पुरोगामी लक्षणं...

ट्रेड मार्क's picture
ट्रेड मार्क in काथ्याकूट
3 Sep 2018 - 7:14 am
गाभा: 

जर कोणी -

काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाबद्दल न बोलता एनआरसीमुळे रोहिंग्यांवर कसा अन्याय होतो आहे हे सांगत असेल...

काश्मीर मध्ये दगडफेकीत आणि फुटीरतावाद्यांच्या कारवायांना बळी [पडणाऱ्या सैनिकांपेक्षा मेजर गोगोईने एका दगडफेक करणाऱ्याला जीपला बांधले त्याबद्दल वाईट वाटत असेल तर...

कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा यांना काही वर्षे उगाच तुरुंगात काढावी लागली याबद्दल अवाक्षरही न काढता वरावर राव, सुधा भारद्वाज ई. ना नक्षलींना पाठिंबा दिल्याबद्दल कोर्टाने हाऊस अरेस्ट सांगितली म्हणून वाईट वाटत असेल...

दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्या पोलीस, कमांडोज आणि सामान्य नागरिकांपेक्षा अफझल गुरु आणि कसाब यांना फाशी दिली गेली म्हणून वाईट वाटत असेल तर...

कोर्टाने कन्हैया कुमार, उमर खालिद वगैरेंना देशद्रोहाच्या आरोपातून मुक्त केल्यावर कोर्ट चांगलं काम करतंय असं वाटत असेल पण एका दशकाच्या सुनावणीनंतर मोदींना २००२ च्या दंगलीसाठी क्लीन चीट दिल्यावर कोर्ट चुकीचं वाटत असेल तर...

अखलाख आणि जुनैदच्या मृत्यूबद्दल वाईट वाटत असेल आणि कुठे चाललाय भारत माझा असं वाटत असेल पण प्रशांत पुजारी, प. बंगाल आणि केरळमध्ये होणाऱ्या हिंदू लोकांच्या हत्या याबद्दल बोलावेसे वाटत नसेल तर...

फक्त असिफावर झालेल्या अत्याचाराबद्दल वाईट वाटत असेल पण मंदसौर मधील ८ वर्षांच्याच मुलीवर झालेल्या अत्याचाराबद्दल माहीतही नसेल किंवा माहित असेल तरी असिफबद्दलच बोलावंसं वाटत असेल...

तर त्या व्यक्तीला पुरोगामी लक्षणांची बाधा झाली आहे असे म्हणता येईल...

आणि जर कोणाला वरील मुद्द्यांपैकी काही वाटत असेल तर तपासून घ्यावे...

नसेल तर अजून तुम्हाला कुठली पुरोगामी लक्षणं माहित आहेत ते प्रतिसादांमध्ये लिहावे...

प्रतिक्रिया

पाकिस्तान मधील हिंदू लोकांना जबरदस्तीने मुस्लिम धर्म स्वीकारायला लावण्या बद्दल वाईट वाटत नाही , पण चीन मधील उगीर मुस्लिमांना चीन सरकार बौद्ध धर्म स्वीकारायला लावते म्हणून वाईट वाटत असेल तर !!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2018 - 2:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

चीन मधील उगीर मुस्लिमांवर बरीच बंधने चीनच्या सरकारने घातली आहेत :
* सरकारी नोकरी करताना काम बंद करून वेळ नमाजाला बंदी आहे
* रमजान महिन्यात रोजे (उपास) ठेवायला बंदी आहे
* (चीनच्या सरकारच्या मताने हीडीस दिसणारी) दाढी ठेवायला बंदी आहे
* काही लाख लोकांना 'सरकारी पाहुणचारामध्ये' 'योग्य' शिक्षण देण्यासाठी 'राजकिय कँप्स'मध्ये बंदिस्त करून ठेवले आहे, इ, इ, इ.

पण तरी...
* भारतातल्या एकाही तथाकथित पुरोगाम्याने,
* भारतातल्या एकाही मुल्लामौलवीने,
* खुद्द पाकिस्तानने,
* पाकिस्तानी पाठींब्यावर चालवलेल्या असंख्य अतिरेकी असलेल्या अथवा नसलेल्या संघटनांपैकी एकीनेही,
* मुस्लीम धर्माच्या कैवारी असण्याचा दावा करणार्‍या एकाही संघटनेने,
* किंबहुना, मुस्लीम उम्माचा सतत जप करणार्‍या कोणत्याही एका देशाने,
चीनचा कडक निषेध तर सोडाच, पण या प्रकाराचा साधा उल्लेखही करणे टाळले आहे. का बरे !!!???

दुटप्पीपणाचे यापेक्षा मोठे उदाहरण जगाच्या इतिहासात सापडणे कठीण आहे !

अभ्या..'s picture

3 Sep 2018 - 3:06 pm | अभ्या..

नोटाबंदीनंतर ती कशी चांगली आहे आणि त्याची अपरिहार्य कारणे काय काय आहेत याच्या कित्येक आरत्या लिहून आता एकेक गोष्टी बाहेर येत असता तोंड फिरवून गप्प बसणे किंवा फाटे फोडत दुसर्‍यालाच देशद्रोही म्हणून सिध्द करत बसणे हा पुरोगामीपणाचा अव्वल नमुना आहे.

ट्रेड मार्क's picture

4 Sep 2018 - 3:17 am | ट्रेड मार्क

वर्षानुवर्षाच्या नाकर्तेपणाला आणि त्यामुळे आलेल्या अवघड परिस्थितीला डोळेआड करत दुसऱ्या कोणी केलेले प्रयत्न कसे हाणून पाडता येतील हे बघत वर नक्राश्रू ढाळणे हे पण एक पुरोगामीपणाचं लक्षण आहे!

केरळात पूर तर बोंबाबोंब, ईशान्येत आला तर काय फरक पडतो ?

https://www.indiatoday.in/india/story/flood-situation-worsens-in-northea...

नाखु's picture

3 Sep 2018 - 5:04 pm | नाखु

धर्मातच कसा अंधश्रद्धा आणि कटटृरपणाचा अतिरेक झाला आहे आणि जगातील इतर सर्व धर्म कसे शांतताप्रिय ,सुसंस्कृत आणि अत्यंत मानवतावादी आहेत याची कंठ दाटून स्तुती करणारी व्यक्ती निलाखस पुरोगामी असतेच.
आणि अश्या व्यक्तिमागे जेष्ठ विचारवंत, बुद्धीवादी लावलं नाही तर फाउल धरला जातो.

भुक्कड हिंदू नाखु पांढरपेशा मिपाकर

विशुमित's picture

3 Sep 2018 - 5:53 pm | विशुमित

हराळी (दुर्वा ) असतात ना...
कितीही उपटा, खुरपा, गाडा, जाळा-पेटवा.. ती परत फुटणारच.
तणनाशकाने कंट्रोल होईल पण तो पर्यंत रानाचं वजवाटोळे होऊ नये म्हणजे मिळवली.

सर टोबी's picture

3 Sep 2018 - 7:25 pm | सर टोबी

पुरोगाम्यांना जणू सणसणीत चपराकच (चपराक म्हटल्यावर जो हिणवल्याचा जोश दिसतो तो दुसऱ्या कोणत्याही प्रकारे व्यक्त करता येत नाही.)

असेच धर्माभिमानाचे पलिते पेटते ठेवा. स्वाभिमानाच्या निखार्यांवर राख बसू नये म्हणून असे धागे काढून पुनः पुन्हा जोश आणा. विकासाचा वारू उधळला नाही म्हणून काय झाले? त्याची जागा अस्मितांचे स्फुल्लिंग चेतवून भरून काढा. शेवटी हे स्फुल्लिंग म्हणजे अस्तनीतले निखारेच होते हे कळेल पण आपला कार्यभाग साधला हे समाधान काय कमी आहे?

परफेक्ट
तुस्सी ग्रेटच सरजी.

...अस्मितांचे स्फुल्लिंग ..... म्हणजे अस्तनीतले निखारेच ....

परफेक्ट परफेक्ट , अगदी परफेक्ट !

विशुमित's picture

3 Sep 2018 - 8:50 pm | विशुमित

छान फवारणी..!

माहितगार's picture

3 Sep 2018 - 9:05 pm | माहितगार

Saudi desert

संस्कृती जाळणार्‍या फवारणीसाठी हि अरबस्थानातील वाळू बरीच इफेक्टीव्ह असावी.

ट्रेड मार्क's picture

4 Sep 2018 - 3:55 am | ट्रेड मार्क

जरा गडबड झाली...

स्वतःच्या धर्माविषयी दुसरा कोणी वेडावाकडा बोलला की ते त्याचं विचारस्वातंत्र्य वाटतं पण जेव्हा दुसऱ्या धर्माविषयी आपल्यातला कोणी बोलला की तो प्रतिगामी, कोत्या विचारांचा वाटतो तेव्हा...

विकासाचा वारू उधळला नाही म्हणून काय झाले?

रच्याकने - विकासाचा वारू उधळलेला आहे. ज्या जीडीपीच्या नावे बोंबाबोंब चालली होती तो आता ८.२ वर गेला आहे. सॅमसंगने भारतात मोठी मोबाईल फॅक्टरी चालू केली. तसेच एकूणच भारत हा जगातला २ नंबरचा मोबाईल बनवणारा देश बनला. २०१४ च्या पूर्वी उतरणीला लागलेली परकीय चलनाची गंगाजळी आता २०१८ मध्ये ४०० बिलियन अमेरिकन डॉलर्सवर पोचली आहे. भारतात किती नोकऱ्या निर्माण झाल्या हे बघा.

त्याची जागा अस्मितांचे स्फुल्लिंग चेतवून भरून काढा

तर हे सगळं न बघता कुठल्या तरी निवडक मारहाणीच्या घटना फक्त बघून अस्मिता आणि कसली स्फुल्लिंग वगैरे बघणे हे पण एक लक्षण म्हणावे काय?

शेवटी हे स्फुल्लिंग म्हणजे अस्तनीतले निखारेच होते

देशातील फक्त निवडक वाईट घटनाच बघणाऱ्या आणि दाखवणाऱ्या तसेच फक्त त्यावरच विश्वास ठेवणाऱ्यांना अस्तनीतले सापच म्हणावे लागेल.

असेच धर्माभिमानाचे पलिते पेटते ठेवा

धर्माभिमान असला तर काय वाईट आहे हे मात्र मला समजले नाही. मी हिंदू असल्याचा मला अभिमान का असू नये याचं एक तरी कारण मला सांगाल का?

माहितगार's picture

4 Sep 2018 - 8:06 am | माहितगार

निवडक ...... फक्त बघून....कसली स्फुल्लिंग वगैरे बघणे हे पण एक लक्षण म्हणावे काय?

अगदी होय "...अस्मितांचे स्फुल्लिंग ..... म्हणजे अस्तनीतले निखारेच ...." ह्या वाक्यातील गडबड सापेक्षतेत अगदी नेमकी असल्यामुळे 'तथाकथीत' पुरोगामीत्वाच्या परफेक्ट लक्षणात मोडायला हवी.

दिगोचि's picture

4 Sep 2018 - 8:56 am | दिगोचि

प्रतिसादात दिलेली पुरोगामित्वाची उदाहरणे पटली. त्यातच आणखी एक. म्यानमारमधल्या रोहिन्ग्याविषयी सहानभूती धाखवायची पन त्यानी मारलेल्या ५०-६० हिन्दुन्चा उल्लेख करायचा नाही. तसेच काश्मीरात चाललेल्या घटनावरून मोदीसरकारला दोश द्यायचा पण तेथून पळवून लावलेल्या पन्डितावर झालेल्या अन्यायाविषयी गप्प रहायचे. पाकिस्तानी व्रुत्तपत्रात भारताला व मोदीसरकारला नावे ठेवायची हेहि उदाहारण त्याचे लक्शण आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

4 Sep 2018 - 11:37 am | प्रकाश घाटपांडे

पुरोगामी का झोडपले जातात? अशी एखादी पुस्तिका लिवा ब्वॊ!

झापडबंद पुरोगामीच का झोडपले जातात.

म्हणजे सरसकटीकरणाच्या सारवणाने हात भरणार नाही.

तडक फलक दुरुस्ती संघ सामान्य सदस्य नाखु

नोटाबंदी मुळे काळ्या पैशाला जब्बरदस्त आला बसला असे जो म्हणत नाही
आधार / जी एस टी ची अम्मलबजावणी कोंग्रेस करीत अस्ताना केलेल्य विरोधाला जो योग्य ठरवत नाही
राम कदमां सारख्यांची मुक्ताफळे जो योग्य ठरवत नाही
जो सनातन प्रभात वाचत नाही .......

ते सर्व पुरोगामी........

यात उद्धवजींना कोणत्या कॅटेगरीत मोजायचे ????

नाखु's picture

6 Sep 2018 - 10:01 pm | नाखु

उर्ध्वगामी अर्थात संजयचक्षूंनी पहात आहेत .
त्यामुळे त्यांचा तिसरा(ट) अक्ष आहे!!!!

अमेरिकेत हजारो लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणारे शेकडो फादर आणि केरळ मध्ये कन्फेक्शन बॉक्स मध्ये आपल्या पूर्वायुष्यातील चूक कबूल करणाऱ्या महिलेवर संगनमताने बलात्कार करणाऱ्या त्या चार फादर बद्दल गप्प बसून चौकशी लांबवणारे कॅथलिक ख्रिश्चन , भारतातील सगळ्या कॅथलिक चर्च ला भाजपच्या विरोधी मत तयार करण्यासाठी तत्परता दाखवतात . हे सुद्धा पुरोगामीपणा चे लक्षण आहे .

प्रकाश घाटपांडे's picture

6 Sep 2018 - 8:44 am | प्रकाश घाटपांडे

यक तर पूरोगामी अदुगरच यखांदा टक्का त्यातुन विखुरलेले त्यातून असंघटीत त्यातून शहाणे त्यातून इगोईस्टीक आन परत त्यात लावा तुम्ही भाण्णं.