करप्ट एसडी कार्डावरचा डेटा मिळवणे

Primary tabs

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
16 Jul 2018 - 7:34 pm

**************

कंजूस यांचे सर्व लेखन इथे पाहा

p1>
***************

जिस का फोन छोटा उस का भी बडा नाम है।

करप्ट एसडी कार्ड उघडणे

परवा एक मेमरी कार्ड स्मार्टफोनमध्ये " मेमरी कार्ड इज आइदर करप्ट / अनवेलबल" ( sd card is either corrupt or unavailable )
मेसेज झळकवू लागले.
सेट अप / फॅार्मॅट ? ( set up / format?)

त्यामध्ये १२-१३ जीबी फोटो/व्हिडिओ होते.
तर ते फॅार्मॅट न करता फोन बंद करून sd card काढून घेतले.
एक नोकिआचा जुना फोन X2 - 00 आहे त्यात टाकून पाहिले. ते चालू झाले - म्हणजे ओपन झाले. या फोनला OTG support आहे. एक पेनड्राइव जोडले.
करप्ट कार्डाचे नाव बदली केले ते तात्पुरतेच झाले, पुन्हा परत NO NAME राहिले. आतले फोल्डर डिलीट होत नव्हते. - डिलीटेड हा मेसेज दिसायचा पण काहीच फरक पडायचा नाही.

फोल्डर कॅापी टु पेनड्राइव झाले( एकेक केले, मार्क ओल नाही) आणि सर्व फोटो/ विडिओ मिळाले.

आता काम तर झाले म्हणून हे करप्ट कार्ड परत स्मार्टफोनात टाकून फॅार्मॅट केल्यावर काहीच फरक पडला नाही. पुन्हा नोकिआ फोनमध्ये उघडते का पाहिले तर उघडले जात आहे. कार्ड पुन्हा वापरता येणार नाही परंतू फोटो - विडिओ मिळाले यातच आनंद.

फोटो १

फोटो २

एक सूचना -

१) छोटे फोन एक कार्ड आणि एक एक्सटर्नल ड्राइव जोडल्यास ,डेटा ट्रानस्फरला बॅट्री फार खातात. दोन चार जीबी डेटा पाठवला की दहा मिनिटांत बॅट्री संपते. सावकाश करायचे चार्जर लावून किंवा थांबून.

२ ) एसडी कार्ड निरनिराळ्या कारणाने बंद पडत असेल. प्रत्येकवेळी याच पद्धतीने उघडेलच असं नाही. माझा एक अनुभव लिहिला.

३) दुसय्रा एका फोनमध्ये ( लुमिआ) बरेचदा " there is a problem reading sd card, scan and rectify - yes/no? " हा मेसेज येतो. याचे कारण मला माहित आहे. युट्युब विडिओ डाउनलोड केल्यामुळे होतं असं. ते विडिओ डिलीट केल्यावर आपोआप ठीक होतं.

४) स्मार्टफोनमधले एसडी कार्ड अथवा जोडलेले पेनड्राइव काढण्याअगोदर
* सेटिंग्जमध्ये जाऊन " Eject memory/sd card / external USB Drive " वर क्लिक करावे.
* त्यानंतर " **card/USB is safely ejected " हा मेसेज येऊन नोटिफिकेशन पट्टीतील त्रिशुळची खूण गेल्यावरच ते काढावे.
मी वापरलेला X2-00 हा हॅाटस्वॅाप फीचर असलेला फोन असल्याने तो बंद न करता ( कार्ड वापरत नसता) कार्ड काढता येते.

आपले काही अनुभव अवश्य लिहा. इतरांना उपयोग होईल.

सूचना आणि शंकांचे स्वागत.

प्रतिक्रिया

प्रसाद_१९८२'s picture

16 Jul 2018 - 7:50 pm | प्रसाद_१९८२

माझे ही एक मेमरी कार्ड फोन मध्ये टाकल्यावर अश्याच तर्‍हेचा दुसरा मेसेज येतो, कार्ड मोबाईल मधे डिटेक्टच होत नाही, मात्र तेच कार्ड दुसर्‍या गाणी वाजवायच्या प्लेयर मध्ये टाकले तर त्यात असणारी गाणी व्यवस्थित प्ले होतात. नक्की काय प्रॉब्लेम असावा ?

मोबाइलच्या मेमरी स्लॉटमध्ये दुसरे कार्ड चालते का? जर दुसरे कार्ड चालत नसेल तर स्लॉट खराब आहे.

चौथा कोनाडा's picture

16 Jul 2018 - 10:26 pm | चौथा कोनाडा

वाह, भारीच की ! डाटा मिळाला !
सोबत लिहिलेले तपशिल मार्गदर्शक आहेत.
धन्यू कंजूससाहेब !

प्रचेतस's picture

17 Jul 2018 - 2:55 pm | प्रचेतस

उत्तम माहिती

पैलवान's picture

19 Jul 2018 - 10:01 pm | पैलवान

बाकी नोकियाचे दणकट फीचरफोन एकदम मस्त असायचे. आता कोणतीच कंपनी असे फोन बनवत नाही.

श्रीमान's picture

24 Jul 2018 - 3:56 pm | श्रीमान

linux os वर corrupt card easily read aani format hote try kara