'मारवा' यांच्या (गंभीर्/चिल्लर्/थिल्लर - वर्गीकरण माहीत नाही) प्रश्नावरून प्रेरित होऊन म्हटलं आवडते परफ्यूम्स विषयावर एक धागा काढावा. सो; हा धागाप्रपंच.
माझ्या बाबांकडून मी उचललेल्या अनेक आवडींपैकी ही एक. परफ्यूम्स. प्रचंड आवडतात, मी याच्या व्यसनाधीन आहे असंही म्हटलं जातं. पण I am okay with it. मला लागतात. मी वाण्याकडे जातानाही सेंट फवारून जातो. काय करणार आता.
तर, आत्तापर्यंत मी कमी अधिक क्वालिटीचे अनेक सेंट्स वापरलेत, वापरतो. त्यातल्या काही निवडक सेंट्स ची इथे यादी करत आहे. प्रतिसादागणिक यादी वाढत जाणं अपेक्षित आहे.
आवडीनुसार उतरत्या क्रमाने: हे क्रम बदलत असतात. या क्षणी हा क्रम आहे.
१) पाको रबान pour homme - अतिशय वेगळा आणि स्ट्राँग वास. वुडी व फ्लोरल नोट्स Top Notes - Rosemary Clary Sage Brazilian Rosewood Middle Notes - Tonka Bean Lavender Geranium Base Notes - Honey Amber Musk Oakmoss
२) डनहिल डिझायर फॉर अ मॅन - गोडूस वास. प्रामुख्याने फ्रूटी. Top Notes-Apple Neroli Bergamot Lemon Middle Notes-Patchouli Teak Wood Rose Base Notes-Musk Vanilla
३) बॉस - बॉटल्ड नाईट - कडक स्पायसी वूडी सेंट. लाँग लास्टिंग. हार्ड टू डिसलाईक. Top Notes-Lavender Birch Middle Notes-Violet Base Notes-Woodsy Notes Musk
४) ब्रूट - ओल्ड इज गोल्ड. एव्हरग्रीन सेंट. निर्विवाद. Brut, one of the most popular men's colognes was first launched in 1964. It is originally produced by Faberge Paris. Top notes: lemon, bergamot, lavender, anise and basil. Heart: geranium, jasmine and ylang-ylang. Base: sandalwood, oak moss, vetiver, patchouli, tonka bean and vanilla.
५) जोवान मस्क फॉर मेन - हाही जुना आहे. शाळेपासून वापरतो आहे. मादक वास. मस्त. Fragrance Notes-Jasmine Neroli Bergamot Musk
६) लोमानी ओरिजिनल - शाळेपासून वापरलेला आणखी एक. मिडियम स्ट्राँग. Lomani pour Homme was launched in 1987. Top notes are lavender, lemon, bergamot and rosemary; middle notes are geranium, camphor and cloves; base notes are patchouli, coumarin and moss.
७) नॉटिका ब्लू फॉर मेन - चार एक वर्षापूर्वीचा टॉप सेलर. सुपर्ब सेंट. Top notes are pineapple, peach and bergamot; middle notes are jasmine and water lily; base notes are sandalwood, musk and cedar.
८) चार्ली रेड - चार्ली चे सगळेच छान आहेत. पण हा मला जास्त आवडला. हा खरं तर वूमन सेंट आहे, पण अप्रतिम आहे. बनवणारी कंपनी रेव्ह्लॉन. Top notes are orange blossom, gardenia, plum, black currant, violet and peach; middle notes are carnation, tuberose, orchid, jasmine, ylang-ylang, lily-of-the-valley and rose; base notes are honey, sandalwood, amber, musk and cedar.
९) इसेन्झा डि विल्स - हा आयटीसी ने बनवलेला परफ्यूम आहे. मला माझ्या मित्राने भेट दिला होता. सुसाट आहे हा परफ्यूम. स्ट्राँग आहे, मादक आहे, स्पायसी आहे. Notes Lemon, Cedar wood, Sandalwood, Plum ,Amber, Musk
१०) टबॅक - याचं सँपल वापरलेलं छोट्या बाटलीतलं. पण नंतर विकत घेणं झालं नाही. घेईन कधीतरी. अतिशय भारी वास आहे याचा. Tabac was launched in 1959. Top notes are aldehydes, lavender, neroli, bergamot and lemon; middle notes are carnation, sandalwood, orris root, jasmine, rose and pine tree needles; base notes are tonka bean, amber, musk, vanilla, oakmoss and tobacco.
जसं प्रत्येक बाबतीत म्हणता येईल, तसं ज्याला आवड आहे त्याच्यासाठी परफ्यूमस चं हे विश्व प्रचंड व्यापक आहे, रंजक आहे. एक मात्र नक्की आहे, तुमची सर्वात पहिली ओळख जी समोरच्याला होते ती तुमच्या वासातून होते. परफ्यूम्स, अत्तरं हे त्याचंच द्योतक आहेत. राजे सजवाड्यांपासून माणूस आपलं अस्तित्व सुवासिक ठेवण्यासाठी यांचा प्रयोग करत आलेला आहे. असो.
आता तुम्हाला कुठले सेंट्स आवडतात ते सांगा ! मी माझ्या यादीत डिओ, अत्तरं वगळली आहेत, ती केवळ यादी भरकटू नये म्हणून. डिओ म्हटलं की वरचा एकही पर्याय टॉप १० मधे येणार नाही. पण असं काही नाही, तुम्हाला जे सुगंध, मग ते कुठल्याही फॉर्म मधे असूदेत, आवडतात ते सांगा ! जाणण्यास उत्सुक.
प्रतिक्रिया
5 Oct 2018 - 7:59 pm | मदनबाण
ओक्के...
केवड्याचा गंध अत्तर लावण्यार्या पेक्षाही त्याच्या आजु-बाजुच्या लोकांना मात्र नक्की कळतो... सुक्ष्म गंध असतो याचा.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Mood of Satya
14 Sep 2018 - 11:05 am | मराठी कथालेखक
चांगल्या दर्जाचे केवडा , मोगरा असे अत्तर कुठे मिळू शकतील (पुण्यात अथवा ऑनलाईन ... मुंबई / कनौज ई ठिकाणी मी जावू शकणार नाही)
14 Sep 2018 - 1:23 pm | सुबोध खरे
लोकांचं भन्नाट ज्ञान पाहून लाजायला होतं राव. आपल्याला त्यातलं काही कळत नाही. एखादा परफ्युम विकत घेतो( किंवा लोकांना भेट देतो) ते केवळ त्याचा सुगंध आवडला म्हणून.
मला पण मित्रांनी किंवा रुग्णांनी भेट दिलेले परफ्युम होते. गंध खास आवडला नाही तर दुसऱ्याला भेट देऊन टाकतो त्याअगोदर त्यांना त्याचा गंध देतो आणि आवडला तरच भेट देतो.
ते बेस नोट, टॉप नोट, वूडी फ्रेग्रन्स वगैरे काही कळत नाही. कुठे माहिती मिळू शकेल?.
14 Sep 2018 - 9:05 pm | नांदेडीअन
A Beginner’s Guide to the Perfume World
http://fragrancedaily.com/a-beginners-guide-to-the-perfume-world
आणि
Guide to Choosing the Right Perfume or Cologne
https://www.perfume.com/article-guide-to-choosing-the-right-perfume-or-c...
15 Sep 2018 - 11:27 am | सुबोध खरे
धन्यवाद __/\__
14 Sep 2018 - 9:52 pm | palambar
चांगला आणि वेगळा विषय. मला यु डी कलोन चा वास फार आवडतो. एकदम फ्रेश वाटते .
15 Sep 2018 - 9:58 pm | चामुंडराय
छान
नवीन माहिती मिळाली. हे सगळं आधी माहीतच नव्हते !
किंबहुना अत्तर, पर्फ्युमज् , फ्रेग्रन्स, सुगंधी हे हुच्चभ्रू प्रतिष्ठितांचे चोचले असा पूर्वीपासून गैरसमज असल्याने त्या कडे लक्ष गेले नव्हते. आणि अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया या सारख्या गाण्यांमुळे हा गैरसमज आणखी दृढ होत गेला. थोडा फार संबंध आला तो उदबत्तीतून येणाऱ्या सुगंधा पुरताच. परंतु मिपावर या क्षेत्रातील जाणकार मंडळी आहेत हे पाहून आनंद वाटला आणि त्यामुळे ज्ञानात भर पडली.
रच्चाकाने, रंगांधळे लोकं असतात त्याप्रमाणे वासांधळे देखील असतात का हो? मिपावरील डॉ. मंडळींकडून उत्तर मिळू शकेल.
17 Sep 2018 - 11:32 am | मराठी कथालेखक
प्रत्येकाची वास जाणवण्याची क्षमता (गंधज्ञान ) कमी जास्त असते. अगदीच शून्य असेल असे वाटत नाही पण जास्त धुम्रपान करणार्यांत गंधज्ञान खूप खालावलेले असते असे ऐकून आहे.
17 Sep 2018 - 12:43 pm | सुबोध खरे
वासांधळे पणा किंवा वास न येणे.
याचे दोन प्रकार आहेत
१) तात्पुरते- यात नाक बंद झाले असले सर्दीमुळे किंवा नाकाच्या आतल्या भागास जखम झाली असेल किंवा दुसऱ्या कारणाने सूज अली असेल तर आपल्याला वास आणि स्वाद जाणवत नाही
२) कायमचे -- यात नाकातील घ्राणेंद्रियांचे संवेदक पासून मेंदूचे वासाचे केंद्र या पूर्ण मार्गात कुठेही अडथळा किंवा इजा झाली असल्यास त्या व्यक्तीची वास हि संवेदना नष्ट होते.
https://en.wikipedia.org/wiki/Anosmia
या विषयावर मी मागे दोन लेख लिहिले होते. त्यात बऱ्याच गोष्टींचा उहापोह केला आहे.
जिज्ञासूंनी वाचून पहावेत( जाहिरात)
https://www.misalpav.com/node/25432
https://www.misalpav.com/node/25466
18 Sep 2018 - 7:16 am | चामुंडराय
हा वासाचाच एक प्रकार आहे का?
भिन्न लिंगी व्यक्ती आवडण्यामध्ये किंवा न आवडण्यामध्ये फेरमोन्स कारणीभूत असतात का?
18 Sep 2018 - 10:35 am | सुबोध खरे
https://www.medicalnewstoday.com/articles/232635.php
फेरोमोन्स बद्दलची अद्ययावत माहिती सध्या शब्दात वरील दुव्यावर वाचता येईल.
अद्यापही मानवी फेरोमोन्स बद्दल नक्की असा पुरावा सापडलेला नाही. परंतु याबद्दल थोडी कल्पना येण्यासाठी हे थोडेसे परस्पर विरोधी दोन्ही दुवे वाचून पहा. https://en.wikipedia.org/wiki/Human_sex_pheromones
http://www.sciencemag.org/news/2017/03/do-human-pheromones-actually-exist
9 Dec 2018 - 1:35 pm | समाधान राऊत
कॉलेज मध्ये असताना एक प्रोफेसर डिओ वापरायचे
सेम तो सेम RMD आणि पान पराग सारखा सुगंध असायचा...
नाव कधी विचारलेच तर धप्पा मिळालेला ..
नंतर कधी नाद केला नाही विचारायचा..
असो