मोबाईल मधील मेमरी कशी वाचवावी?

Primary tabs

सान्वी's picture
सान्वी in तंत्रजगत
5 Sep 2018 - 2:15 pm

माझा 32 gb इंटर्नल मेमरी चा अँड्रॉइड मोबाईल आहे. त्यात मी गरजेपुरते app ठेवले आहेत. Whatsapp चा autodownload चा option पण बंद ठेवला आहे. तरी आता माझ्या मोबाईल ची मेमरी 31.5 एवढी झालेली दाखवत आहे. ती मेमरी कशी फ्री करू? आणि आणखी एक, सतत नवीन सिस्टीम updates येत असतात. Option फक्त now वर later एवढाच असतो. आणि कधीतरी ते डाउनलोड करावेच लागतात त्यामुळे आणखी मेमरी लागते. याच्यावर काय मार्ग आहे?

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2018 - 2:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. अनावश्यक मेसेजेस, चित्रे आणि व्हिडिओज रोजच्या रोज डीलीट करायची सवय ठेवा.

२. हे काम "AVG cleaner" हे अ‍ॅप वापरून सहज करता येते.

धन्यवाद सर, तसे करून पाहीन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2018 - 10:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुरक्षिततेच्या सूचना :

१. मोबाईल, लॅपटॉप, पीसी, इत्यादींसाठी cleaner services देणारी अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. मात्र, अशी अनेक अ‍ॅप्स डेटा चोरीसाठी आणि व्हायरस पसरवण्यासाठीही वापरली जातात. तेव्हा, खात्री असलेलेलेच अ‍ॅप वापरावे. AVG ही विश्वासार्ह कंपनी आहे.

२. कोणतेही अ‍ॅप नेहमी आपल्या OS मध्ये असलेल्या डाऊनलोड/इन्स्टॉल सर्विसनेच करावे. उदा : अँड्रॉईड मधले Play Store.
अश्या सर्विसमधून मिळणार्‍या अ‍ॅप्सचे, व्हायरस फ्री असण्याच्या व OSशी जमवून घेण्याच्या, दृष्टीने परिक्षण केलेले असते... त्यामुळे ती निर्धोक असतात.

मराठी कथालेखक's picture

5 Sep 2018 - 4:32 pm | मराठी कथालेखक

काही अ‍ॅप्स हे एस डि कार्डवर हलवता येतात, ते हलवून टाका.
व्हॉट्स अ‍ॅपवर आलेले आणि जतन करावेसे वाटणारे व्हिडिओ, फोटोज पण एसडी कार्डवर हलवा, हे तुम्हाला फाईल मॅनेजर मधून करावं लागेल थोडं वेळखावू काम आहे पण एकदा कराच.
कॅमेर्‍याने काढलेले फोटोज आणि व्हिडिओज ह्यंच्या करिता डिफॉल्ट लोकेशन हे एसडी कार्ड करता येते ते करा, आधीचे फोटोज आणि व्हिडिओज मात्र स्वतःलाच फाईल मॅनेजरमधून हलवावे लागतील.
सिस्टीम अपडेट्स टाळू नका, ते घेत रहा त्याने तुम्हाला मदतच होईल. माझ्या अलिकडच्या अपडेटनंतर मला व्हॉटस अ‍ॅपपण एसडी कार्डवर हलवता आले त्यामुळे १६ जीबी इंटर्नल मेमरी आणि बरेच अ‍ॅप्स असूनही फोन मेमरीत सुमारे २.५ ते ३ जीबी जागा शिल्लक आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2018 - 9:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

एसडी कार्ड असल्यास हे सुद्धा करावे. नसल्यास, बराच डेटा फोनवर साठवायचा असल्यास ते वापरावे. AVG Antivirus अ‍ॅपमध्ये हे सुलभपणे करण्याचा पर्याय आहे.

प्रसाद_१९८२'s picture

6 Sep 2018 - 1:49 pm | प्रसाद_१९८२

फ्रि इंस्टॉल केल्यास फोन खूप स्लो होतो व डेटा सुरु असल्यास त्या पॉप अ‍ॅड सतत येत राहतात असा अनुभव आला. AVG Antivirus Pro. इंस्टॉल केल्यास केल्यास काही फरक पडेल का ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2018 - 10:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

AVG Antivirus च्या फ्री व्हर्शनबरोबर मला तरी ही समस्या आलेली नाही. जाहिराती फक्त अ‍ॅप सुरू केल्यावरच येतात, चकटफू सेवेसाठी तेवढे सहन करायलाच हवे :)

AVG Antivirus Pro मध्ये VPN सुरक्षा मिळते, पण त्याला पैसे पडतात... तसेही त्यावाचून माझे फारसे अडलेले नाही.

चौथा कोनाडा's picture

5 Sep 2018 - 4:44 pm | चौथा कोनाडा

मोबाईल मधील स्पेस कशी वाढवावी ?

हा व्हिडो पहावा :

मोबाईल स्पेस कैंसें बढाये ?
आणखी...

जर इएस फाइल फोल्डर नावाचे अ‍ॅप टाकलेत तर स्पेस मॅनेजमेंट सोपी पडते.
क्विकपिक नावाचे अ‍ॅप टाकलेत तर फोटो मॅनेजमेंट खुपच इझीली करता येईल.
एक्सटर्नल मेमरी कार्ड टाकलेय का मोबाईलमध्ये ? आता नसेल आणि महत्वाचे वाटणारे फोटो, डॉक्युमेंटस सेव्ह करायची असतील तर जरूर एक्सटर्नल मेमरी कार्ड टाका. व तिथे बॅकअप करत रहा आणि मुख्य मेमेरी डिलिट व मोकळी करत रहा.

सेटिंग्जमध्ये जाऊन अबाउट फोन उघडा आणि कोणते मॅाडुल, कोणते अॅन्ड्राइड वर्शन ते इथे लिहा म्हणजे पुढचे सांगता येईल.

१) व्हिडिओ रिकॅार्डिंग हे मेमरी खाणारे मोठे गिऱ्हाइक. समारंभांत सलग पाचदहा मिनिटे करू नये. एक दीड मिनिटांचे करावे. नको असलेले डिलिट करणे सोपे जाते.

एचडी व्हिडिओ = ८० एमबी / एक मिनीट,
फुल एचडी व्हिडिओ = १६० एमबी /एक मिनीट.

२) बरेच फोन ड्यूल सिम - हाइब्रिड सिम असतात.
दोन सिम कार्डे वापरल्यास मेमरी कार्ड बसत नाही.
अशा वेळी पेनड्राइव वापरून ( ओटिजी असेल तरच करता येते) फोटो व्हिडिओ त्यात ढकलता येतात.
हे काळजीपुर्वक वापरावे लागते.

कंजूस's picture

6 Sep 2018 - 4:05 pm | कंजूस

आपण काढलेल्या फोटो व्हिडिओंनी मेमरी फुल होणेशी अँटिवायरसचा काय संबंध?

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2018 - 10:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

AVG antivirus (AVG cleaner हा त्याचा एक भाग आहे) हा व्हायरसविरोधी कामाबरोबर इतर अनेक सोयीही देतो.

१. अनावश्यक असू शकणार्‍या (इमेजेस, हिडन कॅशे, व्हिजिबल कॅशे, रेसिड्युअल फाईल्स,एम्प्टी फाईल्स, क्लिप्बोर्ड, अ‍ॅपडेटा, इ) फाईल्सने व्यापलेल्या जागेची वर्गवारी दाखवते व आपण त्यातील प्रत्येक प्रकाराला स्वतंत्रपणे डिलीट करू शकतो.

२. प्रत्येक अ‍ॅपने व्यापलेली जागा आपण पाहू शकतो.
२.(अ) त्यातली अनावश्यक असलेली अ‍ॅप्स आपण डिलीट करू शकतो.
२.(आ) त्यापैकी जी अ‍ॅप्स त्यांच्या प्रोग्रॅम/डेडाच्या पूर्णपणे/काही भाग एसडी कार्डावर हलवू देतात, तो भाग आपण AVG च्या मदतीने एसडी कार्डावर हलवू शकतो, त्यामुळे फोनच्या मेमरीत जास्त जागा रिकामी होते.

३. WiFi connection testing, WiFi speed testing, इ अनेक गोष्टी आहेत.

उपयोजक's picture

7 Sep 2018 - 8:30 am | उपयोजक

सगळ्यात जास्त जागा खातात ते व्हिडिओज.त्यातही व्हॉटसअॅपवर आलेले व्हिडिओज.कारण व्हॉटसअॅपचे व्हिडिओ थेट फोन मेमरीमधेच डाऊनलोड होतात.
त्यानंतर येतात त्या Pdf फाईल्स.या सुद्धा खुप जागा खातात.
त्यानंतर येतात ध्वनिफिती.

या तिन्हींवर अंकुश ठेवल्यास बरीच जागा वाचेल.

मंदार कात्रे's picture

7 Sep 2018 - 3:47 pm | मंदार कात्रे

गुगल प्ले सेटिंग्ज मध्ये जाऊन अ‍ॅप अपडेट सेटिंग बदलता येते
वायफाय अथवा मोबाइल डाटा दोन्हीवर अ‍ॅप अपडेट डिसेबल करा

मंदार कात्रे's picture

7 Sep 2018 - 3:51 pm | मंदार कात्रे

App

मंदार कात्रे's picture

7 Sep 2018 - 3:53 pm | मंदार कात्रे

App

सर्व जाणकारांचे मनःपुर्वक आभार. @ श्री कंजूस माझा फोन moto z play असून अँड्रॉइड version 7.1.1 हे आहे.

कंजूस's picture

8 Sep 2018 - 8:12 am | कंजूस

तुमचा फोन moto z play आणि android v -7.1 आहे हे कळल्यावर तीन गोष्टी समजल्या -

१) सेपरेट मेमरी स्लॅाट आहे , जे चांगले आहे.
स्कॅनडिस्क Scandisc अथवा Nitro किंवा Trnscend या कंपन्यांची १६/३२ जीबी मेमरी कार्डस(४००रु?) मिळतात ती टाकून त्यात फोटो/व्हिडिओ सरकवता येईल. कार्डावर क्रमांक वगैरे मार्किंग पेनने लिहिता येत नाहीत, एकेका प्लास्टिक पाउचमध्ये क्रमांक लिहून ठेवावे आणि त्यामध्ये काय आहे हे लिहिल्यास फार सोपे जाते.

२) इक्सटर्नल मेमरी वापरण्याचे दोन पर्याय -
OTG cable वापरून पेनड्राइव किंवा कार्ड रीडर जोडणे.
परंतू mito z play मध्ये " TYPE C USB PORT" दिलेला आहे त्यात OTG जोडता येत नाही, डेटा ट्रान्सफर होत नाही.

त्यावर उपाय म्हणजे OTG चालणारा दुसरा एक android phone वापरणे.
प्रथम वाइफाइ hotspot वापरून डेटा दुसऱ्या फोनमध्ये पाठवणे, नंतर त्यातून पेनड्राइव/ कार्डरीडर मध्ये ट्रानस्फर करणे.

३) व्हिडिओ रेकॅार्ड केल्यास मोटो z play मध्ये
2160x1440,
1920x1280 आणि
1280x720
या तीन रेझलुशनचे करता येतात.
- पहिले दोन प्रकार मेमरी फार संपवतात.
तिसरा प्रकार 1280x720 सेट करा. तो उत्तम आहे.

______________

सूचना : १) sd card काढण्या अगोदर ते "eject" करावे. त्याच्याशी फोनचा संपर्क बंद करावा.

२) Android 6, 7, 8 मध्ये अॅप्स sd card वर टाकता येतात.
तो ओप्शन नवीन कार्ड टाकल्यावर येतो किंवा अगोदरचे कार्ड eject करून पुन्हा टाकल्यावर येतो.
A- use this card as system card?/
B -use this only for data storage ?

शंका असल्यास विचारा.

सान्वी's picture

8 Sep 2018 - 12:42 am | सान्वी

@ म्हात्रे सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही apps sd card वर हलवण्याचा प्रयत्न केला पण settings मध्ये तसा option येत नाही आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Sep 2018 - 3:02 am | डॉ सुहास म्हात्रे

सगळ्याच अ‍ॅप्समध्ये, (अ) ती एसडीवरून काम करू शकतील अशी सुविधा नसते व (आ) त्यांना एसडीवर हलवण्याची सोयही नसते.

हे काम करण्यासाठी AVG Cleaner हे उत्तम अ‍ॅप आहे. सर्वप्रथम ते Play Store वापरून इन्टॉल करा.

नंतर...

१. मोबाईलमध्ये AVG Cleaner अ‍ॅप सुरु करा व APPS (डाव्या कॉलममधील वरून तिसरा) पर्याय निवडा.

२. Show All बटण दाबा... आता तुम्हाला इन्टॉल केलेल्या सगळ्या अ‍ॅप्सची यादी दिसेल.

३. AVG Cleaner पहिल्यांदाच वापरत असल्यास...

३.अ) पहिल्या अ‍ॅपच्या नावावर स्पर्श करा... नंतर येणार्‍या डिस्प्लेमध्ये APP INFO वर स्पर्श करा. आता तुम्हाला त्या अ‍ॅपची बरीच माहिती देणारा स्क्रिन दिसेल, त्यातले...

३.आ) अ‍ॅप नको असल्यास UNINSTALL बटण वापरून ते काढून टाका व त्याने व्यापलेली सर्व जागा परत मिळवा.

३.इ) MOVE TO SD CARD हे बटण एनेबल्ड (वापरण्याजोगे) असेल तर : त्यावर स्पर्श केल्यास त्या अ‍ॅपचा शक्य तेवढा भाग एसडी कार्डवर हलवला जातो (१००% कोड एसडीवर ठेवून कोणतेही अ‍ॅप काम करू शकत नाही. त्यामुळे, अ‍ॅप कार्यरत राहण्यासाठी आवश्यक तेवढा भाग मोबाईलच्या मेमरीत राहतो.)

३.ई) MOVE TO SD CARD हे बटण डिसेबल्ड (न वापरण्याजोगे) असेल तर : ते अ‍ॅप आपला प्रोग्रॅम/डेटा एसडीवर ठेवून काम करू शकत नाही. तेव्हा त्या अ‍ॅपमध्ये काहीच उपाय नाही असे समजून त्याला सोडून द्या.

३.उ) CLEAR DATA बटण :
...... * अ‍ॅपमध्ये तुमचा काही खाजगी डेटा साठवणे आवश्यक नसेल (उदा : Times of India अ‍ॅपने साठवलेला डेटा) तर या बटणाला स्पर्श करून तो डेटा डिलीट करा व अजून जास्त जागा रिकामी करा.
...... * अ‍ॅपमध्ये तुमचा काही खाजगी डेटा साठवणे आवश्यक असेल (उदा : जीमेल अ‍ॅपमध्ये ईमेल अ‍ॅड्रेस, इ) तर ते बटण वापरू नका. (हा डेटा चुकून डिलीट झाला तरी हरकत नाही... कारण ते अ‍ॅप सुरू केल्यावर तुम्हाला हा डेटा परत भरण्याची विनंती केली जाईल..)

३.ऊ) CLEAR DATA बटण : या बटणाला स्पर्श करून अधिक काही जागा परत मिळवा.

३.ए) प्रत्येक अ‍ॅप वरीलप्रमाणे तपासून पहा व शक्य तितकी जागा रिकामी करून घ्या.

हे काम आठवड्यातून एकदा तरी करावे... आपल्या नकळत जमा झालेला भरपूर कचरा दूर होतो आणि जागा व वेग वाढतात.

४. खालील सोपी व कमी वेळ खाणारी कृती दिवसातून एकदा तरी करावी...

४.अ) मोबाईलमध्ये AVG Cleaner अ‍ॅप सुरु करा व QUICK CLEAN बटणावर स्पर्श करा.

४.आ) आता दिसणार्‍या स्क्रिनवरील...
......* Hidden cashe, Visible cashe, Empty folders हे तीन पर्याय बेलाशक निवडा
+
......* For your consideration या सेक्शनमधील, ज्यांचा डेटा तुम्हाला नको असेल अश्या अ‍ॅप्सना निवडा. या सेक्शनमधे निवडून डिलीट केलेला डेटा परत मिळत नाही तेव्हा ही निवड सावधान राहून करा.

......* FINISH CLEANING बटण दाबा.

Whatsapp मधील इमेजेस, व्हिडओ क्लिप्स आणि लांबलचक संदेश, या गोष्टी सर्वात जास्त जागा खातात व त्या मोबाईल धीमा बनवणार्‍या क्रमांक एकच्या शत्रू आहेत ! त्याना पाहून झाल्यावर, त्यातल्या हव्या त्या गोष्टी एसडीवर किंवा इतर कोठे साठवून त्यांना मोबाईलच्या मेमरीतून डिलीट केल्यास "जागा व वेग" यांचा खूप फायदा मिळतो, असा स्वानुभव आहे.

हे झाले नेहमी लागणारे महत्वाचे पर्याय. या अ‍ॅपमध्ये इतर अनेक प्रकारचे पर्याय आहेत.

या प्रकारातले,
(अ) इतके पर्याय देणारे,
(आ) दर कृतीवर इतका ताबा (कंट्रोल) देणारे, पण तरीही
(इ) वापरायला साधे सोपे (युजर फ्रेंडली) आणि
(ई) वेगवान व
(उ) निर्धोक काम करणारे
(ऊ) मोफत असलेले
दुसरे अ‍ॅप माझ्या पाहण्यात नाही.

अंतु बर्वा's picture

8 Sep 2018 - 1:24 am | अंतु बर्वा

वर्षभरापुर्वी अडगळीत पडलेला सॅमसुम स२ तात्पुरता वापरास काढला असताना त्यात बिलकुल मेमरी नसल्याचं स्पष्ट झालं आणि एकही अ‍ॅप धड अपडेट होत नव्हतं.
आंतरजालावर *#9900# (delete dumpstate/logcat) हा कोड वापरल्यास बर्यापैकी मेमरी रीकामी होत असल्याचं बर्याच जणांनी सुचवलेलं आहे. प्रयत्न करुन पाहिला आणि आश्चर्यकारकपणे जवळ जवळ अडीच जीबी जागा उपलब्ध झाली. परंतु आठवड्याभरातचं येरे माझ्या मागल्या झाल्याने परत प्रयत्न केला असता फक्त २० ते ३० एमबीचा फरक पडलेला आढळला. करुन पहा, गाजराची पुंगी...

अंतु बर्वा's picture

8 Sep 2018 - 3:59 am | अंतु बर्वा

धन्यवाद म्हात्रेसर. स२ फक्त काही दिवसांकरीता काढावा लागला होता. तो आता परत बर्नर मोडवर आहे पण पुन्हा गरज पडल्यास तुम्ही सांगितलेले अ‍ॅप वापरुन पाहिन.

मला वाटतं स४ की स५ येईपर्यंत मोबाईल मध्ये दोन पार्टिशन असायचे. त्यात दोन जीबी अ‍ॅपसाठी आणि बाकी USB स्टोरेज. त्यामुळे बाकी कीतीही जागा फ्री असेल तरी नवीन अ‍ॅप टाकता यायचे नाहीत. आजकालचे फोन पुर्ण USB स्टोरेज मिक्स अँड मॅच करु देतात. सध्या वापरात असलेल्या स७ मधे इनबिल्ट फीचर (डिवाइस मेंटेनन्स) आहे जे जवळ जवळ तुम्ही सांगितलेल्या अ‍ॅपसारखेच काम करते. एखादे अ‍ॅप बॅकग्राउंडला बॅटरी खात असेल तर नोटीफिकेशन वगैरे येते...

थॉर माणूस's picture

8 Sep 2018 - 5:15 am | थॉर माणूस

लेख वाचल्यावर सहज म्हणून माझ्या फोनचे स्टोरेज बघितले. ६४ जीबीच्या फोनमधे जागा १३ जीबी इमेजेस आणि ८ जीबी विडीओज नी भरलीये! यातले जवळजवळ ७०% तरी मेसंजर्समूळेच असणार नक्की.

इरसाल कार्टं's picture

18 Sep 2018 - 11:10 am | इरसाल कार्टं

मी ES File Explorer वापरतो.
याचे फायदे:
एकही बिनकामाचे नोटिफिकेशन दाखवत नाही.
रिसायकल बिन आहे त्यामुळे डिलीट केलेली फाईल रीस्तोर करता येते.(फक्त या app मधून केलेली)
दुप्लीकेत फोटोज, व्हात्साप वर पाहिलेले स्टेटस च्या टेम्पररी फाईल्स सहज शोधून देतो. त्या खूप जास्त जागा व्यापतात आणि लक्षात येत नाहीत.
एकापेक्षा जास्त फाईल्स डिलीट/कॉपी/मूव्ह करायच्या असल्यास निवडीसाठी दोन पर्याय आहेत त्याने काम सोपे होते.

तुम्ही व्हात्साप वापरत असाल तर त्याच्या app फोल्डरमधील मिडिया फोल्डरमध्ये जाऊन इमेजेस, व्हिडिओ, ऑडीओ आणि डॉक्युमेंट च्या फोल्डरमधील 'सेंट' फोल्डर रिकामे करा. यातही भरपूर अनावश्यक फाईल्स असतात.

Shrirang Kulkarni's picture

15 Oct 2018 - 10:52 am | Shrirang Kulkarni

आपल्या मोबाइलला मधील सर्व गोष्टी गुगळे ड्राईव्ह वर सरकवून टाका म्हणजे तुम्हाला तुमच्या सरकावलेल्या गोष्टी जेंव्हा हव्या असतील तेंव्हा आणि ज्याच्यावर हव्या असतील त्यावर मिळतील म्हणजे संगणक किंवा भ्रमणध्वनी.