एका धाग्यावर श्रीमंत पेशवे यांनी विचारणा केलीय म्हणून इकडे वेगळा धागा काढला आहे.
रानभाजी ४ थे वर्ष
चिंब पाऊस अल्लड वारा, धुंद हवा मृदगंध नवा l
रानातुनी बहरे रानमेवा, तयाचा मज आस्वाद हवा ll
या वर्णनासारखे अगदी नितांत सुंदर, श्यामल आणि पावसाळी व सर्वात महत्वाचे म्हणजे प्रदूषण मुक्त अस्सल नैसर्गिक वातावरण आपल्या आदिवासी गावात दर पावसाळ्यात असते.
या अशा गावात गेली ३ वर्षे जनजाती कल्याण आश्रमातर्फे, आदिवासी समाजातील आपल्या बंधू/भगिनींसाठी ""रानभाजी महोत्सव"" अशी एक नाविन्यपूर्ण स्पर्धा घेतली जाते.
आपल्याला माहीतही नाहीत अशा काही उत्तम पालेभाज्या या भागात श्रावण मासात उगवतात. आपल्या सर्व आदिवासी भगिनींना आणि मातांना या भाज्यांचे विविध गुण माहीत आहेत, व त्या विविध प्रकारे शिजवण्यातही पारंगत आहेत.
या अश्या भाज्यांची स्पर्धा घेऊन उत्तम सादरीकरण आणि स्वाद आणि माहिती असणाऱ्या या जनजाती समाजातील स्पर्धकांना भेटवस्तू देऊन प्रोत्साहन दिले जाते.
वनस्पती शास्त्राचे नामवंत परीक्षक असतात.
पुण्यातून आपण बऱ्याच लोकांना सहल म्हणून या ठिकाणी घेऊन जातो,नाम मात्र शुल्क असते, स्पर्धेच्या ठिकाणी घरटी काही लोकांना चुलीवर शिजवलेले अन्न व रानभाजी, नाचणी सत्व असा आस्वाद घ्यायला मिळतो. जमा केलेल्या शुल्कातील काही रक्कम घरटी कातकरी कुटुंबाला दिली जाते, या निमित्ताने पूर्वीच्या कार्यक्रमातून आहुपे हे गाव पर्यटनासाठी प्रसिद्ध होऊन, सहलीस येणाऱ्या पाहुण्यांच्या चहा, नाष्टा व जेवणाच्या सोयीतून त्यांना रोजगार मिळाला आहे, व कल्याण आश्रमाची मुळ इच्छा परिपूर्ण झाली आहे.
एकंदरीत या मस्त खुशाल आणि निवांत गारव्याचा आस्वाद घ्यायला आपल्याला आवडेल ना!!!
या वर्षीचा रानभाजी उत्सव जुन्नर तालुक्यातील आजनावळे या गावी 11 व 12 ऑगस्ट रोजी होणार आहे त्याचे शुल्क ₹2000/- प्रत्येक व्यक्तीसाठी आहे.
या वर्षी फक्त एकच रानभाजी उत्सव होणार आहे, कारण विविध आदिवासी भागात या निमित्ताने आपला संपर्क व्हावा, तेथील जीवन अनुभवास यावे, व नवीन ठिकाणांना त्यामुळे होणारा लाभ मिळावा ही प्रामाणिक इच्छा !!!
अधिक माहिती साठी :-
ऋषभ मुथा -9850258408
वैशाली जोशी -9552558197
विजय भालिंगे -9689502350
नारायण ठिकडे-8007062162
नरेन्द्र पेंडसे -7709013232
सचिनकुलकर्णी- 9921574108
या कार्यक्रमासाठी तयारी व अंमलबजावणीसाठी काही स्त्री व पुरुष स्वयंसेवकांची गरज आहे, तेंव्हा ही माहिती प्रसारित झाली की लवकरात लवकर आपली व आपल्या मित्र मैत्रिणींची नावे सहलीसाठी व कार्यकर्ता म्हणून नोंदवण्यासाठी कृपया तयार रहा.
टीप - अशा निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर तेथील स्वच्छता, शुद्धता यास बाधा न आणता, त्याचे अधिक संवर्धन कसे करता येईल हे आपले प्रथम कर्तव्य आहे.
प्लास्टिक पिशव्या/बाटल्या इत्यादी प्रतिबंधित वस्तू सोबत नेण्यास, वापरण्यास व इतरत्र टाकण्यास सक्त मनाई आहे.
जनजाती कल्याण आश्रम,पुणे
ll आदिवासी और शहरवासी, तू मै एक रक्त ll
भारत माता की जय !!!
प्रतिक्रिया
4 Aug 2018 - 1:25 pm | सस्नेह
छान.
4 Aug 2018 - 3:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
स्पृहणिय उपक्रम !
5 Aug 2018 - 1:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
ऑगस्ट ११ व १२ म्हणजे सलग दोन दिवसांचा कार्यक्रम आहे की दोन वेगवेगळ्या सहली आहेत ? फक्त १२ तारीखेस (रविवार) जाणे शक्य आहे काय ?
जरा तपशिलासह कार्यक्रम दिल्यास सोईचे होईल.
5 Aug 2018 - 8:25 pm | त्रिवेणी
शनिवारी दुपारी निघतात आणि रविवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत परत पुणे असा साधारण कार्यक्रम असतो.
वरील नंबर पैकी मुथा यांना फोन करून बघा. मी या वर्षी नाही जात आहे त्यामुळे वरील लोकच जास्त माहिती देऊ शकतील.
फक्त रविवारी ही जाता येईल. पण ते तुमच तुम्हा स्वतःला जाव लागेल.
7 Aug 2018 - 12:19 am | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
5 Aug 2018 - 9:16 am | जयंत कुलकर्णी
मी या कार्यक्रमास दोन वर्षांपूर्वी जाऊन आलो आहे.
निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असल्यास जरूर जाणे... शिवाय आदिवासी कुटुंबांना मदत होते हे वेगळेच..
6 Aug 2018 - 6:01 am | त्रिवेणी
6 Aug 2018 - 12:49 pm | II श्रीमंत पेशवे II
त्रिवेणी आपण दिलेल्या माहिती बद्दल खरच मनपूर्वक आभार
गेल्यावर्षी च्या रानभाजी महोत्सवाला मला ठरवून पण जाता आले नाही.
या वर्षी नक्की तिथे हजर असेन.
पुनश्चः धन्यवाद ....
6 Aug 2018 - 8:37 pm | रमेश आठवले
अमदावाद मधील प्रसिद्ध Indian Institute of Management या संस्थेतील प्राध्यापक अनिल गुप्ता यांची सृष्टी या नावाची संस्था असाच उपक्रम गेली पंधरा वर्षे करीत आहे. त्याला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मी दोन वर्षी तेथे जाऊन आलो आहे. या सम्बन्धी अधिक माहिती या लीन्क वर वाचता येईल.
http://www.sristi.org/cms/?q=en/gujarat-popularise-traditional-recipes-s...
7 Aug 2018 - 8:43 am | प्रचेतस
अजनावळे गाव प्रचंड सुंदर आहे. एका बाजूला जीवधन, दुसर्या बाजूला वर्हाड्या, तिसर्या बाजूला नाणेघाट अशा तिन्ही बाजूंनी हे गाव वेढलं गेलं आहे. प्रचंड सुंदर आणि जवळपासच्या अनेक प्राचीन अवशेषांनी समृद्ध.
13 Aug 2018 - 9:42 am | priya_d
या महोत्सवास (ऑगस्ट २०१८)कोणी मिपाकर जाउन आले असतील त़र कृपया वृत्तांत जरूर शेअर करा .