माझा पदार्थ विज्ञान ब्लॉग : मुलांनी Physics मध्ये निदान पास तरी व्हावे यासाठीचा प्रयत्न!!!

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in काथ्याकूट
26 Jul 2018 - 2:00 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

सर्व प्रथम माझ्या ब्लॉग ला तुम्ही देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. मराठी ही ज्ञानभाषा आहे हे तुम्ही तुमच्या प्रतिसादामधून सिद्ध केलंत ..

आज एका महत्वाच्या विषयासंबंधी आपल्याशी बोलणार आहे, तो विषय आहे भौतिकशास्त्र किंवा पदार्थविज्ञान किंवा Physics. न्यूटनची काही सूत्रे व काही formule याच्या पलिकडे या विषयात काही आहे असं फार कोणाला वाटत नाही. त्याला कारण म्हणजे ज्या पद्धतीने याविषया वरील पुस्तके लिहिली जातात आणि त्यातही गणिते सोडवून मार्क मिळवण्यावर भर दिला जातो त्यामुळे या विषयात काही मनोरंजक, मजेदार असू शकेल असं निदान त्या वयातल्या विद्यार्थ्यांना वाटत नाही..

पण या विषयाची गोम म्हणजे तुम्हाला Science ला जायचं असेल तर या विषयाशी सख्य करावंच लागतं..केवळ Physics आवडलं नाही म्हणून Science career सोडलेले खूप आहेत..शिवाय गोगलगाईच्या पोटात पाय असं म्हणतात तसं या Physics विषयाच्या पोटात Maths दडलेलं असतं..एकंदरच अवघड मामला..याचाच चुलत भाऊ Engineering Mechanics हा असून तो भल्याभल्यांना रडवतो..मुलांची वर्ष राहतात..मुलांना नैराश्य येतं..

या सर्व पार्श्वभूमीवर या विषयावर आधारीत गोष्टी मराठीत लिहाव्यात आणि मुलांचा ताण थोडा हलका करावा यासाठी मी एक ब्लॉग सुरु केला..यात विक्रम वेताळाच्या गोष्टींच्या रूपात या संकल्पना मांडत आहे..त्यात भर म्हणजे भारतातील पदार्थ विज्ञानाचे ४-५व्या शतकातील पुस्तक मिळाले..त्याचाही योग्य तेवढा संदर्भ देऊन गोष्टी लिहिल्या, लिहितोय..उद्देश एवढाच की मुलांनी निदान पास होण्यासाठी तरी अभ्यास करावा व नैराश्यातून सुटावं..त्याच साठी सारा खटाटोप..

--तुम्ही अशा विद्यार्थ्यांचे पालक असाल तर या ब्लॉग चा संदर्भ म्हणून वापर करून मुलांना संकल्पना समजवू शकता..
--स्वत: शिक्षक असाल तर शिकवण्यात थोडी मजा आणू शकता..
--विद्यार्थी असाल तर ताण थोडा हलका करू शकता..
--या विषयात नापास झालेल्या, हा विषय जड जाणाऱ्या, हा विषय अजिबात न आवडणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना हा ब्लॉग वाचायला सांगून थोडी मदत करु शकता..

काही सुधारणा सुचवायच्या असल्यास सुचवू शकता..जरूर विचार केला जाईल ..ब्लॉग लिंक खाली देत आहे..प्रतिक्रीया कळवा..वाचायचे पैसे पडत नाहीत!!!
विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात

हे फक्त Physics बद्दल झालं पण इतरही विषयांवर मराठीत लिखाण व्हायला हवं.. विषय अगणित आहेत .. वाचकही अगणित आहेत.. तुमच्या आवडीच्या विषयावर लिहा.. मला जसं मिपा वरच्या मंडळींनी समजून घेतलं तसं तुम्हालाही समजून घेतील.. प्रसंगी दुरुस्त्या सुचवतील .. पण यातून कोणालातरी शिकण्यात मदतच होईल .. त्यामुळे मागे हटू नका..

कळावे लोभ असाच कायम राहावा ही विनंती ..

अनिकेत कवठेकर

प्रतिक्रिया

विज्ञान, गणित, या विषयंची समजच मुलांना आणि पालकांना कमीच असते.

पण तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे.

अनिकेत कवठेकर's picture

28 Jul 2018 - 9:03 pm | अनिकेत कवठेकर

कंजूस साहेब,
ज्या पद्धतीने ह्या विषयावर लिहिलेले आहे त्यामुळे हा घोळ आहे. इतिहास सुद्धा जर सन-सनावळयापुरताच राहिला असता तर कोणी लक्ष घातलं नसतं. तसं जर पदार्थविज्ञानाबद्दल लिहिलं तर थोडी मजा येइल. त्यातून या विषयातील आवडही वाढेल.

दुर्गविहारी's picture

27 Jul 2018 - 7:56 pm | दुर्गविहारी

अतिशय उत्तम संकल्पना. याची अत्यंत गरज आहे. फक्त विषय सोपा करण्यासाठी ब्लॉगमधे काही व्हिडीओ टाकता येतात का फा. कुठलीही गोष्ट व्हिजुअलाईज करता आली तर ती अत्यंत सोपी होते हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

अनिकेत कवठेकर's picture

28 Jul 2018 - 9:07 pm | अनिकेत कवठेकर

आधी लिखाणातून ही अपिल वाढवायचा प्रयत्न करेन..विडिओ वगैरेचे स्किल माझ्याकडे नाही..सूचना चांगलीच आहे..नवीन शिकावे लागेल..जरूर प्रयत्न करु

शेखरमोघे's picture

28 Jul 2018 - 6:23 am | शेखरमोघे

अतिशय गरज असलेला हा विषय आहे. पण हाच काय इतर कुठलाही विषय समजण्यापेक्षा त्यात साचेबद्ध उत्तरे देऊन जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येतील हाच जर सगळ्यान्चा प्रयत्न असेल तर विषय सोपा करण्यासाठी काहीही करून दिले तरी त्यात कुणीच डोके घालणार नाही. उत्तम resource material!

अनिकेत कवठेकर's picture

28 Jul 2018 - 9:14 pm | अनिकेत कवठेकर

पण गोष्टीरूपात लिहून थोडी मजा आणली तर नक्कीच थोडे प्रयोग करण्याची ईच्छा निर्माण होऊ शकते, शिवाय मराठीतून विषयाचा गाभा जास्त परिणाम कारकपणे पोहोचतो ही मातृभाषेची ताकद आपल्याला जाणवल्याशिवाय राहणार नाही.

balasaheb's picture

28 Jul 2018 - 10:04 am | balasaheb

खुप मस्त

अनिकेत कवठेकर's picture

28 Jul 2018 - 9:08 pm | अनिकेत कवठेकर

प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद..

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jul 2018 - 9:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्पृहणिय उपक्रम ! त्याला उत्तम यशासाठी शुभेच्छा !

अनिकेत कवठेकर's picture

29 Jul 2018 - 12:10 am | अनिकेत कवठेकर

धन्यवाद..कळावे लोभ असावा ही विनंती!

सतिश गावडे's picture

28 Jul 2018 - 10:21 pm | सतिश गावडे

ते डेरीव्हेटीव्ज आणि इंटीग्रेशन कधी आणि कशासाठी वापरतात तेही लिहा ना कधीतरी. बरीच वर्ष झाली त्याचा "अभ्यास" करुन. मात्र ते नेमकं कधी आणि कुठे वापरत असतील हा प्रश्न मनाला नेहमी सतावत असतो ;)

नशिब, दैव हे व्हेक्टर अल्जिब्रामधल्या रिझल्टंट व्हेकटरसारखे आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात अनेक बरेवाईट घटक असतात जे आपल्या आयुष्यावर, आपल्या ध्येयांवर, स्वप्नांवर परीणाम करत असतात. काही चांगला परीणाम करतात तर काही वाईट. काही आपल्या स्वप्नांना पुरक असतात तर काही आपल्या स्वप्नांच्या गळ्याला नख लावतात. हे सारे घटक म्हणजेच व्हेक्टर्स. त्यांची परीणाम करण्याची क्षमता म्हणजे त्यांची "मॅग्निट्युड" आणि ते घटक आपल्या स्वप्नांना पुरक आहेत की मारक यावरुन ठरते त्यांची डायरेक्शन. यातले दोन महत्वाचे व्हेक्टर म्हणजे आपली ईच्छाशक्ती आणि आपले प्रयत्न. या सगळ्यांचा जो काही एकत्रित प्रभाव असतो तो असतो रिझल्टंट व्हेक्टर. ज्याला आपण रोजच्या भाषेत नशीब किंवा दैव म्हणतो.