग्रॅनी स्मिथ वगैरे हवीत??

सर्वसाक्षी's picture

14 Mar 2009 - 1:00 pm | सर्वसाक्षी

पदार्थ आणि चित्रे, दोन्ही सुरेख. एकदा प्रयोग केला पाहिजे याचा

स्वाती दिनेश's picture

14 Mar 2009 - 9:28 pm | स्वाती दिनेश

खवय्यांनो, धन्यवाद.
अनुजा,ग्रॅनी स्मिथच कशाला? कोणतीही सफरचंद चालतील की.. गाला, गोल्डन डिलिशस इ. इ..
स्वाती (राजेश), ऑरेंजकेक मी थोडा वेगळ्या प्रकाराने करते,लवकरच करुन रेशिपी देईन.
डॉन्या, एक्सेल शीट बनवलीस का? इथे आलास की करु रे आपण ऍपल केक..:)
तात्या, कट्टी फू? अरे पुढच्या भारतवारीला तुला ऍपल केक खाऊ घालते..:)
शीतल, तुझी ऑरेंजकेकची रेसिपी टाक की ग..
लवंगी,नक्की कर ग केक ऍपल पिकिंगमधून आणलेल्या ऍपल्सचा
अनामिक, ब्लेंडरने फेटले तर चालेल की. इतका वेळ फेटायचे की फेटताना हलके वाटायला लागले पाहिजे.
शाल्मली, केक करुन पाहिलास का? (आणि लिखाळला खाऊ घातलास का?)
विंजिनेर, युझु घालून नक्कीच वेगळा ,मस्त स्वाद येईल. मी अजून घालून पाहिले नाही.एकदा पहायला हवे.
मैत्र, रुडेशाईम.. वावा अफलातून जागा आहे ती..
श्रेया, ह्या केकबद्दल काहीच लिहिले नाहीस..
पक्या,चतुरंग,नंदन,सहज,भाग्यश्री,प्राजु,किट्टू,रेवती,वेताळ,सर्वसाक्षी,संजय
सर्वांना डांक श्योन अर्थात धन्यवाद!
स्वाती