हजारो बेटांचा देश...... फिनलँड.... भाग २

बरखा's picture
बरखा in भटकंती
26 Jun 2018 - 9:22 pm

https://www.misalpav.com/node/42878 भाग १

पहिले सुरुवात करुयात फिनलँडबद्दलच्या माहितीने. पहिल्या धाग्याच्या प्रतिक्रिया वाचल्यावर असे वाटले की या देशाबद्दल थोडी माहिती द्यायला हवी. म्हणुन ती पहिली देत आहे. नुसत नावावरून हे नेमक कुठ आहे? असाच भाव मी बर्‍याच जणांच्या चेहर्‍यावर बघितला. मी सुद्धा त्यातलीच एक. मग आंतरजालावर याची माहिती मिळवली. घराजवळची नेमकी खुण काय असे आपण विचारतो, त्या भाषेत सांगायचे झाले तर स्विडन आणी नॉर्वेच्या जवळ फिनलँड हा देश आहे. युरोपमधिल आठव्याक्रमांकावर हा देश आहे.या देशाची लोकसंख्या ५.५ दशलक्षच्या जवळपास आहे. हेलसिंकी याची राजधानी आहे.
Flag
युरोप मधे येणारा हा देश बाल्टीक समुद्राने वेढलेला आहे. पांढरा आणि निळा रंगांचा वापर असलेला ह्या देशाचा झेंडा आहे. येथील हवामान बहुतांशी थंडच असते. अगदी समर म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा तापमान कधी कधी १३अं पर्यन्त खाली जाते. उन्हाळ्यामधे सुर्यप्रकाश हा रात्रीचे बारावाजेपर्यन्त दिसतो. बाहेर लख्ख उजेड असतो. जणू घरात बिना लाईट लावता राहिले तरी काही हरकत नाही. जेमतेम पाच सहा तास अंधार असतो. तर हिवाळ्यात संध्याकाळी चार वाजताच अंधार पडायला सुरुवात होते. दिवसा घरात उजेडासाठी लाईट लावावी लागते. कधीही पाऊस पडू शकतो. जुन जुलै अशी ईकडे शाळेची सुट्टी असते. बरेच लोक उन्हाळ्यात लांबच्या सुट्टीवर जातात. तसेच या वातावरणात फिरण्यासाठी भटकंतीला जातात. या मोसमाचा पुरेपुर आनंद घेण्याचा प्रयत्न ईथले लोक करतात. कारण याच महिन्यांनमधे सुर्यकिरणे त्यांना मिळतात. कारण एकदा का हिवाळा सुरु झाला की सुर्यप्रकाश फक्त नावापुरताच राहतो. बाहेर -२०,-२५अं असे तापमान असते आणि सगळी कडे बर्फ असतो. मग अशावेळी हे लोक सौना घेतात. सौना हा जणु ह्यांच्या संस्कृतीचा एक भाग असल्या सारख आहे. कॉमन सौना खुप ठिकाणी आढळून येतो, तसेच बर्‍याच जणांच्या घरात या साठी वेगळी जागाच ठेवलेली असते. ( सौना म्हणजे एका बंदीस्त खोलीत गरम वाफ अंगावर घेणे आणि त्यातून अंगावर घाम तयार करणे. ही वाफ तयार होण्यासाठी एका डब्यात मोठाली दगड अतिउच्च तापमानावर तापवली जातात आणि मग त्यावर थोडा थोडा वेळाने पाणि टाकत रहायचे. त्या तापलेल्या दगडांवर पाणि पडताच जी वाफ तयार होते ती त्या बंद खोलीत साठून राहते. आपल्या शरीराला सोसेल ईतपत ही वाफ घेऊन आपण बाहेर पडावे. ऊगा समोरचा आपल्यापेक्षा जास्त बसला आहे म्हणून आपणही बसु नये. त्याने शरीरास अपाय होऊ शकतो. )
Sauna
आम्ही अगदी योग्य वेळेत आल्याने सध्या भ्रमंती करता येत आहे. मुख्य करून ईकडे फिनीश आणि स्विडीश भाषा बोलली जाते. ईकडची शिक्षण पद्धती खुप चांगली आहे. त्यामुळे बाहेरुन विद्यार्थी शिक्षणासाठी ईकडे येण्याचे प्रमाण बरेच आहे.
ईकडे फिरण्यासाठी बस, मेट्रो, ट्राम, जहाच यांचा वापर करता येतो.
Tram
यात मला गंमत वाटली ती ही कि एकदा का तुम्ही तिकिट घेतल की ते बस पासुन जहजापर्यन्त सगळ्यांना चालत. तुम्ही कुठेही बसु शकता आणि कुठेही उतरू शकता. तिकिट घेतल्यापासून पुढे दिड तासापर्यन्त ते चालते. त्या वेळात तुम्ही कुठलही वाहन कितीही वेळा वापरू शकता. फक्त पुण्याप्रमणे ईकडेही वेग वेगळे रिजन म्हणजे नगरपलिका आणि त्यांच्या हद्दी आहेत. तुम्हाला ज्या रिजन मधे जायचे आहे त्या रिजनचे तिकिट काढायचे. एका रिजनचे तिकिट दुसर्‍या रिजनला चालत नाही.

पुढचा भाग लवकरच... ( सुओमेनलिना किल्ला )

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

26 Jun 2018 - 10:54 pm | धर्मराजमुटके

एका शब्दात वर्णन करायचे झाले तर फिनलँड म्हणजे "नोकिया" !
केवळ नोकिया मुळे ह्या कधीही न पाहिलेल्या देशाबद्दल ममत्त्व बाळगून आहे.

सोमनाथ खांदवे's picture

27 Jun 2018 - 7:54 am | सोमनाथ खांदवे

उत्तम माहिती दिली , बर्फाळ देशाच बऱ्याच लोकांचा विक पॉईंट आहे , पण लेख अजून मोठे टाका .
वाचायला सुरुवात केल्या नंतर अर्धवट जेवल्या सारख वाटत .

यशोधरा's picture

27 Jun 2018 - 8:01 am | यशोधरा

छान!!

निशाचर's picture

27 Jun 2018 - 8:27 pm | निशाचर

वाचत आहे. पुभाप्र