आज होळी !
पार्टीला चकना पाहीजे का नको :?
पाहीजे ना ?
चला उठा बघू चला मार्केट मध्ये... भाजी मंडी मध्ये लेका रिलायन्स फ्रेश मध्ये नको... !
मस्त पैकी भाजी निवडा.
१. बंद गोभी
२. कांदा
३. गाजर / मुळे
४. काकड्या
५. पालक / मेथी
६. लिंबू
७. मिठ
८. बस्स झाली लिस्ट पुर्ण !!
मग गल्लीतल्या वाण्याकडे चला.
१. चार अंडी ( प्रत्येकी )
२. हल्ल्दीराम भुजीया
३. उत्तम वटाणे (लाल / पिवळे)
४. रेडी मिक्स मसाला
****
कृती :-
१. बंद गोभी ला आडवा पकडा व हातात सुरी घेऊन त्याला ओट्यावर ठेवा व जोरदार हल्ला चढवा, जेवढे बारिक करता येईल तेवढे बारीक तुकडे बंद गोभी चे करा.
२. कांदा गोल कापा ने आपल्याला बापजन्मामध्ये जमायचं नाय.. त्यामुळे जसा कापता येईल तसा कापा.
३. गाजर चे कातडे काढा.. व त्याचे बारिक बारिक तुकडे करा.
४. काकड्यांचा पण हाल सेम टू सेम गाजरासारखा करा.
५. लिंबू कापून तयार ठेवा.. आडवा कापा.. उभा नको.. लफडा होतो म्हणतात.
६. ते सर्व मिश्रण एका परातीत घाला ( बंद गोभी, कांदा, गाजर्,काकड्या )
७. वरून रेडीमिक्स मसाला टाका जेवढा पाहीजे तेवढा.. हलके मिठ.. चवी साठी.. व लिंबू पिळा.
८. सर्व मिश्रण एकजिव होऊ पर्यंत हवेत उडवा व परातीत धरा.. प्राक्र्टीस असेल तरच उडावा उडवी करा नाय तर सरळ हाताने मिक्स करा.
९. आता ह्या मध्ये हल्ल्दीराम भुजीया व वटाणे पसरवा...
१०. जी अंडी आणली आहेत त्यांचीइ भुर्जी कोणा जाणकार कडून करुन घ्या व ती पण वर तयार केलेल्या मिश्रणावर पसरा.
११. बाटली उघडा व आपला एवन चकण्या बरोबर मज्जा करा... फुलटू !
१२. भांडी, प्लेटे कोन धुणार आहे हे आधीच ठरवा.. नंतर वाद नको.
***
चकना स्पेशल !!!! आप भी खाओ अपने दोस्तो को भी खिलाओ !!!! बाट के खाने से प्यार बढता है..... आप को हमारी रेसेपी अच्छी लगी होगी तो आप हमे लिखना ना भुले... ! - फिर मिलेंगे अगली पार्टी पे .. तबतक नमस्कार!
प्रतिक्रिया
10 Mar 2009 - 4:16 pm | दशानन
माझ्या धांदरट पणामुळे मी एक धागा उडवला व दुसरा कोणी तरी संपादकाने उडवला... :(
पण जय हो कॉपी-पेस्ट भगवान की ;)
10 Mar 2009 - 4:18 pm | अवलिया
जावे कशाला संपादकाच्या कामात लुडबुड करायला... चहा शिग्रेट बोलीवर आहेत ना, करतील त्यांना जे करायचे ते.. !!!
-- अवलिया
10 Mar 2009 - 4:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
राजे स्वारी हा! तुम्हीच प्रतिसाद दिलात 'कोणीतरी एक धागा उडवा' म्हणून मी तत्परतेने उडवला. मग 'ब्याक' बटणाची जादू वापरून सिलेक्ट-पेश्टची दुसरी जादू वापरून तुमच्या खवत चिकटवला.
पाकृ वाचायला वेळ नाही, पुरणात गूळ आणि वेलची घालायची आहे.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
10 Mar 2009 - 4:21 pm | अवलिया
फटु?
10 Mar 2009 - 4:23 pm | दशानन
अजून म्याबी ट्राय नाय केला हाय हा प्रकार... कुणी तरि करु दे... त्यांचे काय हुतं ते बघू मग आपण तयार करुन फुटु काढू ;)
कसं ! बराबर ना !
10 Mar 2009 - 4:25 pm | झेल्या
=))
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
10 Mar 2009 - 4:22 pm | सँडी
झ्याक!
>>बाटली उघडा
मला ऐवढेच आइकु आले...आनि मी परात सोडुन बाटली पकड्ली! आता येउद्या चक्ना!
-टांगा पल्टी सँडी
10 Mar 2009 - 4:27 pm | निखिल देशपांडे
राजे पाकृ पण.... सहि आहे....
बाटली उघडा व आपला एवन चकण्या बरोबर मज्जा करा... फुलटू !
हे वाचल्या नंतर पुढ्चे काय वाचणार.....
भांडी, प्लेटे कोन धुणार आहे हे आधीच ठरवा
हा खुप महत्वाचा मुद्दा आहे.... आमच्या कडे ह्यावरुन वाद नक्कि आहे....
10 Mar 2009 - 4:30 pm | मदनबाण
३. गाजर चे कातडे काढा.. व त्याचे बारिक बारिक तुकडे करा.
खपलो,,,मेलो,,,,वारलो,,,,,,,तिरडीवर झोपलो....
असे ते गाजर नक्कीच म्हणत असेल नाही ? :D
(शाकाहारी)
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
10 Mar 2009 - 4:34 pm | दशानन
(शाकाहारी)
मदनबाण.....
अंडे नाही घातले तरी चालेल त्यात
10 Mar 2009 - 4:37 pm | दिपक
10 Mar 2009 - 4:42 pm | दशानन
लै भारी !!!!
=))
सही दिपक राव, तुमच्या कल्पकतेला सलाम !!