मला डिसेंबर 2018 मध्ये राजस्थान मध्ये 6 ये 7 दिवस पर्यटनासाठी जायचे आहे...
मी कोणत्याही टूर पॅकेज मधून न जाता स्वतः नियोजन करून जायचं ठरवलं आहे.
आम्ही 8 प्रौढ आणि 5 लहान मुले आहोत....
तरी राजस्थान बाबत माहिती आणि नियोजन बाबत जाणकारांकडून माहितीची अपेक्षा आहे....
कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती.....
प्रतिक्रिया
17 Jul 2018 - 6:05 pm | कंजूस
सात दिवसांत राजस्थानातला थोडा भाग पाहून होतो. पॅलेस आणि म्युझिअम लहान मुलांना बोअरिंग आहेत. ठिकाणं निवडावी लागतील सर्वांना आवडणारी.
राजस्थान स्वत: फिरणे अजिबात अवघड नाही.
कुठून जाणार? मुंबईकडून उत्तम गाड्या आहेत. पुण्याकडून कमी.
18 Jul 2018 - 8:39 pm | टर्मीनेटर
२ दिवस माउंट अबू आणि ३ ते ४ दिवस उदयपुर मध्ये वास्तव्य केल्यास ६-७ दिवसांत राजस्थानातला मेवाड प्रांत व्यवस्थित बघता येऊ शकेल.
माउंट अबू , कुंभलगड, चितोडगड, हल्दीघाटी, नाथद्वारा, राणकपूर, एकलिंगजी, थोडेसे दुर्लक्षित असलेले परंतु खजुराहो प्रमाणे लेणी असलेले अत्यंत सुंदर असे सहस्त्रबाहू (अपभ्रंश होऊन सास बहु ) मंदिर , आणि उदयपुर शहर अशी ठिकाणे पाहता येतील. एकूण १३ जण आहात तर हि सर्व ठिकाणे पाहण्यासाठी उदयपुर पासून सुरुवात करून परत उदयपुर ला येण्यासाठी टेम्पो ट्रॅव्ह्लर किंवा फोर्स असे वाहन बुक करता येईल.
19 Jul 2018 - 10:15 am | कंजूस
हाच भाग केला आहे पण अबु त्याला जोडले नाही, वेगळी ट्रिप केली.
बरेच लोक जमा केले की नावे सुचवत राहतात हे करायचं ते करायचं पण नकाशाप्रमाणे काय सोयीचं आहे कुणालाच माहित नसते. एका शहरात राहून एकेक/दोनचार ठिकाणं करून परत त्याच शहरात येण्यात बराच वेळ वाया जातो.
अबु - उदयपूर दोनशे किमि आहे.
अबु -अंबाजी-पाटण-मोढेरा-अहमदाबाद ही ट्रिप वेगळी करणे सोयीचं आहे.
कोटा(मेन लाइन स्टेशन) कोटा - बुंदी-।।।-चितोडगड-उदेपुर ।।-एकलिंगजी+नाथद्वारा+हल्दिघाटी परत।। उदेपुर शहर बाग पॅलेस दर्शन।। उदेपुर-राणकपुर।।राणकपुर-फलना रेल्वेस्टेशनमेन लाइन.
उदयपुर आडमार्गावर आहे.
कोटा आणि फलना इथे जाण्यायेण्यासाठी भरपूर गाड्या आहेत.
कुंभालगड नक्की कुठे आहे? :- वर दिलेल्या "एकलिंगजी+नाथद्वारा+हल्दिघाटी पुढेच कुभालगडमार्गे फलना स्टेशनला जाता येते. थोडक्यात कुंभाल डोंगराच्या दोन बाजुनी फलना ते उदयपुर रस्ते आहेत. उजवीकडे हा रस्ता आणि डावीकडून राणकपूरमार्गे.
13 Aug 2018 - 1:20 pm | टर्मीनेटर
@ कंजूस. माफ करा हा प्रतिसाद वाचायचा राहून गेला होता. आम्ही माउंट अबू हून उदयपूरला येताना राणकपूर - कुंभलगड -एकलिंगजी - सहस्त्र बाहू मंदिर असे करत आलो होतो. आणि दुसऱ्या दिवशी उदयपुरहून चितोडगड - नाथद्वारा - हल्दीघाटी राणाप्रताप म्युझियम बघून परत उदयपूरला आलो होतो.
13 Aug 2018 - 3:44 pm | कंजूस
टुअर/टॅक्सीवाले फार उलटसुलट फिरवतात. त्यात प्रवासात वेळ जातो आणि बघायला रेंगाळायला वेळ कमी उरतो.
23 Jul 2018 - 6:35 pm | राजेंद्र मेहेंदळे
फायनल झाले की कृपया ईथे टाका, म्हणजे सर्वांना उपयोगी होईल
24 Jul 2018 - 1:57 pm | कंजूस
>>सर्वांना उपयोगी होईल>>
बरोबर जाणाऱ्या लोकांच्या वयोगटाप्रमाणे आवडीनिवडी बदलतात हो. मुलांना घेऊन अजमेर दर्गा, पुष्कर तीर्थ करणे वेळेचा अपव्यय.
पाच दिवस फक्त अबु पाहून आलो आहे.
12 Aug 2018 - 6:28 pm | चारु राऊत
मी राजस्थान ची बहुतेक शहरे रात्री रेल्वे चा प्रवास व सकाळी रीटायरिंग रूम मध्ये प्रातर्विधी करून थोड्या दिवसात भरपूर राजस्थान पहिले आहे कारण बहुतेक शहरे ठराविक अंतरावर आहेत.
12 Aug 2018 - 6:29 pm | चारु राऊत
मी राजस्थान ची बहुतेक शहरे रात्री रेल्वे चा प्रवास व सकाळी रीटायरिंग रूम मध्ये प्रातर्विधी करून थोड्या दिवसात भरपूर राजस्थान पहिले आहे कारण बहुतेक शहरे ठराविक अंतरावर आहेत.