कोएनराड एल्स ह्यांच्याशी संवाद

साहना's picture
साहना in काथ्याकूट
19 Aug 2018 - 3:19 am
गाभा: 

Koenraad Elst

दोन्ही व्यख्याने आणि प्रश्नोत्तरे फेसबुक वर LIVE मिळतील
https://www.facebook.com/bookstruck.in/

प्रतिक्रिया

चामुंडराय's picture

19 Aug 2018 - 6:30 am | चामुंडराय

.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Aug 2018 - 2:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

क्योनराड एल्स्ट

चामुंडराय's picture

19 Aug 2018 - 8:20 pm | चामुंडराय

माझा एक डच सहकारी आहे.
तो त्याचे नावं कुनराड ( कुन ) असे सांगतो.
ख खो ड जा

अरविंद कोल्हटकर's picture

21 Aug 2018 - 7:42 pm | अरविंद कोल्हटकर

भारतविद्या (Indology) हा अभ्यासविषय जोन्सने संस्कृतचा अभ्यास १८व्या शतकाच्या अखेरीस केल्यापासून अस्तित्वात आला आणि १९वे शतक आणि २०व्याचा बराच भाग त्याचे केन्द्र युरपमध्ये होते. अलीकडे ते अमेरिकेकडे सरकले आहे. हे नवे अभ्यासक भारतविद्येकडे नव्या दृष्टिकोनामधून पाहतात आणि त्यांच्या अभ्यासामध्ये हवा तितका आदरभाव नसतो. ते अधिक डाव्या विचाराने त्याकडे पाहतात आणि प्राचीन भारतविद्येमध्ये उच्चवर्णीयांचा अहंकार, स्त्री आणि दलितसमाज ह्यांना कमी लेखणे हे गर्भीभूत आहेत असे त्यांना दिसते. ह्याला विरोधी आणि भारतविद्येचे केन्द्रस्थान भारतातच असले पाहिजे असा विचार राजीव मल्होत्रा आणि त्यांचे समविचारी मांडत असतात. राजीव मल्होत्रांचे 'Battle for Sanskrit: Dead or Alive, Oppressive or Liberating, Political or Sacred?' हे पुस्तक आणि अन्य लेखन ह्या संदर्भात पाहावे.

क्योनराड एल्स्ट हेहि राजीव मल्होत्रा पंथातील आहेत अणि त्यामुळे हार्वर्ड विद्यापीठाचे मायकेल विट्झेल असे अभ्यासक त्यांच्या विरोधात असतात.

राजीव मल्होत्रांची भाषणे, चर्चा इत्यादि यूट्यूबवर उपलब्ध आहेत.

माहितगार's picture

21 Aug 2018 - 9:08 pm | माहितगार

कसयं बेसिकली काही पॉईंट महत्वाचे वाटतात, त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे 'न्हाऊ घातलेल्या बाळाच्या पाण्यासोबत बाळालाही फेकुन देण्याचा अट्टाहास' होऊ नये . तसा तो युरोमेरीकेतील काही टिकाकार इंडॉलॉजीस्ट कडून होत असणे हे खुपणारे असावे. जन्माधारीत विषमता, सती इत्यादी त्याज्य प्रथा भारतात होत्या नाही असे नाही पण भारतीय संस्कृती प्रबोधनाच्या टप्प्यांमधून बर्‍यापैकी पुढे सरकली आहे किंवा प्रबोधनीय प्रगतीच्या मार्गावर आहे हे युरोमेरीकन इंडॉलॉजीस्ट व्यवस्थीत लक्षात घेतात का या बद्दल बर्‍याचदा साशंकता वाटते. ह्यातील बर्‍याच मंडळीं च्या वैचरीक निष्पक्षतेबाबत बर्‍याचदा साशंकता वाटावी अशी स्थिती असते.

भारतीय स्त्रीच्या कपाळावरचे कुंकू हे केवळ सौंदर्य शृंगाराचा भाग असू शकते की नाही, त्या कुंकवाच्या टिळ्याला रक्ताशी हकनाक संबंध जोडणे गरजेचे असते का ? एका संस्कृत ग्रंथात 'प्राकृत' हा शब्द सुसंस्कार व्हायचे बाकी अशा अर्थाने येत असावा या शब्दाचा एक विद्वान काही तरी वेगळा अनुवाद करतो त्यावरुन एक विदुषी त्या अर्थाला 'पीग' पर्यंत ताणते ! खलनायकाचीही बाजू मांडणे भारतीय साहित्याला नवे नसावे , औरंगजेबाचीही महती गा, पण औरंगजेबाची महती कितीही गाईली त्याने बहुतेक गोष्टी राजकीय कारणासाठी केल्या म्हणून स्विकारायचे ठरवले तरी 'सरमद' सारख्या शब्दशः नग्न फकीरालाही केवळ त्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारण्यासाठी मृत्यूदंड देण्याचे पुरोगामीत्वाच्या कोणत्या निकषाने समर्थन होते ?

लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आदर आहेच पण वर उल्लेखील्याप्रमाणे वाकडे अर्थ काढून भारतीयांच्या परोक्ष भारतीय संस्कृतीबद्दल परदेशात अपप्रचार करण्यात हितसंबंध गुंतलेले असण्याची साशंकता वाटणे स्वाभाविक असावे. त्यामुळे अशा वाकड्या अर्थी सादरीकरणाचा परामर्ष राजीव मल्होत्रा कॉन्राड एल्स्टसारखी बोटावर मोजण्या एवढीच मंडळी प्रयत्न करताहेत. त्यांच्यातही कमतरता असणारच खास करुन भारतीय परंपरावाद्यांचे समर्थन करताना काही वेळा हि मंडळी ओव्हर द बोर्ड जाताना दिसतात पण किमान बाळालाही फेकुन देण्याचा ' होत असलेल्या इतर इंडॉलॉजीस्टच्या अट्टाहासाला हिच मंडळी तोंड देत आहेत हे विसरताही येत नसावे.

बाकी आपण काय लिहिले आणि मी प्रतिसाद काय दिला हे सर्वसामान्य भारतीयाला सहज उलगडणारही नाही अशी सर्वसाधारण अवस्था असावी. असो.