गुगल फोटो / ब्लॅागर यावरून फोटोशेअरिंग
अद्ययावत करण्याच्या दृष्टीने हा लेख लिहित आहे.
गाभा :
गुगल दिवसेंदिवस सर्वव्यापी होत आहे तसेच त्यांच्याकडूनही सतत बदल होत आहेत. पिकासा - गुगुल प्लस - गुगल फोटोज असे बदल झाले आहेत.
सध्या वेबसाइटवर फोटो देण्यासाठी या दोन साइट्स कशा वापरायच्या ते पाहू . गुणदोष अथवा अडचणींचाही विचार करूया. मोबाइलमध्ये कॅम्रे चांगले आले ,ते सतत बरोबर असतात त्यामुळे त्यातूनच फोटो काढून फेसबुक अथवा इन्स्टाग्राम तसेच वाटसप माध्यमातून इतर लोकांना दाखवता येतात. ही तीन माध्यमं स्वतंत्र, भरपूर मेमरी देणारी प्रायमरी माध्यमं ( म्हणजे फोटो इथे थेट टाकता येतात दुसय्रा कोणत्याही साइटचा आधार न घेता,) आहेत. मिसळपाव या आपल्या साइवर फोटो किंवा लेखामध्ये फोटो देण्यासाठी स्टोरेजच्या कमतरतेमुळे दुसय्रा 'फोटो_शेअरिंग_साइट'चा आधार घ्यावा लागतो. या लेखात मिपासाठी लागणारी "image link" "गुगल फोटोज" किंवा 'ब्लॅागर'मधून कशी
मिळवायची ते पाहू.
१) योग्य साइटवर फोटो अपलोड करणे.
अ ) गुगल फोटोज वापरणे.
किंवा
ब ) ब्लॅागर वापरणे.
२) फोटोची इमेज लिंक मिळवणे.
३) इमेज लिंक बरोबर असण्याची खात्री करणे.
------------------------------
गुगल फोटोज
गूगल फोटोजवरून फोटो देण्यात अडचणी येत आहेत. लोकांकडचे डिवाईसेस वेगवेगळे वापरात आहेत. Android phones , iphone, tablet, computers इत्यादी कोणत्याही डिवाईसवरून शेअरिंग साठी हा भाग अपडेट ( 2021-11-23)करत आहेत हे.
'गूगल फोटोज' Google Photos वरून फोटो शेअर करणे.
गूगल फोटोज ही एक cloud storage सोय आहे. ती Gmail/ google account असणाऱ्या यूजरला 15 GB free storage उपलब्ध करून देते. यामध्ये फोटो साठवता येतात आणि ते पाहता किंवा डाउनलोड करता येतात. आता एवढे फ्री स्टोअरेज देणारी ही एकमेव जागा ( service provider) आहे आणि शिवाय सुरक्षित ( secure) आहे.
गाभा
मिसळपाव ( मिपा)साईटची स्वत:ची स्टोरेज नाही त्यामुळे आपले ( मोबाईल/कंपुटर हार्ड डिस्क/ camera मधले) फोटो प्रथम कुठेतरी इंटरनेटवरच्या साईटवर असणे जरुरीचे आहे. मग तिथून ते मिपावर लेखामध्ये तात्पुरते दाखवता येतात. तशा साईटवर फोटो स्टोअर करून ' direct image sharing link' मिळवावी लागते. ती मिळाली की लेख/ प्रतिसाद लिहिताना तिथे असणारा 'image' pop-up menu वापरून फोटो देता येतो. ती 'direct image sharing link' google photos मधून कशी मिळवायची हे देत आहे. गूगल फोटोजवरून फोटोंच्या वेगवेगळ्या लिंका मिळतात परंतू त्या सर्वच मिपासाठीच्या direct image sharing link नसतात. तशी लिंक कशी मिळवायची ते इथे देत आहे.
तुम्ही android मोबाईल, iphone, computer ,tablet असे कोणतेही उपकरण (device) वापरत असलात तरी पद्धत एकच आहे.
१.तुमच्या डिवाइसमध्ये Google photos app सुद्धा असेल किंवा नसेल परंतू आपल्याला त्याची साईट वापरायची आहे.
ही साईट ब्राउजरमध्ये उघडा.
https://photos.google.com/
लॉगिन नसेल तर
https://photos.google.com/login
ही लिंक वापरून तुमच्या Gmail accountने लॉगिन करा.
( इथे तुम्ही फक्त backup केलेले फोटो दिसतात, डिवाइसच्या स्टोरेजमधले दिसणार नाहीत.)
२. मेनूमध्ये जाऊन album create करा.
अल्बमचे नाव द्या. उदाहरणार्थ
Share_to_mipa_1
त्याच पेजवरच्या मेनूमध्ये >> options>>share>>create link केल्यावर तो 'shared' album तयार होतो.
((नाव असे द्या की पुढे हे फोटो कशासाठी हे लगेच समजेल. शिवाय
Share_to_mipa_2
Share_to_mipa_3
. . .
अशी नावं दिल्याने त्या albumचे एडिटिंग सोपे जाईल.
३. पुन्हा फोटोजच्या मुख्य पेजवर जाऊन >> मेनू>>albums ओपन करा. इथे आता नवीन अल्बमचे नाव दिसेल व त्यावर shared हा शब्द दिसेल. या अल्बमवर क्लिक करून उघडा. अपलोडचा बाण वापरून हवे ते फोटो अपलोड करा. किंवा अगोदरच अपलोड केलेले फोटो 'add photos' वापरून त्या shared albumमध्ये आणा.
( (आता या albumमध्ये असणारे/आणलेले फोटो shared च असतील. पण तुमचे इतर backup फोटो shared नसल्याने इतरांना दिसणार नाहीत.))
४. या अल्बममधल्या एखाद्या फोटोला क्लिक केल्यावर तो मोठा दिसेल. त्यावर पुन्हा क्लिक करून 'open in new tab' करा.
Address bar मध्ये
https_lh3.googleusercontent_com/. . . .
अशी लिंक दिसली तर कॉपी करून घ्या। हीच direct image link.
अशी लिंक दिसली नाही तर
https_photos _dot_google_dot_com/share/. . . .
अशी दिसत असेल तेव्हा फोटोवर राईट क्लिक करून हवी ती https_lh3.googleusercontent_com/. . . . टाईपची लिंक 'copy link' मधून मिळते.
((सूचना लिंका शेअर केल्यानंतर album चे नाव बदलू नका. तसे केल्यास लिंका पुन्हा कराव्या लागतील.))
-------------------------------
ब्लॅागर :
गुगलचाच एक प्रॅाडक्ट "Blogger" ( Blogger) म्हणून प्रसिद्ध आहे. इंटरनेट माध्यमातून स्वत:चे स्वतंत्र लेख लिहिण्यासाठी गुगल'ने फुकटात उपलब्ध करून दिलेले माध्यम आहे हे
सर्वांनाच माहित आहे.
ब १) मोबाइल कॅम्र्याने फोटो काढणे,
ब २ ) आपला ब्लॅाग उघडून तिथे फोटो अपलोड करणे आणि ब्लॅाग पब्लिश करणे,
ब ३) पब्लिश झालेल्या ब्लॅागमधून फोटोची इमेज लिंक काढणे.
ब २-१ -१) मोबाइलमध्ये Blogger app असेल तर ते उघडा. जिमेल अकाउंट/गुगल अकाउंट वापरून लॅागिन करा.
ब २-१ -२) new blog + क्लिक करून बॅाक्सच्या वरती जी बरीच आइकॅान आहेत त्यातले फोटोचे निवडून क्लिक केल्यावर camera/ from this blog/ document हे पर्याय दिसतात.
document पर्याय निवडल्यावर -
- choose file - मोबाइल फोल्डरमधला हवा असलेला फोटो अपलोड करा.
तो दिसल्यावर Add the selected बटण प्रेस करा.
अजून दोन चार फोटो असे अपलोड करून ब्लॅागच्या सर्वात वरती दिसणाय्रा आइकॅान्समधून "publish" बटण क्लिक केल्यावर हा ब्लॅाग सर्वांना दिसतो/ पाहता येतो.
आता एका बाजुला " View blog" बटण आहे त्यावर क्लिक केल्यास हा तुमचा ब्लॅाग इतरांना कसा दिसेल ते पान उघडेल. या पानावरच्या फोटोवर मोबाइलच्या टच स्क्रीनवर बोट धरल्यास "copy link" केल्यास फोटोची हवी असलेी "image link" मिळवता येते. एवढेच नव्हे तर दुसय्रा कुणाकककुकुणालाही लिंक मिळवता येते.
कुणालाही लिंक काढता येते.
मोबाइलमधले Blogger App वापरून ब्लॅागवर फोटो अपलोड करण्याला आणखी एक पर्याय आहे तो म्हणजे blogger dot com ही वेबसाइट उघडून तिथे ब्लॅाग बनवणे. या दोन्ही पध्दतीचे फायदे तोटे आहेत. गुगल प्रत्येक जीमेल अकाऊंटला 15GB free cloud storageउपलब्ध करून देते. मोबाइल अॅपमधून फोटो अपलोड केल्यास ते फोटो बरेच कमी रेझलुशनचे ( यास गुगल high quality photos म्हणते) साठवले जातात व यासाठी unlimited free storage मिळते. परंतू वेबसाइट वापरून फोटो अपलोड करताना आणखी एक पर्याय दिसतो - high resolution photos but it will reduce your 15 GB free available storage. म्हणजे काही खास फोटोंसाठी हा पर्याय वापरा. हे फोटो वेबसाइट /लेखामध्ये पाहताना विरळ ( grainy) वाटणार नाहीत.
------------------------------------------
३) इमेज लिंक तपासणे
दोन्ही तह्रेने लिंक तर मिळाली ती तपासण्याचा सोपा उपाय म्हणजे ती लिंक क्रोम ब्राउजरसोडून इतर कोणत्या ब्राउजरच्या अॅड्रसमध्ये टाकून लोड करणे. लिंक बरोबर असल्यास पूर्ण फोटो उमटतो.
-------------------------
सोपे करण्याचा प्रयत्न केला आहे. शंका आणि सूचनांचे स्वागत. आणखी काही सुधारणा माहित असल्या तर प्रतिसादांत अवश्य लिहा.
App न वापरता वेबसाइटचा केलेला वापर विचित्र व अनाठायी वाटण्याची शक्यता आहे परंतू Android मोबाइल नसला तरीही इतर ओएससाठी वेबसाइटचा पर्याय वापरता येतो. या गोष्टी मोबाइलमधून करता येतात म्हणजे कंम्प्युटरातून नक्कीच होतील. करून पाहा.
--------------
Summery
You will learn in this article -
• How to open a blog and upload photos.
• How to upload photos onto my blogspot or Google photos and extract image sharing link for a website?
• Google Drive is the parent holder of all folders, Google Photos is a sub folder.
• What is "15GB free cloud storage" and how to utilise the same.
• Why do photos not load onto website?
• Why do photos look grainy?
• What is "high quality photos" and "high resolution photos?"
• How to upload photos onto Google Drive or Google Photos without using an Android phone?
--------
Suggestions and queries are welcome.
प्रतिक्रिया
12 Jul 2018 - 11:51 am | दुर्गविहारी
उत्तम धागा ! याचा व्हिडीओ बनवून टाकता आला तर पहा. सगळ्यांनाच सोपे जाईल.
12 Jul 2018 - 1:34 pm | प्रसाद_१९८२
मात्र हा फारच द्राविडी प्राणायम वाटतोय.
---
यापेक्षा फेसबुक अल्बम मधून फोटो टाकणे फारच सोयीचे आहे असे दिसतेय.
12 Jul 2018 - 2:59 pm | श्वेता२४
मिसळपाव या आपल्या साइवर फोटो किंवा लेखामध्ये फोटो देण्यासाठी स्टोरेजच्या कमतरतेमुळे दुसय्रा 'फोटो_शेअरिंग_साइट'चा आधार घ्यावा लागतयावर खरच काही उपाय नाही का. हे फोटो अपलोड करणं खूप सोपं होण्याची गरज आहे.
12 Jul 2018 - 3:09 pm | कंजूस
एक मोठा स्टोरेज भाड्याने घेऊन साइट मात्र विनाउत्पन्न फुकट चालवणे कसं शक्य आहे?
गुगल किंवा फेसबुक यांना जाहिरातींचे भरमसाठ उत्पन्न आहे ते फुकट स्टोरेज देऊ शकतात.
एवढंच काय, फेसबुकमाध्यमातून ( आणिआआता वाटसप) लोकांना फोटो दाखवता येत नसते तर डिएसएलार महागड्या कॅम्राचा खप दाणकन कोसळेल.
12 Jul 2018 - 3:00 pm | कंजूस
प्रसाद_१९८२,
फेसबुक अल्बममधुन फोटो टाकण्याची कृती मिपावरच्या इतर धाग्यात दिली आहेच, परंतू काही जणांचे हाइ रेझलुशनचे फोटो गुगल ड्राइव/गुगल फोटोज/ आहेत त्यांना फोटोची लिंक मिळण्यात अडचण येते. ती अडचण का येते, कशी दूर करायची एवढेच या धाग्यात दिले आहे. ब्लॅागरवर काही अडचण नसते.
फेसबुकवर सध्या ४ एमबी पर्यंतचे (फोन मेमरी/स्टोरेज साइज)फोटो अपलोड होतात परंतू फेसबुकवर कम्प्रेस होतात.सामान्य फोटोंसाठी फेसबुक चांगले आहे.
ओफिसमधून मिपा वाचणारे बरेच आहेत त्यांना फेसबुकवरचे लेखात टाकलेले फोटो दिसत नाहीत कारण फेसबुक बॅन असते.
कायमची गोष्ट कोणतीच नाही. गुगलसुद्धा तुम्ही चारपाच महिने काहीच अॅक्टिवटी केी नाहीत तर डेटा डिलिट करू शकते. फोटोबकेट साइट ने फक्त पेड अकाउंटला शेअरिंग चालू ठेवले आहे. याहूचे फ्लिकर कधीही बंद होईल कारण ती कंपनी वेराइझनने घेतली आहे.
धन्यवाद.
12 Jul 2018 - 3:00 pm | श्वेता२४
मिसळपाव या आपल्या साइवर फोटो किंवा लेखामध्ये फोटो देण्यासाठी स्टोरेजच्या कमतरतेमुळे दुसय्रा 'फोटो_शेअरिंग_साइट'चा आधार घ्यावा लागतो.
खरच काही उपाय नाही का? हे फोटो अपलोड करणं खूप सोपं होण्याची गरज आहे.
12 Jul 2018 - 3:23 pm | कंजूस
>>>>खरच काही उपाय नाही का? >>>
आहे ना!!
।
।
दरवर्षी एक हजार डॅालर देणारा देणगिदार मिळवणे.
12 Jul 2018 - 3:49 pm | श्वेता२४
विनोदाचा भाग सोडा. पण हा काही फार मोठा आकडा नाही. सगळ्या मिपाकरांनी मनात आणलं तर हे नक्की शक्य आहे असं मला वाटतं.
14 Jul 2018 - 9:23 am | शाली
एवढा ऊद्योग करन्यापेक्षा फोटोबकेट वापरा की.
14 Jul 2018 - 10:33 am | कंजूस
फोटोबकेटवरून माझ्या दोनतीन धाग्यात टाकलेले फोटो पुन्हा टाकावे लागणार आहेत. त्यातून घेतलेल्या शेअरिंग लिंकस बंद केल्या त्यांनी. पेड अकाउंटलाच चालतात.
आता हा जो उद्योग आहे तो सर्वांनी गुगल फोटोजच वापरावे यासाठी नाही. ज्या कुणाला गुगल फोटोज वापरायची इच्छा आहे त्यांच्यासाठी.
14 Jul 2018 - 1:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
@ कंजूस
तुम्ही दिलेली मिपावर फोटो टाकण्याची प्रक्रिया, बहुतेक मोबाईलवरून फोटो टाकण्यासाठीची असावी. लॅपटॉप किंवा पीसीवरून फोटो टाकताना इतकी किचकट प्रक्रिया वापरावी लागत नाही.
तसेही, माझ्या अनुभवावरून मोबाईलवर मोठा मजकूर टंकणे आणि, विशेषतः चित्रे असलेले लेखन करणे, खूपच त्रासाचे होते. त्याऐवजी, लॅपटॉप किंवा पीसी वापरून केलेल्या सुलभ लेखनाचा अनुभव आनंददायक असतो.
14 Jul 2018 - 1:43 pm | कंजूस
>>तुम्ही दिलेली मिपावर फोटो टाकण्याची प्रक्रिया, बहुतेक मोबाईलवरून फोटो टाकण्यासाठीची असावी>>
हो.
१) मोबाइल अॅपवरून फोटो अपलोड केल्यास ते कमी रेझलुशनचे का अपलोड होतात हे दिलं आहे. तोच फोटो साइटवरून कसा अधिक रेझलुशनचा टाकता येतो ते दिलय.
२) फोटोची शेअरिंग लिंक काढण्यासाठीची वेबसाइट दिली आहे. कधीकधी काही मोबाइलमधून फुल साइट येतच नाही अथवा मिळवलेली लिंक ही"मेसेज शेअरिंग"ची असते. आपल्याला "इमेज शेअरिंग लिंक फॅार वेबसाइट " हवी असते.
४ ) सध्या ३/४ जिबि रॅम आणि ३२/६४ जीबी रॅामचे मोबाइल( १५हजारात), ६ इंची स्क्रिनचे उपलब्ध झाल्याने हे आता सहज शक्य आहे.
14 Jul 2018 - 1:53 pm | कंजूस
>>>मोबाईलवर मोठा मजकूर टंकणे आणि, विशेषतः चित्रे असलेले लेखन करणे, खूपच त्रासाचे होते. त्याऐवजी, लॅपटॉप किंवा पीसी वापरून केलेल्या सुलभ लेखनाचा अनुभव आनंददायक असतो.>>>>
हे चित्र आता बदलत आहे. मोबाइलचे फास्ट प्रसेसर, मोठे तजेलदार स्क्रीन, मोठी रॅम ,भन्नाट कॅम्रे, सर्वव्यापी फास्ट आणि स्वस्त इंटरनेट,क्लाउड स्टोरिज ,मोठे खिसे ही कारणं आहेत.
नोट अॅपमध्ये सर्व लेख ओफाइन लिहून एका झटक्यात मिपावर टाकता येतो.
14 Jul 2018 - 8:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
मोबाईल कितीही मोठा झाला तरी त्याचा कीपॅड त्याच्या लांबीरूंदीच्या बाहेर जाऊ शकत नाही (अजून जरा मोठा झाला तर तो टॅब बनेल) ! त्यामुळे, बोटाच्या टोकाने किंवा पेन पॉईंटरने टंकणे अत्यंत गैरसोईचे राहणार आहे... अगदी १९९०च्या सुरुवातीपासून संगणक टंकन करणार्या व सद्या नोट वापरणार्या माझ्यासारख्यांसाठीही :)
15 Jul 2018 - 6:18 pm | चौकटराजा
माझ्याकडे स्मार्टट्रोन नाव असलेला मोबाईल आहे. त्यात टी क्लाउड व टी स्टोअर अशा दोन सोयी आहेत. त्याचा व तुमच्या या धाग्याचा सम्बन्ध असावा काय ?
दुसरे जाता जाता - गुगल वापरून मरा ठी टन्कताना " कॅट " मॉल " असे शब्द तयार कसे करायचे ? ग म भ न फेसबुक वर वापरता येते का थेट ?
15 Jul 2018 - 11:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिपा :
kET = कॅट
mOl = मॉल
गुगल इनपुट साधने : यात जरा वेगळी आयाडियाची कल्पना वापरावी लागते ! :) ती अशी...
cat = कॅट
mall = मॉल
टीप : गुगलमध्ये इंग्लिश शब्दाचे स्पेलिंग टंकल्यास त्याचा उच्चार मराठीत/देवनागरीमधे दिसणार्या पर्यायांत दिसतो. त्यावर टिचकी मारून त्याला स्विकारा.
17 Jul 2018 - 9:33 am | चौकटराजा
आताच डेस्क टोप वरून गुगल वापरून पाहिले टोप हाच पर्याय येत आहे . आता ग म भ न ने पहा टॉप हा शब्द आला. गुगल मधे सातत्य नाही . cat चे वेळी कॅट आला पर्यायी शब्द पण bat चे वेळी बॅट आला नाही बात बत असे शब्द आले.
17 Jul 2018 - 9:45 am | टर्मीनेटर
गुगल इनपुट टूल्स मध्ये सातत्य नाही हि खरी गोष्ट आहे. ह्या अडचणी मलाही येतात, मग अशा वेळी कॉपी पेस्टचाच पर्याय वापरावा लागतोय. ग म भ न वर तर बरेच चित्रविचित्र शब्द निर्माण होतात.
17 Jul 2018 - 1:11 pm | कंजूस
संगणकाचं माहित नाही. मोबाइलमध्ये दहा आठवडे झाले की कीबोर्ड, जीमेल अपडेटस येतात त्यामध्ये करेक्शनस होत असतात नवीन.
17 Jul 2018 - 7:58 pm | चौकटराजा
वाईट अनुभव वर टर्मिनेटर यानी म्हटल्या सारखा ग म भ न वरच्या भुताटकीचा ! बाकी मोबाईल सगळे ब्येस आहे .
17 Jul 2018 - 8:00 pm | चौकटराजा
हे सगळे पाहिल्यावर " एव्हरी जीनियस हॅज अ क्रूकेड कॉर्नर इन हिज ब्रेन " ची आठवण येते.
17 Jul 2018 - 8:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
गुगल इनपुट साधने वापरून, मला बहुतेक वेळेस पहिला पर्याय व क्वचित दुसरा पर्याय, योग्य तोच मिळतोय. हे बघा...
17 Jul 2018 - 8:22 pm | कंजूस
गुगल तुमची प्रमाण बाराखडी घेणार आणि त्यावर काम करणार.
अॅ आणि ऑ ऑ ऑ हे स्वर कुठे आहेत त्यात?
17 Jul 2018 - 8:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
वर पहा.
15 Jul 2018 - 9:36 pm | कंजूस
*टी क्लाउड व टी स्टोअर अशा दोन सोयी आहे**
म्हणजे कसली अॅप आहेत?
एकदोन अक्षरं माझ्याही कीबोर्डातून टंकता येत नाहीत ती प्रतिसादात नाही पण लेखासाठी कॅापीपेस्ट करण्यासाठी साठवून ठेवली आहेत.
18 Jul 2018 - 8:41 pm | उपयोजक
१.मोबाईलवरुन लिहिण्यासाठी mightyfrog ची simple notepad अॅप वापरा.तिथे लिहून इथे पेस्ट करा.
२. फोटो प्रकाशित करण्यासाठी www.tinypuc.com वापरा.
३. मोबाईलवरुन देवनागरीत लिहिण्यासाठी Lipikaar marathi ही अॅप वापरा.
18 Jul 2018 - 8:42 pm | उपयोजक
१.मोबाईलवरुन लिहिण्यासाठी mightyfrog ची simple notepad अॅप वापरा.तिथे लिहून इथे पेस्ट करा.
२. फोटो प्रकाशित करण्यासाठी www.tinypuc.com वापरा.
३. मोबाईलवरुन देवनागरीत लिहिण्यासाठी Lipikaar marathi ही अॅप वापरा.
18 Jul 2018 - 8:42 pm | उपयोजक
१.मोबाईलवरुन लिहिण्यासाठी mightyfrog ची simple notepad अॅप वापरा.तिथे लिहून इथे पेस्ट करा.
२. फोटो प्रकाशित करण्यासाठी www.tinypic.com वापरा.
३. मोबाईलवरुन देवनागरीत लिहिण्यासाठी Lipikaar marathi ही अॅप वापरा.
18 Jul 2018 - 8:42 pm | उपयोजक
१.मोबाईलवरुन लिहिण्यासाठी mightyfrog ची simple notepad अॅप वापरा.तिथे लिहून इथे पेस्ट करा.
२. फोटो प्रकाशित करण्यासाठी www.tinypic.com वापरा.
३. मोबाईलवरुन देवनागरीत लिहिण्यासाठी Lipikaar marathi ही अॅप वापरा.
18 Jul 2018 - 8:49 pm | उपयोजक
१. mightyfrog ची simple notepad ही app वापरा.तिथे लिहून इथे पेस्ट करा.
२. मोबाईलवरुन मराठी लिहिण्यासाठी Lipikaar Marathi ही अॅप वापरा.
३. मोबाईलवरुन मिपावर फोटोंसाठी www.tinypic.com वापरा.
21 Jul 2018 - 9:19 am | सोमनाथ खांदवे
उपयोजक जी ,
छान माहिती दिलीत व आमच्या सारख्या नवशिक्याच्या ज्ञानात भर पडली आहे .
आता मला हे सांगा मिसळपाव वर एकच प्रतिसाद प्रदर्शित करण्यासाठी काय करावे बरं ?
3 Aug 2018 - 12:47 pm | प्रकाश घाटपांडे
>>>ब्राउजरमध्ये ctrl dot org/google/photos
ही साइट ओपन करा.<<< हे उघडत नाही. ४०४ नॉट फाउंड एरर
3 Aug 2018 - 1:41 pm | टर्मीनेटर
ctrlq.org/google/photos वर गुगल फोटोज ची लिंक पेस्ट करून एम्बेड कोड जनरेट करावा लागतो, त्यामुळे काम वेळखाऊ होते. त्यापेक्षा फेसबुक किंवा गुगल फोटोज ची लिंक डायरेक्ट वापरणे सोयीस्कर पडते.
3 Aug 2018 - 3:03 pm | कंजूस
१) काही मोबाइलमध्ये हवी असलेली इमेज लिंक मिळतच नाही जी 'शेअरिंग लिंक' मिळते त्याने फोटो येत नाहीत म्हणून खटाटोप.
२) ctrl_org मधून लिंक मिळते किंवा " try another link" हा मेसेज दिसला की समजायचे आपल्या फोटोला पब्लिक अॅक्सेस द्यायचा राहून गेला आहे.
३) इंपॅार्टन्ट -
जर का तुम्ही तुमचे फोटो ' backup' करणार असाल 'गुगल_फोटोज'वर तर ते खरेच फुल रेझलुशनचे असायला नकोत का? मोबाइलमधला ४ एमबी फाइल साइजचा फोटो प्रिंट केल्यास चांगला येतो. त्याचा बॅकप जर १८० केबीचा होऊन राहणार असुल तर पुढे त्याचे प्रिंट्स कसे चांगले येणार? गुगल ओएस बॅकप करताना वीसपट ( ९५%) कम्प्रेस करते. वेबसाइट वापरूनच अपलोड करा.
४) आता अवन रिपेअर धाग्यातले फोटो 'सेव इमेज' करून पाहा - ते पाचशे केबीचे कसे आले? त्यासाठी फोनमधले अरिजनल फोटो तीन एमबीचे होते त्यास एका अॅपने (simple photo resizer/photo and picture resizer - developer- farluner) ५००-६०० kB केले नंतर ते फुल रेझलुशन अपलोड केले. म्हणजे फोनमधल्या इनबिल्ट फोटो कम्प्रेसर अॅप'ला बाइपास/ गंडवले आणि हवा तेवढा ठेवला.