वृत्तपत्र ? एक निरीक्षण

सतिश पाटील's picture
सतिश पाटील in काथ्याकूट
29 Jul 2018 - 1:03 pm
गाभा: 

नुकतीच काल एक दुदैवी घटना घडली. दापोली कृषी विद्यापठाची सहल महाबळेश्वरला निघाली असता वाटेत आंबेनळी घाटात अपघात होऊन बस दरीत पडली आणि 33 जणांचा मृत्यू झाला.

यासंबंधी बातमी लोकसत्ता नामक वृत्तपत्रात पान क्रमांक 1,2 आणि 5 वर छापून आलीये, रायगड आणि सातारा प्रशासन, पोलीस, स्थानिक नागरिक, महाबळेश्वर हायकर्स, यांनी घटनास्थळी मदत सुरू केली. पण या सगळ्यात एका नावाचा जाणून बुजून उल्लेख लोकसत्ताने केला नाही. ते नाव म्हणजे स्थानिक आमदार भरत गोगावले.

काल बहुतेक सगळ्या वृत्तवाहिनीवर त्यांचे प्रतिनिधी वा पत्रकार या घटनेची माहिती या आमदारकडुन घेत होते, कारण पत्रकारांच्या आधी ते तिथे लोकप्रतिनिधी म्हणून घटनास्थळी उपस्थित होते, आधी 40 लोक ठार झाले असे वृत्तवाहिन्या सांगत होते तेव्हा भरत गोगावलेंनी 32 ठार आणि एकच व्यक्ती वाचला आहे असे सांगितले तेव्हा मीडियाने बातमीची दुरुस्ती केली.

पण मग लोकसत्ताने बातमी देताना या आमदाराचा उल्लेख का टाळला ? कारण सदर आमदार हे शिवसेनेचे आहेत.

सामना -शिवसेना
लोकमत-काँग्रेस
तरुण भारत- R S S
संध्याकाळ आणि नवाकाळ- शिवसेना, मनसे
सकाळ-राष्ट्रवादी
प्रहार-नारायण राणे

वरील वृत्तपत्रे हे त्या पक्षाला उघड उघड किंवा छुपे समर्थन करतात, विरोधी पक्ष बद्दल नकारात्मक भूमिका मांडतात पण लोकसत्ताने एखादे चांगले काम केलेल्या व्यक्तीबद्दल किंवा तत्सम माहिती लपवून ठेवावी ? कारण काय तर ते आमदार विरोधी पक्षातले आहेत म्हणून ?

सत्य बातमी वाचकांपासून लपवून ठेऊन आपण वाचकांना फसवतोय असं नसेल का वाटत यांना ?

चांगल्याला चांगलं म्हणायचं चांगुलपणा संपला ?

प्रतिक्रिया

प्रसाद_१९८२'s picture

29 Jul 2018 - 2:03 pm | प्रसाद_१९८२

सामना तर सेनेचे अधिकृत मुखपत्रच आहे, त्यातून पक्षाची भुमिका मांडणे त्यांना क्रमप्राप्तच आहे. मात्र स्वत: निधर्मी, पुरोगामी व संतुलित असल्याची जाहिरात करणारी वृत्तपत्रे जेंव्हा एकाद्या पक्षाची तळी उचलतात तेंव्हा त्यांना काय म्हणावे ? शिवाय लोकसत्ताला शिवसेनेचे वावडे आहे असे ही नाही, सामना वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणार्‍या भाजपा विरोधातील बातम्या, लोकसत्ता त्यांच्या प्रथम पानावर छापते.
--
भारतीय प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता दिवसेंदिवस रसातळाला जात आहे. काल टिव्ही ९ नामक मराठी न्युज चॅनेलवर वरिल आपघात कसा झाला हे ग्राफिकच्या माध्यमातून दाखवत होते, त्या ग्राफिक मध्ये आंबेनळी म्हणून जो घाट त्यांनी दाखवला ते पाहून हसावे की रडावे हेच कळत नव्हते.

गामा पैलवान's picture

30 Jul 2018 - 1:45 am | गामा पैलवान

एनडीटीव्हीवर चक्क मुंबई गोवा महामार्गावर अपघात असं म्हणून कशेळी घाट दाखवीत होते!

-गा.पै.

रीडर's picture

30 Jul 2018 - 2:35 am | रीडर

लोकसत्ता मध्ये बातमीचा मथळा 32 मृत असे होता आणि खाली सर्वाना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत असे छापले होते

नाखु's picture

30 Jul 2018 - 9:47 am | नाखु

सध्या जाहिरात पत्र झालेलं असल्याने शिल्लक जागेत शिल्लक अकलेनुसार (कुवतीप्रमाणे) शुल्लक बातम्या रोचक आणि सनसनाटी शीर्षक देऊन टाकण्यात धन्यता मानत आहेत.
त्यांची ई आवृत्ती खरेच "ईईईई" म्हणायला हवी इतकी प्रेक्षणीय असते.

चुकार नाखु वाचकांची पत्रेवाला

सतिश पाटील's picture

30 Jul 2018 - 9:56 am | सतिश पाटील

10 पास झाल्यावर 1 आठवड्याचा क्रॅश कोर्स करुन पत्रकार झालेल्यांची अक्कल ती कितीशी असणार ?
एक वाक्य धड पूर्ण मराठीत बोलता येत नाही यांना. तो ही मुद्दा आहेच पण आपल्या राजकीय सोयीने बातम्या देणे अथवा लपवणे किंवा त्याचा आशय बदलणे ये जास्त भयंकर आहे.

चौथा कोनाडा's picture

30 Jul 2018 - 10:09 am | चौथा कोनाडा

विशिष्ट बाजूला झुकते माप देवऊन, शब्दांचे फेरफार करून, हवे ते उल्लेख अतिठळक करून, नको ते उल्लेख क्षीण अथवा नाहीसे करून स्वःतचे उखळ पांढरे करणार्‍या वृत-संपादकाची चलती आहे सध्या. या लोकांचे भवितव्य उज्वल आहे.

गणामास्तर's picture

30 Jul 2018 - 11:55 am | गणामास्तर

तुम्हाला बर्ट्रांड रसेल माहिती आहे का ?

" त्येनं लई दिसापैलेच यक फिलॉसॉफी मांडून ठिवली हाये. त्यो म्हंतो , ' काई लोकान्ची पब्लिसीटीची स्टाईल आल्लग आस्ती. पेपरवाले आपला फुटू पब्लिश करत न्हाईत ,आपल्याला हाटकून इग्नोअर करतेत आसं अन्नेसेसरी फिलिंग त्येन्ला व्हत आस्तं. आपन लय पुडं जानार हाओत , रेग्युलर मान्सापेक्षा आपल्यात कायतरी स्पेशल हाये, त्ये लोकान्ला कळालं म्हनून ते आपल्याला मागं खेचन्याचं प्लॅनिंग करून ऱ्हायलेत आसं त्यांचं ओपिनियन आस्तं. त्येच्यातच त्येन्ला आनंद आस्तो. मंग आपला फुटू , आपलं नाव लोक कसं पेपरात येवू द्येत न्हाईत ह्येची डिट्टेल स्टोरी त्ये सोताची फिलॉसॉफी मिक्स करून सांगत फिरतेत.
त्येन्ला पेपरात येणाऱ्या फुटूपेक्षा न येणाऱ्या फुटूमंदून जाडा पब्लिसीटी मेळत आस्ती अन त्येच्यातच त्येन्ला इंटरेस्ट आस्तो.
पब्लिसीटी जेव्हडी नाद्दर तेव्हडी खतरनाक आस्ती "

श्रेयअव्हेर - बब्रुवान रुद्रकंठावार