नमस्कार मंडळी,
गेला बरेच काळ मी मिसळपावचा सदस्य आहे, त्याआधीपासून वाचक आहे!
माझ्या मनात कित्येक दिवसांपासून एक किडा वळवळत आहे. :/
किडा असा आहे की:
एकूण लेख आणि कविता यांचा विचार करता जेव्हा जेव्हा वीकांत येतो तेव्हा तेव्हा मिपावर लेखांचा ढीग पडतो! (स्पर्धा पहावी तर इथे! १००वा लेख काय:O , ५० ओळींचे कवित्व म्हणावे का महाकाव्य! )
या लेखांना प्रतिक्रिया म्हणून महाढीग उत्तरे येतात, वाद घडतात, भावी लेखांची बीजे रोवली जातात. एकंदरीत, विपुल लेखन जाहले आणि उदंड पीक आले अशी परिस्थिती निर्माण होते. यात जर जोडून सुट्टी आली तर मग विचारायला नको अशी परिस्थिती होते. :)
तेच जर अवीकांत (मराठीत: वीक एन्ड) असेल तर मात्र निवडक प्रतिक्रिया आणि हजर सभासद यांच्यानुसार उत्तरे येतात. मुख्यतः पडीक सभासद यांनी पुढाकार घेतला आणि सुप्रसिद्ध तात्यांनी त्यात त्यांचे दोन आणे जोडले तर लेखाला प्रसिद्धी लाभते!
सारांश असा की: तात्या व संपादक वर्गाने लेख उचलला आणि पडीक सभासदांची अनुकूल प्रतिक्रिया लाभली तर तो लेख/ कविता कित्येक तास मुख्यपानावर विराजमान राहते!
आता गंमत अशी की,
जर एखाद्या नवख्या लेखकाने सुरवात केली आणी कर्म-धर्म संयोगाने तो नेमका वीकांताच्या आसपास वर चिटकवला (मराठी: अपलोड) तर तो लेख इतरांच्या उत्तम लिखाणामुळे दुसर्या-तिसर्यापानावर दबून जाईल. परत त्यावर येऊ शकणार्या प्रतिक्रियांच्या संख्येवर अवेळी संक्रात येईल ती वेगळीच! :(
आणि या बिचार्याला ;) कोणतीच कल्पना नसते की दोन दिवसांनंतरपण :SSकोणीच प्रतिक्रिया का देत नाहीये? बिचारा लेखक दर दोन मिनिटांनी 'फ५' ला दाबत असतो, न जाणे लिंक तुटली असेल तर :( ...
अर्थात याला अपवाद असतील, आहेत आणि होतीलही! जसे आपले बिपिनदा, केशवसुमार, रामदास आणि यादी लांबत जाते...
माझ्यासारखे अनेक मित्र, बंधु आणि भगिनी सोमवार ते शुक्रवार हापिसात पिसत पिसत (पत्ते नव्हे!) समोरच्या खिडकीतून दिसणार्या चौकोनी तुकड्यांवर टिचक्यामारून या महाजालावरिल विविध पियुषांचे/पेयांचे काही घोट घेत असतात. याला अपवाद पडतो तो वीकांताचा! :D
वीकांताला यातले बरेच जण घरकामात, मुलांचे अभ्यास, साप्ताहिक प्रगती (?) आणि जमलेच तर सुंदर पेयांच्या आस्वादात तल्लिन असतात.
आता जेव्हा सोमवार (परत एकदा :S ) उजाडतो तेव्हा हापिसात येणे क्रमप्राप्त असते (नाहीतर खायला कोण कमवणार?).
थोड्यावेळाने आठवण येते ती मिपाची! कामाच्या वेळात वेळ काढून ५ मिनिटे तरी मिपावर डोकावणे होतेच!
मिपा उघडल्यावर दिसते ती लेखांची भली मोठ्ठी यादी वीकांताला वर चिकटवली गेलेली! ती ही जगभरातून B) !
कधी बिपिनदा, कधी डॉनचे पाक किस्से तर कधी नवे मिपा कट्टा वृतांत्त! अगदी घरच्या गप्पा माराव्यात तशी मंडळी लिहितात मग त्याकडे लक्ष नको द्यायला ? घरच्या माणसाला कोणी नाही म्हणतं का ?
कोणाच्याही अंगात एवढा संयम नसतो की हा बॅकलॅग येता आठवडाभर शिल्लक ठेवावा; हळू हळू संपवावा...
मग काम बाजूला राहून पुढचे २ तास मिपा मिपा खेळण्यात कधी निघून जातात कळतच नाही! (इथूनच का ते बग बग म्हणतात ते प्राणी सुरू होतात?)
म्हणजेच माझ्यासारख्या अनेकांना सोमवारी हापिसात आल्यावर, दोन 'च्या' झाल्यावरपण जी काय तल्लफ येते ती गेले अनेक महिने मिपा भरून काढत आहे!
या सगळ्यामागचा प्रपंच असा की, अशी काही माहिती नीलकांत किंवा तात्या किंवा संपादक मंडळ देऊ शकेल काय ज्यावरून माझ्या तर्काला पुष्टी मिळेल/ खोडून काढता येईल? शिवाय नवख्या लेखकांना मार्गदर्शन होइल ते वेगळेच!
आपली यावरची मते/अनुभव जाणून घ्यायला आवडेल! शेवटी पहिला लेख हा स्वत:साठी स्पेशल असतोच ना!
अवांतरः या शक्यतेचा विचार केला आहे की मिपा सर्व्हर/ आरेखन या गोष्टींची दखल घेऊन/ न घेता सोडून देत असेल. पण जिज्ञासा स्वस्थ बसू देत नाही.
प्रतिक्रिया
12 Mar 2009 - 8:13 am | प्राजु
चांगला लिहिला आहे.
मिपावर उत्तमोत्तम लेख येताहेत. खरंच वाचायला वेळ पुरत नाही.
पण जसं जमेल तसं वाचावं. विकांताला बरेच जण (मी सुद्धा) इतर कार्यक्रमांमुळे मिपावर फार कमी असते. त्यामुळे जे लेखन शनिवार्-रविवारी येते ते सोमवारीच वाचायला मिळ्ते. याउलट विक डेज मध्ये रोजच्या रोज वाचन होत असते.
याला उपाय काहीही नाही. जमेल तेव्हा विकेंड्स ना सुद्धा मिपामिपा खेळावे (घरच्याची परवानगी असेल तर!)
असो..
आपणही आपले लेखन सुरू ठेवावे ही विनंती. :) नुसते लेखनच नव्हे तर इतर लेखांवर आपली मतेही मांडावीत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Mar 2009 - 11:37 am | छोटा डॉन
पहिला लेख उत्तम म्हणावा असा जमला आहे.
खरं पाहिलं तर अगदी प्रासंगीक असल्याशिवाय आम्हीही शनिवारी अथवा रविवारी कोणतेही नवे लिखाणं टाकत नाही ( कोण म्हणाला रे कंपु ऑनलाईन नसतो म्हणुन ;) ). कारण मिपावर नेहमी हजर असणार्या सदस्यांपैकी ७० % ( अचुक नाही, त्यावरुन वाद नकोत ) जनता ही "ऑफीसमधुन लॉगईन" करत असते व विकांताला सुट्टी असते.
शिवाय प्राजुताई म्हणते तसे विकांताला इतर कामे उरकण्याकडे जास्त भर असतो त्यामुळे सविस्तर अथवा नुसती का होईना लेख वाचुन प्रतिक्रिया देण्याइतका वेळ मिळेल का ह्याची खात्री नसते ...
सोमवार हा सर्वोत्तम दिवस आहे नवे लेखन टाकण्याचा .....
बाकी "प्रतिसादा"चे म्हणाल तर त्याला असे काही मापदंड नाहीत, अलमोस्ट सर्वच मंडली आवडले की फट्टकन तसे कळवुन मोकळे होतात, इथे कसली पार्सिलीटी होत असेल असे वाटत नाही. त्याची काळजी नसावी, आपले लेखन येऊद्यात ...
बाकी इतर लेखांना आपण प्रतिसाद देत राहिलात तर आपली इतर लोकांशी "ओळख" नक्की वाढेल व ह्याचा फायदा होईल ...
आम्ही सुरवात प्रतिसादापासुनच केली होती हे जरुर नमुद करु इच्छितो ... :)
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
12 Mar 2009 - 11:50 am | परिकथेतील राजकुमार
कोण कोण पडीक लोक आहेत हो इकडे ? आयला मी आठवड्याचे ७ हि दिवस सकाळी १० ते रात्री ९ असतो इकडे, मला तर कधी कोण पडीक दिसले नाहि बॉ !!
तेच जर अवीकांत (मराठीत: वीक एन्ड) असेल तर मात्र निवडक प्रतिक्रिया आणि हजर सभासद यांच्यानुसार उत्तरे येतात. मुख्यतः पडीक सभासद यांनी पुढाकार घेतला आणि सुप्रसिद्ध तात्यांनी त्यात त्यांचे दोन आणे जोडले तर लेखाला प्रसिद्धी लाभते!
सारांश असा की: तात्या व संपादक वर्गाने लेख उचलला आणि पडीक सभासदांची अनुकूल प्रतिक्रिया लाभली तर तो लेख/ कविता कित्येक तास मुख्यपानावर विराजमान राहते!
विनायका ऐकतोयसना रे भावा .... प्रतिक्रीया मिळवण्याचा सक्सेस पासवर्ड दिलाय हो प्रमेय साहेबांनी.
स्वगत :- कशाला खोड्या काढतो रे मेल्या लोकांच्या ? तुला एक दिवस कोणीतरी 'दवाखान्यातील राजकुमार' करणार बघ !
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
12 Mar 2009 - 12:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्राजू आणि डॉन्याशी सहमत. प्रमेय, ओपनिंग मस्त झाली आहे, पुढेही चांगली फलंदाजी करत रहाल अशी आशा आहेच.
विकान्त आणि सुट्टीला मीपण अंमळ कमीच वापरते इंटरनेट (पक्षी: मिपावरून गायब). कंपू असेल तरच लेखन जास्त प्रतिसाद खेचतं हे मलातरी पटत नाही. खूप चांगल्या आणि खूप टाकाऊ, दोन्ही प्रकारच्या लिखाणाला भरघोस प्रतिसाद मिळतात, अर्थात तसा नियमही नाही. पडीक लोकांना चिक्कार वेळ असेल तर सिल्व्हर काय गोल्डन जुबिलीसुद्धा तासाभरात साजरी होते, (काय डॉन्या, बरोबर ना?).
अवांतर: मिपावर स्वागत.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
12 Mar 2009 - 7:01 pm | ब्रिटिश टिंग्या
प्रमेय, ओपनिंग मस्त झाली आहे, पुढेही चांगली फलंदाजी करत रहाल अशी आशा आहेच.
अवांतर : तसा मी २४*७ ऑनलाईन असतो. तेव्हा अडीनडीच्या वेळी प्रतिसाद हवे असल्यास नि:संकोच संपर्क साधा ;)
12 Mar 2009 - 1:43 pm | हेरंब
अहो, आम्हाला प्रमेय सुध्दा लक्षांत रहायची नाहीत. तुम्ही तर प्रमेयातच रायडर घालून ठेवला आहे.
12 Mar 2009 - 9:59 pm | चतुरंग
पहिल्याच लिखाणाबद्दल अभिनंदन!!
तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही मिपाचे बरेच दिवस सदस्य आहात.
तुमची वाटचाल बघता तुम्ही अवघ्या ५ लेखांनाच प्रतिसाद दिलेले आहेत!
ओळख मिसळपावावर वाढवण्याचा एक सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रतिक्रिया देणे.
तुम्ही वाचलेल्या धाग्यांवर काय आवडले/नाही आवडले ह्याबद्दल प्रतिक्रिया देत गेलात तर तुमचे नाव आपसूकच लोकांसमोर रहाते.
पर्यायाने तुम्ही केलेले लेखन काय असेल ह्याबद्दलही उत्सुकता वाढते.
उत्तम लिखाण असले तर ताबडतोब उचलले जातेच.
खेळीमेळीतली कंपूबाजी ही एक विरंगुळा म्हणून असते पण कोणाचाही लेख/कविता ठरवून तोंडावर पाडणे किंवा शिव्या घालणे असे अजून तरी माझ्या पहाण्यात नाहीये!
तेव्हा या, प्रतिक्रिया द्या, लिहीत रहा, बरेवाईट असेल त्याप्रमाणे मिपाकर सांगत रहातील! काळजी नसावी!! :)
चतुरंग
12 Mar 2009 - 10:07 pm | ब्रिटिश टिंग्या
ओळख मिसळपावावर वाढवण्याचा एक सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रतिक्रिया देणे!
त्यातल्या त्यात कमी वेळात प्रसिद्ध व्हायचे असेल तर मिपाच्या बँडविड्थची तमा न बाळगता लांबलचक नकारात्मक प्रतिक्रिया देणे.....लगेचच प्रसिद्ध पावाल!
+१,+२ अशा प्रतिसादांमध्ये काहीही हशील होत नाही! असे प्रतिसाद केवळ प्रतिसादांची संख्या वाढवण्याकरिता असतात ;)
27 Mar 2009 - 3:04 am | प्रमेय
हे वाचणार्या सर्वांचे व प्रतिसाद देणार्यांना मनापासून धन्यवाद.