सिलिकॉन व्हेली मध्ये खालील मंडळी येत आहे. ह्यांचे व्याख्यान आहे आणि त्यानतंर त्यांच्याशी संवाद साधनांची संधी किंवा डिनर घेण्याची संधी सुद्धा उपलब्ध असणार आहे.
११ ऑगस्ट (शनिवार) - श्री राजीव श्रीनिवासन ह्यांचे व्याख्यान "How India was an Empire of Intellect and not just of Spirit" आहे. (आयोजक इंडिक बुक क्लब )
२५ ऑगस्ट (शनिवार) - सौ शेफाली वैद्य यांचे वाख्यान आहे. अजून विषय ठरलेला नाही. (आयोजक हिंदू महासभा )
३ सप्टेंबर लेबर डे सुट्टी - डॉक्टर कोएनराड एलस्ट ह्यांची दोन अभ्यासपूर्ण व्याख्याने आहेत (आयोजक Bookstruck.in )
- आर्यन होमलेन्ड डिबेट मधील अद्यतन शोध आणि मते (३ तास)
- मोदी सरकारची ४ वर्षातील कामगिरी (३ तास)
सर्व व्याख्याने विनामूल्य असून मिपा वरील सदस्यांनी लाभ घ्यावा. सर्व व्याख्याने फेसबुक लाईव्ह वर सुद्धा पाहता येतील.
माहिती साठी संपर्क : +१ (669) 223-1204
प्रतिक्रिया
6 Aug 2018 - 7:56 pm | ट्रम्प
म्हणजे सगळे वक्ते मिशन 2019 चे वातावरण तयार करायला येत आहेत तर !!!!
येऊ द्या !!!
येऊ द्या !!!!
ती माटी माणुश रोशगुल्ला बांगलन बाई नाही परवडणार .
7 Aug 2018 - 11:05 am | कपिलमुनी
ऑनलाईन ट्रोलना भलतीच प्रसिद्धी मिळायला लागली आहे .
लौकरच पद्म पुरस्कार मिळतील. पुढे राज्यपाल वगैरे !
शिव्या देउन पोट भरायचा धंदा जोरात आहे.
7 Aug 2018 - 11:18 am | जेम्स वांड
कारण माझ्या भावना इतक्या टोकदार नसल्या तरी शेफाली वैद्यबाईंना फॉलो करण्याइतके मटेरियल त्यांच्या लेखनात, ट्विट्स मध्ये किंवा ऑप इंडिया पोस्ट्स मधेही नसते. बहुतेक सगळं काही व्हॉटअबाऊटरी आधारित कंटेंट ऐकायला कार्यक्रमात कोणी जावं, त्यापेक्षा त्यांना ट्विटरवरच वाचलेलं परवडण्यासारखे आहे, सतत ट्विट करत राहणे ही तशीही त्यांची खासियत आहेच.
टीप - त्यांच्या एकंदरीत लेखनात एकच गोष्ट खूप भारी असते, ती म्हणजे त्यांचा 'साड्यांचा अभ्यास' टेक्सटाईल हिस्टरी मध्ये खरंच त्यांचं ज्ञान आदरणीय आहे.
7 Aug 2018 - 6:18 pm | पुंबा
ललितदेखिल छान लिहितात त्या. पुर्वी फॉलो करत असे मात्र राजकिय पोस्टमध्ये जे भयानक अज्ञान, गलिच्छ भाषा, व्हाटाबाऊटरी असते तिचा वीट येऊन ब्लॉक केले.
8 Aug 2018 - 11:19 am | arunjoshi123
उदा. देता येईल का?
मंजे बाकी लोकही पाहत असतात तिच्या ट्वीट्स.
तेव्हा अपप्रचार करण्याअगोदर उदाहरण द्याल तर बरं होईल.
8 Aug 2018 - 12:23 pm | पुंबा
ट्विटरबद्दल मी सांगू शकत नाही पण फेबुवर मी त्यांना २ वर्षांपुर्वीपर्यंत फॉलो करत असे. आपटार्ड, लिबटार्ड अशी विरोधकांना लेबलं देणे, नेहरू-गांधींबद्दल अफवा, तद्दन खोटी माहिती, नीट भाषेत वाद घालणार्यांशीदेखिल अतिशय अपमानजनक भाषेत बोलणे हे अनुभवून झाले आहे. ललित इतकं सुंदर लिहिणारी ही बाई राजकारणाबद्दल लिहिताना एवढी ताळतंत्र का सोडते असा प्रश्न तेव्हा पडायचा.
8 Aug 2018 - 2:35 pm | arunjoshi123
नक्की कोणत्या संदर्भात कुणाला काय म्हटले याचं उदाहरण मिळेल का?
================
मला प्रत्यक्ष त्यांचा संदर्भ हवा आहे.
==========
शिवाय इथे त्यांच्यावर ज्या प्रकारचे प्रतिसाद आलेत त्यापेक्षा फार भयंकर नेटवर येतात. तेव्हा त्यांनी एकतर्फी अत्यंत साधुव्रुत्तीनं लिहावं कसं?
8 Aug 2018 - 3:20 pm | पुंबा
हो. त्याचीदेखिल कल्पना आहे. त्याचा निषेधही मी वेळोवेळी केला होता.
मला त्यांचे लिखाण अतिरेकी/बव्हंशी ट्रोलिंगला समांतर वाटले. शिवाय राजकिय विश्लेषक म्हणुन टिव्हीवर जाताना भाजपची तळी उचलण्याची पराकाष्ठा त्या करायच्या ते डोक्यात जाणारे होते. त्याकारणे मी माझ्या हातात होते ते केले. बाईंना ब्लॉक मारले.
7 Aug 2018 - 11:19 am | प्रसाद_१९८२
असुद्या,
तुम्हाला तुमच्या आवडत्या पक्षातर्फे ती संधी मिळत नाही, म्हणून तुमचा त्रागा समजू शकतो !
--
असो, नशीब असते एकएकाचे.
7 Aug 2018 - 11:59 am | जेम्स वांड
कपिलमुनीवर वैयक्तिक झालाय म्हणून विचारतोय,
तुम्ही शेफाली वैद्यताईंचा डु आयडी आहात काय?
=)) =))
7 Aug 2018 - 12:09 pm | प्रसाद_१९८२
होय. =))
7 Aug 2018 - 12:11 pm | प्रसाद_१९८२
वैयक्तिक वगैरे काही नाही, मी सहज थोडी गम्मत केली. :))
---
कपिलमुनी यांनी ह. घ्या.
7 Aug 2018 - 12:30 pm | कपिलमुनी
मिपावर चर्चा बॅन झाल्या नाहीतर बर्याच आयडी मध्ये पोटेंशियल होते .
7 Aug 2018 - 12:34 pm | जेम्स वांड
चर्चा बॅन नाहीत, तर तुणतुणे खाजवत बसणे बॅन झाले आहे. मग!? करायची का आपण चर्चा कपिलमुनी =))
7 Aug 2018 - 12:31 pm | जेम्स वांड
स्वभाव आवडला बरंका प्रसाद भाऊ!
उगा अंगाला लावून घेणे नाही अन मस्करीची कुस्करी नाही, जियो ! (और लगे रहो)
7 Aug 2018 - 12:29 pm | जेम्स वांड
=))
7 Aug 2018 - 12:52 pm | शाम भागवत
राज्यसभेचे सभासदत्व राहिले की हो. :)
कृ.ह.घ्या.
7 Aug 2018 - 5:12 pm | sagarpdy
मटार उसळ, शिकरण पण
7 Aug 2018 - 6:09 pm | अभ्या..
हा मटार उसळ शिकरण काय प्रकार असतो? कुठे मिळते हे कॉम्बीनेशन?
कुणी सांगेल काय?
7 Aug 2018 - 6:22 pm | राघवेंद्र
अभ्या पुण्यात येऊन इतके दिवस झाले. एकानेही तुला घरी जेवायला नाही बोलावले असे दिसते.
7 Aug 2018 - 6:28 pm | अभ्या..
नाही ना रे राघवा. :(
लैच वाळीत टाकल्यावानी केलंय बघ.
8 Aug 2018 - 7:49 pm | शाम भागवत
काहीही.
पुलंची पुस्तके तुम्ही वाचलेली नाहीत, अशी माझ्या मनाची समजूत घालणे मला बिलकूल झेपत नाहीये. तस्मात माझा पास.
;)
7 Aug 2018 - 7:41 pm | ट्रम्प
आखाडा चे दोन तीन दिवस बाकी राहिलेत आणि तुम्ही मटार उसळ शिकरण बद्दल चर्चा करताय ? बहोत नाइंसाफी है .
7 Aug 2018 - 7:10 pm | शाम भागवत
:))
7 Aug 2018 - 9:16 pm | डँबिस००७
शिव्या देउन पोट भरायचा धंदा जोरात आहे.
अख्खा विरोधी पक्ष आज ही हेच करत आहे !!
7 Aug 2018 - 10:56 pm | कपिलमुनी
आताचे पूर्वीचे सगळेच विरोधी पक्ष हेच करतात
8 Aug 2018 - 12:07 am | डँबिस००७
शिव्या देउन पोट भरायचा धंदा हल्ली जोरात आहे. अस ध्वनित होत होत म्हणुन म्हंटल की आताच विरोधी पक्ष हेच करत आहेत !
8 Aug 2018 - 11:23 am | arunjoshi123
आम्हाला ब्राह्मण मुख्यमंत्री नको हा राजकीय विरोध नाही, हा आजकालचा शिव्यांचा धंदा आहे. फरक आहे रे कपिल.
8 Aug 2018 - 11:15 am | arunjoshi123
तुम्हाला कोणीओओओओणी पुसत नाही.
8 Aug 2018 - 11:17 am | arunjoshi123
अरे कपिल, ७० वर्षे चाललेलं हे धंद्याचं मॉडेल बंद पडलं आहे.
8 Aug 2018 - 9:59 am | शब्दबम्बाळ
LOL शेफाली वैद्य!
यांना म्हणे बड्डे ला पंप्र यांनी टिवटिववर फॉललॉव करून गिफ्ट दिल होत!
असेही अनेक ट्रोल्स फोल्लो करतातच ते, त्यात अजून एक भर!
बाकी, परदेशातून फंड गोळा करायची तयारी सुरु झाली वाटत!
8 Aug 2018 - 12:23 pm | कपिलमुनी
या शेफारलेल्या वौद्यने अमृता फडणवीस यांना सुद्धा ट्रोल केले होते.
8 Aug 2018 - 2:05 pm | ट्रम्प
उच्च विचार प्रदर्शित करणारे आयडी अचानक कंपूगीरी सुरू करतात पाहून आश्चर्य वाटले
8 Aug 2018 - 7:52 pm | शाम भागवत
:)
8 Aug 2018 - 2:17 pm | शाम भागवत
अजो परतले वाटते.
गुरूजी कधी येणार?
मंगूशेटची अनुपस्थिती पण जाणवतेय. त्यांनापण आणा रे कुणीतरी.
हे सगळे आले की खूप काय काय कळत असत.
8 Aug 2018 - 2:22 pm | अभ्या..
ते एस काका पण कुठे गायब झालेत कायकी, व्यायामाचे डोक्यात घेतलेय की वेटलॉसचे काही कळत नाही.
10 Aug 2018 - 10:21 am | मार्मिक गोडसे
शेफाली वैद्य सारख्या लोकांचा बुरखा फाडणारा लेख.