हजारो बेटांचा देश...... फिनलँड.... भाग ४ हेलसिंकी सांबा कार्निवल.

बरखा's picture
बरखा in भटकंती
28 Jun 2018 - 7:39 pm

https://www.misalpav.com/node/42878 भाग १
https://www.misalpav.com/node/42891 भाग २
https://www.misalpav.com/node/42898 भाग ३

हेलसिंकी मधे सिनेट स्क्वेअर नावाचे एक ठिकाण आहे. येथे एक भले मोठे चर्च असून चर्च समोरील मो़कळ्या जागेवर विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. येथेही बेरेच पर्यटक भेट देण्यास येतात. आम्ही ईथे आलो ते सांबा कार्निवल बघायला. सांबा हा एक नृत्याचा प्रकार आहे. येथिल जेवढे सांबा स्कूल आहेत ते सर्व मिळून या कार्निवलचे आयोजन करतात. यात लहान लहान चिमूकल्यांपासून ते वयच्या सत्तर- पंच्याहत्तरीतील तरून तरूणी यांचा सुध्धा सहभाग असतो ( या वयात ईतक्या हिरहिरीने भाग घेऊन सगळी ड्रेपरी अंगावर परिधान करून नाचणे म्हणजे सोपे न्हवे. म्हणून त्यांना ज्येष्ठ, अथवा वृद्ध संबोधने मला पटले नाही)
या कार्निवल मधे वेग वेगळे गट असतात. एक गट पुढे गेला की त्याच्या मागे दूसरा गट असे करत ही परेड चालू होते. ठराविक रस्त्याने आपली नृत्य कला सादर करत हे गट शेवटच्या ठिकाणापर्यन्त जातात.
यात मला विषेश आवडलेली गोष्ट म्हणजे विविध पाना फुलांनी सजवलेल्या गाड्या ह्या हाताने ओढून पुढे नेल्या जात होत्या. कुठेही जनरेटर अथवा तत्सम प्रकारच्या विजेचा अथवा धुर सोडून प्रदूषण वाढवण्यार्‍या गोष्टी दिसून आल्या नाहीत. पारंपारिक वाद्यांचा वापर, तसेच स्वताहाच गाणे म्हणने, किंवा एकादी सीडी लवलेली असल्यास ती फक्त छोट्या स्पिकर चालू ठेवलेली होती. जेणे करून ध्वनी प्रदूषणही होऊ नये. या गोष्टी सर्व गटांनी पाळल्या होत्या.
कार्निवल साठी केली गेलेली वेशभूषा, केशभूषा, सजावट हे सगळ बघण्यासारख असत.

सिनेट स्क्वेअर वरील पायर्‍यांवर बसून कार्निवलचा आनंद घेताना पर्यटक आणि स्थानिक लोक. मागे पांढर्‍या रंगातील मोठे चर्च.

C

ही परेड साधारण तीन तास चालते. दिलेल्या वेळेत परेड सुरू झाली. एका गाडीत राजा- राणिचा वेष परिधान केलेली जोडी बसलेली होती. ह्यांच्या गाडीने परेडची सुरूवात झाली.

A

काळ्या रंगातील कपडे परिधान केलेले लोक हाताने रथ ओढुन नेताना...

R

G

आपले वय विसरून कार्निवलचा आनंद घेणारी एक युवती.....

Y

G

D

D

पारंपारिक वाद्य वाजवताना एक गट...

G

अजुन एक..
D

D

D

सुंदर अश्या पर्‍या...

P

सीडींचा वापर करून बनवलेली वेषभूशा...

C

D

C

आई सोबत या कार्निवल मधे सहभागी झालेली ही चिमुकली फोटो साठी पोज देताना....

P

D

P

A

छोटे राजा-राणि...

R

A

पानाफुलांनी सजवलेला ड्रेस...

A

P

वाद्य वाजवणारा अजून एक गट...

V

A

हिला बघितल्यावर मला चल रे भोपळ्या टूणूक टूणूक ही गोष्ट आठवली...

C

शुभ्र हा पिसारा...

P

A

B

P

भारतीय वेशभूषेतील काही युवती...

V

G

विष्णूरुप....

V

P

D

भारतीय वेशातील जोडी...

B

प्लास्टिक बाटल्यांचा वापर करून तयार केलेला पिसारा...

P

हातात त्रिषूळ घेतलेली युवती...
T

A

D

ही युवती सगळ्यांना चॉकलेट देत होती. तुम्ही पहिली चॉकलेट खिशात घालून परत तिच्याकडे मागीतली तरी वाकड तोंड न करता पुन्हा तेवढ्याच आनंदाने आपल्या हातात चॉकलेट ठेवत होती....

C

B

D

D

D

पुढील भाग..... लवकरच

प्रतिक्रिया

अमोल काम्बले's picture

29 Jun 2018 - 6:29 pm | अमोल काम्बले

सुन्दर छायाचित्र. मस्तच!!!!

तुषार काळभोर's picture

1 Jul 2018 - 10:05 am | तुषार काळभोर

भारतीय संदर्भातील सहभागी व्यक्ती पाहून आश्चर्य वाटले.

टर्मीनेटर's picture

2 Jul 2018 - 8:59 pm | टर्मीनेटर

रंगसंगती खूप छान वाटली.

दुर्गविहारी's picture

3 Jul 2018 - 11:01 am | दुर्गविहारी

भारतीय वेषातील लोक पाहून मजा वाटली. अगदी प्लॅस्टिकचा पिसारा घातलेल्या युवतींची वेशभुषाही भारतीय वाटते, एखाद्या कोळीणीसारखी. याची थोडी माहिती देता आली असती तर बरे झाले असते. बाकी फिनलंडची खुप छान माहिती मिळते आहे. स्कँडेनेव्हीयन देश खुप सुंदर आहेत असे एकून आहे, पण तुमच्यामुळे त्यांची सफर होते आहे. पुढचा भाग लवकर टाका.

प्रत्यक्षात असते तर! लेखमाला आणि चित्रे सुंदरच. धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jul 2018 - 11:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर भाग ! सांबा फेस्टिवलच्या चित्रांनी खूप मजा आणली !

फिनलँडमध्ये भारतिय देव आणि पोषाख यांच्याबद्दल आकर्षण आहे हे पाहून आश्चर्ययुक्त मजा वाटली ! :)